Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the VOICE. Switch to the VOICE to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 2:12-3:39

भयंकर झुंज

12 नेरचा मुलगा अबनेर आणि शौलपुत्र ईश-बोशेथचे सेवक महनाईम सोडून गिबोन येथे आले. 13 सरुवेचा मुलगा यवाब आणि दावीदचे सेवकही बाहेर पडून गिबोनला आले. गिबोनच्या तलावाशी या दोन गटांची गाठ पडली. तलावाच्या दोन बाजूला दोन्ही सैन्ये उतरली.

14 अबनेर यवाबाला म्हणाला, “आपल्यातील तरुण सैनिकांनी उठून समोरासमोर येऊन दोन हात करावे.”

यवाब म्हणाला, “ठीक आहे होऊन जाऊ दे.”

15 तेव्हा दोन्ही बाजूचे तरुण सैनिक उठले. त्यांनी आपापली संख्या पाहिली. शौलपुत्र ईश-बोशेथ याच्या बाजूने झुंज द्यायला त्यांनी बन्यामीनच्या वंशातील बाराजण निवडले आणि दावीदाच्या सैन्यातील बाराजणांना घेतले.

16 प्रत्येकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मस्तक धरुन त्याच्या कुशीत तलवार खुपसली. तेव्हा सर्व एकदम पडले. म्हणून त्या जागेचे नाव हेलकथहसूरीम म्हणजेच “धारदार सुऱ्यांचे क्षेत्र” असे पडले हे स्थळ गिबोनमध्ये आहे. 17 त्या दिवशी तेथे तुंबळ युध्द झाले. दावीदाच्या सैन्याने त्या दिवशी अबनेर आणि इस्राएल लोक यांचा पराभव केला.

अबनेरकडून असाएलचा वध

18 यवाब, अबीशय आणि असाएल हे सरूवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरणासारखा चपळ होता. 19 त्याने अबनेरचा पाठलाग सुरु केला. अबनेरचा पाठलाग करताना त्याने डावीकडे अथवा उजवीकडे वळून सुद्धा पाहिले नाही. 20 अबनेर ने मागे वळून विचारले, “तू असाएल ना?”

असाएलने होकार भरला.

21 (असाएलला इजा होऊ नये असे अबनेरला वाटत होते.) म्हणून तो असाएलला म्हणाला, “माझा पाठलाग थांबव. एखाद्या तरुण सैनिकाला धर. त्याचे चिलखत स्वतःसाठी घे.” पण असाएलने त्याचे न ऐकता अबनेरचा पाठलाग चालूच ठेवला.

22 पुन्हा अबनेर त्याला म्हणाला, “हा पाठलाग थांबव नाहीतर मला तुला मारावे लागेल आणि तसे झाले तर तुझा भाऊ यवाब याला मी तोंड दाखवू शकणार नाही.”

23 तरीही असाएल ऐकेना. तेव्हा अबनेरने आपल्या भाल्याचे मागचे टोक असाएलच्या पोटात खुपसले. भाला सरळ त्याच्या पोटात घुसून पाठीतून निघाला. असाएलला तिथे तात्काळ मृत्यू आला.

यवाब आणि अबीशय अबनेरच्या मागावर

असाएलचा मृतदेह तिथेच जमिनीवर पडलेला होता. लोकांनी ते पाहिले आणि ते तिथेच थांबले. 24 पण यवाब आणि अबीशय यांनी अबनेरचा पाठलाग चालू ठेवला. ते अम्मा टेकडीपाशी पोहोंचले तेव्हा सूर्य नुकताच मावळत होता. (ही टेकडी गिबोन वाळवंटाच्या रस्त्यावरील गिहा गावासमोर आहे.) 25 बन्यामीनच्या घराण्यातील लोक अबनेरकडे आले आणि या डोंगराच्या शिखरावर उभे राहिले.

26 तेव्हा यवाबाला हाक मारून अबनेरने त्याला विचारले, “आपापसातील या प्राणघातक लढाया अशाच चालू ठेवायच्या आहेत का? याचे पर्यवसान दु:खात होणार आहे हे तू जाणतोसच. आपल्याच भाऊबंदांचा पाठलाग थांबवायला तुझ्या लोकांना सांग.”

27 तेव्हा यवाब म्हणाला, “तू हे सुचवलेस ते चांगले झाले नाहीतर, देवाच्या जीविताची शपथ, हे लोक सकाळच्या वेळी आपल्याच बांधवांचा पाठलाग करत राहिले असते.” 28 आणि यवाबाने रणशिंग फुंकले. त्याच्या बाजूच्या लोकांनी इस्राएल लोकांचा पाठलाग थांबवला. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढे इस्राएलांशी युध्दही केले नाही.

29 अबनेर आणि त्याच्या बरोबरची माणसे यांनी मग रातोरात यार्देन खोऱ्यातून कूच केले. नदी पार करुन महनाइमला पोचेपर्यंत ते वाटचाल करत होते.

30 यवाबाने अबनेरचा पाठलाग थांबवला आणि तो परतला. आपल्या लोकांना त्याने एकत्र केले तेव्हा असाएल धरुन दावीदाच्या सेवकांपैकी एकोणीस जण बेपत्ता असल्याचे त्याला आढळून आले. 31 पण दावीदाच्या लोकांनी बन्यामीनच्या कुळातील अबनेरची तीनशे साठ माणसे मारली होती. 32 दावीदाच्या लोकांनी असाएलचे दफन बेथलहेम येथे त्याच्या वडीलांच्या थडग्यातच केले.

यवाब आणि त्याची माणसे रात्रभर प्रवास करुन उजाडता उजाडता हेब्रोन येथे पोचली.

इस्राएल आणि यहूदा यांच्यात लढाई

दावीद आणि शौल यांच्या घराण्यांमध्ये दीर्घकाळ युध्द चालू राहिले. दिवसेंदिवस दावीदाची ताकद वाढत चालली तर शौलचे घराणे कमकुवत बनत गेले.

हेब्रोन येथे दावीदाच्या सहा मुलांचा जन्म

हेब्रोन येथे दावीदाला मुलगे झाले,

त्यांचा क्रम असा इज्रेलची अहीनवाम हिच्यापासून पहिला मुलगा झाला तो अम्मोन.

दुसरा मुलगा किलाब, हा कर्मेलची नाबालची विधवा अबीगईल हिचा मुलगा.

अबशालोम तिसरा, गशूरचा राजा तलमय याची मुलगी माका ही याची आई.

अदोनीया चवथा, हग्गीथ ही त्याची आई.

शफाट्या पाचवा, त्याची आई अबीटल.

दावीदाची बायको एग्ला हिच्यापासून सहावा इथ्राम झाला.

हेब्रोनमध्ये जन्मलेले हे त्याचे सहा पुत्र.

अबनेर दावीदाला येऊन मिळण्याचे ठरवतो

शौल आणि दावीद यांच्या घराण्यात चाललेल्या लढायांमध्ये शौलाच्या सैन्यातील अबनेरचे बळ वाढत चालले. शौलची रिस्पा नामक उपपत्नी होती. ती अय्याची मुलगी. ईश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “माझ्या वडिलांच्या दासीशी तू शरीर संबध का ठेवतोस?”

या बोलण्याचा अबनेरला संताप आला. तो म्हणाला, “शौलशी आणि त्याच्या घराण्याशी मी एकनिष्ठ राहिलेलो आहे. दावीदाच्या हातून मी तुमचा पराभव होऊ दिला नाही. मी विश्वासघात केला नाही. [a] पण आता तू मला या बाईच्या संदर्भात दूषण देत आहेस. 9-10 आता मात्र मी निर्धाराने सांगतो की, देवाने भाकित केल्याप्रमाणे सर्व घडेल. शौलाच्या घराण्याकडून राज्य काढून घेऊन ते दावीदाकडे सोपवण्याचे भाकित परमेश्वराने केले आहे. परमेश्वर दावीदाला इस्राएल आणि यहूदा यांचा राजा करणार आहे. दानपासून बैर-शेब्यापर्यंत त्याचे राज्य असेल. माझ्या हातून आता हे सर्व प्रत्यक्षात आले नाही तर देव खुशाल माझे वाईट करो.” 11 ईश-बोशेथ हे ऐकून इतका घाबरला की त्याने काहीही प्रत्युत्तर केले नाही.

12 अबनेरने दूतांकरवी दावीदाला निरोप पाठवला, “ह्या प्रदेशांवर कोणी राज्य करावे असे तुला वाटते? माझ्याबरोबर करार कर. म्हणजे इस्राएलचा राजा म्हणून तुला मान्यता मिळवून द्यायला मी मदत करीन.”

13 यावर दावीद म्हणाला, “हे छान झाले, मी करार करायला तयार आहे. आता माझे एक मागणे आहे. शौलची मुलगी मीखल हिला आपल्याबरोबर आणलेस तरच मी तुला भेटीन.”

14 शौलचा मुलगा ईश-बोशेथ याच्याकडे दावीदाने जासूदांकरवी निरोप पाठवला, “माझी पत्नी मीखल हिला माझ्याकडे पाठवून द्यावे. ती मला देण्यात आलेली आहे. तिच्या प्राप्तीसाठी मी शंभर पलिष्ट्यांचा वध केला होता.”

15 तेव्हा ईश-बोशेथने लईशचा मुलगा पालटीयेल याच्याकडून मीखलला आणण्यास माणसे पाठवली. 16 पालटीयेल हा मीखलचा नवरा. तो तिच्यामागोमाग बहूरीम पर्यंत रडतरडत गेला. पण अबनेरने त्याला परत जाण्यास सांगितले तेव्हा तो मागे फिरला.

17 अबनेरने इस्राएलाच्या वडीलधाऱ्या मंडळीकडे निरोप पाठवला, “दावीदाला राजा करावे असे तुमच्या मनात होते. 18 आता ते प्रत्यक्षात आणा. परमेश्वराने दावीदा विषयी म्हटले आहे ‘पलिष्टी लोक आणि इतर शत्रू यांच्यापासून मी माझ्या इस्राएल लोकांचे संरक्षण करीन. माझा सेवक दावीद याच्यामार्फत मी हे करीन.’”

19 अबनेरने हे सर्व हेब्रोन येथे दावीदाच्या कानावर घातले. बन्यामीन घराण्यातील लोकांशीही तो या विषयी बोलला. त्यांना आणि इस्राएल लोकांना ते चांगले वाटले.

20 एवढे झाल्यावर तो आपल्या बरोबर वीस जणांना घेऊन हेब्रोन येथे दावीदाकडे आला. दावीदाने अबनेर आणि त्याच्या बरोबरचे हे सर्वलोक यांना मेजवानी दिली.

21 अबनेर दावीदाला म्हणाला, “महाराज, सर्व इस्राएल लोकांना मी आता आपल्या पायाशी एकत्र आणतो. ते तुमच्याशी करार करतील. मग आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही इस्राएलवर राज्य कराल.”

तेव्हा दावीदाने अबनेरला निरोप दिला. अबनेर शांततेने परत गेला.

अबनेरचा मृत्यू

22 इकडे यवाब आणि दावीदाचे लोक युध्दावरुन परत आले. त्यांनी शत्रूकडून बऱ्याच मौल्यवान वस्तू लुटून आणल्या. दावीदाने निरोप दिल्यावर अबनेर नुकताच शांतचित्ताने तेथून गेला होता. तेव्हा हेब्रोन येथे दावीदाजवळ तो अर्थातच नव्हता. 23 यवाब सर्वसैन्यासह हेब्रोन येथे आला. सैन्यातील लोक यवाबाला म्हणाले, “नेरचा मुलगा अबनेर दावीदराजाकडे आलेला होता आणि दावीदाने त्याला शांत मनाने जाऊ दिले होते.”

24 तेव्हा यवाब राजाकडे आला आणि म्हणाला, “हे आपण काय केलेत? अबनेर येथे आलेला असताना तुम्ही त्याला तसेच जाऊ दिलेत! असे का? 25 या नेरच्या मुलाला तुम्ही ओळखताच. त्याचा यात कावा आहे. तो येथील बित्तंबातमी काढायला आला होता.”

26 मग दावीदाकडून निघून यवाबाने आपले दूत अबनेरच्या मागावर पाठवले. त्यांनी त्याला सिरा विहिरीजवळ गाठले आणि परत आणले. दावीदाला याची काहीच कल्पना नव्हती. 27 हेब्रोन येथे त्याला आणल्यावर यवाबाने त्याला गुप्त मसलत करण्यासाठी म्हणून वेशीच्या आत घेतले आणि अबनेरच्या पोटात वार केला. अबनेर गतप्राण झाला. यवाबाचा भाऊ असाएल याला अबनेरने मारले होते त्याचा यवाबाने सूड उगवला.

दावीदाचा अबनेर करता शोक

28 दावीदाला हे वृत्त समजले तेव्हा तो म्हणाला, “नेरचा मुलगा अबनेर याच्या खुनाच्या बाबतीत मी आणि माझे राज्य निर्दोष आहोत. परमेश्वर हे जाणतो. 29 यवाब आणि त्याचे कुटुंबीय या कृत्याला जबाबदार आहेत. तेव्हा अपराधी ते आहेत. (याचे फळ त्यांना भोगावे लागेल) त्याच्या वंशातील लोक महारोग, पंगुत्व यांनी ग्रासले जातील, युध्दात मारले जातील. त्यांची अन्नान्नदशा होईल.”

30 गिबोनच्या लढाईत अबनेरने असाएलला मारले. आपल्या भावाच्या वधाचे प्रत्युत्तर म्हणून यवाब आणि अबीशय यांनी अबनेरला मारले.

31-32 दावीदाने यवाब व त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांना सांगितले, “तुमची ही वस्त्रे फाडा आणि शोक झाला असल्याचे दाखवणारी वस्त्रे घाला. अबनेरच्या मृत्युबद्दल दु:ख व्यक्त करा.” त्यांनी हेब्रोन येथे अबनेरचे दफन केले. दावीद अत्यंविधीला हजर होता. अबनेरच्या कबरीपाशी राजा आणि इतर सर्व जण यांनी विलाप केला.

33 तेथे दावीद राजाने हे शोकगीत म्हटले

“एखाद्या मूढ गुन्हेगाराप्रमाणे अबनेर मेला, नाही का?
34     अबनेर, अरे, तुझ्या हातात बेड्या नव्हत्या,
    पाय साखळदंडांनी बांधले नव्हते
नाही रे, तुला कपटी लोकांनी मारले.”

मग पुन्हा सर्वांनी अबनेरसाठी शोक व्यक्त केला. 35 दावीदाने काही तरी खाऊन घ्यावे म्हणून दिवसभर लोकांनी त्याची मनधरणी केली. पण दावीदाने एक निर्धार केला होता. “सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा तत्सम काहीही खाल्ले तरी देव मला शासन करो, मला संकटात टाको” असे तो बोलला होता. 36 लोकांनी हे सर्व पाहिले आणि दावीद राजाची वर्तणूक पाहून त्यांना आनंद झाला. 37 दावीदाने अबनेरला मारलेले नाही याबद्दल यहूदा आणि इस्राएल लोकांची खात्री पटली.

38 दावीद राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आज एक महत्वाचा पुढारी इस्राएलमध्ये मारला गेला हे तुम्ही जाणताच. 39 त्याच दिवशी राजा म्हणून माझा राज्याभिषेक झाला. सरुवेच्या मुलांचे हे वर्तन मला फार त्रासदायक झाले आहे. परमेश्वर त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना तसेच शासन करो.”

योहान 13:1-30

येशू त्याच्या शिष्यांचे पाय धुतो

13 मग वल्हांडण सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून पित्याकडे जावे असा समय आला आहे, हे जाणून आपले स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीति केली.

मग संध्याकाळचे भोजन होण्याच्या वेळेस सैतानाने शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याच्या मनात त्याला शत्रूंच्या हाती घावे असे आधीच घालून दिले असताना, आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो आणि आता देवाकडे जातो हे ओळखून, येशू जेवणावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन आपल्या कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला. आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने पुसू लागला.

मग तो शिमोन पेत्राकडे आला; पण पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, तू माझे पाय धुणार काय?”

येशूने उत्तर दिले, “मी आता जे करीत आहे, ते तुला आता कळणार नाही, तर पुढे तुला कळेल.”

पेत्र त्याला म्हणाला, “तू माझे पाय कधीही धुवायचे नाहीत.”

येशूने उत्तर दिले, “जर मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही.”

शिमोन पेत्राने उत्तर दिले,“मग प्रभु माझे पायच नव्हे तर हात व डोकेही धुवा.”

10 येशूने उत्तर दिले, “ज्याची आंघोळ झाली आहे, त्याचे फक्त पाय धुतले तरी चालेल, कारण तो स्वच्छच आहे. तुम्ही स्वच्छ आहात पण सर्वच नाहीत.” 11 आपल्याला कोण धरून देणार हे येशूला माहीत होते, म्हणून “तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत” असे तो म्हणाला.

12 जेव्हा त्याने त्याचे पाय धुण्याचे संपविले तेव्हा त्याने आपली बाह्यवस्त्रे घातली व आपल्या जागेवर आला. त्याने त्यांना विचारले, “मी काय केले हे तुम्हांला समजले काय? 13 तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभु’ म्हणता आणि योग्य म्हणता, कारण मी तोच आहे. 14 म्हणून मी जो प्रभु आणि गुरु असूनही मी तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे. 15 कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला उदाहरण घालून दिले. 16 मी खरे सांगतो, दास आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नाही आणि पाठविलेला ज्याने पाठविले त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. 17 या गोष्टी जर तुम्ही समजता आणि त्या तुम्ही जर केल्या तर तुम्ही आशीर्वादित आहात.

18 “मी तुम्हां सर्वाविषयी बोलत नाही. ज्यांना मी निवडले ते मला माहीत आहेत. परंतु पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे तसे घडलेच पाहिजे: ‘जो माझी भाकर खातो त्याने माझ्यावर आपली टाच उचलली आहे.’ [a] 19 हे होण्याअगोदरच मी तुम्हांस सांगतो, यासाठी की जेव्हा हे होईल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा, की मी तो आहे. 20 मी तुम्हांस खरे सांगतो ज्या कोणाला मी पाठवितो त्याला जो स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो.”

येशू त्याच्याविरूद्ध कोण असेल ते सांगतो(A)

21 असे बोलल्यावर येशू आपल्या आत्म्यात व्याकुळ झाला आणि उघडपणे म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यातील एकजण मला धरून देईल.”

22 तेव्हा तो कोणाविषयी बोलतो असा संशय धरून शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. 23 आणि ज्याच्यावर येशू प्रीति करीत असे असा त्याच्या शिष्यातील एकजण येशूच्याजवळ खेटून बसला होता. 24 शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुणावले आणि म्हणाला, “ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे विचार.”

25 तेव्हा तो तसाच येशूच्या अगदी जवळ असता त्याल म्हणाला, “प्रभु तो कोण आहे?”

26 येशूने उत्तर दिले, “ज्याला मी भाकरीचा तुकडा ताटात भिजवून देईन तोच तो आहे.” मग त्याने भाकरीचा तुकडा ताटात बुडवून घेतला व तो शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याला दिला. 27 त्याने भाकरीचा तुकडा घेतला आणि सैतानाने त्याचा ताबा घेतला. मग येशूने त्याला म्हटले, “तुला जे करायचे आहे ते लवकर कर.” 28 पण त्याने त्याला काय सांगितले हे जेवणास बसलेल्यांपैकी कोणाला कळले नाही. 29 कारण यहूदाजवळ पैशाचा व्यवहार होता. काहींना वाटले येशू त्याला भोजनास जे पाहिजे ते आणण्यासाठी सांगत आहे किंवा गरिबाला काही देण्याविषयी सांगत आहे.

30 यहूदाने भाकर घेतल्याबरोबर तो बाहेर गेला कारण ती वेळ रात्रीची होती.

स्तोत्रसंहिता 119:1-16

आलेफ

119 शुध्द आयुष्य जगणारे लोक सुखी आहेत.
    ते लोक परमेश्वराची शिकवण पाळतात.
जे लोक परमेश्वराचा करार पाळतात ते सुखी आहेत.
    ते परमेश्वराच्या आज्ञा मनापासून पाळतात.
ते लोक वाईट गोष्टी करीत नाहीत.
    ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात.
परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या आज्ञा दिल्यास
    आणि त्या आज्ञा पूर्णपणे पाळायला तू आम्हाला सांगितलेस.
परमेश्वरा, मी जर नेहमी तुझे नियम पाळले.
तर मी जेव्हा तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन
    तेव्हा मला कधीही लाज वाटणार नाही.
मी जेव्हा तुझा चांगलुपणा आणि
    न्यायीपणा यांचा अभ्यास करीन तेव्हा मी तुला खरोखरच मान देईन.
परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा पाळेन.
    तेव्हा कृपाकरुन मला सोडून जाऊ नकोस.

बेथ

तरुण माणूस शुध्द आयुष्य कसे जगू शकेल?
    तू दिलेली शिकवण आचरणात आणून.
10 मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो.
    देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर.
11 मी काळजीपूर्वक तुझी शिकवण अभ्यासतो. का?
    म्हणजे मी तुझ्याविरुध्द पाप करणार नाही.
12 परमेश्वरा, तुझे कल्याण असो
    मला तुझे नियम शिकव.
13 मी तुझ्या सगळ्या शहाणपणाच्या निर्णयांबद्दल बोलेन.
14 तुझ्या कराराचा अभ्यास करणे
    मला इतर कशाही पेक्षा आवडते.
15 मी तुझ्या नियमांबद्दल चर्चा करेन.
    मी तुझी जीवन जगण्याची पध्द्त आचरेन.
16 मला तुझे नियम आवडतात.
    मी तुझे शब्द विसरणार नाही.

नीतिसूत्रे 15:29-30

29 परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे. पण तो चांगल्या माणसांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.

30 जो माणूस हसतो तो इतरांना आनंद देतो आणि चांगली बातमी ऐकून लोकांना अधिक चांगले वाटते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center