M’Cheyne Bible Reading Plan
36 “तेव्हा बसालेल व अहलियाब यांनी आणि परमेशवराने ज्या इतर कारागिरांना ह्या कामाच्या कसबाचे ज्ञान व समज दिली आहे त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पवित्र मंडपाचे हे बांधकाम करावे.”
2 नंतर बसालेल व अहिलियाब यांना आणि ज्या कारागिरांना परमेश्वराने विशेष कसब व ज्ञान दिले होते त्यांना मोशेने बोलावले, ह्या कामात मदत व सेवा करण्याची त्या लोकांची इच्छा होती म्हणून तेही खुषीने आले. 3 इस्राएल लोकांची जी जी अर्पणे आणली होती त्यांचा देवाचे पवित्रस्थान बांधण्यासाठी त्यांनी उपयोग केला. रोज सकाळी इस्राएल लोकांनी अर्पणे आणणे चालूच ठेवले. 4 शेवटी मग सर्व कसबी कारागीर पवित्रस्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले व म्हणाले, 5 “लोकांनी खूप अर्पणे आणली आहेत! आम्हाला ह्या पवित्रस्थानाचे बांधकाम पूर्ण करवयास लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे!”
6 तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम सोडला की, “कोणाही स्त्रीने किंवा पुरुषाने आता पवित्रस्थानाच्या सेवेसाठी अधिक अर्पणे आणू नयेत.” तेव्हा अशा रीतीने आणखी अर्पणे आणावयास बंदी घालण्यात आली. 7 लोकांनी हे काम पूर्ण करण्याकरता लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक साहित्य अर्पण केले होते!
पवित्र निवास मंडप
8 मग त्या कसबी कारागिरांनी पवित्र निवास मंडप बांधण्याचे काम सुरु केले; त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचे दहा पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी, पसरलेल्या पंखाच्या, करुब दूतांची चित्रे शिवली. 9 प्रत्येक पडद्याचे मोजमाप सारखेच होते म्हणजे तो चौदावार-गज-लांब व दोन वार-गज-रुंद असे होते. 10 त्या कारागिरांनी त्यापैकी पांच पडदे जोडून एक भाग व दुसरे पांच पडदे जोडून दुसरा भाग असे दोन भाग तयार केले. 11 नंतर त्यांनी त्या दोन्हीही भागांच्या शेवटच्या किनारीवर निव्व्या सुताची बिरडी केली; तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवर ही तशीच बिरडी केली. 12 त्यानी एका पडद्याखाली किनारीवर पन्नास बिरडी व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही पन्नास बिरडी केली; ती बिरडी समोरासमोर होती. 13 नंतर ते दोन पडदे एकत्र जोडण्यासाठी त्यांनी सोन्याच्या पन्नास गोल कड्या केल्या; त्या कड्यांनी ते पडदे एकत्र जोडल्यावर त्या सर्वाचा मिळून अखंड पवित्र निवास मंडप तयार झाला.
14 नंतर पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी त्या कारागिरांनी बकऱ्याच्या केसांच्या अकरा पडद्यांचा एक तंबू बनविला. 15 ह्या सर्व पडद्यांचे मोजमाप सारखेच होते म्हणजे पंधरा वार लांब व दोन वार रुंद होते. 16 त्या कारागिरांनी त्यापैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे सहा पडदे जोडून दुसरा भाग तयार केला. 17 नंतर त्यांनी एका कनातीच्या बाहेरील शेकटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी व तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी केली. 18 हे दोन पडदे जोडून एक तंबू करण्यासाठी त्यांनी पितळेच्या पन्नास गोल कड्या केल्या. 19 मग त्यांनी पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या. मेंढ्याच्या कातड्याचे व दुसरे तहाशाच्या कमावलेल्या कातड्याचे अशी दोन आच्छादने केली.
20 मग पवित्र निवास मंडपाला आधार देण्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या फव्व्या तयार केल्या. 21 प्रत्येक फळी पंधरा फूट लांब व सत्तावीस इंच रुंद होती. 22 त्यांनी प्रत्येक फळीच्या दोन बाजूला दोन कुसे केली व उभ्या आडव्या तुकड्यांनी त्या दोन फव्व्या एकासारख्याच केल्या. 23 त्यांनी पवित्र निवास मंडपाच्या दक्षिण बाजूस लावण्यासाठी वीस फव्व्या केल्या; 24 मग त्या वीस फळयांच्या खाली लावण्यासाठी त्यांनी चांदीच्या चाळीस खुर्च्या केल्या, एका फळी खाली दोन म्हणजे प्रत्येक कुसाखाली एक याप्रमाणे त्या केल्या. 25 त्याचप्रमाणे पवित्र निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी वीस फळया केल्या. 26 त्यांनी त्या वीस फव्व्यासाठी एकेका फळीखाली दोन या प्रमाणे चांदीच्या चाळीस खुर्च्या केल्या. 27 पवित्र निवास मंडपाच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिम बाजूस लावण्यासाठी सहा फव्व्या. 28 आणि त्याचप्रमाणे निवास मंडपाच्या कोपऱ्यासाठी दोन फव्व्या त्यांनी केल्या. 29 ह्या फव्व्या खालच्या बाजूला जोडलेल्या होत्या आणि वरच्या भागी एकत्र गोल कडीला त्या अडकवल्या होत्या; दोन्ही कोपऱ्यासाठी त्यांनी अशाच फव्व्या केल्या. 30 तेव्हा पवित्र निवास मंडपाच्या पश्चिमबाजूस एकूण आठ फव्व्या व प्रत्येक फळी खाली चांदीच्या दोन खुर्च्या अशा सोळा खुर्च्या झाल्या.
31 त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले-पवित्र निवास मंडपाच्या एका बाजूच्या फव्व्यासाठी पाच, 32 दुसऱ्या बाजूच्या फव्व्यासाठी पाच आणि पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी पांच; 33 आणि त्यांनी फव्व्याच्या भध्याभागी लावावयाचा अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोंचेल असा केला. 34 त्या फव्व्या त्यांनी सोन्याने मढविल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनविल्या आणि अडसरही सोन्याने मढविले.
35 मग त्यांनी निव्व्या जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर करूब दुतांची चित्रे शिवून घेतली, 36 आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व ते सोन्याने मढविले; 37 मग त्यांनी पवित्र निवास मंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा नक्षीदार पडदा बनविला. 38 व त्या पडद्यासाठी त्यांनी पाच खांब व त्यांच्या आकड्या बनविल्या; त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या; आणि खांबासाठी पितळेच्या पाच खुर्च्या बनविल्या.
येशू द्राक्षवेल आहे
15 मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे. 2 तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो. ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ घावे म्हणून त्या द्राक्षवेलीला तो साफ करतो. 3 जे वचन मी तुम्हांला सांगितले, त्यामुळे तुम्ही आता स्वच्छ झालाच आहा. 4 तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यावचून त्याच्याने फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांला फळ देता येणार नाही.
5 “मी वेल आहे, तुम्ही फाटे आहा, जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो, तोच पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही होत नाही. 6 कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो. तो वाळून जातो मग त्याला गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळण्यात येते. 7 तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे ते तुम्ही मागा म्हणजे ते तुम्हांस मिळेल. 8 तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते, आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.
9 “जशी पित्याने माझ्यावर प्रीति केली आहे तशीच मीही तुम्हांवर प्रीति केली आहे. माझ्या प्रीतीत राहा. 10 ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतित राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. 11 माझा आनंद तुम्हांमध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा, म्हणून मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. 12 जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. ही माझी आज्ञा आहे. 13 आपल्या मित्रासाठी मरावे, यापेक्षा कोणाचीही प्रीति मोठी नाही. 14 मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात. 15 आता मी तुम्हांला सेवक म्हणत नाही, कारण आपला धनी काय करतो हे सेवकाला माहीत नसते, पण मी तुम्हांला मित्र म्हणतो कारण ज्या गोष्टी मी आपल्या पित्याकडून ऐकल्या त्या सर्व तुम्हांला कळविल्या आहेत.
16 “तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि नेमले आहे. यासाठी की, तुम्ही जाऊन फळ द्यावे. आणि तुमचे फळ टिकावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांस द्यावे 17 तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हांस आज्ञा देऊन सांगतो.
येशू त्याच्या अनुयायांना सूचना देतो
18 “जर जग तुमचा द्वेष करते, तर लक्षात ठेवा की, पहिल्यांदा जगाने माझासुध्दा द्वेष केलेला आहे. 19 तुम्ही जर जगाचे असता तर जगाने तुम्हावर, जशी ते स्वतःवर करतात तशी प्रीति केली असती, पण तुम्ही जगाचे नसल्याने, आणि तुमची जगातून निवड केल्याने, जग तुमचा द्वेष करते.
20 “जे शब्द तुम्हांला सांगितले ते लक्षात ठेवा. कोणताही नोकर आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नसतो. त्यांनी जर माझी छळणूक केली तर ते तुमचीही करतील, त्यांनी जर माझी शिकवण पाळली तर ते तुमचीसुद्या पाळतील. 21 माझ्या नावामुळे ते तुमच्याशी अशाप्रकारे वागतील, कारण ज्याने मला पाठविले, त्याला ते ओळखत नाहीत. 22 जर मी आलो नसतो आणि त्यांना सांगितले नसते तर ते पापाबद्धल दोषी ठरले नसते. आता त्यांना त्यांच्या पापाविषयी सबब सांगता येणार नाही.
23 “जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. 24 मी त्या लोकांमध्ये अशा गोष्टी केल्या ज्या दुसऱ्या कोणीही केल्या नाहीत. मी जर त्या गोष्टी केल्या नसत्या, तर पापाबद्धल ते दोषी ठरले नसते, पण आता त्यांनी ते चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही त्यांनी माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला. 25 परंतु नियमशास्त्रात लिहिलेले पूर्ण व्हावे म्हणून हे घडले: ‘कारण नसताना त्यांनी माझा द्वेष केला.’ [a]
26 “पित्यापासून मी साहाय्यकर्ता पाठवीन, साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. तो पित्यापासून येतो. जेव्हा तो येतो तेव्हा तो माझ्याविषयी सांगतो. 27 आणि तुम्हीसुद्या माझ्याविषयी लोकांना सांगाल. कारण तुम्ही माझ्याबरोबर सुरुवातीपासून आहात.
12 जर एखाद्याला चांगले व्हायचे असेल तर त्याची चूक दाखवल्यावर त्याला राग यायला नको. ज्याला चूक दाखवलेली आवडत नाही तो मूर्ख असतो.
2 परमेश्वर चांगल्या माणसांबरोबर आनंदी असतो. पण परमेश्वर दुष्ट माणसाला अपराधी ठरवतो.
3 दुष्ट माणसे कधीही सुरक्षित नसतात. पण चांगली माणसे सुरक्षित आणि निर्धास्त असतात.
4 नवरा चांगल्या बायकोबद्दल आनंदी आणि अभिमानी असतो. पण जर बाई आपल्या नवऱ्याला लाज आणत असेल. तर ती त्याच्या शरीरातल्या आजारा सारखी असते.
5 चांगले लोक त्यांनी ज्या योजना आखलेल्या असतात त्यात न्यायी आणि इमानी असतात. पण दुष्टांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
6 दुष्ट लोक दुसऱ्यांना दु:ख देण्यासाठी आपल्या शब्दांचा वापर करतात. पण चांगल्या माणसाचे शब्द एखाद्याला संकटापासून वाचवू शकतात.
7 दुष्ट माणसांचा नाश होतो आणि त्यांचा मागमूसही राहात नाही. पण चांगल्या माणसाची आठवण मात्र तो गेल्यानंतरही येत राहाते.
8 लोक विद्वानाची स्तुती करतात पण ते मूर्खांचा आदर करीत नाहीत.
9 खूप मोठा माणूस नसूनही खूप काम करणे हे खायला काही नसताना मोठेपणाचा आव आणण्यापेक्षा चांगले असते.
10 चांगला माणूस त्याच्या प्राण्यांची काळजी घेतो. पण दुष्ट माणूस दयाळू असू शकत नाही.
11 जो शेतकरी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे पुरेसे अन्न असते. पण जो माणूस फालतू गोष्टीत वेळ घालवतो तो मूर्ख असतो.
12 दुष्ट माणसाजवळ नेहमी चुकीच्या गोष्टी करायला असतात. पण चांगल्या माणसाजवळ जी शक्ती असते ती मुळाप्रमाणे खोल गेलेली असते.
13 दुष्ट माणूस मूर्ख गोष्टी करतो. स्वतःच शब्दात अडकतो. पण चांगला माणूस त्या प्रकारच्या संकटातून सुटतो.
14 जो चांगल्या गोष्टी सांगतो त्याबद्दल त्याला बक्षीस मिळते. त्याचप्रमाणे तो जे काम करतो ते त्याला लाभ मिळवून देते.
15 मूर्ख माणसाला नेहमी स्वतःची पध्द्त सर्वश्रेष्ठ वाटते. पण विद्वान माणूस दुसरे लोक जे सांगतात तेही ऐकतो.
16 मूर्ख माणसाला फार लवकर राग येतो. पण हुशार माणूस कुणी काही चुकीचे बोलले तर चटकन् क्षमा करतो.
17 जर एखादा माणूस खरे बोलत असेल तर तो ज्या गोष्टी सांगतो त्यातही तो प्रामाणिक असतो. पण जर एखादा खोटं बोलत असेल तर त्याचे बोलणे संकटाकडे नेते.
18 जर एखादा माणूस विचार न करता बोलत असेल तर ते शब्द तलवारीसारखे लागतात. पण शहाणा माणूस काळजी पूर्वक बोलतो. त्याचे शब्द दु:खावर फुंकर मारतात.
19 जर माणूस खोटे बोलला तर त्याचे शब्द लगेचच वाया जातात. पण सत्य मात्र सदैव राहाते.
20 दुष्ट लोक नेहमी संकटे आणतात. पण जे लोक शांततेसाठी काम करतात ते आनंदी असतात.
21 चांगल्या लोकांवर दुर्दैव कोसळत नाही. पण दुष्टांवर मात्र अनेक संकटे येतात.
22 परमेश्वर खोटं बोलणाऱ्यांचा तिरस्कार करतो. पण परमेश्वर खरे बोलणाऱ्या लोकांबरोबर आनंदी असतो.
23 हुशार माणूस त्याला जे माहीत आहे ते सर्व सांगत नाही. पण मूर्ख माणूस त्याला जे माहीत आहे ते सर्व सांगतो आणि तो मूर्ख आहे हे दाखवतो.
24 जे लोक खूप काम करतात त्यांना इतर कामगारांवर देखरेख करण्याचे काम देतात. पण आळशी माणसाला गुलामासारखे राबावे लागते.
25 काळजी माणसाचे सुख हिरावून घेते. पण प्रेमळ शब्द त्याला आनंदी करु शकतात.
26 चांगला माणूस आपले मित्र काळजीपूर्वक निवडतो. पण दुष्ट माणूस नेहमी चुकीचे मित्र निवडतो.
27 आळशी माणूस त्याला हव्या असलेल्या गोष्टीच्या मागे जाणार नाही पण जो माणूस खूप कष्ट करतो त्याच्याकडे श्रीमंती येते.
28 जर तुम्ही योग्य रीतीने जगलात तर तुम्हाला खरे जीवन मिळेल. सदैव जगण्याचा तोच मार्ग आहे.
5 प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा, 2 आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीति केली तसे प्रीतीमध्ये चाला, त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला.
3 जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नावही निघू नये, हे देवाच्या पवित्र लोकांसाठी योग्य नाही. 4 तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. उलट उपकारस्तुति असावी. 5 कारण तुम्हांला हे माहीत असावे की: जो मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा अधाशी जे मूर्तिपूजेसारखेच आहे, त्या मनुष्याला देवाच्या आणि ख्रिस्ताच्या राज्यात वतन असणार नाही.
6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये. कारण या कारणांमुळे जे आज्ञा मोडतात, त्यांच्यावर देवाचा क्रोध येणार आहे. 7 म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका. 8 मी हे सांगतो कारण एके काळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूचे अनुयायी म्हणून पूर्ण प्रकाशात आहात. प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. 9 कारण प्रकाशाची फळे प्रत्येक चांगुलपणात, नीतीमत्वात, आणि सत्यात दिसून येतात. 10 नेहमी प्रभूला कशाने संतोष होईल हे शोधण्याचा प्रयत्न करा. 11 आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्यांचे भागीदार होऊ नका. तर उलट, ती उघडकीस आणा. 12 कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयी बोलणेही लज्जास्पद आहे. 13 पण जेव्हा सर्व काही प्रकाशाद्वारे उघड होते, तेव्हा प्रत्येक गोष्ट दिसते. 14 आणि जी प्रत्येक गोष्ट दिसते, ती प्रकाश आहे. म्हणूनच आम्ही असे म्हणतो:
“हे झोपलेल्या जागा हो
व मेलेल्यांतून ऊठ,
आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”
15 म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी सावध असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा. 16 जे चांगल्या संधीचा उपयोग करतात. कारण हे दिवस वाईट आहेत. 17 म्हणून मूर्खासारखे वागु नका, तर उलट देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्या. 18 द्राक्षारस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका. त्यामुळे मनुष्य सर्वच बाबतीत बेताल होतो. उलट आत्म्याने पूर्ण भरले जा, 19 स्तोत्रे, गीते, आणि आध्यात्मिक गीतांनी एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गाणी गा, आणि आपल्या अंतःकरणात प्रभूसाठी गायने गा. 20 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.
पती-पत्नी
21 ख्रिस्ताच्या भयात एकमेकांच्या अधीन असा.
22 पत्नींनो, जशा तुम्ही प्रभुच्या अधीन होता, तशा आपल्या पतींच्या अधीन असा. 23 कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. ख्रिस्त स्वतःच शरीराचा तारणारा आहे. 24 पण, ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे.
25 पतींनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीति करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीति करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले, 26 यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन निर्मळ करावे. 27 यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल. किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल.
28 याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नींवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो. 29 कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा द्वेष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो. 30 कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. 31 शास्त्र सांगते त्याप्रमाणे, “म्हणून मनुष्य त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील. आणि ते दोघे एकदेह होतील.” [a] 32 हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते. 33 तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे. व पत्नी नेही पतीचा मान राखाला पाहिजे.
2006 by World Bible Translation Center