Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NIV. Switch to the NIV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 22:1-23:23

दावीदाचे देवाप्रीत्यर्थ स्तुतिगीत

22 शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून देवाने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले.

परमेश्वर हा माझा दुर्ग माझा गड माझ्या सुरक्षिततेचा आधार
    तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या, देवाच्या आश्रयाला जातो.
देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते.
    परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा,
माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले.
    क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो.
त्यांनी माझी चेष्टा केली.
    पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला
    आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला.

(शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता) मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या.
    मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.
कबरीचे पाश माझ्या भोवती आवळले होते.
    मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता.
तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय,
    मी त्यालाच शरण गेलो.
देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला.
    मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.
तेव्हा धरती डळमळली,
    हादरली स्वर्गाचा पाया थरथरला
    कारण देवाचा कोप झाला होता.
त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता.
    मुखातून अग्निज्वाळा बाहेर पडत
    होत्या ठिणग्या बरसत होत्या.
10 आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला.
    काव्व्याकुटृ ढगावर उभा राहिला.
11 करुबावर आरुढ होऊन तो उडत होता.
    वाऱ्यावर स्वार झाला होता.
12 परमेश्वराने दाट काळे ढग स्वतःभोवती तंबू सारखे वेढून घेतले होते.
    त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरुन ठेवले होते.
13 त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की
    निखारे धगधगू लागले.
14 परमेश्वर आकाशातून गरजला
    त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला
15 त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली.
    परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले

16 परमेश्वरा, तुझ्या घनगंभीर आवाजात तू बोललास तेव्हा
    तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या उच्छ्‌वासाने
(समुद्राचे पाणीही मागे हटले) समुद्राचा तळ दिसू लागला,
    पृथ्वीचा पाया उघडा पडला.

17 मला परमेश्वराने आधार दिला वरुन तो खाली आला.
    मला धरून त्याने संकटांच्या खोल पाण्यातून बाहेर काढले.
18 शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला.
    शत्रू बलाढ्य होता पण परमेश्वराने मला वाचवले.
19 मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला.
    पण देवाने मला आधार दिला.
20 परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे म्हणून त्याने मला सोडवले.
    मला त्याने सुरक्षित स्थळी नेले.
21 मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल कारण मी योग्य तेच केले.
    मी गैर काही केले नाही, तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल.
22 कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले.
    देवाविरुध्द कोणताही आपराध मी केला नाही.
23 परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो.
    त्याच्या नियमांचे पालन करतो.
24 माझे आचरण शुध्द
    आणि निर्दोष आहे.
25 तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच.
    कारण माझी वर्तणूक योग्य आहे.
त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही.
    तेव्हा तो माझे भले करील.

26 एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करु.
    तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू.
27 परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस.
    पण दुष्ट आणि बदमाशांशी तूही कुटिलतेने वागतोस.
28 परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस,
    गर्विष्ठांना धडा शिकवतोस
29 परमेश्वरा, तू माझा दीप आहेस
    माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस
30 परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करु शकतो.
    देवाच्या मदतीनेच मी शत्रूंची भिंतसुध्दा पार करु शकतो.

31 देवाची सत्ता सर्वंकष आहे.
    देवाचे वचन कसोटीला उतरलेले आहे.
    जे त्याच्यावर भरवसा टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.
32 या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता?
    याच्याखेरीज भक्कम दुर्ग कोण?
33 देव माझा मजबूत दुर्ग आहे.
    सात्विक लोकांना तो आपल्या मार्गाने नेतो.
34 देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो.
    तो मला आत्मविश्वास देतो आणि उच्च स्थानावर तो मला अढळ ठेवतो.
35 युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो त्यामुळे
    माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करु शकतात.

36 देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस.
    शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास.
37 माझ्या पायांत बळ दे म्हणजे
    मी न अडखळता ताठ चालू शकेन.
38 शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे.
    त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही.
39 त्यांचा मी नाश केला.
    त्यांचा पराभव केला.
आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत.
    होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले.

40 देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस.
    शत्रूचा पाडाव केलास.
41 त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस,
    म्हणजे मी त्यांच्यावर वार करु शकेन.
42 शत्रू मदतीसाठी याचना करु लागले
    पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही.
त्यांनी देवाचा धावाही केला
    त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली.
43 माझ्या शत्रूची मी खांडोळी केली.
    जमिनीवरच्या धुळीसारखे ते कणपदार्थ बनले.
त्यांचा मी चेंदामेंदा केला.
    चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.

44 माझ्यावर जे चाल करुन आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस.
    त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस.
    ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली.
45 आता दूर देशचे लोक माझे ऐकतात,
    जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात,
तात्काळ माझा शब्द मानतात.
    माझा त्यांना धाक वाटतो.
46 भीतीने ते गर्भगळीत होतात.
    हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात.

47 परमेश्वर जिवंत आहे.
    माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे.
    तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे.
48 त्यानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला.
    लोकांना माझ्या शासनामध्ये ठेवले.
49 देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस.

मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस.
    दुष्टांपासून मला वाचवलेस.
50 म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन.
    तुझे नामसंकीर्तन करीन.

51 परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो.
    आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो.
    दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.

दावीदाचे अखेरचे बोल

23 दावीदाची ही अखेरची वचने:

“इशायपुत्र दावीदाचा हा संदेश देवामुळे ज्याला थोरवी
    प्राप्त झाली त्याचा हा संदेश.
याकोबच्या देवाचा हा अभिषिक्त
    राजा इस्राएलचा गोड गळ्याचा गायक
परमेश्वराचा आत्मा माझ्या मार्फत बोलला
    त्याचे शब्द माझ्या मुखी होते.
इस्राएलचा देव हे बोलला
    इस्राएलचा दुर्ग मला म्हणाला,
‘जो न्यायाने राज्य करतो,
    जो देवाविषयी आदर बाळगून राज्य करतो.
तो माणूस उष: कालच्या प्रभे सारखा असेल,
    निरभ्र सकाळ असावी तसा असेल,
पावसानंतर येणाऱ्या उन्हासारखा असेल,
    पाऊस कसा तर ज्याच्यामुळे जमिनीतून कोवळे गवत तरारून येतं असा.’

“देवाने माझे घराणे बळकट व सुरक्षित केले.
    देवाने माझ्याबरोबर एक कायमचा करार केला.
तो सर्व दृष्टींनी माझ्या भल्याकरताच आहे याची त्याने खातरजमा करून घेतली.
    त्याने असा मजबूत करार केला आणि आता तो त्याचा भंग करणार नाही.
हा करार म्हणजे माझा उध्दारच होय.
    हा करार म्हणजेच मला हवे होते ते सर्व काही होय.
परमेश्वर माझ्या घराण्याची.
    भरभराट करील.

“पण दुष्ट माणसे काट्यांसारखी असतात.
    लोक काटा धरून ठेवत नाहीत, फेकून देतात.
त्याचा स्पर्श झाला तर लाकडी
    आणि पंचधातूचा भाला टोचावा तशा वेदना होतात.
(होय, असा माणूस काट्यासारखा असतो)
    त्यांना आगीच्या भक्ष्य स्थानी टाकतील
    आणि ती जळून खाक होतील.”

दावीदाचे सैन्य

दावीदाच्या पदरी असलेल्या वीरांची नावे अशी:

योशेब-बश्शेबेथ तखमोनी. हा रथावरच्या सेवकांचा मुख्य होता. असनी अदीनो म्हणूनही त्याला ओळखतात. त्याने एका वेळी आठशे जणांना ठार केले.

त्याच्या खालोखाल. अहोही येथील दोदय याचा मुलगा एलाजार. पलिष्ट्यांना आव्हान दिले त्यावेळी दावीदाबरोबर असलेल्या तीन वीरांपैकी एक. ते युध्दाच्या तयारीने आले, पण इस्राएल सैनिक पळून गेले होते. 10 थकून अंगात त्राण राहिलं नाही तोपर्यंत एलाजार पलिष्ट्यांशी लढत राहिला. तलवार घटृ पकडून त्याने लढा चालू ठेवला. परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला. एलाजारची युध्दात सरशी झाल्यावर मग लोक तिथे आले. पण शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते आले.

11 हरार येथील आगे याचा मुलगा शम्मा हा ही होता. पलिष्टी चालून आले तेव्हा एका कडधान्याच्या शेतात हे युध्द झाले. लोकांना पलिष्ट्यांसमोरुन पळ काढला. 12 पण शम्मा शेताच्या ऐन मध्यावर उभा राहिला आणि त्याने एकट्याने त्यांना तोंड दिले. त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. परमेश्वराने इस्राएलला त्यादिवशी मोठा विजय मिळवून दिला.

13 दावीद एकदा अदुल्लामच्या गुहेत होता आणि पलिष्टी सैन्याचा तळ खाली रेफाईच्या खोऱ्यात होता. त्यावेळी तीस शूरांपैकी तिघेजण दावीदाकडे जायला म्हणून थेट गुहेपर्यंत अक्षरश: सरपटत गेले.

14 नंतर एकदा दावीद गडावर असताना पलिष्ट्यांची टोळी बेथलहेम येथे होती. 15 दावीद आपल्या गावाचे पाणी पिण्यासाठी व्याकुळ झाला तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी मला कुणी आणून दिले तर किती बरे होईल.” खरोखरच कोणी तसे करावे म्हणून तो बोलत नव्हता. तो आपला उगाच तसे म्हणाला. 16 पण या तीन शूरांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यातून धाडसाने तोंड देत मार्ग काढला आणि बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी काढून दावीदाला प्यायला आणून दिले. दावीदाने ते प्यायचे नाकारले. त्याने ते परमेश्वराला अर्पण म्हणून जमिनीवर ओतून टाकले. 17 दावीद म्हणाला, “परमेश्वरा, हे मी कसे पिऊ? हे पाणी मी प्यायलो तर ज्यांनी आपले प्राण माझ्यासाठी धोक्यात घातले त्यांचे रक्तच मी प्राशन केल्यासारखे होईल.” म्हणून तो ते पाणी प्याला नाही. त्या तीन शूर वीरांनी यासारखी अनेक धाडसे केली.

इतर शूर योध्दे

18 सरूवेचा मुलगा यवाब याचा भाऊ म्हणजे अबीशय. अबीशय या तीन वीरांचा नायक होता. आपल्या भाल्याने त्याने तीनशे शत्रू सैनिकांना ठार केले. आणि त्या तिघांमध्ये नाव मिळवले. 19 त्या तिघांमध्ये तो सर्वाधिक प्रसिद्ध होता. त्यांचा तो नायकही होता. पण तो त्यांच्यापैकी नव्हता.

20 यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी माणसाचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले. मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला. 21 एका धिप्पाड मिसरी माणसालाही त्याने मारले. या मिसरी माणसाच्या हातात भाला होता तर बनायाच्या हातात फक्त काठी. बनायाने त्याचा भाला हिसकावून घेतला आणि त्याच्याच भाल्याने त्या मिसरी माणसाचा जीव घेतला. 22 बनायाने अशी बरीच कृत्ये केली. त्यानेही या तिघांइतकाच नावलौकिक मिळवला. 23 तो तीस वीरांच्या (तीस वीर-दावीदाच्या अतिशय शूर सैनिकांचा गट म्हणजे हे लोक होत.) पेक्षा अधिक प्रसिद्ध होता. पण तरी पहिल्या तिघांच्या पदाला तो पोचला नाही. दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले.

प्रेषितांचीं कृत्यें 2

पवित्र आत्म्याचे आगमन

पन्रासावाचा [a] दिवस आला, तेव्हा सर्व प्रेषित एका ठिकाणी एकत्र होते. अचानक आकाशातून आवाज ऐकू आला. तो आवाज सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यासारखा होता. ज्या ठिकाणी ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरुन गेले. त्यांनी अग्नीच्या ज्वालांसारखे काहीतरी पाहिले. त्या ज्वाला विभक्त होत्या. आणि तेथील प्रत्येक मनुष्यावर एक एक अशा उभ्या राहिल्या. ते सर्व पवित्र आत्म्याने भरुन गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता.

त्यावेळी यरुशलेमामध्ये काही फार धार्मिक यहूदी लोक होते. हे लोक जगातील प्रत्येक देशाचे होते. या लोकांपैकी मोठा गट हा आवाज ऐकल्यामुळे तेथे आला.ते आश्चर्यचकित झाले कारण प्रेषित बोलत होते आणि प्रत्येक मनुष्याला त्याची स्वतःची भाषा ऐकायला मिळाली.

यामुळे यहूदी लोक अचंबित झाले. त्यांना हे समजत नव्हते की, प्रेषित हे कसे करु शकले. ते म्हणाले, “पाहा! ही माणसे (प्रेषित) ज्यांना आपण बोलताना ऐकत आहोत ती सर्व गालीली [b] आहेत! पण आपण त्यांचे बोलणे आपल्या स्वतःच्या भाषेत ऐकत आहोत. हे कसे शक्य आहे? आपण भिन्र देशाचे आहोतः पार्थी, मेदी, एलाम, मेसोपोटेमिया, यहूदा, कपदुकीया, पंत, आशिया [c] 10 फ्रुगिया, पंफिलीया, इजिप्त, कुरेने शहराजवळचा लिबीयाचा भाग, रोमचे प्रवासी, 11 क्लेत व अरब प्रदेश असे आपण सर्व निरनिराळ्या देशांचे आहोत. आपल्यापैकी काही जन्मानेच यहूदी आहेत. काही जण धर्मांतरीत आहेत. आपण या निरनिराळ्या देशांचे आहोत. परंतु आपण ह्या लोकांचे बोलणे आपापल्या भाषेत ऐकत आहोत! आपण सर्व ते देवाविषयीच्या ज्या महान गोष्टी बोलत आहेत त्या समजू शकतो.”

12 ते लोक आश्चर्यचकित झाले, आणि गोंधळून गेले. त्यांनी एकमेकांना विचारले, “काय चालले आहे?” 13 दुसरे लोक प्रेषितांना हसत होते. त्यांना असे वाटले की, प्रेषित द्राक्षारस खूप प्रमाणात प्यालेले आहेत.

पेत्राचे लोकांपुढे भाषण

14 मग पेत्र अकरा प्रेषितांसह उठून उभा राहिला. आणि तेथे असलेल्या लोकांना ऐकू जावे म्हणून मोठ्याने बोलला. तो म्हणाला, “माझ्या यहूदी बंधूंनो, आणि तुम्ही सर्व यरुशलेमचे रहिवासी, माझे ऐका, मी जे सांगतो, ते तुम्हांला समजणे जरुरीचे आहे, काळजीपूर्वक ऐका. 15 सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि तुम्हांला वाटते तसे हे लोक द्राक्षारसाच्या धुंदीत बोलत नाहीत! 16 परंतु आज येथे ज्या गोष्टी घडताना तुम्ही पाहत आहात त्याविषयी योएल संदेष्ट्याने लिहीले होते. योएल असे लिहिले:

17 ‘देव म्हणतो: शेवटल्या दिवसात
    मी अखिल मानवांवर आपला आत्मा ओतीन
तुमचे पुत्र व कन्या भविष्य सांगतील
    तुमच्या तरुणांना दृष्टांत [d] होतील;
    तुमच्या वृद्धांना विशेष स्वप्ने पडतील.
18 त्यावेळी मी माझा आत्मा माझ्यासेवकांवर,
    पुरुषांवर व स्त्रियांवर ओतीन
    आणि ते भविष्य सांगतील.
19 वर आकाशात मी अद्भुत गोष्टी दाखवीन,
    खाली पृथ्वीवर मी पुरावे देईन.
    तेथे रक्त, अग्नि आणि दाट धूर असतील.
20 सूर्य अंधारामध्ये बदलला जाईल
    चंद्र रक्तासारखा लाल होईल
नंतर प्रभुचा महान व गौरवी दिवस येईल.
21 प्रत्येक व्यक्ति जी प्रभुवर विश्वास ठेवते ती वाचेल.’ (A)

22 “माझ्या यहूदी बांधवानो, हे शब्द ऐका: नासरेथचा येशू हा एक फार विशेष मनुष्य होता. देवाने तुम्हांला हे स्प्टपणे दाखविले आहे. देवाने येशूच्या हातून मोठ्या सामर्थ्यशाली व अदुभुत गोष्टी तुमच्यामध्ये करुन हे सिद्ध केले. तुम्ही सर्वांनी या गोष्टी पाहिल्या. म्हणून तुम्ही हे जाणता की हे सत्य आहे. 23 तुमच्याकरिता येशूला देण्यात आले आणि तुम्ही त्याला जिवे मारले. वाईट लोकांच्या मदतीने तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. परंतु हे सर्व होणार हे देव जाणून होता, ती देवाचीच याजना होती. फार पूर्वीच देवाने ही योजना तयार केली होती. 24 येशूने मरणाचे दु:ख सहन केले. परंतु देवाने त्याला मुक्त केले, देवाने येशूला मरणातून उठविले, मरण येशूला बांधून ठेवू शकले नाही. 25 येशूविषयी दावीद असे म्हणतो:

‘मी प्रभूला नेहमी माइयासमोर पाहिले आहे;
    मला सुरक्षित ठेवण्यासाठी तो माइया उजवीकडे असतो
26 म्हणून माझे हृदय आनंदात आहे
    आणि माझे तोंड आनंदात बोलते.
    होय, माझे शरीरदेखील आशा धरुन राहील
27 कारण तू माझा जीव मरणाच्या जागेत [e] राहू देणार नाहीस
    तू तुइया पवित्र लोकांच्या शरीराला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
28 तू मला कसे जगायचे ते शिकविलेस.
    तू माइयाजवळ येशील.
    आणि मला मोठा आनंद देशील.’ (B)

29 “माझ्या बांधवांनो, खरोखर आपला पूर्वज दाविद याच्याविषयी मी तुम्हांला सांगू शकतो. तो मेला आणि पुरला गेला. आणि त्याची कबर आजच्या ह्या दिवसापर्यत आपल्यामध्ये आहे. 30 दावीद हा संदेष्टा [f] होता. आणि देव जे काही बोलला ते त्याला माहीत होते. दावीदाला देवाने अभिवचन दिले की, तो त्याच्याच घराण्यातून एका व्यक्तीला त्याच्या राजासनावर बसवील. 31 ते घडण्यापूर्वीच दावीदाला हे माहीत होते. यासाठीच दावीद त्या व्यक्तीबद्दल असे म्हणतो:

‘त्याला मरणाच्या जागेत राहू दिले नाही.
    त्याचा देह कबरेमध्ये कुजला नाही.’

दावीद ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठविण्याविषयी म्हणत होता. 32 म्हणून येशूला देवाने मरणातून उठविले, दाविदाला नाही! आम्ही सर्व ह्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. आम्ही त्याला पाहिले! 33 येशूला स्वर्गात उचलून घेण्यात आले. आता येशू देवाच्या उजवीकडे देवाबरोबर आहे. देवाने येशूला आता पवित्र आत्मा दिलेला आहे. हाच पवित्र आत्मा देण्याचे वचन देवाने दिले होते. म्हणून आता येशू तो आत्मा ओतीत आहे. हेच तुम्ही पाहत आहात व ऐकत आहात! 34 दावीद वर स्वर्गात उचलला गेला नाही, तर येशूला वर स्वर्गात उचलून घेण्यात आले. दावीद स्वतः म्हणाला,

‘प्रभु (देव) माझ्या प्रभुला म्हणाला:
मी तुझे वैरी
35     तुझ्या सामर्थ्याखाली घालीपर्यंत [g] माझ्या उजवीकडे बैस.’ (C)

36 “म्हणून, सर्व यहूदी लोकांना खरोखर हे समजले पाहिजे की देवाने येशूला प्रभु व रिव्रस्त [h] असे केलेले आहे. तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलेला हाच तो मनुष्य!”

37 जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांना फार फार दु:ख झाले. त्यांनी पेत्राला व इतर प्रेषितांना विचारले, “आम्ही काय करावे?”

38 पेत्र त्यांना म्हणाला, “तुमची ह्रदये व जीविते बदला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा. मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. 39 हे अभिवचन तुम्हांसाठी आहे, हे तुमच्या मुलांना आणि जे लोक खूप दूर आहेत त्यांनासुद्धा आहे. प्रभु आपला देव, ज्यांना स्वतःकडे बोलावितो अशा प्रत्येक व्यक्तीला ते दिलेले आहे.”

40 पेत्राने दुसऱ्या पुष्कळ शब्दांत त्यांना सावधान केले; त्याने त्यांना विनवणी केली, “ह्या युगाच्या दुष्टाई पासून स्वतःचा बचाव करा!” 41 मग ज्यांनी पेत्राने सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार केला, त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला. त्या दिवशी विश्वासणाऱ्यांच्या बंधुवर्गामध्ये तीन हजार लोकांची भर पडली.

विश्वासणाऱ्यांचा सहभाग

42 सर्व विश्वासणारे एकत्र भेटत असत. ते त्यांचा वेळ प्रेषितांची शिकवण शिकण्यात घालवीत. विश्वासणारे एकमेकांशी सहभागिता करीत. ते एकत्र खात आणि एकत्र प्रार्थना करीत. 43 प्रेषित अनेक सामर्थ्यशाली आणि अद्भुत गोष्टी करीत; आणि प्रत्येक व्यक्तीला देवाविषयी आदर वाटू लागला. 44 सर्व विश्वासणारे एकत्र राहत. प्रत्येक गोष्ट ते आपापसात वाटत असत. 45 विश्वासणाऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनी व वस्तू विकल्या. नंतर त्यांनी पैसे विभागून ज्यांना आवश्यकता होती अशा लोकांना दिले. 46 सर्व विश्वासणारे मंदिरामध्ये दररोज एकत्र जमत. त्या सर्वांचा उद्देश सारखाच होता. ते त्यांच्या घरामध्ये एकत्र खात. आपले अन्न इतरंना वाटण्यात त्यांना फार आनंद होत असे आणि आनंदी मनाने ते खात असत. 47 विश्वासणारे देवाची स्तुति करीत. आणि सर्व लोकांना ते आवडत असत. आणि अधिकाधिक लोक तारले जात होते. व विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये प्रभु रोज अनेक लोकांची भर घालीत असे.

स्तोत्रसंहिता 122

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दाविदाचेस्तोत्र.

122 “आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ या,”
    असे लोक म्हणाले तेव्हा मी खूप आनंदात होतो.
आपण इथे आहोत.
    यरुशलेमच्या दरवाजात उभे आहोत.
हे नवीन यरुशलेम आहे.
    हे शहर पुन्हा एक एकत्रित शहर म्हणून वसवण्यात आले.
कुटुंबांचे जथे जिथे जातात ती हीच जागा.
    इस्राएलचे लोक तिथे परमेश्वराच्या नावाचे गुणगान करण्यासाठी जातात.
    ही कुटुंबे देवाची आहेत.
राजांनी त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी सिंहासने मांडली.
    दावीदाच्या वंशातील राजांनी आपली सिंहासने त्या ठिकाणी मांडली.

यरुशलेममध्ये शांती नांदावी म्हणून प्रार्थना करा.
    “जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना इथे शांती मिळेल,
अशी मी आशा करतो.
    तुझ्या चार भिंतींच्या आत शांती असेल अशी मी आशा करतो.”

तुझ्या मोठ्या इमारतीत, सुरक्षितता असेल अशी मी आशा करतो”.
    माझ्या भावांच्या आणि शेजाऱ्यांच्या भल्यासाठी तिथे शांती नांदो अशी मी आशा करतो.
आपला देव, आपला परमेश्वर, त्याच्या मंदिराच्या भल्यासाठी
    या शहरात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी मी प्रार्थना करतो.

नीतिसूत्रे 16:19-20

19 विनम्र राहून गरीब लोकांबरोबर राहणे हे जे लोक स्वतःला इतरांपेक्षा चांगले समजतात, त्यांच्याबरोबर राहून श्रीमंतीचे वाटेकरी होण्यापेक्षा चांगले असते.

20 जर एखादा माणूस लोकांच्या शिकवण्याकडे लक्ष देईल तर त्याचा फायदा होईल. आणि जो माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला आशीर्वाद मिळतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center