M’Cheyne Bible Reading Plan
दीपवृक्ष
8 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “मी तुला दाखविलेल्या जागेवर सात दिवे ठेवण्यास अहरोनास सांग, म्हणजे त्यांचा प्रकाश दीपवृक्षा समोरच्या जागेवर पडेल.”
3 परमेश्वराने मोशेद्वारे दिलेली आज्ञा अहरोनाने मानून त्याने तसे केले; त्याने त्या दिव्यांची तोंडे योग्य दिशेकडे करुन ते योग्य ठिकाणी ठेविले, त्यामुळे दीपवृक्षासमोरील भागावर त्यांचा उजेड पडला. 4 परमेश्वराने मोशेला दाखविल्याप्रमाणे दीपवृक्ष त्यांच्या बैठकीपासून तर त्याच्या सोनेरी पानापर्यंत घडीव सोन्याचा केला होता.
लेवी लोकांचे समर्पण
5 परमेश्वर मोशेला म्हणाला, 6 “लेवी लोकांना इतर इस्राएल लोकांपासून वेगळे कर; व त्यांना शुद्ध कर. 7 त्यांना शुद्ध करण्यासाठी पापार्पणातील पवित्र पाणी त्यांच्यावर शिंपड म्हणजे त्या पाण्यामुळे ते शुद्ध होतील. मग त्यांनी आपल्या अंगावरील केस काढावेत आणि आपले कपडे धुवावेत; त्यामुळे ते शुद्ध होतील.
8 “लेवी लोकांनी एक गोऱ्हा घ्यावा; त्या सोबत अर्पिण्यासाठी तेलात मळलेल्या पिठाचे अन्नार्पण घ्यावे; मग त्यांनी पापार्पणासाठी आणखी एक गोऱ्हा घ्यावा. 9 तू लेवी लोकांना दर्शनमंडपासमोरील अंगणात आण व मग सर्व इस्राएल लोकांना तेथे एकत्र जमव 10 मग लेवी लोकांना परमेश्वरासमोर आण; तेव्हा इस्राएल लोकांनी त्यांच्या डोक्यावर आपले हात ठेवावे. 11 नंतर अहरोनाने त्यांना परमेश्वराला समर्पित करावे. अशा रितीने लेवी लोक पवित्र परमेश्वराची सेवा कराण्यास पात्र होतील.
12 “मग लेवी लोकांना आपले हात गोऱ्ह्यांच्या डोक्यावर ठेवण्यास सांग एक गोऱ्हा परमेश्वरासाठी पापार्पण म्हणून व दुसरा होमार्पण म्हणून होईल. ह्या अर्पणामुळे ते लेवी लोक शुद्ध होतील. 13 मग लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या समोर उभे राहण्यास सांग. मग त्यांचे ओवाळणीचे अर्पणा प्रमाणे ते परमेश्वराला अर्पण कर. 14 त्यामुळे ते लेवी पवित्र होतील. ते इतर इस्राएल लोकापेक्षा वेगळे असतील, व ते माझे लोक होतील.
15 “तेव्हा तू लेवी लोकांना शुद्ध कर आणि ओवाळणीचे अर्पणा प्रमाणे परमेश्वराला त्यांना समर्पित कर. तू हे केल्यानंतर त्यांनी दर्शनमंडपात येऊन आपले काम करावे. 16 इस्राएल लोकांनी लेवी लोक मला द्यावेत. ते माझे होतील. पूर्वी मी प्रत्येक इस्राएलास सांगितले होते की प्रत्येक घरातून प्रथम जन्मलेला मुलगा मला द्यावा. परंतु आता इतर इस्राएलातील प्रथम जन्मलेल्या मुलांच्या ऐवजी मी लेवी लोक घेत आहे. 17 इस्राएलात प्रथम जन्मलेला प्रत्येक नर माझा आहे; मग तो माणसापैकी असो किंवा पशूपैकी असो, तो माझाच आहे; कारण मी मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेली मुले व पशू मारुन टाकिले आणि म्हणून प्रथम जन्मलेले मुलगे मी माझ्याकरता निवडून घेतले. 18 परंतु आता इस्राएल लोकातील सर्व प्रथम जन्मलेल्या ऐवजी मी लेवी लोक घेतले आहेत. 19 इस्राएल लोकातून मी लेवी लोक निवडले आहेत आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना मी ते दान म्हणून देत आहे. दर्शनमंडपात लेवी लोकांनी सर्व इस्राएल लोकाकरिता काम करावे अशी माझी इच्छा आहे. ते इस्राएल लोकांसाठी असलेली प्रायाश्चिताची अर्पणे करतील त्यामुळे इस्राएल लोक शुद्ध होतील. मग इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले तरी त्यांना भारी आजार किंवा त्रास होणार नाही.”
20 तेव्हा मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मानून परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे त्यांनी लेवी लोकाकरिता सर्वकाही केले. 21 लेवी लोकांनी स्नान केले व, आपले कपडे धुतले. तेव्हा अहरोनाने त्यांना ओवळणी च्या अर्पणाप्रमाणे परमेश्वराला अर्पिले, आणि त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करुन त्याने त्यांना शुद्ध केले. 22 त्यानंतलेवी लोक सेवा करण्यास दर्शनमंडपात आले. अहरोन व त्याच्या मुलांनी त्यांच्यावर देखरेख केली; कारण ते लेवी लोक करीत असलेल्या सेवेबद्दल जबाबदार होते. परमेश्वराने मोशेकडून अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी लेवी लोकांचे सर्व काही केले.
23 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 24 “लेवी लोकासाठी विशेष आज्ञा अशी आहे की पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक लेवी माणसाने दर्शनमंडपातील सेवा करण्यात भाग घ्यावा. 25 परंतु लेवी माणूस पन्नास वर्षांचा होईल तेव्हा त्याने आपल्या सेवेतून मोकळे व्हावे; त्याने सेवा करण्याची गरज नाही. 26 त्या वर्षाच्या अथवा त्याहून मोठे असलेल्या लेवी माणसांनी पाहिजे तर दर्शनमंडपात सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी; परंतु त्यांनी स्वतः सेवा करु नये. लेवी लोकांना सेवा करण्यास निवडून घेताना तू हा नियम पाळावा.”
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटुंबासाठी मास्कील
44 देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे.
आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले,
खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले.
2 देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास
आणि तो आम्हाला दिलास
तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस
तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.
3 हा देश आमच्या वडिलांच्या तलवारीने मिळवलेला नाही.
त्यांच्या कणखर बाहूंनी त्यांना विजयी केले नाही.
हे घडले कारण तू त्यांच्या बरोबर होतास.
देवा तुझ्या पराक्रमी शक्तीमुळे आमचे वाडवडील वाचले का?
कारण तू त्यांच्यावर प्रेम केलेस.
4 देवा, तू माझा राजा आहेस आज्ञा दे
आणि याकोबाच्या माणसांना विजयाप्रत ने.
5 देवा, तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे रेटू.
तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूवर चालून जाऊ.
6 माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही.
माझी तलवार मला वाचवू शकणार नाही.
7 देवा, तू आम्हाला मिसर पासून वाचवलेस.
तू आमच्या शत्रूंना लाजवले आहेस.
8 आम्ही रोज देवाची स्तुती करु आम्ही
तुझ्या नावाची सदैव स्तुती करत राहू.
9 परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास.
तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबरोबर लढाईत आला नाहीस.
10 तू आमच्या शत्रूंना आम्हाला मागे रेटू दिलेस.
शत्रूंनी आमची संपत्ती घेतली.
11 तू आम्हाला मेंढ्यासारखे खायचे अन्न म्हणून देऊन टाकले.
तू आम्हाला राष्ट्रांमध्ये इतस्तत: विखरुन टाकले.
12 देवा, तू आम्हाला कवडीमोलाने विकलेस.
तू किंमतीसाठी घासाघीस देखील केली नाहीस.
13 तू शेजाऱ्यांमध्ये आमचे हसे केलेस.
आमचे शेजारी आम्हाला हसतात.
ते आमची मस्करी करतात.
14 आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत,
ज्यांना स्वत:चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.
15 मी लाजेने वेढला गेलो आहे.
दिवसभर मला माझी लाज दिसते.
16 माझ्या शत्रूंनी मला अडचणीत आणले
माझे शत्रू माझी चेष्टा करुन जशास तसे वागायचा प्रयत्न करतात.
17 देवा, आम्ही तुला विसरलो नाही तरीही तू आम्हाला या सगळ्या गोष्टी करतोस
आम्ही तुझ्याबरोबर केलेल्या करारनाम्यावर सही केली तेव्हा खोटे बोललो नाही.
18 देवा, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो नाही.
आम्ही तुझा मार्ग चोखाळणे बंद केले नाही.
19 परंतु देवा, तू आम्हाला कोल्हे राहातात त्या जागेत चिरडलेस,
मृत्यूसारख्या अंधाऱ्याजागेत तू आम्हाला झाकलेस.
20 आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो का?
आम्ही परक्या देवाची प्रार्थना केली का? नाही.
21 देवाला खरोखरच या गोष्टी माहीत असतात.
त्याला आपल्या ह्रदयातल्या अगदी आतल्या गुप्त गोष्टीही माहीत असतात.
22 देवा आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहोत.
मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.
23 प्रभु, ऊठ तू का झोपला आहेस?
ऊठ आम्हाला कायमचा सोडून जाऊ नकोस.
24 देवा, तू आमच्यापासून लपून का राहात आहेस?
तू आमची दु:ख आणि संकट विसरलास का?
25 तू आम्हाला घाणीत ढकलून दिले आहेस
आम्ही धुळीत [a] पोटावर पडलो आहोत.
26 देवा, ऊठ! आम्हाला मदत कर.
मेहेरबानी करुन आम्हाला वाचव.
यरुशलेमच्या स्त्रिया तिच्याशी बोलतात
6 सुंदर स्त्रिये!
तुझा प्रियकर कुठे गेला आहे?
आम्हाला सांग म्हणजे आम्ही
त्याला शोधण्यात तुला मदत करु शकू.
ती यरुशलेमच्या स्त्रियांना उत्तर देते
2 माझा प्रियकर त्याच्या बागेत गेला.
मसाल्याच्या फुलांच्या ताटव्यात गेला.
तो बागेत खाऊ घालायला
आणि कमलपुष्पे गोळा करायला गेला.
3 मी माझ्या प्रियकराची आहे.
तो माझा आहे.
कमलपुष्पात खाऊ घालणारा तोच माझा प्रियकर आहे.
तो तिच्याशी बोलतो
4 प्रिये तू तिरझा नगरीप्रमाणे सुंदर आहेस.
यरुशलेमसारखी आल्हाददायक आहेस
आणि तटबंदी असलेल्या शहरासारखी भयंकर आहेस.
5 माझ्याकडे बघू नकोस!
तुझे डोळे मला उद्दीपित करतात.
लहान बकऱ्या गिलाद पर्वताच्या उतारावरुन नाचत खाली जातात तसे
तुझे केस लांब आणि मोकळे आहेत.
6 तुझे दात नुकत्याच आंघोळ करुन
आलेल्या बकरीसारखे पांढरे शुभ्र आहेत.
त्या सगळ्या जुळ्यांना जन्म देतात
आणि त्यांच्यापैकी एकीचेही बछडे दगावलेले नाही.
7 बुरख्याखाली असलेली तुझी कानशिले
डाळींबाच्या फोडींसारखी आहेत.
8 तिथे कदचित 60 राण्या
आणि 80 दासी [a] असतील
आणि तरुण स्त्रिया अगणित असतील.
9 पण माझ्यासाठी मात्र फक्त एकच स्त्री आहे.
माझे कबुतर, माझी सर्वोत्कृष्ट स्त्री.
ति तिच्या आईची लाडकी आहे.
आईचे सगळ्यात आवडते अपत्य आहे.
तरुण स्त्रिया तिला पाहतात आणि तिची स्तुती करतात.
राण्या आणि दासीसुध्दा तिची स्तुती करतात.
स्त्रिया तिची स्तुती करतात
10 ती तरुण स्त्री कोण आहे?
ती पहाटेप्रमाणे चमकते आहे,
ती चंद्रासारखी सुंदर आहे.
सूर्यासारखी तेजस्वी आहे
आणि आकाशातल्या
सैन्याप्रमाणे भयंकर आहे.
ती म्हणते
11 मी आक्रोडाच्या राईतून दरीतली फळे बघायला गेले.
द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत का,
डाळींबाना कळ्या आल्या आहेत का,
ते बघायला गेले.
12 मला काही कळायच्या आतच
माझ्या आत्म्याने मला राजाच्या लोक [b] रथात ठेवले.
यरुशलेमच्या स्त्रिया तिला बोलावतात
13 शुलामिथ, परत ये, परत ये.
म्हणजे आम्ही तुला बघू शकू,
ती महनाइम नाच करीत असताना टक लावून का
तू शुलमिथकडे पहात आहेस?
6 म्हणून ख्रिस्ताविषयीची प्राथमिक माहिती आपण मागे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ. पुन्हा एकदा देवावरचा विश्वास, बाप्तिस्म्याविषयीची [a] शिकवण, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचा न्यायनिवाडा, देवावरील विश्र्वास, आपल्या निर्जीव गतजीवनाचा पश्चाताप या मूलभूत गोष्टींचा पाया आपण पुन्हा घालू नये. 3 आणि जर देवाची इच्छा असेल तर आपण पूर्ण ख्रिस्तीपणापर्यंत जाऊ.
4-6 ज्यांना स्वर्गीय दानांचा अनुभव आलेला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत, त्यांना पुन्हा पश्चात्तापाकडे नेणे अशक्य आहे. तसेच देवाच्या वचनाची गोडी अनुभवली आहे, व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याचा अनुभव आहे आणि त्यानंतर ख्रिस्तापासून जर ते दूर गेले तर त्यांना पश्चात्तापाकडे वळविणे अशक्य आहे, कारण त्याच्या स्वतःच्या हानीकरता ते देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभावर खिळतात व लोकांच्या अवकृपेच्या समोर त्याला आणतात.
7 जी जमीन वेळोवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी पिते व ज्या लोकांकडून तिची लागवड होते त्यांच्यासाठी धान्य उपजविते तिला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतो. 8 पण जी जमीन काटे व कुसळे उपजविते, ती निरुपयोगी आहे व तिला शाप मिळण्याची भिति असते; तिचा अग्नीने नाश होईल.
9 बंधूंजनहो, आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत, पण खरोखर आम्ही तुमच्याकडून अधिक चांगल्याची अपेक्षा करतो. आम्हांला अशी खात्री आहे की, ज्या तारणाचा भाग असलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कराल. 10 कारण तुम्ही केलेली पवित्रजनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्यावर केलेले प्रेम ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही. 11 पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरिता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी. 12 आम्हांला असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचे फळ मिळवितात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.
13 जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याच्यापेक्षा कोणी मोठा नसल्याने देवाने स्वतःच्याच नावाने शपथ वाहिली. 14 तो म्हणाला, “मी तुला भरपूर आशीर्वाद देईन आणि मी तुझ्या वंशजांना सतत बहुगुणित करीत राहीन.” 15 म्हणून धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्याला दिले होते ते त्याला प्राप्त झाले.
16 लोक, नेहमी शपथ वाहताना आपल्यापेक्षा जो मोठा असतो त्याच्या नावाचा उपयोग करतात. कारण शपथ ही विदित केलेल्या सत्याची खात्री पटविणे व सर्व वादाचा शेवट करणे यासाठी असते. 17 आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली. 18 देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे (त्याचे वचन व शपथ) जे आपण आश्रयाकरिता निघालो आहोत, त्या आपणांस त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.
19 आम्हांला ही आशा जणू काय भक्कम, सुरक्षित अशा नांगरासारखी आत्म्याला आहे व ही आशा मंदिराच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते, 20 जेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे अनंतकाळासाठी मुख्य याजक झाला आहे.
2006 by World Bible Translation Center