M’Cheyne Bible Reading Plan
7 परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर असेन मी तुला फारोसाठी देव असे केले आहे; आणि अहरोन हा तुझा संदेष्टा होईल; 2 मी तुला सांगतो ते सर्व तू अहरोनाला सांग; मग माझे सर्व बोलणे तो फारोला सांगेल आणि मग फारो इस्राएल लोकांना हा देश सोडून जाऊ देईल. 3 परंतु मी फारोचे मन कठोर करीन. मग मी मिसरमध्ये अनेक चमत्कार दाखवीन. तरीही फारो ऐकणार नाही. 4 तेव्हा मग मी मिसरच्या लोकांना जबर शिक्षा करीन आणि त्या देशातून माझ्या सर्व लोकांना मी बाहेर काढीन 5 तेव्हा मिसरच्या लोकांना समजेल की मी परमेश्वर आहे मी मिसरच्या लोकांविरुद्ध होईन आणि मग त्यांना कळेल की मी परमेश्वर आहे मग मी माझ्या लोकांना त्यांच्या देशातून बाहेर घेऊन जाईन.”
6 मग मोशे व अहरोन यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. 7 ते फारोबरोबर बोलले तेव्हा मोशे ऐंशी वर्षाचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षाचा होता.
मोशेच्या काठीचा साप होतो
8 परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, 9 “फारो तुम्हाला मी पाठविल्याचा पुरावा म्हणून एखादा चमत्कार करून तुमचे सामर्थ्य दाखविण्या विषयी विचारील तेव्हा अहरोनाला आपली काठी जमिनीवर टाकण्यास सांग म्हणजे फारोच्या देखत त्या काठीचा साप होईल.”
10 तेव्हा मोशे व अहरोन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे फारोकडे गेले. अहरोनाने आपली काठी जमिनीवर टाकली. तेव्हा फारो व त्याचे सेवक यांच्या देखत त्या काठीचा साप झाला.
11 तेव्हा फारो राजाने आपले जाणते व मांत्रिक बोलावले; तेव्हा मिसरच्या त्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर अहरोनाप्रमाणे केले. 12 त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले परंतु अहरोनाच्या काठीच्या सापाने त्यांचे साप गिळून टाकले. 13 तरीही परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे फारोचे मन कठोर झाले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही व इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
पाण्याचे रक्त होते
14 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोचे मन कठीण झाले आहे; तो इस्राएल लोकांना जाऊ देत नाही. 15 उद्या सकाळी फारो नदीवर जाईल; तू साप झालेली काठी बरोबर घे आणि नाईल नदीच्या काठी त्याला भेटावयास जा. 16 त्याला असे सांग, ‘इब्री म्हणजे इस्राएल लोकांचा देव परमेश्वर याने मला तुझ्याकडे पाठवले आहे व त्याच्या लोकांना त्याची उपासना करावयास रानात जाऊ दे, असे तुला सांगण्यास मला बजावले आहे. आतापर्यंत तू परमेश्वराचे ऐकेले नाहीस. 17 तेव्हा परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर आहे हे त्याला अशावरून कळेल: मी नाईल नदीच्या पाण्यावर ह्या माझ्या हातातील काठीने तडाखा मारीन तेव्हा नदीच्या पाण्याचे रक्त होईल. 18 मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसरचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत.’”
19 परमेश्वर मोशेला म्हाणाला, “आपली काठी मिसरमधील नद्या, नाले, तलाव व जेथे पाणी भरून ठेवतात त्या जागेवर उगारण्यास अहरोनास सांग म्हणजे त्याने तसे केल्यावर सर्व पाण्याचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात भरलेल्या पाण्याचे देखील रक्त होईल.”
20 तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी उगारली नाईल नेदीवर मारली. त्याने हे फारो व त्याचे अधिकारी यांच्यासमोर केले. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले. 21 नदीतले मासे मेले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकेनात. अवघ्या मिसरभर रक्तच रक्त झाले.
22 मिसरच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसेच केले. तेव्हा परमेश्वराने संगितल्याप्रमाणे फारोचे मन कठीण झाले. 23 मोशे व अहरोन यांनी केलेल्या चमत्काराकडे फारोने लक्ष दिले नाही; तो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला.
24 मिसरच्या लोकांना नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले.
बेडकांची पीडा
25 परमेश्वराने नाईल नदीला दिलेल्या तडाख्याला सात दिवस होऊन गेले.
येशू बहात्तर पुरुषांना कामगिरीवर पाठवितो
10 या घटनांनंतर प्रभुने इतर बहात्तर जणांची [a] नेमणूक केली. आणि येशूने त्यांना जोडीजोडीने पाठविले. त्याला ज्या ठिकाणी जायचे होते त्या प्रत्येक गावात व ठिकाणी त्याने त्यांना पाठविले. 2 तो त्यांना म्हणाला, “पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने त्याच्या पिकासाठी कामकरी पाठवावेत यासाठी प्रार्थना करा.
3 “जा! आणि लक्षात ठेवा, लांडग्यात जशी कोंकरे तसे मी तुम्हास या जगात पाठवीत आहे. 4 थैली, पिशवी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, व रस्त्याने जाताना कोणाला सलाम करु नका. 5 कोणत्याही घरात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा पहिल्यांदा असे म्हणा, ‘या घरास शांति असो!’ 6 जर तेथे शांतिप्रिय मनुष्य असेल तर तुमची शांति त्याच्यावर राहील, परंतु तो मनुष्य शांतिप्रिय नसेल तर तुमची शांति तुमच्याकडे परत येईल. 7 त्या घरात तुम्हांला जे देतील ते खातपीत राहा. कारण कामकरी हा त्याच्या मजुरीस पात्र आहे. या घरातून त्या घरात असे घर बदलू नका.
8 “कोणत्याही नगरात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा आणि जेव्हा ते तुमचे स्वागत करतील तेव्हा, तुमच्यासमोर जे वाढलेले असेल ते खा. 9 तेथील रोग्यांना बरे करा आणि नंतर त्यांना सांगा की, ‘देवाचे राज्य लवकरच तुमच्याकडे येत आहे!’
10 “परंतु तुम्ही एखाद्या गावात प्रवेश कराल आणि त्यांनी जर तुमचे स्वागत केले नाही तर रस्त्यात जा आणि म्हणा. 11 ‘आमच्या पायाला लागलेली तुमच्या गावाची धूळदेखील आम्ही तुम्हांविरुद्ध झटकून टाकीत आहोत! तरीही हे लक्षात असू द्या की, देवाचे राज्य लवकरच तुमच्याकडे येत आहे.!’ 12 मी तुम्हांला सांगतो, त्या दिवशी त्या गावापेक्षा सदोमातील लोकांना सोपे जाईल.
जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना येशू इशारा देतो(A)
13 “खोराजिना तुझ्यासाठी हे वाईट होईल! बेथसैदा [b] तुझ्यासाठी हे वाईट होइल! कारण जे चमत्कार तुम्हांमध्ये घडले ते जर सोर व सिदोनमध्ये घडले असते तर त्यांनी फार पूर्वीच गोणपाट नेसून राखेत बसून पश्चात्ताप केला असता. 14 तरीसुद्धा सोर व सिदोन यांना न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोपे जाईल. 15 आणि कफर्णहूमा, तुला स्वर्गापर्यंत चढवले जाईल काय? तू तर अधोलोकातच जाशील.
16 “जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो. आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला नाकारतो.”
सैतानाचे पतन
17 ते बहात्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभु, तुझ्या नावाने भुतेसुद्धा आम्हांला वश होतात!”
18 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले! 19 ऐका मी तुम्हांला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा अधिकार दिला आहे. व मी तुम्हांला शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे. आणि कशानेच तुम्हांला अपाय होणार नाही. 20 तथापि तुम्हांला भुते वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वार्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.”
येशू पित्याला प्रार्थना करतो(B)
21 त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात उल्हासित झाला, आणि म्हणाला, “हे पित्या, स्वार्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभु मी तुझी स्तुति करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे बरे वाटले ते तू केलेस.
22 “माइया पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या. आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रगट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.”
23 आणि शिष्यांकडे वळून तो एकांतात बोलला, “तुम्ही जे पाहता ते पाहणारे डोळे धन्य. 24 मी तुम्हांस सांगतो, अनेक राजांनी व संदेष्ट्यांनी तुम्ही जे पाहता ते पाहण्याची इच्छ बाळगली, परंतु त्यांनी ते पाहिले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते ऐकले नाही.”
चांगला शोमरोनी
25 नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”
26 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यांत काय वाचतोस?”
27 तो म्हणाला, “‘तू तुझा देव प्रभु याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तिने प्रीति कर.’ [c] व ‘स्वतःवर जशी प्रीति करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीति कर.’” [d]
28 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू चिरकाल राहशील.”
29 पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले, “मग माझा शेजारी कोण?”
30 येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमाहून यरीहोस निघाला होता. आणि तो लुटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेतले. त्यांनी त्याला मारले, आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.
31 “तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्याला पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. 32 त्याच मार्गाने एक लेवी त्या ठिकाणी आला. लेव्याने त्याला पाहिले. व तो सुध्दा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
33 “नंतर एक शोमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत तेथे आला. जेव्हा त्याने त्या मनुष्याला पाहिले, तेव्हा त्याला त्याच्याविषयी कळवळा आला 34 तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षारस ओतून त्या बांधल्या. नंतर त्या शोमरोन्याने त्याला आपल्या गाढवावर बसविले व त्याला उतारशाळेत आणले, व त्याची देखभाल केली. 35 दुसऱ्या दिवशी त्याने दोन दीनार। [e] (सुमारे वीस रुपये) काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला, ‘याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.’”
36 लुटारुंच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता, “त्याचा त्या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते?”
37 तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला, “ज्याने त्या गरजू जखमी प्रवाशावर दया मनापासून केली तो.”
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “जा आणि तूही तसेच कर.”
मरीया आणि मार्था
38 मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता, तो एका खेड्यात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करुन आदरातिथ्य केले. 39 तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली. 40 पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभु, माझ्या बहिणीने सर्व काम माइयावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.”
41 प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस. 42 पण एक गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो कारण मरीयेने तिच्यासाठी चांगला कार्यभाग निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
24 “त्या सर्वशक्तिमान देवाला माणसाच्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी कशा माहीत असतात?
परंतु त्याच्या भक्तांना मात्र त्याच्याबद्दल काहीच माहीत नसते.”
2 “लोक शेतातली हद्द दर्शविणाऱ्या खुणा जास्त जमीन मिळवण्यासाठी सरकवतात.
लोक पशूंचे कळप चोरुन दुसऱ्या रानात चरायला नेतात.
3 ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात.
ते विधवेची गाय पळवून नेतात आणि त्यांच्या ऋणाची ती जोपर्यंत परतफेड करत नाही तोपर्यंत ती गाय आपल्याकडे ठेवून घेतात.
4 ते गरीब लोकांना घरादाराशिवाय इकडे तिकडे हिंडायला लावतात.
सगळ्या गरीबांना या दुष्टांपासून लपून राहावे लागते.
5 “गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते अन्नाच्या शोधात लवकर उठतात.
ते मुलाबाळांना अन्न देण्यासाठी रात्रीपर्यंत काम करतात.
6 गरीब लोकांना शेतात गवत आणि चारा कापत रात्रीपर्यंत काम करावे लागते.
त्यांना श्रीमंतांच्या शेतातली द्राक्षे वेचावी लागतात.
7 त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते.
थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरुण नसते.
8 ते डोंगरावर पावसात भिजतात.
थंडीवाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ काही नसते म्हणून ते मोठ्या खडकांना चिकटून बसतात.
9 दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आईजवळून घेतात.
ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून ठेवून घेतात.
10 गरीबांजवळ कपडे नसतात. म्हणून काम करताना ते उघडेच असतात.
ते दुष्टांसाठी धान्याच्या पेंढ्या वाहतात पण स्वतः मात्र उपाशीच राहतात.
11 ते आॉलिव्हचे तेल काढतात. द्राक्षाचा रस काढतात.
व त्यासाठी द्राक्षकुंडात द्राक्षं तुडवतात.
परंतु त्यांच्याजवळ मात्र पिण्यासाठी काही नसते.
12 शहरात मरायला टेकलेल्या माणसांचे दु:खद रडणे ऐकू येते ते दु:खी कष्टी लोक मदतीसाठी हाका मारतात.
परंतु देव ते ऐकत नाही.
13 “काही लोक प्रकाशाविरुद्द बंड करतात.
देवाला काय हवे आहे हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा नसते.
देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे त्यांना आवडत नाही.
14 खुनी सकाळी लवकर उठतो आणि गरीब व असहाय्य लोकांना ठार मारतो.
तो रात्रीच्या वेळी चोर बनतो.
15 ज्या माणसाला व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो.
‘मला कुणीही बघणार नाही’ असे त्याला वाटते, पण तरीही तो त्याचा चेहरा झाकतो.
16 रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा दुष्ट लोक दुसऱ्यांची घरे फोडतात.
पण दिवसा ते स्वतःला त्यांच्या घरांत कोंडून घेतात. ते प्रकाशाला टाळतात.
17 त्या दुष्टांना काळीकुटृ रात्र सकाळसारखी वाटते.
त्या भयंकर काळोखाची भयानकता त्यांना चांगलीच माहीत असते.
18 “पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात.
त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षे गोळा करु नयेत म्हणून त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो.
19 हिवाळ्यातल्या बफर्पासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते.
त्याप्रमाणे त्या पापी लोकांना थडग्यात नेले जाते.
20 हा दुष्ट माणूस मरेल आणि त्याची आईदेखील त्याला विसरुन जाईल.
त्याची प्रेयसी म्हणजे त्याचे शरीर खाणारे किडे असतील.
लोक त्याची आठवण ठेवणार नाहीत.
त्यामुळे दुष्टपणा लाकडासारखा मोडून पडेल.
21 दुष्ट माणसे वांझ बायकांना त्रास देतात
आणि ते विधवांना मदत करायचे नाकारतात.
22 सामर्थ्यवान लोकांना नष्ट करण्यासाठी दुष्ट आपली शक्ती खर्ची घालतात.
दुष्ट माणसे सामर्थ्यवान बनू शकतात परंतु त्यांना त्यांच्या आयुष्याची खात्री नसते.
23 दुष्टांना थोड्या वेळासाठी सुरक्षित आणि निर्धास्त वाटते.
आपण सामर्थ्यवान व्हावे असे त्यांना वाटते.
24 दुष्ट लोक थोड्या काळापुरते यशस्वी होतात. परंतु नंतर ते जातात.
धान्याप्रमाणे त्यांची कापणी होते, इतर लोकांप्रमाणे दुष्टांनादेखील कापले जाते.
25 “या गोष्टी खऱ्या आहेत हे मी शपथपूर्वक सांगतो.
मी खोटे बोललो हे कोण सिध्द करेल?
मी चुकलो हे कोण दाखवेल?”
11 मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.
अधिकाराखाली असणे
2 मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी जी शिकवण तुम्हाला दिली, ती तुम्ही काटेकोरपणे पाळता. 3 परंतु तुम्हाला हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे. आणि प्रत्येक पुरुष हा स्त्रीचे मस्तक आहे, आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे.
4 प्रत्येक मनुष्य जो प्रार्थना करताना किंवा देवाकडून आलेला संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो मस्तकाला लज्जा आणतो. 5 परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते. कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे. 6 जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत. परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तिने आपले मस्तक झाकावे.
7 ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे. 8 पुरुष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे. 9 आणि मनुष्य स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली. 10 यासाठी देवाने स्त्रीला अधिकार दिलेला आहे त्याचे चिन्ह म्हणून तिने आपले मस्तक आच्छादावे व देवदूतांकरितासुद्धा तिने हे करावे.
11 तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरुष स्त्रीपासून स्वतंत्र नाही. 12 कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत.
13 हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता सभेत देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का? 14 पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हाला शिकवीत नाही काय? 15 परंतु स्त्रीने लांब केस राखणे हा तिचा मान आहे कारण तिला तिचे केस निसर्गतः आच्छादनासाठी दिले आहेत. 16 जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रुढी नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
प्रभु भोजन
17 पण आता ही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही, कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमची हानि होते. 18 प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये गट असतात, आणि काही प्रमाणात ते खरे मानतो. 19 (तरीही तुम्हांमध्ये पक्ष असावेत) यासाठी की, जे तुमच्यामध्ये पसंतीस उतरलेले आहेत ते प्रगट व्हावेत.
20 म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभुभोजन घेत नाही. 21 कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हांतील प्रत्येक जण अगोदरच आपले स्वतःचे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा प्यायलेला असतो. 22 खाण्यापिण्यासाठी तुम्हांला घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजविता? मी तुम्हांला काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करु काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करीत नाही.
23 कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हांला दिले. प्रभु येशूला ज्या रात्री मारण्यासाठी धरुन देण्यात आले. त्याने भाकर घेतली. 24 आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, “हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.” 25 त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने द्राक्षारसाचा प्याला घेतला आणि म्हणाला, “हा द्राक्षारसाचा प्याला माझ्या रक्ताने स्थापित केलेला नवा करार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही द्राक्षारस प्याल तेव्हा माझी आठवण करण्यासाठी हे करा.” 26 कारण जितके वेळा तुम्ही ही भाकर खाता व हा द्राक्षारसाचा प्याला पिता, तितके वेळा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
27 म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खातो किंवा द्राक्षारसाचा प्याला पितो. तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल. 28 पंरतु मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी. आणि नंतर भाकर खावी किंवा द्राक्षारसाचा प्याला प्यावा. 29 कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व द्राक्षारसाचा प्याला पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर न्याय ओढवून घेतो. 30 याच कारणामुळे तुम्हांतील अनेक जण आजारी आहेत. आणि पुष्कळजण झोपलेले आहेत. 31 परंतु जर आम्ही आमची परीक्षा करु तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. 32 प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हांला शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हांलाही शिक्षा होऊ नये.
33 म्हणून माझ्या बंधूनो, जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा. 34 जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे यासाठी की तुम्ही न्यायनिवाड्यासाठी एकत्र जमू नये. मी येईन तेव्हा इतर गोष्टी सुरळीत करुन देईन.
2006 by World Bible Translation Center