M’Cheyne Bible Reading Plan
22 दावीद म्हणाला, “हेच ते परमेश्वर देवाचे मंदिर. इस्राएल लोकांनी होमबली अर्पण करण्याची वेदीही इथेच बांधली जाईल.”
दावीदाची मंदिर उभारणीची योजना
2 इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वाना दावीदाने एक फर्मान काढून बोलवून घेतले. पाथरवटांची निवड त्याने त्यांच्यातून केली. देवाच्या मंदिरासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांचे होते. 3 दरवाजांसाठी लागणारे खिळे आणि बिजागऱ्या यांच्यासाठी दावीदाने लोखंड आणवले. पितळेचाही फार मोठा साठा त्याने केला. 4 सीदोन आणि सोर या नगरांतील लोकांनी गंधसरुचे लाकूड दावीदाला दिले. ते ओंडके तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण.
5 दावीद म्हणाला, “आपण परमेश्वरासाठी भव्य मंदिर उभारले पाहिजे. पण माझा मुलगा शलमोन अजून लहान आहे. त्याचे शिक्षणही अद्याप पुरे झालेले नाही. परमेश्वराचे मंदिर मात्र उत्कृष्ट झाले पाहिजे. असे देखणे आणि भव्य की सगळ्या राष्ट्रांमध्ये त्याची कीर्ती व्हायला हवी. त्यादृष्टीनेच मी परमेश्वराच्या मंदिराची योजना आखीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी मंदिर उभारणीची बरीच तयारी केली.
6 मग त्याने आपला मुलगा शलमोन याला जवळ बोलावले. इस्राएलचा परमेश्वर देव याच्यासाठी मंदिर बांधण्याची दावीदाने त्याला आज्ञा केली. 7 दावीद शलमोनाला म्हणाला, “मुला, परमेश्वर देवासाठी मंदिर बांधायची मला फार इच्छा होती. 8 पण परमेश्वर मला म्हणाला, ‘दावीदा, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यात अनेक लोक मारले गेले. तेव्हा तुला माझ्यासाठी मंदिर बांधता येणार नाही. 9 मात्र तुझा मुलगा शांतताप्रिय आहे. मी त्याच्या कारकिर्दीत शांतता लाभू देईन. त्याचे शत्रू त्याला त्रास देणार नाहीत. त्याचे नाव शलमोन म्हणजे शांतताप्रिय असेल. इस्राएलला त्याच्या काळात शांतता आणि स्वस्थता लाभेल. 10 तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर उभारील. तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन त्याचे राज्य मी बळकट करीन. इस्राएलवर त्याच्या वंशजा पैकी एकजण सर्वकाळ राज्य करील.’”
11 दावीद म्हणाला, “मुला, तुला परमेश्वराची अखंड साथ लाभो. तुला यश मिळो. परमेश्वर देवाने भाकीत केल्याप्रमाणे तुझ्याहातून त्याचे मंदिर बांधून होवो. 12 तो तुला इस्राएलचा राजा करील. लोकांचे नेतृत्व करायला आणि परमेश्वर देवाचे नियम पाळायला तो तुला ज्ञान आणि शहाणपण देवो. 13 इस्राएलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू कसोशीने पाळ म्हणजे तू यशस्वी होशील. घाबरु नको. दृढ राहा. हिंमत बाळग.
14 “शलमोन, परमेश्वराच्या मंदिराच्या वास्तूसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. 3,750 टन सोने आणि 37,500 टन चांदी मी जमवली आहे. लोखंड आणि पितळ, तर मोजदाद करणे कठीण इतके आहे. दगड, लाकूड यांचाही साठा मी केलाच आहे. शलमोन, त्यात तू भर घालू शकतोस. 15 पाथरवट आणि सुतार तुझ्या दिमतीला आहेत. खेरीज प्रत्येक कामात कुशल अशी माणसे आहेत. 16 सोने, चांदी, पितळ, लोखंड यांच्या कारागिरीत ते निपुण आहेत. शिवाय हे कारागिर काही थोडे थोडके नाहीत. असंख्य आहेत. तेव्हा आता कामाला सुरवात कर. तुला परमेश्वराची साथ मिळो.”
17 दावीदाने मग इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळींना शलमोनला सहकार्य करण्याची आज्ञा केली. 18 दावीद त्यांना म्हणाला, “खुद्द परमेश्वर देवच तुमच्याबरोबर आहे. त्याच्या कृपेने तुम्हाला शांतता लाभली आहे. आपल्या भोवतालच्या शत्रूंना पराभूत करण्यात परमेश्वराने मला साहाय्य केले. आता हा देश परमेश्वराच्या आणि तुमच्या ताब्यात आहे. 19 तेव्हा अंतःकरणपूर्वक तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाला शरण जा आणि त्याचे ऐका. परमेश्वर देवाचे पवित्र मंदिर बांधा. मग मंदिरात पवित्र करारकोश आणि इतर पवित्र वस्तू आणून ठेवा.”
पत्नी आणि पती
3 त्याचप्रमाणे, पत्नींनो, आपल्या पतींच्या अधीन असा. यासाठी की, त्यांच्यापैकी काहींनी जर देवाची आज्ञा पाळली नाही तर काही न बोलताही आपल्या सदवर्तनाने त्यांची मने जिंकता येतील. 2 जेव्हा ते तुमचे शुद्ध आणि आदरयुक्त वागणे पाहतील 3 तुमची सुंदरता बाह्यस्वरुपाची नसावी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे केस सुशोभित करण्याने, सोन्याचे दागिने वापरण्याने किंवा चांगले कपडे घातल्याने आलेली नसावी. 4 त्याऐवजी तुमची सुंदरता अंतःकरणाची, जी कधीही नाश पावत नाही, अशी असली पाहिजे ती सौम्य, शांत स्वभावाची असली पाहिजे जी देवाच्या दृष्टीने अतिमौल्यवान आहे.
5 पूर्वीच्या काळातील ज्या पवित्र स्त्रिया होऊन गेल्या, त्यांनी अशाच प्रकारे आपल्या सर्व आशा देवावर केन्द्रीत करुन आपली स्वतःची सुंदरता वाढीस लावली त्या स्त्रिया आपल्या पतींच्या अधीन असत. 6 साराने अब्राहामाची आज्ञा पाळली आणि अब्राहामाला आपला मालक मानले. जर तुम्ही चांगली कामे करता व कशाचीही भिति मनात बाळगत नाही तर तुम्ही तिच्या म्हणजे सारेच्या मुली आहात.
7 तसेच पतींनो, तुम्ही आपल्या पत्नींबरोबर समंजसपणाने राहा. त्या जरी अबला असल्या तरी त्या देवाच्या कृपेमध्ये तुमच्याबरोबरच वारस आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्याविषयी आदर बाळगा, म्हणजे तुम्ही ज्या प्रार्थना देवाला सादर करता त्यात कसलीही बाधा येणार नाही.
चांगल्या कामासाठी दु:ख सोसणे
8 शेवटी सारांश हा की, तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने, सहानुभूतीने आपल्या भाऊबहिणींशी प्रेमाने, दयाळूपणे आणि नम्रतेने राहा. 9 वाइटाची परतफेड वाइटाने करु नका, किंवा अपमानाची फेड अपमानाने करु नका. उलट, त्या व्यक्तीसाठी देवाकडे आशीर्वाद मागा. कारण देवाने तुम्हाला हे करण्यासाठीच बोलाविले होते. यासाठी की, तुम्हाला देवाचा आशीर्वादाचा वारसा मिळावा. 10 पवित्र शास्त्र म्हणते,
“ज्याला जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे,
व चांगले दिवस पहावयाचे आहेत,
त्याने आपली जीभ वाईट बोलण्यापासून आवरली पाहिजे,
आणि त्याने आपल्या ओठांनी खोट्या गोष्टी बोलू नयेत.
11 दुष्टतेपासून त्याने दूर व्हावे व चांगले ते करावे.
त्याने शांतीचा शोध करुन ती मिळविली पाहिजे
12 जे नीतिमान लोक आहेत त्यांच्यावर प्रभुची नजर असते
आणि त्यांच्या प्रार्थना तो कान देऊन ऐकतो
पण जे वाईट गोष्टी करतात त्यांच्याकडे प्रभु पाठ फिरवितो.” (A)
13 जे चांगले ते करण्यास तुम्ही उत्सुक असाल तर अशी कोण व्यक्ती आहे जी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करील? पण, 14 जे योग्य ते करुनसुद्धा जर तुम्हांला दु:ख सहन करावे लागते, तर तुम्ही धन्य आहात. म्हणून “त्या लोकांची भीति बाळगू नका किंवा गर्भगळित होऊ नका” [a] 15 पण आपल्या अंतःकरणात ख्रिस्त हा प्रभु आहे असा आदर बाळगा तुमच्यामध्ये जी आशा आहे, तिच्याविषयी तुम्हांला कोणी विचारले तर त्याचे समर्थन करण्यास सदैव तयार राहा. 16 पण हे सौम्यतेने व आदराने करा. ख्रिस्तामध्ये जगत असताना तुमच्या चांगल्या वागणुकीवर जे आरोप करतात त्यांना लाज वाटेल, अशा रीतीने तुम्ही आपली विवेकबुद्धी शुद्ध राखा.
17 कारण चांगले काम करुनदेखील आपण दु:ख सोसावे अशी जर देवाची इच्छा असेल तर वाईट करुन दु:ख भोगण्यापेक्षा ते अधिक चांगले.
18 ख्रिस्तदेखील आपल्या पापांसाठी
एकदाच मरण पावला.
एक नीतिमान दुसऱ्या
अनीतिमानांसाठी मरण पावला.
यासाठी की, तुम्हाला देवाकडे जाता यावे.
त्याच्या आत्म्यासंबंधी म्हटले
तर त्याला पुन्हा जीवन दिले गेले.
19 आत्मिक रुपाने देखील ख्रिस्त बंदिवासात असलेल्या आत्म्यांकडे गेला व सुवार्ता सांगितली. 20 फार पूर्वी नोहाच्या काळात जेव्हा जहाज बांधले जात होते आणि देव धीराने वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही, तेच हे आत्मे होत. फक्त थोडकेच म्हणजे आठ लोकच जहाजात गेले व त्यांचा पाण्यापासून बचाव झाला. 21 ते पाणी आत्मा चिन्हात्मकरीत्या बाप्तिस्म्याचे ज्यामुळे आता तुमचे तारण होते त्याचे प्रतीक आहे. बाप्तिस्मा म्हणजे शरीरावरील धूळ काढणे नव्हे, तर तो देवाकडे शुद्ध विवेक मिळावा म्हणून केलेला करार आहे. हे सर्व येशू ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठण्यामुळे घडू शकले. 22 तो स्वर्गात गेलेला आहे आणि देवाच्या उजव्या हाताशी बसला आहे. देवदूत, अधिकार आणि सामर्थ्य हे सर्व त्याच्या अधीन आहेत.
शोमरोन आणि इस्राएल यांना करावयाची शिक्षा
1 मीखाला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. योथाम, आहाज व हिज्कीया यांच्या काळात हे घडले. हे सर्व यहूदाचे राजे होते. मीखा मोरेशेथचा होता. मीखाने शोमरोन व यरुशलेम यांच्याविषयी पुढील दृष्टांन्त पाहिले.
2 सर्व लोकांनो ऐका!
जग आणि त्यावरील प्रत्येकाने, ऐका!
माझा प्रभू परमेश्वर, त्याच्या पवित्र मंदिरातून येईल.
तुमच्याविरुध्दचा साक्षीदार म्हणून तो येईल.
3 पाहा परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे.
पृथ्वीवरील उच्चस्थाने तुडविण्यासाठी तो येत आहे.
4 विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते,
तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील.
दऱ्या दुभंगतील आणि उंच टेकड्यावरुन
वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे वाहू लागतील.
5 का? ह्याला कारण याकोबचे पाप,
तसेच इस्राएल राष्ट्राची दुष्कर्मे आहेत.
शोमरोन, पापाचे कारण
याकोबने पाप करण्याचे कारण काय?
त्याला कारणीभूत आहे शोमरोन.
यहूदात उच्चस्थान कोठे आहे?
यरुशलेममध्ये.
6 म्हणून मी शोमरोनला भूमीवरील खडकांच्या ढिगाप्रमाणे करीन.
ती द्राक्ष लागवडीच्या जागेप्रमाणे होईल.
शोमरोनचे चिरे मी दरीत ढकलून देईल.
आणि तिथे पायांखेरीज काहीही शिल्लक ठेवणार नाही.
7 तिच्या सर्व मूर्तीचे तुकडे तुकडे केले जातील.
तिच्या वेश्येची संपत्ती (मूर्ती) आगीमध्ये भस्मसात होईल.
तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या पुतळ्यांचा मी नाश करीन. का?
कारण शोमरोनने माझ्याशी विश्वासघात करुन सर्व धन मिळविले. [a]
म्हणून माझ्याशी एकनिष्ठ नसलेल्या लोकांमार्फत
तिची संपत्ती घेतली जाईल [b]
मीखाचे मोठे दु:ख
8 घडणाऱ्या गोष्टींबद्दल मला फार दु:ख होईल.
मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन.
मी कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन.
आणि शहामृगाप्रमाणे ओरडीन.
9 शोमरोनची जखम भरुन येऊ शकत नाही.
तिचा आजार (पाप) यहूदापर्यंत पसरला आहे.
तो माझ्या माणसांच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे.
तो पार यरुशलेमपर्यंत पसरला आहे.
10 गथमध्ये हे सांगू नका.
अंकोत ओरडू नका.
बेथ-अफ्रामध्ये धुळीत लोळा.
11 शाफीरमध्ये राहणारे लोकहो,
तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन आपल्या वाटेने फिरता.
सअनानवासी बाहेर पडणार नाहीत.
बेथ-एसलामधील लोक शोक करतील.
आणि त्या शोकाचे कारण (आधार) तुम्ही असाल.
12 मारोथमधील लोक सुवार्तेची वाट
पाहता पाहता दुर्बल होतील.
का? कारण संकट परमेश्वराकडून खाली
यरुशलेमच्या वेशीपर्यंत आले आहे.
13 लाखीशच्या महिले,
गाडी चपळ घोडा जुंप.
सियोनच्या पापाला लाखीशमध्ये सुरवात झाली.
का? कारण तू इस्राएलच्या पापांत सामील झालीस.
14 म्हणून तू गथांतल्या मोरेशथला
निरोपाचे नजराणे दिले पाहिजेस.
अकजीबची घरे
इस्राएलच्या राजाला फसवतील.
15 मोरेशमध्ये राहणाऱ्या लोकांनो,
तुमच्या विरुध्द एका व्यक्तीला मी आणीन.
तो तुमच्या मालकीच्या वस्तू घेईल.
इस्राएलचे वैभव (परमेश्वर) अदुल्लामला येईल.
16 म्हणून केसा कापा, मुंडन करा. [c] का?
कारण तुम्हाला प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल.
गरुडा प्रमाणे तुम्ही स्वतःचे डोक्याचे मुंडन करुन कराल.
गरुडा प्रमाण तुम्ही स्वतःचे डोक्याचे मुंडन करुन घ्या आणि दु:ख प्रगट करा.
का? कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.
येशू बहात्तर पुरुषांना कामगिरीवर पाठवितो
10 या घटनांनंतर प्रभुने इतर बहात्तर जणांची [a] नेमणूक केली. आणि येशूने त्यांना जोडीजोडीने पाठविले. त्याला ज्या ठिकाणी जायचे होते त्या प्रत्येक गावात व ठिकाणी त्याने त्यांना पाठविले. 2 तो त्यांना म्हणाला, “पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने त्याच्या पिकासाठी कामकरी पाठवावेत यासाठी प्रार्थना करा.
3 “जा! आणि लक्षात ठेवा, लांडग्यात जशी कोंकरे तसे मी तुम्हास या जगात पाठवीत आहे. 4 थैली, पिशवी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, व रस्त्याने जाताना कोणाला सलाम करु नका. 5 कोणत्याही घरात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा पहिल्यांदा असे म्हणा, ‘या घरास शांति असो!’ 6 जर तेथे शांतिप्रिय मनुष्य असेल तर तुमची शांति त्याच्यावर राहील, परंतु तो मनुष्य शांतिप्रिय नसेल तर तुमची शांति तुमच्याकडे परत येईल. 7 त्या घरात तुम्हांला जे देतील ते खातपीत राहा. कारण कामकरी हा त्याच्या मजुरीस पात्र आहे. या घरातून त्या घरात असे घर बदलू नका.
8 “कोणत्याही नगरात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा आणि जेव्हा ते तुमचे स्वागत करतील तेव्हा, तुमच्यासमोर जे वाढलेले असेल ते खा. 9 तेथील रोग्यांना बरे करा आणि नंतर त्यांना सांगा की, ‘देवाचे राज्य लवकरच तुमच्याकडे येत आहे!’
10 “परंतु तुम्ही एखाद्या गावात प्रवेश कराल आणि त्यांनी जर तुमचे स्वागत केले नाही तर रस्त्यात जा आणि म्हणा. 11 ‘आमच्या पायाला लागलेली तुमच्या गावाची धूळदेखील आम्ही तुम्हांविरुद्ध झटकून टाकीत आहोत! तरीही हे लक्षात असू द्या की, देवाचे राज्य लवकरच तुमच्याकडे येत आहे.!’ 12 मी तुम्हांला सांगतो, त्या दिवशी त्या गावापेक्षा सदोमातील लोकांना सोपे जाईल.
जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना येशू इशारा देतो(A)
13 “खोराजिना तुझ्यासाठी हे वाईट होईल! बेथसैदा [b] तुझ्यासाठी हे वाईट होइल! कारण जे चमत्कार तुम्हांमध्ये घडले ते जर सोर व सिदोनमध्ये घडले असते तर त्यांनी फार पूर्वीच गोणपाट नेसून राखेत बसून पश्चात्ताप केला असता. 14 तरीसुद्धा सोर व सिदोन यांना न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोपे जाईल. 15 आणि कफर्णहूमा, तुला स्वर्गापर्यंत चढवले जाईल काय? तू तर अधोलोकातच जाशील.
16 “जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो. आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला नाकारतो.”
सैतानाचे पतन
17 ते बहात्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभु, तुझ्या नावाने भुतेसुद्धा आम्हांला वश होतात!”
18 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले! 19 ऐका मी तुम्हांला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा अधिकार दिला आहे. व मी तुम्हांला शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे. आणि कशानेच तुम्हांला अपाय होणार नाही. 20 तथापि तुम्हांला भुते वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वार्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.”
येशू पित्याला प्रार्थना करतो(B)
21 त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात उल्हासित झाला, आणि म्हणाला, “हे पित्या, स्वार्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभु मी तुझी स्तुति करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे बरे वाटले ते तू केलेस.
22 “माइया पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या. आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रगट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.”
23 आणि शिष्यांकडे वळून तो एकांतात बोलला, “तुम्ही जे पाहता ते पाहणारे डोळे धन्य. 24 मी तुम्हांस सांगतो, अनेक राजांनी व संदेष्ट्यांनी तुम्ही जे पाहता ते पाहण्याची इच्छ बाळगली, परंतु त्यांनी ते पाहिले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते ऐकले नाही.”
चांगला शोमरोनी
25 नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”
26 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यांत काय वाचतोस?”
27 तो म्हणाला, “‘तू तुझा देव प्रभु याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तिने प्रीति कर.’ [c] व ‘स्वतःवर जशी प्रीति करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीति कर.’” [d]
28 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू चिरकाल राहशील.”
29 पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले, “मग माझा शेजारी कोण?”
30 येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमाहून यरीहोस निघाला होता. आणि तो लुटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेतले. त्यांनी त्याला मारले, आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.
31 “तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्याला पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. 32 त्याच मार्गाने एक लेवी त्या ठिकाणी आला. लेव्याने त्याला पाहिले. व तो सुध्दा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
33 “नंतर एक शोमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत तेथे आला. जेव्हा त्याने त्या मनुष्याला पाहिले, तेव्हा त्याला त्याच्याविषयी कळवळा आला 34 तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षारस ओतून त्या बांधल्या. नंतर त्या शोमरोन्याने त्याला आपल्या गाढवावर बसविले व त्याला उतारशाळेत आणले, व त्याची देखभाल केली. 35 दुसऱ्या दिवशी त्याने दोन दीनार। [e] (सुमारे वीस रुपये) काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला, ‘याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.’”
36 लुटारुंच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता, “त्याचा त्या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते?”
37 तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला, “ज्याने त्या गरजू जखमी प्रवाशावर दया मनापासून केली तो.”
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “जा आणि तूही तसेच कर.”
मरीया आणि मार्था
38 मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता, तो एका खेड्यात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करुन आदरातिथ्य केले. 39 तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली. 40 पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभु, माझ्या बहिणीने सर्व काम माइयावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.”
41 प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस. 42 पण एक गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो कारण मरीयेने तिच्यासाठी चांगला कार्यभाग निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
2006 by World Bible Translation Center