Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
गणना 24

बलामचा तिसरा संदेश

24 इस्राएलला आशीर्वाद द्यायची परमेशवराची इच्छा आहे हे बलामने पाहिले. म्हणून त्याने ते कुठल्याही प्रकारची जादू वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने वाळवंटाकडे पाहिले. बलामने वाळवंटाच्या कडे पाहिले आणि त्याला इस्राएलचे सगळे लोक दिसले. त्यांनी आपापल्या भागात आपापल्या गंटासह तळ दिला होता. नंतर देवाचा आत्मा बलामावर आला. आणि बलामने हे शब्द उच्चारले:

“हा निरोप बौराचा मुलगा बलाम याच्याकडून आहे.
    मला ज्या गोष्टी स्पष्ट दिसतात त्याविषयी मी बोलतो.
मी हा निरोप देवाकडून ऐकला.
    सर्वशक्तिमान देवाने मला जे दाखविले ते मी पाहिले.
    मला जे दिसले त्याबद्दल मी नतमस्तक होऊन सांगत आहे.

“याकोबाच्या माणसांने तुमचे तंबू सुंदर आहेत.
    इस्राएल लोकांनो तुमचीघरे सुंदर आहेत.
तुम्ही झऱ्याच्या काठी लावलेल्या बागेसारखे आहात.
    नदीकाठी वाढणाऱ्या बागे प्रमाणे तुम्ही आहात.
तुम्ही परमेश्वराने लावलेल्या, गोड सुगंध असणाऱ्या झुडपाप्रमाणे आहात.
    पाण्याजवळ वाढणाऱ्या सुंदर झाडाप्रमाणे तुम्ही आहात.
तुमच्याकडे नेहमी भरपूर पाणी असेल.
    तुमचे बी वाढण्यासाठी लागणारे पाणी तुमच्याकडे भरपूर असेल.
तुमचा राजा अगागच्या राजापेक्षा थोर असेल.
    तुमचे राज्य खूप महान असेल.

“देवाने त्या लोकांना मिसरमधून आणले.
    ते रानटी बैलासारखे शक्तिशाली आहेत.
ते त्यांच्या सर्व शत्रूंचा पराभव करतील.
    ते त्यांची हाडे मोडतील आणि त्यांचे बाण तोडतील.
इस्राएल सिंहासारखा आहे.
    तो वेटोळे करून झोपला आहे.
होय! तो लहान सिंहाप्रमाणे आहे
    आणि त्याला उठवायची कोणीही इच्छा धरत नाही.
जो माणूस तुला आशीर्वाद देईल त्याला आशीर्वाद मिळेल.
    जो माणूस तुझ्या विरुद्ध बोलेल त्याच्यावर संकटे येतील.”

10 बालाक बलामवर खूप रागावला. तो बलामला म्हणाला, “मी तुला माझ्या शत्रूंविरुद्ध बोलण्यासाठी बोलावले, पण तू त्यांना आशीर्वाद दिलास. तू त्यांना तीन वेळा आशीर्वाद दिलास. 11 आता इथून जा. घरी जा. मी तुला चांगला मोबदला देईन असे म्हटले होते. परंतु परमेश्वराने तुझे इनाम हिरावून घेतले.”

12 बलाम बालाकाला म्हणाला, “तूच माझ्याकडे माणसे पाठविलीस. त्या माणसांनी मला येण्याबद्दल विचारले. पण मी त्यांना म्हणालो, 13 ‘बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वतः काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेव्हढीच मी बोलतो. तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या माणसांना सांगितले होते.’ 14 आता मी माझ्या माणसांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांना काय करतील ते सांगतो.”

बलामचा शेवटचा संदेश

15 नंतर बलामने या गोष्टी सांगितल्या:

“हा निरोप बौरचा मुलगा बलाम याचा आहे.
    मला ज्या गोष्टी स्पष्ट दिसतात त्याबद्दल मी बोलतो.
16 मी हा निरोप देवाकडून ऐकला.
    परात्पर देवाने मला जे शिकविले ते मी शिकलो.
सर्वशक्तिमान देवाने मला जे दाखविले ते मी पाहिले.
    मला जे स्पष्ट दिसते ते मी नतमस्तक होऊन सांगतो.

17 “मला परमेश्वर येताना दिसतो, पण एवढ्यात नाही.
    तो मला एवढ्या लवकर येताना दिसत नाही.
याकोबच्या घराण्यातून एक तारा उदय पावेल
    इस्राएल मधून एक राजा निघेल.
तो राजा मवाबच्या लोकांना चिरडून टाकील.
    सेथच्या सर्व मुलांचा तो चुराडा करील.
18 इस्राएल सर्वशक्तिमान बनेल.
    त्याला अदोमचा प्रदेश मिळेल.
    त्याला सेईरचा, त्याच्या शत्रूचा प्रदेश मिळेल.

19 “याकोबाच्या घराण्यातून नवा राजा येईल.
त्या शहरात जे लोक जिवंत राहिले असतील त्यांचा तो नाश करील.”

20 नंतर बलामने अमालेकी लोकांना पाहिले आणि तो हे म्हणाला:

“सर्व अमालेकी बलिष्ठ आहेत.
    पण अमालेकचा सुद्धा नाश होईल.”

21 नंतर बलामने केनी लोकांना पाहिले आणि तो म्हणाला:

“उंच पर्वतावर असलेल्या पक्षाच्या घरट्याप्रमाणे [a]
    तुमचा प्रदेश सुरक्षित आहे असे तुम्हाला वाटते.
22 पण केनी लोकांचासुद्धा नाश होईल.
    परमेश्वराने काईनाचा जसा नाश केला त्याप्रमाणे.
    अश्शूर तुला बंदिवान करील.”

23 नंतर बलाम हे शब्द बोलला:

“देव जेव्हा असे करतो तेव्हा कोणीही जिवंत रहात नाही.
24     कित्तीच्या किनाऱ्यावरुन बोटी येतील.
त्या अश्शूर आणि एबेर याचा नाश करतील.
    पण त्या बोटींचासुद्धा नाश होईल.”

25 नंतर बलाम उठला आणि त्याच्या घरी परत गेला आणि बालाकही मार्गस्थ झाला.

स्तोत्रसंहिता 66-67

प्रमुख गायकासाठी स्तुतिगीत

66 पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे.
देवाच्या गौरवी नावाचा जय जयकार करा.
    स्तुतिगीतांनी त्याचा सन्मान करा.
त्याचे काम किती आश्चर्यजनक आहे, चांगले आहे ते त्याला सांगा.
    देवा, तुझी शक्ती महान आहे तुझे शत्रू तुझ्या पुढे नतमस्तक होतात. ते तुला घाबरतात.
सगळ्या जगाला तुझी उपासना करु दे
    प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे.

देवाने केलेल्या गोष्टी बघा त्या गोष्टी
    आम्हाला आश्चर्यचकित करतात.
देवाने समुद्राचे कोरडे वाळवंट बनवले
    त्याची आनंदी माणसे चालत नदीच्या पलिकडे गेली.
देव त्याच्या महान शक्तिमुळे जगावर राज्य करतो
    देव सगळीकडच्या लोकांवर लक्ष ठेवतो,
    त्याच्याविरुध्द कुणीही बंड करु शकत नाही.

लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा.
    त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा.
देवाने आम्हाला जीवन दिले.
    देव आम्हाला संरक्षण देतो.
10 लोक चांदीची अग्नी परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली.
11 देवा, तू आम्हाला सापळ्यात अडकू दिलेस.
    तू आमच्यावर जड ओझी लादलीस.
12 तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस.
    तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस.
    परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.
13-14 म्हणून मी तुझ्या मंदिरात तुला होमबली अर्पण करण्यासाठी बळी घेऊन येईन.
मी संकटात होतो तेव्हा तुझ्याकडे मदत मागितली.
    मी तुला अनेक वचने दिली,
आता मी वचन दिल्याप्रमाणे तुला त्या गोष्टी देत आहे.
15     मी तुला पापार्पण करीत आहे.
मी तुला धुपासहित मेंढ्या अर्पण करीत आहे.
    मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे.

16 देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या.
    देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो.
17-18 मी त्याची प्रार्थना केली,
    मी त्याची स्तुती केली.
माझे मन शुध्द होते म्हणून
    माझ्या प्रभुने माझे ऐकले.
19 देवाने माझे ऐकले.
    त्याने माझी प्रार्थना ऐकली.
20 देवाची स्तुती करा देव माझ्यापासून दूर गेला नाही.
    त्याने माझी प्रार्थना ऐकली.
    देवाने मला त्याचे प्रेम दाखवले.

प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे स्तुतिगीत

67 देवा, मला दया दाखव, आणि आशीर्वाद दे.
    कृपाकरुन आमचा स्वीकार कर!

देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो.
    तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे.
देवा, लोक तुझी स्तुती करु देत,
    सर्व लोक तुझी स्तुती करु देत.
सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे.
    का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस
    आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस.
देवा, लोक तुझी स्तुती करोत,
    सर्व लोक तुझी स्तुती करोत.
देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे.
    आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो.
देव आम्हाला आशीर्वाद देवो
    आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घाबरोत आणि त्याला मान देवोत.

यशया 14

इस्राएल घरी परत येईल

14 पुढील काळात, परमेश्वर याकोबाला प्रेमाची पुन्हा प्रचिती देईल. तो इस्राएली लोकांची पुन्हा निवड करील. तो त्यांना त्यांची जमीन परत देईल. यहुद्यां व्यतिरिक्त अन्य लोक त्यांना येऊन मिळतील. ते एकत्र होतील आणि त्यांचा एकच वंश याकोबाचा वंश होईल. इतर राष्ट्रे इस्राएलला त्याची जमीन परत देतील, इतर राष्ट्रांतील स्त्री पुरूष इस्राएलचे गुलाम होतील. पूर्वी ह्याच लोकांनी इस्राएलच्या प्रजेला गुलाम होण्यास भाग पाडले होते. पण आता इस्राएलच त्यांचा पराभव करील व त्यांच्यावर राज्य करील. परमेश्वर तुमचे कष्ट कमी करून सुख व आराम देईल. पूर्वी तुम्ही गुलाम होता. लोक तुम्हाला राबवून घेत. पण परमेश्वर तुमचे कष्ट नाहीसे करील.

बाबेलोनच्या राजाबद्दलचे गाणे

त्या वेळी बाबेलोनच्या राजाबद्दलचे हे गाणे तुम्ही म्हणायला लागाल, राजा आमच्यावर राज्य करीत.

असताना नीचपणे वागत होता,
    पण आता त्याची सत्ता नष्ट झाली.
परमेश्वर दुष्ट राजांचा राजदंड मोडतो.
    परमेश्वर त्यांची सत्ता काढून घेतो.
रागाच्या भरात बाबेलोनच्या राजाने लोकांना फटकावले.
    तो नेहमीच लोकांना फटकावत असे.
त्या दुष्ट राजाने क्रोधाने लोकांवर सत्ता गाजवली.
    तो नेहमीच लोकांना दुखवत असे.
पण आता संपूर्ण देशाला स्वास्थ्य मिळाले आहे.
    देश शांत आहे.
    लोक उत्सव, समारंभ करू लागले आहेत.
तू दुष्ट राजा होतास.
    पण आता तू संपला आहेस.
लबानोनमधील गंधसरू
    व सरूवृक्षसुध्दा आनंदित झाले आहेत.
वृक्ष म्हणतात, “राजाने आम्हाला कापून टाकले होते.
    पण आता राजाच पडला आहे.
    तो आता कधीच उठणार नाही.”
राजा, तू येणार म्हणून अधोलोकात
    खळबळ उडाली आहे.
पृथ्वीवरच्या नेत्यांच्या आत्म्यांना,
    तू येणार म्हणून जागे करीत आहे,
सिंहासनावरून त्यांना उठवीत आहे,
    ते तुझ्या आगमनाची तयारी करतील.
10 ते सर्व तुझी चेष्टा करतील.
    ते म्हणतील, “आता तू अगदी आमच्याप्रमाणे
    निर्जीवकलेवर झाला आहेस.”
11 तुझा गर्व अधोलोकात पाठविला आहे.
    तुझ्या सारंगीचा नाद तुझ्या गर्विष्ठ आत्म्याचे आगमनच घोषित करीत आहे.
अळ्या तुझे शरीर खाऊन टाकतील.
    तू अळ्यांच्या अंथरूणावर झोपशील व कीटकांचे पांघरूण घेशील.
12 तू प्रभात ताऱ्याप्रमाणे होतास,
    पण आता तू आकाशातून खाली पडला आहेस.
पूर्वी सर्व राष्ट्रे तुझ्यापुढे नेहमीच वाकत होती,
    पण आता तू संपला आहेस.
13 तू नेहमीच स्वतःला सांगायचास,
    “मी परात्पर देवासारखा होईन.
मी आकाशात उंच जाईन.
देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन स्थापन करीन.
    मी पवित्र साफोन डोंगरावरच्या देवसभेत बसून देवांना भेटीन.
14 मी मेघांवर आरोहण करून वेदीवर जाईन.
    मी परात्पर देवासारखा होईन.”

15 पण तसे घडले नाही.
    तू देवाबरोबर आकाशात गेला नाहीस.
    तुला अधोलोकात, पाताळात आणले गेले.
16 लोक तुझ्याकडे निरखून पाहतील व तुझ्याबद्दल विचार करतील.
    तू एक कलेवर आहेस हे ते पाहतील आणि म्हणतील,
“पृथ्वीवर सगळीकडे ज्याने
    प्रचंड भय निर्माण केले होते तो हाच का?
17 ज्याने शहरांचा विध्वंस करून
    सर्व जमिनीचे वाळवंट केले तो हाच मनुष्य का?
ज्यांने युध्दात लोकांना कैदी केले
    व त्यांना घरी जाऊ दिले नाही तो हाच का?”
18 पृथ्वीवरील प्रत्येक राजा वैभवात मरण पावला,
    प्रत्येकजण आपापल्या थडग्यात विसावा घेत आहे.
19 पण, हे दुष्ट राजा,
    तुला तुझ्या थडग्याच्या बाहेर टाकले आहे.
तू झाडाच्या तोडलेल्या फांदीप्रमाणे आहेस.
    लढाईत मारल्या गेलेल्या सैनिकाला बाकीचे सैनिक तुडवून जातात तशी तुझी स्थिती आहे.
आता तुझ्यात व इतर कलेवरात काहीही फरक नाही
    तुला कफनात गुंडाळले आहे.
20 इतर खूप राजे मृत्यू पावले, व आपापल्या थडग्यात विसावले
    पण तुला त्यांच्यात जाता येणार नाही.
का? कारण तू स्वतःच्याच देशाचा विध्वंस केलास.
    स्वतःच्याच प्रजेला ठार मारलेस.
तुझी मुले तुझ्यासारखा नाश करीत राहू शकणार नाहीत.
    त्यांना परावृत्त केले जाईल.

21 त्याच्या मुलांना ठार मारण्याची तयारी करा,
    कारण त्यांचे वडील गुन्हेगार आहेत.
त्यांची मुले नातेवाईक, नातवंडे कधीही ह्या देशावर राज्य करणार नाहीत.
    ते, पुन्हा कधीही ह्या जगात, त्यांची शहरे वसविणार नाहीत.

22 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणाला, “मी स्वतः त्या लोकांविरूध्द लढण्यास उभा राहीन. मी प्रसिध्द् शहर बाबेलोनचा नाश करीन. मी सर्व बाबेलोन वासीयांचा नाश करीन. त्यांची मुले, नातवंडे, पतवंडे ह्यांचा नाश करीन.” हे सर्व स्वतः परमेश्वर बोलला.

23 परमेश्वर पुढे म्हणाला, “मी बाबेलोनचे रूप बदलून टाकीन. ती जागा लोकांना नव्हे तर जनावरांना राहण्यालायक करीन. त्या जागी दलदल करीन ‘नाशरूपी झाडूने’ मी बाबेलोन स्वच्छ करीन.” सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.

देव अश्शूरला पण शिक्षा करील

24 सर्वशक्तिमान परमेश्वराने वचन दिले आहे. परमेश्वर म्हणाला, “मी वचन देतो, मी सांगितल्याप्रमाणे गोष्टी घडून येतील. मी योजल्याप्रमाणे सर्व होईल. 25 मी माझ्या देशात अश्शूरच्या राजाचा नाश करीन. माझ्या डोंगरावर मी त्या राजाला पायाखाली तुडवीन. त्याने माझ्या माणसांना त्याचे गुलाम केले, त्यांच्या मानेवर जोखड घातले. यहुदाच्या मानेवरील जोखड दूर केले जाईल. त्याच्यावरी ओझे दूर सारले जाईल. 26 माझ्या लोकांकरिता मी हा बेत केला आहे. मी माझ्या हाताचा (बळाचा) सर्व राष्ट्रांना शिक्षा करण्यासाठी उपयोग करीन.”

27 जेव्हा परमेश्वरच संकल्प करतो तेव्हा कोणीच तो रद्द करू शकत नाही. जेव्हा लोकांना शिक्षा करण्यासाठी परमेश्वरच हात उगारतो, तेव्हा कोणीच त्याला थांबवू शकत नाही.

देवाचा पलेशेथविरूध्द संदेश

28 राजा आहाजच्या मृत्यूच्या वर्षीच ही शापवाणी झाली.

29 पलेशेथ देशा, तुला पराभूत करणारा राजा गेला म्हणून तुला आनंद झाला आहे. पण खरे तर तुला आनंद व्हायचे काही कारण नाही. हे खरे आहे की त्या राजाची सत्ता संपली आहे. पण राजाचा मुलगा गादीवर बसेल व राज्य करील. हे एका सापाने दुसऱ्या अती विषारी सापाला जन्म दिल्यासारखे होईल. हा नवा राजा तुझ्या दृष्टीने चपळ व भयानक सापासारखा असेल. 30 पण माझी गरीब प्रजा मात्र सुखाने खाईल. त्यांची मुले सुरक्षित राहतील. माझे गरीब लोक सुखशांतीने राहतील. पण मी तुझ्या कुळाचा उपासमारीने अंत करीन. तुझ्या कुळातील उरलेले सर्व लोक मरतील.

31 नगरच्या वेशीजवळील प्रजाजनांनो, रडा.
    नगरवासीयांनो, आक्रोश करा.
पलेशेथ मधील सर्व लोक भयभीत होतील.
    त्यांचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल.

उत्तरेकडे पाहा!
    धुळीचा लोट उठला आहे.
अश्शूरचे सैन्य येत आहे.
    त्या सैन्यातील सर्व माणसे बलवान आहेत. [a]
32 ते सैन्य त्यांच्या देशात निरोप पाठवील.
    ते जासूद त्यांच्या लोकांना काय सांगतील?
ते सांगतील की पलेशेथचा पराभव झाला आहे.
    पण परमेश्वराने सीयोनला बलवान बनवले
    व सर्व गरीब तिकडे आश्रयासाठी गेले.

1 पेत्र 2

जिवंत धोंडा व पवित्र राष्ट्र

म्हणून सर्व प्रकारची दुष्टता, तसेच फसवणूक, ढोंगीपणा हेवा, निंदा यापासून सुटका करुन घ्या. नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळासारखे तुम्ही शुद्ध आध्यात्मिक दूधाची इच्छा धरा. यासाठी की त्यापासून तुमची वाढ होईल व तुमचे तारण होईल. आता “प्रभु चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेतला आहे.” [a]

जिवंत धोंडा जो प्रभु येशू त्याच्याकडे या. जो जगातील लोकांकडून नाकारला गेला. पण जो देवाला बहुमोल असा आहे आणि ज्याला देवानेच निवडले आहे. तुम्हीसुद्धा, जिवंत धोंड्याप्रमाणे आध्यात्मिक मंदिर बांधण्यासाठी रचिले जात आहा. पवित्र याजकगणांप्रमाणे सेवा करण्यासाठी, ज्यांचे काम म्हणजे आध्यात्मिक अर्पणाचा देवासमोर यज्ञ करणे असे आहे. जे देवाला, येशू ख्रिस्ताद्वारे मान्य आहे. म्हणून खालील उतारा पवित्र शास्त्रात नमूद केला आहे:

“पहा सियोनात मी कोनशिला बसवितो,
    जो मौल्यवान व निवडलेला आहे
आणि जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो तो कधीही लज्जित होणार नाही.” (A)

तुम्ही जे या धोंड्यावर विश्वास ठेवता, त्या तुम्हांला तो मौल्यवान आहे, पण जे विश्वास धरीत नाहीत त्यांना,

“बांधणाऱ्यांनी नापंसत केलेला धोंडा
    तोच कोनशिला झाला आहे.” (B)

तो असा झाला,

“एक धोंडा जो लोकांना अडखळवितो
    आणि एक खडक जो लोकांना पाडतो.” (C)

ते लोक अडखळतात कारण ते देवाची आज्ञा पाळत नाहीत. त्यांना त्याच्यासाठी नेमलेले आहे.

पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.

10 एकवेळ तुम्ही लोक नव्हता
    पण आता तुम्ही देवाचे लोक आहात.
एके काळी तुम्हाला करुणा दाखविण्यात आली नव्हती
    पण आता तुम्हाला देवाची करुणा दाखविण्यात आली.

देवासाठी जगा

11 प्रियजनहो, मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके असल्यासारखा बोध करतो की, तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा. 12 जरी विदेशी लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपराध केल्याबद्दल दोष देतात तरी तुम्ही आपले वागणे इतके चांगले ठेवा की, तुमची चांगली कामे पाहून विदेशी लोकांनी देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्याला गौरव द्यावे.

प्रत्येक मानवी अधिकाऱ्याची आज्ञा पाळा

13 प्रभुकरिता प्रत्येक मानवी अधिकाऱ्याच्या अधीन असा. 14 राजाच्या अधीन असा, जो सर्वोच्च अधिकारी आहे आणि राज्यपालांच्या अधीन असा. कारण अयोग्य करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आणि चांगली कामे करणाऱ्यांना शाबासकी देण्यासाठी प्रान्ताधिपतीने त्यांना पाठविले आहे. 15 म्हणून जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा मूर्ख लोकांचे अविचारी बोलणे तुम्ही बंद करता आणि हीच देवाची इच्छा आहे. 16 मुक्त लोकांसारखे जगा. पण तुमच्या मुक्तपणे जगण्याच्या नावाखाली वाईट गोष्टींना वाव देऊ नका. उलट देवाचे सेवक असल्याप्रमाणे जगा. 17 सर्व लोकांचा आदर करा. ख्रिस्तातील तुमच्या बंधूवर्गावर प्रीति करा. देवाप्रती भीतीयुक्त आदर असू द्या. राजाला मान द्या.

ख्रिस्ताच्या दु:खसहनाचे उदाहरण

18 घरातील गुलामांनो, संपूर्ण आदराने तुमच्या मालकाच्या अधीन असा, जे चांगले आणि दयाळू आहेत त्यांच्याशीच नव्हे तर जे कठोरतेने वागतात त्यांच्यासुद्धा अधीन असा. 19 कारण हे प्रशंसनीय आहे. जर एखादा त्याच्या अंतःकरणात असलेल्या देवाच्या इच्छेसंबंधाने जागरुक आहे व अन्यायामुळे त्याला दु:ख सोसावे लागते. 20 कारण जर तुम्ही केलेल्या चुकीबद्दल तुम्हांला मार मिळाला आणि तुम्हांला तो सहन करावा लागतो, तर ते देवासमोर मान्य आहे. 21 यासाठी देवाने आपल्याला बोलावले आहे; कारण ख्रिस्ताने देखील आपल्यासाठी दु:ख सहन केले आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकून चालावे, म्हणून स्वतःच्या अशा वागण्याने आपल्यासमोर उदाहण ठेवले.

22 “त्याने कोणतेही पाप केले नाही,
    त्याच्या मुखात कपट नव्हते.” (D)

23 जेव्हा लोकांनी त्याचा अपमान केला तेव्हा त्याने उलट अपमान केला नाही. जेव्हा त्याने दु:ख सहन केले तेव्हा त्याने धमकी दिली नाही. परंतु जो न्यायाने निवाडा करतो त्या देवाच्या हाती स्वतःला सोपवून दिले. 24 त्याने स्वतःआमची पापे वाहिली त्याच्या शरीरावर घेऊन वधस्तंभावर वाहिली, यासाठी की आम्ही आमच्या पापाला मरावे. आणि नीतीमत्त्वासाठी जगावे. त्याला झालेल्या जखमांमुळे तुम्हाला आरोग्य मिळाले. 25 तुम्ही मेंढराप्रमाणे बहकत होता. पण आता तुमच्या जीवनाचा जो मेंढपाळ व संरक्षक त्याच्याकडे परत आला आहात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center