M’Cheyne Bible Reading Plan
आदामापासून अब्राहामापर्यंतची वंशावळ
1 आदाम, शेथ, अनोश, केनान, महललेल, यारेद, हनोख, मथुशलह, लामेख (नोहा.) [a]
4 शेम, हाम आणि याफेथ ही नोहाची मुले.
याफेथची मुले
5 गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख, तीरास
6 गोमरचे मुलगे: आश्कनाज, रीफाथ, तोगार्मा
7 यावानचे मुलगे: अलीशा, तार्शीश, कित्तीम, रोदानीम
हामचे मुलगे
8 कूश, मिस्राईम (मिसर) पूट व कनान.
9 कूशचे मुलगे असे: सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका,
रामाचे मुलगे शबा आणि ददान.
10 कुशचा वंशज निम्रोद हा जगातील सर्वात सामर्थ्यवान आणि शूर सैनिक झाला.
11 मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम, 12 पात्रुसीम, कास्लूहीम (याच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला.
13 आणि कनानाचा ज्येष्ठ मुलगा सीदोन व त्यांनतर हेथ; 14 यबूसी, अमोरी, गिर्गाशी, 15 हिव्वी, अर्की, शीनी 16 आर्वाही, समारी, हमाथी हे होत.
शेमचे मुलगे
17 एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम हे शेमचे मुलगे, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे अरामचे मुलगे.
18 शेलहचे वडील अर्पक्षद आणि एबरचे वडील शेलह.
19 एबरला दोन मुलगे झाले. एकाचे नाव पेलेग (म्हणजे विभागणी) त्याला हे नाव पडायचे कारण याच्या हयातीत पृथ्वीवरील लोकांची भाषावार विभागणी झाली. पेलेगच्या भावाचे नाव यक्तान. 20 यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, 21 हदोराम, ऊजाल, दिक्ला, 22 एबाल, अबीमाएल, शबा, 23 ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला.
24 अर्पक्षद, शेलह, 25 एबर, पेलेग, रऊ 26 सरुग, नाहोर, तेरह, 27 अब्राम (म्हणजेच अब्राहाम) ही सर्व शेमची मुले.
अब्राहामची वंशावळ
28 इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामची मुले. 29 त्यांचे वंशज पुढीलप्रमाणे:
नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा. इश्माएलची इतर मुले म्हणजे केदार, अदबेल, मिबसाम, 30 मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा 31 यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलचे मुलगे.
32 कटूरा ही अब्राहामची दासी होती. तिने जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला.
यक्षानला सबा व ददान हे मुलगे झाले.
33 एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे मुलगे.
या सर्वाना कटूराने जन्म दिला.
साराचे मुलगे
34 इसहाक हा अब्राहामचा मुलगा. एसाव आणि इस्राएल (याकोब) हे इसहाकचे मुलगे.
35 एसावाचे मुलगे पुढीलप्रमाणे: अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.
36 अलीपाजचे मुलगे असे: तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्रा यांना अमालेक नावाचा मुलगा होता.
37 नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलचे मुलगे होत.
सेईरचे अदोमी
38 लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे मुलगे.
39 होरी आणि होमाम हे लोटानचे मुलगे. लोटानला तिम्ना नावाची बहीणही होती.
40 आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे मुलगे.
अय्या आणि अना हे सिबोनचे मुलगे.
41 दीशोन हा अनाचा मुलगा
आणि हमदान, एशबान, यित्राण, करान हे दीशोनचे मुलगे.
42 बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे मुलगे.
ऊस व अरान हे दीशानाचे मुलगे.
अदोमचे राजे
43 इस्राएलमध्ये राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोममध्ये राजे होते. त्यांची नावे अशी:
बौराचा मुलगा बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.
44 बेलाच्या निधनानंतर जेरहचा मुलगा योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.
45 योबाब मरण पावल्यानंतर त्याच्या जागी हूशाम गादीवर आला. हा तेमानी देशातील होता.
46 हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा मुलगा हदाद याने राज्य केले. त्याने मवाबच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.
47 हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता.
48 साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा युफ्राटीस नदीवरल्या रहोबोथचा होता.
49 शौल वारल्यावर अकबोरचा मुलगा बाल-हानान राजा झाला.
50 बाल-हानान वारल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या बायकोचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची मुलगी. मात्रेद मे-जाहाबची मुलगी. 51 पुढे हदाद वारला.
नंतर तिम्रा, आल्या, यतेथ, 52 अहलीबामा, एला, पीनोन, 53 कनाज, तेमान मिब्सार, 54 माग्दीएल, ईराम, हे अदोमचे नेते झाले.
इस्राएलची मुले
2 रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून, 2 दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर हे इस्राएलचे मुलगे होत.
यहूदाचे मुलगे
3 एर, ओनान व शेला, ही यहूदाची मुले. बथ-शूवा या कनानी स्रीपासून ही त्याला झाली. यहूदाचा पहिला मुलगा एर वाईट प्रवृत्तीचा आहे हे परमेश्वराने जाणले होते त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले. 4 यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे मुलगे झाले. असे यहूदाचे हे पाच मुलगे.
5 हेस्त्रोन आणि हामूल हे पेरेस चे मुलगे
6 जेरहला पाच मुलगे होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा (दारदा).
7 जिम्रीचा मुलगा कर्मी. कर्मीचा मुलगा आखार, आखार ने युध्दात बळकावलेल्या वस्तू देवाला अर्पण करण्याऐवजी ती लूट स्वतः जवळच ठेवली. आणि इस्राएल लोकांवर पुष्कळ संकटे आणली.
8 एथानाचा मुलगा अजऱ्या.
9 यरहमेल, राम आणि कालेब हे हेस्रोनचे मुलगे.
रामचे वंशज
10 अम्मीनादाब हा रामचा मुलगा. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता. 11 नहशोनचा मुलगा सल्मा. बवाज हा सल्माचा मुलगा. 12 बवाजचा मुलगा ओबेद. आणि ओबेदचा मुलगा इशाय. 13 इशायचा मुलगा अलीयाब. अलीयाब हा इशायचा पहिला पुत्र, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा. 14 चवथा नथनेल, पाचवा रद्दाय. 15 सहावा ओसेम, सातवा दावीदा. 16 सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवाचे मुलगे. 17 अमासाची आई अबीगईल अमासाचे वडील येथेर हे इश्माएली होते.
कालेबचे वंशज
18 हेस्रोनचा मुलगा कालेब, यरियोथची मुलगी अजूबा ही कालेबची (बायको.) [b] या दोघांना मुले झाली येशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजूबाचे मुलगे. 19 अजूबा वारल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव हूर. 20 हूरचा मुलगा उरी. ऊरीचा मुलगा बसलेल.
21 पुढे, वयाच्या साठाव्या वर्षी हेस्रोनने माखीरच्या मुलीशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादचे वडील. हेस्रोन आणि माखीरची मुलगी यांच्या शरीरसंबंधातून तिने सगूब याला जन्म दिला. 22 सगूबचा मुलगा याईर. याईरची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती. 23 पण गशूर आणि अराम यांनी ती सर्व बळकावली. कनाथ आणि आसपासची खेडीपाडी ही त्यापैकीच. अशी एकंदर साठ खेडी होती. ती सर्व, गिलादचा बाप माखीर याच्या मुलांची होती.
24 एफ्राथमधील कालेब येथे हेस्रोन मरण पावला. त्याची बायको अबीया हिला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यापासून झालेला अशहूर हा मुलगा होता. हा अश्हूर म्हणजे तकोवाचा बाप.
यरहमेलची वंशज
25 यरहमेल हा हेस्रोनचा पहिला मुलगा. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलची मुले. राम हा त्यातला मोठा. 26 यरहमेलला दुसरी बायको होती, तिचे नाव अटारा. ती ओनामची आई.
27 यरहमेलाचा थोरला मुलगा राम याचे मुलगे मास, यामीन आणि एकर हे होत.
28 शम्मय व यादा हे ओनामचे मुलगे. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे मुलगे.
29 अबीशूराच्या बायकोचे नाव अबीहाईल. त्यांना दोन मुलगे झाले ते म्हणजे अहबान आणि मोलीद.
30 सलेद आणि अप्पईम हे नादाबचे मुलगे. यापैकी सलेद निपुत्रिकच वारला.
31 अप्पईमचा मुलगा इशी. इशीचा मुलगा शेशान. शेशानचा मुलगा अहलय.
32 शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन मुलगे होते. पैकी येथेर मुले बाळे न होताच वारला.
33 पेलेथ आणि जाजा हे योनाथानचे मुलगे, ही झाली यरहमेलची वंशावळ.
34 शेशानला मुलगे नव्हते, फक्त मुली होत्या. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा. 35 त्याच्याशी शेशानने आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव अत्ताय.
36 अत्तायास नाथान नावाचा मुलगा झाला. त्याचा मुलगा जाबाद. 37 जाबादचा मुलगा एफ्लाल, एफलाल हा ओबेदचा बाप. 38 ओबेदचा मुलगा येहू, येहूचा मुलगा अजऱ्या. 39 अजऱ्याने हेलसला जन्म दिला. आणि हेलसाने एलासा याला जन्म दिला. 40 एलासाचा मुलगा सिस्माया, सिस्मायाचा मुलगा शल्लूम, 41 शल्लूमचा मुलगा यकम्या, यकम्याचा मुलगा अलीशामा.
कालेबचे घराणे
42 कालेब हा यरहमेलचा भाऊ. कालेबलाही मुलगे झाले. त्यापैकी मेशा हा थोरला. मेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा हेब्रोन.
43 कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे मुलगे. 44 शमाने रहम याला जन्म दिला, रहमचा मुलगा यर्काम. रेकेमचा मुलगा शम्मय, 45 शम्मयचा मुलगा मावोन. मावोन हा बेथसूरचा बाप.
46 कालेबला एफा नावाची दासी होती. तिला हारान, मोसा, गाजेज ही मुले झाली. हारान हा गाजेजचा पिता.
47 रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे मुलगे.
48 माका ही कालेबची आणखी एक दासी. शेबेर आणि तिऱ्हना हे तिचे मुलगे. 49 शाफ आणि शवा हे ही तिला झाले. शाफचा मुलगा मद्नान आणि शवाचे मुलगे मखबेना आणि गिबा. अखसा ही कालेबची मुलगी.
50 कालेबची वंशावळ ही अशी आहे. होर हा कालेबचा थोरला मुलगा. हा एफ्राथला झाला. हूरचे मुलगे पुढीलप्रमाणे: किर्याथ-यारीमाचा संस्थापक शोबाल, 51 बेथलहेमचा संस्थापक सल्मा आणि बेथ-गादेरचा संस्थापक हारेफ.
52 किर्याथ-यारीमची मुहूर्त मेढ रोवणारा शोबाल याचे वंशज असे: हारोवे, मनुहोथमथील अर्धे लोक, 53 आणि किर्याथ-यारीममधील घराणी (कुळे). इथ्री, पूथी, शमाथी आणि मिश्राई ही ती घराणी होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले.
54 सल्माचे वंशज याप्रमाणे: बेथलेहेम व नटोपाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहतकर आणि सारी लोक. 55 शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखनिकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाबचा संस्थापक हम्माथ याच्यापासून उत्पन्न झालेले केनी लोक होते.
येशू आपला मुख्य याजक
8 आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की: असा मुख्य याजक आम्हांला लाभलेला आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूस बसतो, 2 आणि कोणत्याही मानवनिर्मित मंडपात नव्हे, तर प्रभु परमेश्वारने बनविलेल्या खऱ्याखुऱ्या मंदिराच्या परमपवित्रस्थानात तो मुख्य याजकाची सेवा करतो.
3 प्रत्येक मुख्य याजक जो नेमलेला असतो, त्याला दाने व अर्पणे सादर करावी लागतात, म्हणून आपल्या ह्या मुख्य याजकालादेखील काहीतरी सादर करणे जरुरीचे होते. 4 जर तो पृथ्वीवर असता तर तो मुख्य याजकदेखील झाला नसता. कारण तेथे अगोदरचे नियमशास्त्राप्रमाणे दानांचे अर्पण करणारे आहेत. 5 ते जी कामे करतात, ती स्वर्गातील गोष्टींची नक्कल आणि छाया अशी आहेत. परमेश्वराचा मंडप घालीत असताना देवाने मोशेला जो आदेश दिला, तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला, “तुला पर्वतावर मी जो नमुना दाखवीला त्या सूचनांबरहुकूम प्रत्येक गोष्ट कर.” 6 परंतु येशूला नेमून दिलेली याजकीय सेवा मुख्य याजकांच्या सेवेहून जशी फारच वरच्या दर्जाची आहे, तसाच येशू ज्या नवीन कराराचा मध्यस्थ आहे, तो करार अगोदरच्या कराराहून अधिक वरच्या दर्जाचा आहे, कारण तो करार अधिक चांगल्या वचनांच्या पायावर उभा आहे.
7 जर पूर्वीचा करार दोषविरहित असता तर त्याच्या जागी दुसऱ्या कराराची गरज भासली नसती. 8 परंतु देवाला लोकांमध्ये दोष आढळला. तो म्हणाला,
“परमेश्वर म्हणतो, असे दिवस येत आहेत,
जेव्हा मी इस्राएल लोकांबरोबर नवा करार करीन
व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करीन.
9 ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही.
त्या दिवशी मी त्यांच्या हाताला धरून इजिप्त देशातून बाहेर आणले,
ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही,
त्यामुळे मी त्यांच्याकडे पाठ फिरवली.
10 परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा करार करीन;
मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात घालीन,
त्यांच्या ह्रदयांवर ते लिहीन,
मी त्यांचा देव होइन,
ते माझे लोक होतील.
11 तुमच्या प्रभूला ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या बंधूला
अथवा आपल्या देशबांधवाला सांगण्याची गरज पडणार नाही,
कारण त्यांच्यातील कनिष्टांपासून वरिष्टांपर्यंत सर्वजण मला ओळखतील.
12 कारण मी दयाळूपणे यापुढे त्यांचे अपराध माफ करीन.
त्यांची पापे विसरून जाईन.” (A)
13 या कराराला नवीन करार म्हटले म्हणून त्याने पहिला करार जुना ठरविला. जे जुने ते निकामी ठरते व नाहीसे होऊन जाते.
मवाबसाठी सजा
2 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “मवाबच्या लोकांनी पुष्कळ अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच. का? कारण त्यांनी अदोमच्या राजाची हाडे जाळून त्याचा चुना केला. 2 म्हणून मी मवाबमध्ये आग लावीन. ती आग करीयोथचे उंच मनोरे नष्ट करून टाकील. तेथे भयंकर आरडाओरड होईल, रणशिंगाचा आवाज होईल आणि मवाब नष्ट होईल. 3 अशारीतीने, मवाबच्या राजांचा शेवट करीन. मी मवाबच्या नेत्यांना ठार करीन.” परमेश्वर असे म्हणतो.
यहूदाला शिक्षा
4 परमेश्वर असे म्हणतो, “यहूदाने पुष्कळ अपराध केले असल्यामुळे मी यहूदाला शिक्षा करीन. का? कारण त्यांनी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्यास नकार दिला. त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांच्या पूर्वजांनी असत्यावर विश्वास ठेवला. यहूदाच्या लोकांनी परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यास हे असत्यच कारणीभूत झाले. 5 म्हणून यहूदात आग लावीन. त्या आगीत यरुशलेमचे उंच मनोरे भस्मसात होतील.”
इस्राएलला शिक्षा
6 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “इस्राएलने पुष्कळ अपराध केले आहेत म्हणून मी त्याला शिक्षा करणारच. का? कारण इस्राएल लोकांना विकले. त्यांनी गरिबांना जोड्याच्या किंमतीला विकले. 7 गरिबांना धुळीत लोटून त्यांनी त्या गरिबांना तुडविले. दु:खितांची गाव्हाणी ऐकणे त्यांनी सोडून दिले. मुले वडील यांनी एकाच स्त्रीशी शारिरिक संबंध ठेवले. त्यांनी माझे नाव धुळीला मिळवले. 8 ते गरीब लोकांजवळून कपडे घेतात आणि वेदीजवळ बसून पूजा करताना त्या कपड्यावरच बसतात. ते गरिबांना पैसे कर्जाऊ देतात आणि त्याबदल्यात त्यांचे कपडे गहाण म्हणून ठेवून घेतात. ते लोकांना दंड देण्यास भाग पाडतात आणि त्या पैशातून स्वतःसाठी मद्य विकत घेतात व त्यांच्या दैवतांच्या देवळात बसून ते पितात.
9 “पण प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोरींना मारणारा मीच होतो. अमोरी गंधसंरूप्रमाणे उंच होते. ते अल्लोन वृक्षांप्रमाणे बळकट होते. परंतु मी त्यांच्या वरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला.
10 “तुम्हाला मिसरमधून आणणारा मीच तो एकमेव! 40 वर्षे मी तुम्हाला वाळवंटातून पार नेले व अमोरींचा प्रदेश घेण्यास मीच तुम्हाला मदत केली. 11 मी तुमच्यापैकी काही मुलांना संदेष्टे बनविले व तुमच्यातील काही तरुणांना नाजीर बनविले, इस्राएल लोकांनो हे खरे आहे!” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. 12 “पण तुम्ही नाजीरांना मद्य प्यायला लावले व संदेष्ट्यांना संदेश देण्यास मनाई केली. 13 तुम्ही मला बोजाप्रमाणे आहात खूप वाळलेले गवत भरलेल्या गाडीप्रमाणे मी खाली वाकलो आहे. पण मी ह्याच तव्हेने तुम्हाला खाली दाबून टाकीन [a]. 14 कोणीही पळून जाऊ शकणार नाही. अगदी जोरात धावणारा सुध्दा! बलवान पुरेसे बलवान राहणार नाहीत. सैनिक पळून जाऊन स्वतःला वाचवू शकणार नाहीत. 15 धनुर्धारी वाचणार नाहीत. जोरात धावणारे पळून जाणार नाहीत. घोडेस्वार जिवंत राहणार नाहीत. 16 त्या वेळी खूप शूर सैनिकसुध्दा पळून जातील. त्यांना कपडे घालण्याससुध्दा वेळ मिळणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो.
दावीदाचे स्तोत्र
145 देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो.
मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.
2 मी तुझी रोज स्तुती करतो.
तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो.
3 परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात.
त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करु शकत नाही.
4 परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील.
तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील.
5 तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे.
मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन.
6 परमेश्वरा तू ज्या चमत्कारपूर्ण गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील.
तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल मी सांगेन.
7 तू ज्या चांगल्या गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील.
लोक तुझ्या चांगुलपणाचे गाणे गातील.
8 परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे.
परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे.
9 परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो.
तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो.
10 परमेश्वरा, तू ज्या गोष्टी करतोस त्यामुळे तुला गौरव प्राप्त होतो.
तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
11 तुझे राज्य किती महान आहे हे ते सांगतात.
तू किती महान आहेस हे ते सांगतात.
12 म्हणून परमेश्वरा, तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल इतर लोकांनाही कळते.
तुझे राज्य किती महान आणि अद्भुत आहे हे त्या लोकांना कळते.
13 परमेश्वरा, तुझे राज्य सदैव राहील.
तू सदैव राज्य करशील.
14 जे लोक खाली पडले आहेत त्यांना परमेश्वर उचलतो.
जे लोक संकटात आहेत त्यांना परमेश्वर मदत करतो.
15 परमेश्वरा, सर्व प्राणीमात्र अन्नासाठी तुझ्याकडे बघतात.
आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
16 परमेश्वरा, तू तुझे हात उघडतोस
आणि तू प्रत्येक प्राणीमात्राला जे लागेल ते सर्व देतोस.
17 परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते.
तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते.
18 जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात,
त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो.
जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो,
त्याच्या अगदी जवळ तो असतो.
19 भक्तांना जे हवे असते ते परमेश्वर करतो.
परमेश्वर त्याच्या भक्तांचे ऐकतो.
तो त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतो
आणि त्यांना वाचवतो.
20 जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो.
परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
21 मी परमेश्वराची स्तुती करेन.
प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.
2006 by World Bible Translation Center