Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 7:1-8:17

यरूब्बाल (म्हणजेच गिदोन) आणि त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांनी सकाळी लवकर उठून हरोद झऱ्याजवळ तळ दिला. आणि मिद्यानी लोकांचा तळ मोरे नावाच्या डोंगराच्या पायथ्याजवळ एका खोऱ्यात होता. हे ठिकाण गिदोनच्या तळाच्या उत्तरेस होते.

तेव्हा परमेश्वर गिदोनला म्हणाला, “माझ्या मदतीने तुम्ही मिद्यानी लोकांचा पराभव करु शकाल पण तुझ्या सैन्यात जरुरीपेक्षा जास्त माणसे आहेत उद्या कदाचित हे इस्राएल लोक मला विसरतील आणि आमचे रक्षण आम्ही स्वतःच केले अशी प्रौढी मिरवतील. तेव्हा आता एक गोष्ट जाहीर कर. त्यांना सांग, ‘कोणी लढाईला घाबरत असेल तर त्याने आत्ताच गिलाद डोंगर सोडून घरी परत जावे.’”

त्यावेळी बावीस हजार माणसे गिदोनला सोडून गेली. तरी दहा हजार राहिली.

तेव्हा परमेश्वर गिदोनला म्हणाला, “ही देखील फार आहेत. त्यांना घेऊन खाली झऱ्याशी जा मी त्यांची परीक्षा पाहतो. ‘याने तुझ्या बरोबर यावे’ असे मी म्हणीन त्याच माणसाने तुझ्याबरोबर जावे. ‘ज्याने जाऊ नये’ असे सांगीन तो तुझ्याबरोबर येणार नाही.”

तेव्हा गिदोन त्या लोकांना झऱ्यापाशी घेऊन आला. तेथे गिदोनला परमेश्वर म्हणाला, “आता या लोकांची मी सांगतो त्याप्रमाणे विभागणी कर. जे कुत्र्याप्रमाणे जिभेने लपलप करत पाणी पितील त्यांचा एक गट कर. जे गुडघे टेकून वाकून पाणी पितील त्यांना दुसऱ्या गटात टाक.”

पाण्याची ओंजळ तोंडाशी नेऊन कुत्र्याप्रमाणे लपक लपक करीत पिणारे तीनशेजण निघाले बाकी सर्व वाकून पाणी प्यायले परमेश्वर गिदोनला म्हणाला, “ही तीनशे माणसे मी निवडतो मिद्यानींच्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी जे लपक लपक करत पाणी प्यायले त्यांचा मी उपयोग करुन घेईन मी त्यांच्या मार्फत इस्राएल लोकांचा बचाव करीन. इतरांना परत जाऊ दे.”

तेव्हा गिदोनने बाकीच्यांना परत पाठवून तीनशे जणांना आपल्या बरोबर राहू दिले. जे परत गेले त्यांची शस्त्रसामुग्री आणि रणवाद्ये तीनशे जणांनी ठेवून घेतली.

गिदोनच्या तळाच्या खालच्या खोऱ्यातच मिद्यानी लोकांचा तळ होता. रात्री परमेश्वर गिदोनशी बोलला तो म्हणाला “ऊठ मिद्यानी सैन्य मी आत्ताच तुझ्या हाती सोपवतो. त्यांच्या तळावर जा. 10 तुला एकट्याला भीती वाटत असली तर तुझा सेवक पुरा याला बरोबर घेऊन जा. 11 तेथे जाऊन ते लोक काय बोलतात ते नीट लक्ष देऊन ऐक म्हणजे मग तुला त्यांच्यावर हल्ला चढवायला भीती वाटणार नाही.”

तेव्हा गिदोन आपल्या पुरा या सेवकासह शत्रूच्या शिबिराच्या कडेशी गेला. 12 मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील सर्व लोक त्या खोऱ्यात होते. त्यांचा जमाव टोळ धाडीसारखा दिसत होता. किनाऱ्यावरील वाळुकणांइतके असंख्य उंट त्यांच्याबरोबर होते.

13 शत्रूतळाशी येताच गिदोनला एकाचे बोलणे ऐकू आले. आपल्याला काय स्वप्न पडले ते तो आपल्या मित्राला सांगत होता. “पावाची एक गोल लादी मिद्यानी लोकांच्या तळापाशी घरंगळत आली. आणि तंबूला तिने इतक्या जोरात धक्का दिला की तंबू उलटला आणि पार आडवा झाला.”

14 त्या मित्राला या स्वप्नाचा अर्थ माहीत होता. तो म्हणाला, “याचा अर्थ एकच असू शकतो योवाशचा मुलगा गिदोन या इस्राएल लोकांबद्दल हे स्वप्न आहे. परमेश्वर त्याच्या करवी मिद्यानी सैन्याचा पाडाव करणार आहे.”

15 गिदोनने हा संवाद ऐकला तेव्हा त्याने परमेश्वरापुढे दंडवत घातले. मग तो आपल्या तळावर परत आला. लोकांना हाका मारुन तो म्हणाला, “चला, तयार व्हा. मिद्यान्यांचा पराभव करायला परमेश्वर आता मदत करणार आहे.” 16 मग गिदोनने आपल्या तीनशे माणसांचे तीन गट केले. प्रत्येकाला एक रणशिंग आणि एक रिकामा घडा दिला. घड्यामध्ये पेटती मशाल होती. 17 मग गिदोनने सांगितले, “माझ्याकडे सर्वांचे लक्ष असू द्या. मी करतो तसे करा. शत्रूच्या तळापर्यंत माझ्या मागोमाग चला. तेथे पोचल्यावर मी करीन तसेच करा 18 तुम्ही शत्रूच्या शिबिराला वेढा घाला. मी आणि माझ्या बरोबरची माणसे रणशिंग फुंकू तेव्हा तुम्हीही तसेच करा नंतर ‘परमेश्वराचा जय असो, गिदोनचा जय असो’ अशी गर्जना करा.”

19 त्याप्रमाणे गिदोन आणि त्याच्या बरोबर शंभरजण शत्रूच्या शिबिरापर्यंत गेले. ते पोहोंचले तेव्हा नुकताच शत्रूपक्षाने पहारा बदलला होता. रात्रीचा तो मधला प्रहर होता. गिदोन आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी आपली रणशिंगे फुंकली आणि घडे फोडले. 20 त्याबरोबर तीनही गटातील लोकांनीही तसेच केले. त्यांच्या डाव्या हातात मशाली आणि उजव्या हातात रणशिंगे होती. ती फुंकत ते “परमेश्वराची तलवार, गिदोनची तलवार” अशा आरोव्व्या मारत होते.

21 गिदोनची माणसे होती तेथेच थांबली. पण आत मिद्यानी लोकांच्या तळावर पळापळ सुरु झाली. 22 ही तीनशे माणसे रणवाद्ये वाजवत असताना, परमेश्वराने मिद्यानी लोकांना एकमेकांना तलवारीने ठार मारायला लावले. त्यांनी पळ काढला.सरेरा कडे बेथ-शिट्टा आणि टब्बाथ जवळच्या आबेल महोल नगराच्या सीमेपर्यंत हे शत्रूसैन्य पळून गेले.

23 मग नफताली, आशेर आणि मनश्शे यांच्या वंशातील सैनिकांना मिद्यानी लोकांचा पाठलाग करायला सांगितले गेले. 24 एफ्राईमच्या डोंगराळ भागात गिदोनने सर्वत्र आपले दूत पाठवले. निरोप असा होता “खाली या आणि मिद्यान्यांवर हल्ला करा. बेथ-बारा आणि यार्देन नदीपर्यंतचा प्रदेश रोखून धरा. मिद्यानी लोकांना निसटू देऊ नका.”

तेव्हा एफ्राईमच्या वंशातील लोकांना त्यांनी बोलावले. त्यांनी बेथ-बारापर्यंत नदीलगतच्या प्रदेशाचा ताबा घेतला. 25 एफ्राईम लोकांनी दोन मिद्यानी नेत्यांना पकडले, ओरेब आणि जेब हे दोन नेते होत. ओरेबचा खडक या ठिकाणापाशी त्यांनी ओरेबला मारले. जेबला जेबचे द्राक्षकुंड येथे मारले. एफ्राईम लोकांनी मिद्यान्याचा पाठलाग सुरुच ठेवला. ओरेब आणि जेब यांची मुंडकी त्यांनी गिदोनला दाखवायला नेली. यार्देन नदीपलीकडे गिदोन होता.

एफ्राईम लोक गिदोनवर चिडले होते. त्यामुळे गिदोनला भेटले तेव्हा त्यांनी विचारले, “तू मिद्यान्यांवर चढाई केलीस तेव्हा आम्हाला का बोलावले नाहीस? आम्हाला तू् अशी वागणूक का दिलीस?”

गिदोनने तेव्हा एफ्राईम लोकांना सांगितले, “माझे तुमच्या इतके चांगले चाललेले नाही. आमच्यापेक्षा तुम्ही कितीतरी जास्त पीक घेता. आम्ही अबियेजर जितकी द्राक्षे काढतो त्यापेक्षा जास्त द्राक्षे तर तुम्ही तशीच मव्व्यात पडू देता. हे खरे नाही काय? याही वर्षी तुम्ही चांगले पीक घेतले आहे. ओरेब जेब या दोन मिद्यानी नेत्यांना तर परमेश्वराने तुमच्या हाती सोपवले. तुम्ही जे केलेत त्याच्याशी मी माझ्या यशाची तुलना कशी करु?” गिदोनचे हे उत्तर ऐकून एफ्राईम लोकांचा राग बराच निवळला.

गिदोन मिद्यानचे दोन राजे कैद करतो

मग गिदोन आपल्या तीनशे माणसांसह यार्देन नदी उतरुन पलीकडे गेला. पाठलाग करताना ते सर्व थकलेले आणि भुकेलेले होते. गिदोन सुक्कोथ नगरातील लोकांना म्हणाला, “माझे सैनिक फार थकले आहेत. त्यांना काहीतरी खायला द्या अजूनही आम्हाला जेबह आणि सलमुन्ना या मिद्यानी राजांचा पाठलाग करायचा आहे.”

तेव्हा सुक्कोथ येथील अधिकारी म्हणाले, “आम्ही त्यांना खायला का द्यावे? अजून तर तुम्ही त्या दोन राजांना पकडलेलेही नाही.”

त्यावर गिदोन म्हणाला, “तुम्ही आम्हाला अन्न देत नाही तर जेबह आणि सलमुन्ना यांना ताब्यात घ्यायला परमेश्वरच आमच्या मदतीला येईल. मग मी परत इथे येईन. तेव्हा वाळवंटातील काटेरी झुडुपांनी मी तुमची चामडी लोळवीन.”

गिदोन मग सुक्कोथहून पनुएल शहराकडे निघाला. तेथील लोकांकडेही त्याने अन्नाची मागणी केली. पण पनुएल येथील लोकांनीही सुक्कोथ येथील लोकांनी दिले तसेच उत्तर दिले. तेव्हा गिदोन त्या लोकांना म्हणाला, “विजयी होऊन परत आल्यावर मी येथील मनोरा उध्वस्त करीन.”

10 जेबह, सलमुन्ना आणि त्यांचे सैन्य कर्कोर नगरात होते. त्यांच्या सैन्यात पंधरा हजार माणसे होती. पूर्वेकडच्या लोकांमधून जगले वाचले ते एवढेच त्यांचे एक लाख वीस हजार शूर योध्दे मारले गेले. 11 मग गिदोन आणि त्याचे लोक नोबह आणि यागबहा या शहरांच्या पूर्वेकडील राहुट्यांचा रस्ता धरून कर्कोर येथे आले व त्यांनी शत्रूवर हल्ला चढवला. शत्रू बेसावध होता. 12 मिद्यान्यांचे राजे जेबह व सलमुन्ना पळून गेले. गिदोनने त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडले. शत्रूसैन्याचा गिदोनच्या सैन्याने पाडाव केला.

13 त्यानंतर हेरेसच्या घाटातून योवाशपुत्र गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सैन्य परत फिरले. 14 गिदोनने सुक्कोथमधील एका तरुणाला पकडले आणि त्याला काही प्रश्न विचारले. त्या तरुणाने सुक्कोथ नगरातील अधिकारी आणि वडीलधारी अशा सत्याहत्तर जणांची नावे गिदोनला लिहून दिली.

15 त्यानंतर गिदोन सुक्कोथला आला. नगरवासीयांना तो म्हणाला, “हे पाहा जेबह आणि सलमुन्ना. ‘तुझ्या दमलेल्या सैनिकांना आम्ही अन्न का द्यावे? तुम्ही अजून जेबह आणि सलमुन्ना यांना कुठे पकडले आहे?’ असे म्हणून माझी चेष्टा करत होतात नाही का?” 16 नंतर गिदोनने शहरातील वडीलधाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी वाळवंटातील काटेरी झुडुपांनी फोडून काढले. 17 पनुएल मधील मनोऱ्याचीही त्याने मोडतोड केली. नंतर नगरात राहणाऱ्या लोकांना ठार केले.

लूक 23:13-43

येशू मेलाच पाहिजे(A)

13 पिलाताने मुख्य याजक, पुढारी आणि लोकांना एकत्र बोलावले. 14 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही या माणसाला तो लोकांना भडकावीत होता म्हणून आणले, आता मी त्याची तुमच्यासमोर चौकशी केली आहे आणि तुम्ही त्याच्याविरुद्ध जे आरोप करीत आहात त्यासाठी मला काहीही आधार सापडत नाही. 15 हेरोदालाही आरोपाविषयी काहीही आधार सापडला नाही. कारण त्याने त्याला परत आमच्याकडे आणले आहे. तुम्हीही पाहू शकता की, मरणाची शिक्षा देण्यास योग्य असे त्याने काहीही केलेले नाही. 16 म्हणून मी याला फटके मारुन सोडून देतो.” 17 [a]

18 पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले, “या माणसाला ठार करा! आणि आम्हांसाठी बरब्बाला सोडा!” 19 (बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांना ठारही केले होते, त्यामुळे त्याला तुरुंगात टाकले होते.)

20 पुन्हा पिलात त्यांच्याशी बोलला, कारण येशूला सोडण्याची त्याची इच्छा होती. 21 पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्याला वधस्तंभावर खिळा!”

22 तिसऱ्यांदा पिलात त्यांना म्हणाला, “परंतु या माणसाने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्याविरुद्ध काहीही आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो.”

23 परंतु ते मोठ्याने ओरडतच राहिले आणि त्याला वधस्तंभावर खिळण्याची मागणी करु लागले. आणि त्यांच्या ओरडण्याचा विजय झाला. 24 पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले. 25 जो मनुष्य दंगा आणि खून यासाठी तुरुंगात टाकला गेला होता, व ज्याची त्यांनी मागणी केली होती त्याला त्याने सोडून दिले. पिलाताने त्यांच्या इच्छे प्रमाणे करण्यासाठी येशूला त्यांच्या हाती दिले.

येशूला वधस्तंभावर खिळून ठार मारले(B)

26 ते त्याला घेऊन जात असताना, कुरेने येथील शिमोन नावाच्या मनुष्याला त्यांनी धरले. तो शेताकडून येत होता. त्यांनी वधस्तंभ त्याच्यावर ठेवला व त्यांनी त्याला तो वधस्तंभ येशूच्या मागे वाहावयास लावला.

27 लोकांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला होता. त्यामध्ये त्याच्यासाठी शोक करणाऱ्या आणि रडणाऱ्या काही स्त्रियांचाही समावेश होता. 28 येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा. 29 कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, ‘धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत, आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत, व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही.’ 30 तेव्हा ते पर्वतास म्हणतील, ‘आम्हांवर पडा!’ आणि ते टेकड्यांस म्हणतील. ‘आम्हांला झाका!’ [b] 31 जर लोक असे करतात जेव्हा झाड हिरवे असते, तर झाड सुकल्यावर काय होईल?”

32 दोन दुसरी माणसे जी दोघेही गुन्हेगार होती, त्यांनाही मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी नेत होते. 33 आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्याला वधस्तंभी गुन्हेगारांमध्ये खिळले. एका गुन्हेगारला त्यांनी उजवीकडे ठेवले व दुसऱ्याला डावीकडे ठेवले.

34 नंतर येशू म्हणाला, “हे बापा, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.”

त्यांनी चिठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. 35 लोक तेथे पाहात उभे होते. आणि पुढारी थट्टा करुन म्हणाले, “त्याने दुसऱ्यांना वाचविले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे!”

36 शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला आंब दिली. 37 आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!” 38 त्याच्यावर असे लिहिले होते: “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”

39 तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याचा अपमान केला. तो म्हणाला, “तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हालाही वाचव!”

40 पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्याला दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. 41 पण आपली शिक्षा योग्य आहे. कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणांस मिळत आहे. पण या माणसाने काहीही अयोग्य केले नाही.” 42 नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर.”

43 येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”

स्तोत्रसंहिता 97-98

97 परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते.
    दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत.
    चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.
अग्नी परमेश्वराच्या पुढे जातो
    आणि शत्रूंचा नाश करतो.
त्याची वीज आकाशात चमकते.
    लोक ती बघतात आणि घाबरतात.
परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात.
    ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात.

आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा
    प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.
लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात.
    ते त्यांच्या “देवाला” नावजतात.
परंतु त्या लोकांना लाज वाटेल.
    त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का?
    कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.
परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस.
    तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.
10 जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो.
    देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.
11 चांगल्या लोकांवर प्रकाश
    आणि सुख चमकते.
12 चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा.
    त्याच्या पवित्र नावाला मान द्या.

स्तुतिगान

98 परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या
    म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.
त्याच्या पवित्र उजव्या बाहूने
    त्याच्याकडे विजय परत आणला.
परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उध्दाराची शक्ती दाखवली.
    परमेश्वराने त्यांना त्याचा चांगुलपणा दाखवला.
त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला.
    दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.
पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर.
    त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.
वीणे, परमेश्वराची स्तुती करा.
    वीणेच्या झंकारांनो, त्याची स्तुती करा.
कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे,
    परमेश्वराचे गुणवर्णन करा.
समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूंना
    जोर जोरात गाऊ द्या.
नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो,
    सगळ्यांनी बरोबर गाणे गा.
परमेश्वरासमोर गा.
    कारण तो जगावर राज्य करायला येत आहे.
तो जगावर न्यायाने राज्य करेल,
    तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.

नीतिसूत्रे 14:7-8

मूर्खाशी मैत्री करु नका. तो तुम्हाला काहीही शिकवू शकणार नाही.

हुशार लोक शहाणे असतात. कारण ते ज्या गोष्टी करतात त्याचा काळजीपूर्वक विचार करतात. पण मूर्ख लोक मूर्ख असतात कारण आपण दुसऱ्यांना फसवून जगू शकतो असे त्यांना वाटत असते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center