M’Cheyne Bible Reading Plan
इस्साखारचे वंशज
7 इस्साखारला चार मुलगे होते. त्यांची नावे अशी: तोला, पुवा, याशूब आणि शिम्मोन.
2 उज्जी, रकाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे मुलगे. ते सर्व आपापल्या घराण्यातले प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या कारकिर्दीपर्यंत 22,600 इतकी झाली.
3 इज्रह्या हा उज्जीचा मुलगा. मिखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे मुलगे. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते. 4 त्यांच्या घराण्यात 36,000 सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळीच्या नोंदीवरुन दिसते. बायका आणि मुले पुष्कळ असल्यामुळे यांचे घराणे मोठे होते.
5 इस्साखारच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून 87,000 लढवय्ये होते असे वंशावळींच्या नोंदींवरुन दिसते.
बन्यामीनचे वंशज
6 बन्यामीनला तीन मुलगे: बेला, बेकर आणि यदीएल.
7 बेलाला पाच मुलगे होते: एस्बोन, उज्जी, उज्जीयेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात 22,034 सैनिक होते असे घराण्याच्या नोंदींवरुन दिसते.
8 जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेर चे मुलगे. 9 आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळीच्या नोंदीवरुन कळते. त्यांच्याकडे 20,200 सैनिक होते, हे ही त्यावरुन कळते.
10 यदीएलचा मुलगा बिल्हान. बिल्हानची मुले, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर. 11 यदीएलचे मुलगे हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे 17,200 सैनिक युध्दाला तयार होते.
12 शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा मुलगा हुशीम.
नफतालीचे वंशज
13 यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे मुलगे.
हे सर्व बिल्हेचे वंशज.
मनश्शेचे वंशज
14 मनश्शेचे वंशज खालील प्रमाणे: मनश्शे आणि त्याची अरामी दासी यांना अस्रीएल नावाचा मुलगा होता. माखीर हाही आणखी एक मुलगा होता. माखीर म्हणजे गिलादचा बाप. 15 हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका बाईशी माखीरने लग्न केले. तिचे नाव माका. माखीरच्या बहिणीचे ही नाव माका होते. या माकाचे दुसरे नाव सलाफहाद होते. हिला फक्त मुलीच झाल्या. 16 माखीरची बायको माका हिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या (माखीरच्या) भावाचे नाव शेरेश. शेरेशचे मुलगे ऊलाम आणि रेकेम.
17 ऊलामचा मुलगा बदान.
हे झाले गिलादचे वंशज. गिलाद हा माखीरचा मुलगा. माखीर मनश्शेचा मुलगा. 18 माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे मुलगे झाले.
19 अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे मुलगे.
एफ्राईमचे वंशज
20 एफ्राईमची वंशावळ पुढीलप्रमाणे. एफ्राईमचा मुलगा शुथेलह,शुथेलहाचामुलगा बेरेद,बेरेदाचा मुलगा तहथ,तहथचा मुलगा एलादा. 21 एलादाचा मुलगा तहथ. तहथचा मुलगा जाबाद. जाबादचा मुलगा शुथेलह.
गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरे मेंढरे चोरुन नेत होते. 22 एजेर आणि एलद हे एफ्राईमचे मुलगे होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले. 23 मग एफ्राईमचा बायकोशी संबंध येऊन त्याची बायको गर्भवती राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. एफ्राईमने या मुलाचे नाव बरीया ठेवले. घरात आधी वाईट घडून गेल्यामुळे त्याने हे नाव ठेवले. 24 एफाईमच्या मुलीचे नाव शेरा. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि खालचे आणि वरचे उज्जनशेरा ही बांधली.
25 रेफह हा एफ्राईमचा मुलगा. रेफहचा मुलगा रेशेफ. त्याचा मुलगा तेलह. तेलहचा मुलगा तहन. 26 तहनचा मुलगा लादान. लादानचा मुलगा आम्मीहूद. आम्मीहूदचा अलीशामा. 27 त्याचा मुलगा नून आणि नूनचा मुलगा यहोशवा.
28 एफ्राईमच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी ते रहात होते: बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान; र्पार्मिला गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी थेट अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत. 29 मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा मुलगा योसेफ याचे वंशज राहत होते.
आशेरजे वंशज
30 इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे मुलगे. त्यांची बहीण सेराह.
31 हेबेर, मालकीएल, हे बरीयाचे मुलगे. मालकीएलचा मुलगा बिर्जाविथ.
32 यफलेट, शोमर, होथाम हे मुलगे आणि शूवा ही बहीण यांचा हेबेर हा बाप होता.
33 पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे मुलगे.
34 अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेरचे मुलगे.
35 शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे मुलगे सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.
36 सोफहचे मुलगे सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना, 37 बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा.
38 यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे मुलगे.
39 आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे मुलगे.
40 हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते गुणसंपन्न शूर योध्दे होते. त्यांच्या वंशावळीच्या नोंदीप्रमाणे 26,000 लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.
राजा शौलच्या घराण्याचा इतिहास
8 बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आश्बेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा. 2 चौथा नोहा व पाचवा राफा.
3-5 अद्दार, गेरा, अबीहूद, अबीशूवा, नामान, अहोह, गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे मुलगे.
6-7 एहूदचे वंशज खालील प्रमाणे: नामान, अहीया आणि गेरा. हे गेबातील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांना आपापली गावे सोडायला लावून सक्तीने मानाहथ येथे नेण्यात आले. गेराने त्यांना कैद केले. गेराने उज्जा आणि अहीहूद यांना जन्म दिला.
8 शहरयिमाने मवाबात आपल्या बायका हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्याला दुसऱ्या एका बायकोपासून मुले झाली. 9-10 ही त्याची बायको होदेश हिच्यापासून त्याला योबाब, सिब्या, मेशा, मल्काम, यऊस. शख्या, मिर्मा हे मुलगे झाले. ते आपल्या वडिलांच्या घराण्यांचे प्रमुख होते. 11 हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे मुलगे झाले.
12-13 एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पाचे मुलगे. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली. बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.
14 अह्यो, शाशक, यरेमोथ, 15 जबद्या. अराद, एदर, 16 मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे मुलगे. 17 जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर, 18 इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे मुलगे.
19 याकीम, जिख्री, जब्दी, 20 एलीएनय, सिलथय, अलीएल, 21 अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे मुलगे.
22 इश्पान, एबर, अलीएल, 23 अब्दोन, जिख्री, हानान, 24 हनन्या, एलाम, अनथोथीया, 25 इफदया, पनुएल हे शाशकचे मुलगे होत.
26 शम्शरय, शहऱ्या, अथल्या, 27 यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामचे मुलगे.
28 हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. तशी त्यांची वंशावळींमध्ये नोंद आहे. ते यरुशलेम येथे राहत होते.
29 गिबोनचा बाप यइएल. तो गिबोनमध्ये राहत होता. त्याची बायको माका. 30 त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब, 31 गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर मुले. 32 शिमा हा मिकलोथचा मुलगा. आपल्या यरुशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.
33 कीशचा बाप नेर. कीश शौलचा बाप. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा.
34 योनाथानचा मुलगा मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा बाप.
35 पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे मुलगे.
36 यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमाबेथ व जिम्री यांचा बाप होता. जिम्री हा मोसाचा बाप होता. 37 बिनाचा पिता मोसा. बिनाचा मुलगा राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.
38 आसेलला सहा मुलगे होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.
39 आसेलचा भाऊ एशेक. त्याचे मुलगे: ज्येष्ठ मुलगा ऊलाम, दुसरा यऊष आणि तिसरा अलिफलेत. 40 ऊलामचे मुलगे शूर आणि उत्तम धनुर्धर होते. त्यांची वंशवेल चांगली विस्तारली. मुले, नातवंडे मिळून 150 जण होते.
हे सर्व बन्यामीनचे वंशज.
विश्वास
11 आता विश्वास म्हणजे, आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरंवसा असणे. 2 यासाठीच म्हणजे त्यांच्या विश्वासासाठीच देवाने पूर्वीच्या लोकांना उंचावले होते.
3 विश्वासामुळेच आम्हांला समजते की, या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली. म्हणून जे काही आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले.
4 विश्वासामुळेच हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला. देवाने हाबेलाची दाने मान्य केल्यामुळे विश्वासाच्याद्वारे तो धार्मिक म्हणून उंचावण्यात आला, आणि जरी तो मेला असला तरी तो आपल्या विश्वासामुळे अजून बोलतो.
5 विश्वासमुळे हनोखाला देवाकडे नेण्यात आले, यासाठी की, त्याला मरणाचा अनुभव आला नाही व तो कोणाला सापडला जाऊ नये म्हणून देवाने त्याला दूर नेले. पण तो वर घेतला जाण्यापूर्वी त्याच्याबद्दल साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे. 6 आणि विश्वासाशिवाय देवाला संतोषविणे अशक्य आहे. कारण जो कोणी देवाकडे येतो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की देव आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना तो बक्षीस देतो.
7 ज्या गोष्टी अजून पाहिल्या नव्हत्या, अशा गोष्टींच्या बाबतीत नोहाला सावधान करण्यात आले होते तेव्हा त्याने विश्वासाने त्याची दखल घेतली. आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी जहाज बांधले, विश्वासामुळेच त्याने जगाचा धिक्कार केला आणि विश्वासामुळे लाभणाऱ्या धार्मिकतेचा तो वारस बनला.
8 जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले. आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या जागेकडे तो गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसतानादेखील तो बाहेर पडला. 9 विश्वासाने तो वचनदत्त देशात एखाद्या उपऱ्यासारखा राहिला. इसहाक व याकोब यांच्यासारखा तोदेखील तंबूत राहिला. कारण ते दोघेही अब्राहामाला दिलेल्या त्याच वचनाचे वारसदार होते. 10 ज्या नगराला मजबूत पाया आहे व ज्याचा प्रयोजक बांधकाम कारागीर स्वतःदेव आहे अशा नगराची ते वाट पाहात होते.
11 आपण दिलेल्या वचनाबाबत देव विश्वासू आहे हे जाणून सारा ही जरी वांझ होती आणि अब्राहामाचे वय लेकरे होण्याच्या अगदी मर्यादेपलीकडे गेले होते, तरी विश्वासाने मुलाला जन्म देण्याची शक्ति त्यांना मिळाली. 12 आणि जवळजवळ मरावयास टेकलेल्या अशा एका अब्राहामापासून आकाशातील ताऱ्यांच्या संख्येएवढी आणि समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांइतकी अगणित संतति जन्मास आली.
13 हे सर्व लोक विश्वासात मरण पावले. देण्यात आलेल्या वचनांचे प्रतिफळ त्यांना प्राप्त झाले नव्हते. परंतु त्यांनी विश्वासाने ते दुरूनच पाहिले व त्याचे स्वागत केले आणि त्यांनी उघडपणे कबूल केले की ते परके आणि प्रवासी आहेत. 14 जे लोक अशा गोष्टी बोलतात ते हेच दर्शवितात की ते त्यांच्या वतनासाठी देश पाहत आहेत. 15 ते जर आपण सोडून आलेल्या देशाबद्दल विचार करीत असते तर त्यांना त्या देशात परत जाण्याची संधी मिळाली असती 16 परंतु ते लोक त्याहून अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गाच्या वतनाची इच्छा धरुन होते. म्हणून देवाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला लाज वाटली नाही. कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.
17-18 जेव्हा देवाने अब्राहामाची परीक्षा पाहिली, तेव्हा विश्वासाने आपला पुत्र इसहाक याला अर्पण केले. होय, ज्याला अभिवचने दिली होती, तो आपला एकुलता एक पुत्र अर्पण करण्यास तयार झाला होता. आणि देवाने त्याला सांगितले होते की, “इसहाकाकडूनच तुइया वंशाची वाढ होईल.” [a] 19 अब्राहामाचा असा विश्वास होता की, देव मनुष्याला मरणातून पुन्हा उठवू शकतो आणि अलंकारिक भाषेत बोलायचे झाले तर इसहाक त्याला जसा काय मरणातून परत मिळाला.
20 इसहाकाने विश्वासाने याकोबाला व एसावाला पुढील काळासाठी आशीर्वाद दिले. 21 विश्वासाने याकोब, जेव्हा तो मरत होता, तेव्हा त्याने योसेफाच्या प्रत्येक मुलाला आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीवर तो टेकला असताना त्याने देवाची उपासना केली.
22 आपल्या आयुष्याच्या शेवटी योसेफ विश्वासाने इस्राएल लोक इजिप्त देशाच्या बाहेर जाण्याबाबत बोलला आणि त्याच्या अस्थिसंबंधी काय करायचे याच्या सूचना त्याने दिल्या.
23 जेव्हा मोशे जन्मला तेव्हा विश्वासाने त्याच्या आईवडिलांनी त्याला तीन महिने लपवून ठेवले कारण त्यांनी पाहिले की ते बाळ सुंदर आहे आणि राजाज्ञेची त्यांना भीति वाटली नाही.
24-25 विश्वासाने मोशेने जेव्हा तो मोठा झाला, तेव्हा फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवून घेण्याचे नाकारले. पापाचे अल्पकाळ टिकणारे सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोवर त्रास सहन करण्याचे त्याने निवडले. 26 इजिप्त देशातील संपत्तीपेक्षा ख्रिस्तासाठी अपमान सहन करणे हे अधिक मौल्यवान आहे, असे त्याने मानले. कारण तो पुढे मिळणाऱ्या बक्षीसाकडे पाहत होता.
27 राजाच्या रागाची भिति न बाळगता, मोशेने इजिप्त देश सोडला. जणू काय न दिसणाऱ्या देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. 28 नाश करणाऱ्याने (देवदूताने) इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या मुलांपैकी एकालाही हात लावू नये म्हणून त्याने विश्वासाने वल्हांडण सण पाळला आणि रक्त शिंपडले.
29 विश्वासाने त्यांनी जणू काय कोरड्या जमिनीवरुन चालावे, तसा तांबडा समुद्र पार केला. पण जेव्हा इजिप्तच्या लोकांनी तसे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बुडाले.
30 लोकांनी विश्वासाने सात दिवस फेऱ्या मारल्यावर यरीहोची भिंत पडली.
31 राहाब वेश्येच्या विश्वासामुळेच ज्या लोकांनी आज्ञा मोडली त्यांच्याबरोबर ती मारली गेली नाही कारण तिने हेरांचे शांतीने स्वागत केले.
32 मी आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आदि संदेष्टे यांच्याबाबत सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही. 33 लोकांनी विश्वासाने राज्ये जिंकली, न्याय स्थापित केला, आणि त्यांना देवाची अभिवचने मिळाली, त्यांनी सिंहांची तोडे बंद केली. 34 त्यांनी अग्निचे सामर्थ्य नष्ट केले. तरवारीने मरण्यापासून बचावले. अशक्तपणात त्यांनी सामर्थ्य मिळविले. ते लढाईत सामर्थ्यशाली ठरले. आणि त्यांनी परकी सेना मागे हटविली. 35 स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले पुन्हा जिवंत असे मिळाले, इतरांना वेदना सोसाव्या लागल्या कारण त्यांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळावे म्हणून सुटका करून घेण्यास नकार दिला. 36 काहींना निंदा व चाबकाचा मार सहन करावा लागला. तर काहींना बेड्या व तुरूगंवास भोगावे लागले. 37 त्यांना दगडमार झाला. करवतीने त्यांना चिरण्यात आले, त्यांना तरवारीने मारण्यात आले. ते मेंढ्यांचे व बकऱ्यांचे कातडे पांघरून फिरत राहिले. ते निराधार झाले. त्यांना अती दबावाखाली भारी पीडा देण्यात आल्या. 38 त्यांच्यासाठी जग योग्य नव्हते, ते जंगलात, डोंगरकपारीत, गुहांमधून व जमिनीतील बिळांतून लपून फिरत राहिले.
39 या लोकांना त्यांचा विश्वासाविषयी चांगले बोलण्यात आले पण देवाने त्यांना जे अभिवचन दिले होते ते त्यांना मिळाले नाही. 40 देवाने आमच्यासाठी काहीतरी अधिक चांगली योजना तयार केली होती यासाठी की आमच्याबरोबर त्यांनाही परिपूर्ण करावे.
इस्राएलसाठी शोकगीत
5 इस्राएलच्या लोकांनो, हे गीत ऐका हे विलापगीत तुमच्याबद्दल आहे.
2 इस्राएलची कुमारिका पडली आहे.
ती पुन्हा कधीही उठणार नाही.
तिला एकटीलाच सोडून दिले आहे ती धुळीत लोळत आहे.
तिला उठवणारा कोणीही नाही.
3 परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो:
“हजार माणसांना घेऊन
नगर सोडणारे अधिकारी फक्त शंभर माणंसाना बरोबर घेऊन नगर
सोडणारे अधिकारी फक्त
दहा माणसांना घेऊन परततील.”
परमेश्वर इस्राएलला परत येण्यासाठी प्रोत्साहन देतो
4 परमेश्वर इस्राएल राष्ट्राला असे सांगतो,
“मला शरण या आणि जगा.
5 पण बेथेलास शरण जाऊ नका;
गिल्गालला जाऊ नका;
सीमा ओलांडून खाली बैरशेब्यालाही जाऊ नका.
गिल्गालमधील लोकांना कैदी म्हणून नेले जाईल.
आणि बेथेलचा नाश केला जाईल.
6 परमेश्वराकडे जा आणि जगा.
तुम्ही परमेश्वराकडे गेला नाहीत, तर योसेफच्या घराला आग लागेल, ती आग योसेफचे घर भस्मसात करील.
बेथेलमधील ही आग कोणीही विझवू शकणार नाही.
7-9 तुम्ही मदतीसाठी परमेश्वराची याचना करावी.
देवानेच कृत्तिका व मृगशीर्ष यांची निर्मिती केली.
तो परमेश्वरच अंधाराचे रूपांतर सकाळच्या उजेडात करतो.
तोच दिवसाचे परिवर्तन अंधाव्या रात्रीत करतो.
समुद्रातील पाण्याला बोलावून जमिनीवर
ओततो त्याचे नाव ‘याव्हे!’
तो एक मजबूत शहर सुरक्षित ठेवतो.
तर दुसऱ्या भक्कम शहराचा नाश होऊ देतो.”
इस्राएली लोकांनी केलेली पापकर्मे
तुम्ही चांगुलपणा विषात बदलता
तुम्ही न्यायाला मारून धुळीत पडू देता.
10 संदेष्टे चव्हाट्यांवर जाऊन लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल बोलतात, पण अशा संदेष्ट्यांचा लोक तिरस्कार करतात.
संदेष्टे सरळ, चांगल्या सत्याची शिकवण देतात. पण लोक त्यांचा रागच करतात.
11 तुम्ही अन्यायाने गरिबांकडून कर घेता,
त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता.
तुम्ही कौरीव दगडांची दिमाखदार घरे बांधता खरी,
पण त्यात तुम्ही रहाणार नाही.
तुम्ही द्राक्षाच्या सुंदर बागा लावता,
पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पीणार नाही.
12 का? कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे.
तुम्ही खरोखरच काही वाईट कृत्ये केली आहेत.
योग्य आचरण करणाऱ्यांना पैसा घेता.
न्यायालयात गरिबांवर अन्याय करता.
13 त्या वेळी, सुज्ञ शिक्षक गप्प बसतील.
का? कारण ती वाईट वेळ आहे.
14 परमेश्वर तुमच्याबरोबर आहे असे तुम्ही म्हणता,
मग सत्कृत्ये करा, दुष्कृत्ये नव्हे.
त्यामुळे तुम्ही जगाल
व सर्व शक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोहबर येईल.
15 दुष्टाव्याचा तिरस्कार करा व चांगुलपणावर प्रेम करा.
न्यायालयात पुन्हा न्याय आणा.
मग कदाचित सर्व-शक्तिमान परमेश्वर
देव योसेफच्या वाचलेल्या वंशजांवर कृपा [a] करील.
अतिशय दु:खाची वेळ येत आहे
16 माझा प्रभू सर्वशक्तिमान देव म्हणतो,
“लोक चव्हाट्यावर रडत असतील रस्त्यांतून ते रडतील.
धंदेवाईक रडणाऱ्यांना लोक [b]
भाड्याने बोलवून घेतील.
17 द्राक्षमळ्यांत लोक रडत असतील.
का? कारण मी तुमच्यामध्ये फिरून व तुम्हाला शिक्षा करीन.”
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
18 परमेश्वरचा खास न्यायाचा दिवस
पाहण्याची तुमच्यापैकी कीहींची इच्छा आहे.
तुम्हाला तो दिवस का बरे पहावयाचा आहे?
परमेश्वराचा तो खास दिवस अंधार आणणार आहे, उजेड नाही.
19 सिंहापासून दूर पळणाऱ्या माणसावर अस्वलाने हल्ला करावा,
अशी तुमची स्थिती होईल.
घरात जाऊन भिंतीवर हात ठेवणाव्याला साप चावावा,
तशी तुमची अवस्था होईल.
20 परमेश्वराचा खास दिवस अंधारच आणील,
उजेड नाहीतो निराशेचा दिवस असेल, प्रकाशाचा एक किरणही नसेल तो आनंदचा दिवस नसेल.
परमेश्वर इस्राएलची उपासना नाकारतो
21 “मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो
मी ते मान्य करणार नाही.
तुमच्या धार्मिक-सभा मला आवडत नाहीत.
22 तुम्ही मला होमार्पणे व अन्नार्पणे जरी दिलीत,
तरी मी ती स्वीकारणार नाही.
शांत्यार्पणात, तुम्ही दिलेल्या पुष्ट
प्राण्यांकडे मी पाहणारसुध्दा नाही.
23 तुमची कर्कश गाणी येथून दूर न्या.
तुमचे वाद्यसंगीत मी ऐकणार नाही.
24 तुम्ही, तुमच्या देशातून, पाण्याप्रमाणे, न्यायीपणा वाहू द्यावा.
कधीही कोरडा न पडणाऱ्या झऱ्याप्रमाणे चांगुलपणा वाहावा.
25 इस्राएल, वाळवंटात, 40 वर्षे तू मला यज्ञ
व दाने अर्पण केलीस.
26 पण तुम्ही सक्कूथ ह्या तुमच्या राजाची व कैवानची मूर्तीसुध्दा वाहून नेली.
तुम्ही स्वतःच तुमच्या दैवतांसाठी तारा तयार केला. [c]
27 म्हणून मी तुम्हाला कैदी म्हणून दिमिष्काच्या पलीकडे घालवीन.”
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
त्याचे नाव सर्वशक्तिमान देव!
लूक येशूच्या जीवनाविषयी लिहितो
1 पुष्कळ लोकांनी आमच्यामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांची नोंद करण्याचा प्रयत्न केला. 2 त्यांनी त्याच गोष्टी लिहिल्या ज्या आम्हांला काही इतर लोकांकडून समजल्या होत्या-या लोकांनी त्या गोष्टी सुरुवातीपासून पाहिल्या होत्या आणि देवाचा संदेश लोकांना सांगून त्याची सेवा केली होती. 3 थियफिला महाराज, सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास मी केला आहे, म्हणून मला असे वाटले की, या सर्व घटनांविषयी आपणांला व्यवस्थित माहिती लिहावी. 4 हे मी यासाठी लिहित आहे की, जे काही तुम्हांला शिकविण्यात आले ते खरे आहे, हे तुम्हांला समजावे.
जखऱ्या आणि अलीशिबा
5 यहूदीयाचा राजा हेरोद याच्या दिवसांत, जखऱ्या नावाचा एक याजक होता. तो अबीयाच्या याजककुळातील होता. त्याला एक पत्नी होती, ती अहरोनाच्या वंशातील कन्यांपैकी होती. तिचे नाव अलीशिबा होते. 6 दोघेही देवाच्या दृष्टीने धार्मिक होते आणि प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात काटेकोर होते. 7 परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती. आणि शिवाय दोघेही फार म्हातारे झाले होते.
8 जेव्हा जखऱ्याच्या गटाची मंदिरात सेवा करण्याची वेळ आली आणि त्यावेळी तो तेथे देवाचा याजक म्हणून सेवा करीत होता, 9 याजकांच्या प्रथेप्रमाणे मंदिरात देवापुढे धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. 10 जेव्हा धूप जाळण्याच्या वेळी सर्वजण बाहेर जमून प्रार्थना करीत होते,
11 तेव्हा देवाच्या दूताने त्याला दर्शन दिले. देवदूत धूप जाळण्याच्या वेदीच्या उजव्या बाजूला उभा होता. 12 जेव्हा जखऱ्याने त्याला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला, आणि त्याला भीति वाटली. 13 देवदूत त्याला म्हणाला, “जखऱ्या, भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे, आणि तुझी पत्नी अलीशिबा इजपासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान ठेव. 14 तो तुला आनंद आणि सुख देईल. त्याचा जन्म होईल तेव्हा पुष्कळ लोक आनंदित होतील. 15 देवाच्या दृष्टीने तो महान होईल. त्याने कोणतेही कडक पेय किंवा मद्य पिऊ नये. आणि तो आईच्या गर्भात असल्यापासूनच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.
16 “आणि तो पुष्कळ इस्राएल लोकांना प्रभु त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल. 17 योहान स्वतः देवापुढे चालेल, तो एलीयाप्रमाणे समर्थ होईल. एलीयाला जो आत्मा होता, तोच त्याला असेल. तो वडिलांची अंतःकरणे त्याच्या मुलांकडे वळवील. आज्ञा न मानणाऱ्यांना तो धार्मिकतेकडे नेईल. प्रभुसाठी लोकांना तयार करण्यासाठी तो या गोष्टी करील.”
18 मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे खरे आहे हे मला कसे समजेल? कारण मी वृद्ध मनुष्य आहे, आणि माझी पत्नीसुद्धा वृद्ध झाली आहे.”
19 आणि देवदूताने उत्तर दिले. तो म्हणाला, “मी गब्रीएल आहे. मी देवाच्या समक्षतेमध्ये उभा राहतो. आणि मला तुझ्याशी बोलायला व तुला ही सुवार्ता सांगायला पाठविण्यात आले आहे. 20 पण हे लक्षात ठेव, तू मुका राहशील. हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही. कारण माझे शब्द जे योग्य वेळी खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”
21 लोक जखऱ्याची वाट पाहत होते, आणि तो मंदिरात इतका वेळ का राहिला याचे त्यांना नवल वाटत होते. 22 जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलता येईना. मग त्यांना जाणीव झाली की, मंदिरात त्याने दृष्टान्त पाहिला आहे. तो त्यांना खुणा करीत होता परंतु बोलू शकत नव्हता. 23 मग असे झाले की, त्याच्या सेवेचा कालावधि संपल्यानंतर तो घरी गेला.
24 काही काळानंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली. आणि पाच महिने तिने स्वतः एकांतवास पत्करला. ती म्हणाली, 25 “शेवटी आता प्रभुने मला या मार्गाने मदत केली आहे. लोकांमध्ये माझी लाज राखण्यासाठी त्याने माझी पुष्कळ काळजी घेतली.”
कुमारी मरीया
26-27 अलीशिबाच्या सहाव्या महिन्यात, देवाने गब्रीएल दूताला गालीलातील नासरेथ गावी पाठविले.योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती, तिच्याकडे गब्रीएलाला पाठविण्यात आले. योसेफ हा दाविदाच्या [a] घराण्यातील होता. तिचे नाव मरीया होते. 28 गब्रीएल तिच्याकडे आला आणि म्हणाला, “अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभु तुझ्याबरोबर आहे.”
29 परंतु या शब्दांनी ती अस्वस्थ झाली, आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करु लागली.
30 देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. 31 ऐक! तू गरोदर राहशील, आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. 32 तो महान होईल व त्याला सर्वोच्य देवाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभु देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल. 33 याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी तो सत्ता चालवील त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही.”
34 तेव्हा मरीया दूताला म्हणाली, “मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल?”
35 देवदूत तिला म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील. 36 आणि याकडे लक्ष दे: तुझी नातेवाईक अलीशिबा जरी वांझ असली तरी तीसुद्धा गरोदर आहे व तिच्या पोटी पुत्र आहे. आणि ज्या स्त्रीला ते म्हणाले की तुला मूल होणार नाही तिला आता सहावा महिना आहे! 37 कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.”
38 मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, आपण म्हणालात तसे माझ्याबाबतीत घडो.” मग देवदूत तिला सोडून गेला.
2006 by World Bible Translation Center