Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NIV. Switch to the NIV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यहोशवा 19-20

शिमोनचा वाटा

19 नंतर शिमोन वंशजांच्या सर्व कुळांतील लोकांना यहोशवाने जमिनीतील हिस्सा दिला. यहूदाच्या वाटणीच्या जमिनी मध्येच यांचाही वाटा होता. त्यांना मिळालेला भाग असा; बैरशेबा (म्हणजेच शेबा), मोलादा, हसर-शुवाल, बाला, असेम, एलतोलद, बधूल, हर्मा, सिकलाग, बेथ-मर्कबोथ, हसर-सुसा बेथ-लबवोथ, शारुहेन ही तेरा नगरे व आसपासचा भाग.

अईन, रिम्मोन एतेर व आशान ही चार नगरे व भोवतालची गावेही त्यांना मिळाली. तसेच बालथ-बैर (म्हणजेच नेगेवमधील रामा) येथपर्यंत या नगरांच्या चहूकडची गावेही त्यांना मिळाली शिमोनच्या वंशजांना मिळालेला हा भूभाग. प्रत्येक कुळाला त्यात वाटणी मिळाली. शिमोनचा प्रदेश यहादाच्या वाटच्या जमिनीच्या अंतर्गतच होता. यहूदाच्या लोकांची जमीन त्यांच्या गरजेच्या मानाने खूपच जास्त होती. म्हणून शिमोनच्या लोकांना त्यातच हिस्सा दिला.

जबुलूनचा वाटा

10 जबुलून हा आणखी एक वंश त्यांनाही कुळांप्रमाणे वाटा मिळाला. त्यांच्या जमिनीची हद्द सारीद पर्यंत होती. 11 ती पश्चिमेकडे वर मरल कडे जाऊन दब्बेशेथपर्यंत जेमतेम पोचली. मग यकनाम झऱ्याच्या बाजूबाजूने गेली. 12 तेथून पूर्वेला वळून सारीद पासून किसलोथ-ताबोर पर्यंत गेली. तेथून दाबरथ व पुढे याफीय येथपर्यंत गेली. 13 त्यानंतर ती सीमा पूर्वेकडे गथ-हेफेर आणि इजा-कासीनकडे गेली. आणि ती रिम्मोन येथे थांबली त्यानंतर ती वळण घेऊन नेया कडे गेली. 14 नेया येथे वळसा घालून उत्तरेला हन्नाथोनपर्यंत गेली व तिचा शेवट इफता एलाच्या खिंडीपाशी झाला. 15 कट्टाथ, नहलाल, शुम्रोन इदला आणि बेथलहेम ही नगरे या हद्दीच्या आत येत होती. ती एकंदर बारा नगरे व आसपासची खेडी होती.

16 जबुलूनच्या वाटणीची शहरे व भोवतालचा प्रदेश तो हाच त्याच्या कुळातील सर्वांना यात वाटा मिळाला.

इस्साखारचा वाटा

17 चौथा हिस्सा इस्साखाराच्या वंशजांना त्यांच्या कुळाप्रमाणे मिळाला. 18 त्याना मिळालेली जमीन या प्रमाणे: इज्रेल, कसुल्लोथ, शूनेम, 19 हफराईम, शियोन, अनाहराथ 20 रब्बीथ, किशोन, अबेस, 21 रेमेथ, एन-गन्नीम, एन-हद्दा आणि बेथ-पसेस.

22 त्यांच्या प्रदेशाची हद्द ताबोर, शहसुमा व बेथ शेमेश यांना लागून होती. यार्देन नदीशी ती थांबत होती. सर्व मिळून सोळा नगरे व त्यांच्या आसपासची खेडी एवढा त्यांचा भाग होता. 23 इस्साखाराच्या वंशजांना, त्यांच्यातील सर्व कुळांना मिळालेला हिस्सा तो हाच.

आशेराचा वाटा

24 पाचवा हिस्सा आशेरच्या वंशजांना मिळाला. त्याच्यातील सर्व कुळांचे त्यात वाटे होते. 25 त्यांना मिळालेली जमीन ही; हेलकथ, हली, बटेन, अक्षाफ 26 अल्लामेलेख, अमाद, मिशाल पश्चिमेला त्यांची हद्द कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथपर्यंत जाऊन 27 पुढे पूर्वेला वळली. बेथ दागोनकडे जाऊन जबुलूनला स्पर्श केला. आणि इफताह-एलच्या खोऱ्याला भिडली. नंतर बेथ एमेक आणि नियेल यांच्या उत्तरेला गेली काबूलच्या उत्तरेला गेली. 28 पुढे एब्रोन, रहोब, हम्मोन व काना येथपर्यंत जाऊन मोठ्या सीदोन पर्यंत गेली. 29 मग दक्षिणेला रामा व तिथून सोर नामक भक्क म तटबंदीच्या नगराकडे वळली. तेथून होसकडे जाऊन तिचा शेवट अकजीब, 30 उम्मा व अफेक व रहोब यांच्या जवळ समुद्रानजीक झाला.

नगरे व भोवतालचा प्रदेश मिळून ही बावीस होतात. 31 हा भाग आशेरच्या वंशजांना त्यांच्या कुळांबरहुकूम मिळाला.

नफतालीचा वाटा

32 सहावा हिस्सा नफतालीच्या वंशजांना, त्याच्यातील कुळांना मिळाला. 33 त्यांची सीमा साननीम जवळच्या विशालवृक्षा पासून सुरु होते. हा हेलेफच्या जवळ आहे. मग ही सीमा अदामी नेकेब व यबनेल यांच्यामधून लक्क म वरुन यार्देन नदीला भिडते. 34 मग पश्चिमेला अजरोथ ताबोर यांच्यातून हुक्कोकशी थांबते. दक्षिणेची हद्द जबुलूनला लागून आहे आणि पश्चिम हद्द आशेरला. पूर्वेला ही सीमा यार्देन नदीपासच्या यहुदापर्यंत आहे. 35 या हद्दीच्या आत काही मजबूत तटबंदीची शहरे आहेत. ती म्हणजे, सिद्दीम, सेर. हम्मथ, रक्कथ, किन्नेरेथ, 36 अदामा, राम, हासोर, 37 केदेश, एद्रई, एन-हासोर. 38 हरोन. मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेस. ही शहरे व त्याच्या आसपासचा भाग मिळून ही एकोणीस नगरे झाली.

39 नफतालीला त्यांच्या कुळांप्रमाणे ही सर्व शहरे व भोवतालची खेडी मिळाली.

दानचा वाटा

40 सातवा वाटा दानच्या वंशजांचा त्यांच्यातील प्रत्येक कुळाला जमिनीत हिस्सा मिळाला. 41 त्यांना मिळालेला 42 शालब्बीन, अयालोन, इथला, 43 एलोन, तिम्ना, एक्रोन, 44 एलतके गिब्बथोन, बालाथ, 45 यहूद, बने-बराक, गथ रिम्मोन, 46 मीयकोन, रक्कोन आणि याफोच्चा समोरचा प्रदेश.

47 आपल्या वाटणीचा प्रदेश ताब्यात घ्यायला दानच्या वंशजांना त्रास झाला. त्यांच्या शत्रूचे सामर्थ्य अधिक होते. दानच्या लोकांना त्यांचा सहजासहजी पराभव करता आला नाही. तेव्हा दानच्या लोकांनी इस्राएलाच्या उत्तर भागाकडे जाऊन लेशेमशी त्यांनी लढाई केली. लढाईत लेशेमला हरवून त्यांचे लोक मारले. अशाप्रकारे दानचे लोक लेशेममध्ये राहू लागले. त्यांनी लेशेम हे नाव बदलून त्या शहराला आपल्या पूर्वजांचे दान हे नाव दिले, 48 ही सर्व शहरे व भोवतालची खेडी दान वंशजांना मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुटुंबाला हिस्सा मिळाला.

यहोशवाचा वाटा

49 अशाप्रकारे जमिनीची विभागणी आणि सर्व वंशांच्या लोकांना करायच्या वाटण्या हे काम प्रमुखांनी पार पाडले. ते झाल्यावर नूनीचा पुत्र यहोशवाला ही काही जमीन द्यायचे इस्राएलाच्या लोकांनी ठरवले. तशी परमेश्वराची आज्ञा होती. 50 त्याला ही जमीन मिळावी अशी परमेश्वराने आज्ञा दिली होती. तेव्हा त्यानी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नथ-सेरह हे नगर यहोशवाला दिले. यहोशवाने ते नगर मागितले होते. तेव्हा ते नगर आणखी बळकट करुन तो तेथे राहू लागला.

51 अशाप्रकारे या जमिनीच्या वाटण्या इस्राएलच्या सर्व वंशांच्या लोकांमध्ये झाल्या. एलाजार हा याजक, नूनाचा पुत्र यहोशवा आणि वडील धारी मंडळी या कामासाठी शिलो येथे जमली होती. परमेश्वरासमोर सभामंडपाच्या प्रवेशद्वारात ते एकत्र जमले. अशाप्रकारे हे वाटपाचे काम समाप्त झाले.

आश्रयाची नगरे

20 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, इस्राएल लोकांना सांग “मोशे मार्फत मी माझी आज्ञा तुमच्यापर्यंत पोचवली. मोशेने तुम्हाला सुरक्षिततेसाठी खास नगरे उभारायला सांगितले. एखाद्याच्या हातून चुकून मनुष्यवध झाला, व त्याचा खुनाचा उद्देश नसेल तर तो माणूस या नगरात आश्रयाला जाऊ शकतो.

“त्याने असे करावे. पळून जाऊन अशा नगराशी पोचल्यावर वेशीपाशी थांबावे. तेथे गावातील वडीलधाऱ्यांना झालेली हकीकत सांगावी. मग त्यांनी त्याला आत येऊ द्यावे. त्याला आपल्यात राहण्यासाठी जागा द्यावी पण त्याचा पाठलाग करत येणारा माणूसही तेथे येऊन पोचेल तर तेव्हा या वडीलधाऱ्यांनी त्याला थोपवून धरावे. आश्रयासाठी आलेल्या व्यक्तीला त्यांच्या ताब्यात देऊ नये. त्यांनी त्याला संरक्षण द्यावे. कारण ज्याला मृत्यू आला त्याला या व्यक्तीने जाणून बुजून मारलेले नाही. ती चुकून योगायोगाने घडलेली गोष्ट होती. रागाच्या भरात. मारायचे ठरवून त्याने काही केले नाही. त्यावेळी ते चुकून झाले, इतकेच. न्यायनिवाडा होईपर्यंत त्याने त्या नगरात राहावे. किंवा तेथील मुख्य याजक हयात असेपर्यंत राहावे. नंतर जेथून आला त्या आपल्या स्वतःच्या नगरात, आपल्या घरी त्याने परत जावे.”

तेव्हा “आश्रयस्थाने” म्हणून इस्राएल लोकांनी काही नगरांची निवड केली. ती नगरे अशी; नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील, गालील मधले केदेश, एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-आर्बा (म्हणजेच हेब्रोन) यार्देनच्या पूर्वेला रऊबेनींच्या प्रदेशापैकी वाळवंटातील यरीहो जवळचे बेसेर, गाद वंशाच्या विभागापैकी गिलादमधील रामोथ. मनश्शेच्या वंशातील बाशानमधील गोलान.

इस्राएल लोक किंवा त्यांच्यात राहणारे परकीय यांच्यापैकी कोणाच्याही हातून चुकून मनुष्यवध झाल्यास त्याने पळून जाऊन आश्रय घ्यावा म्हणून ही नगरे नेमली. म्हणजे त्या व्यक्तीला संरक्षण मिळेल व तिचा पाठलाग करणाऱ्याच्या हातून ती व्यक्ती मारली जाणार नाही. मग त्या नगरातील न्यायसभेने निवाडा करावा.

लूक 19:28-48

येशू यरुशलेमेत प्रवेश करतो(A)

28 येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरुशलेमापर्यंत गेला. 29 जेव्हा तो वर जातच राहिला तेव्हा तो जैतून डोंगर म्हटलेल्या टेकडीनजिक असलेल्या बेथफगे आणि बेथानीजवळ आला तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की, 30 “तुमच्यासमोर असलेल्या खेड्यात जा. तुम्ही प्रवेश करताच, ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु तुम्हास आढळेल. ते सोडून येथे आणा. 31 जर तुम्हांला कोणी विचारले की, तुम्ही ते का सोडता? तर म्हणा की, ‘प्रभूला याची गरज आहे.’”

32 ज्यांना पाठविले होते, ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांस आढळले. 33 ते सोडीत असता त्याचा मालक त्यांना म्हणाला, “तुम्ही शिंगरु का सोडता?”

34 ते म्हणाले, “प्रभूला याची गरज आहे.” 35 त्यांनी ते येशूकडे आणले. त्यांनी आपले झगे शिंगरावर घातले आणि येशूला त्याच्यावर बसविले. 36 येशू रस्त्यावरुन जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरीत होते.

37 जेव्हा तो जैतून डोंगराच्या उतरणीवर आला तेव्हा सर्व जनसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुति करु लागले. 38 ते म्हणाले,

“‘प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!’ (B)

स्वर्गात शांति आणि उर्ध्वलोकी देवाला गौरव!”

39 जमावातील काही परुशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना दटावा.”

40 त्याने उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगतो, जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील!”

येशू यरुशलेमासाठी रडतो

41 जेव्हा तो जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला. आणि म्हणाला, 42 “जर आज कोणत्या गोष्टी तुला शांति देतील हे माहीत असते तर! परंतु आता ते तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आले आहे. 43 तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रु तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढीतील, आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील. 44 ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील. व दगडावर दगड राहू देणार नाही. कारण देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”

येशूचा मंदिरात प्रवेश(C)

45 येशूने मंदिरात प्रवेश केला व जे विक्री करीत होते, त्यांना बाहेर हाकलू लागला. 46 तो त्यांस म्हणाला, “असे लिहिले आहे की, ‘माझे घर प्रार्थनेचे घर होईल!’ पण तुम्ही ते ‘लुटारुची गुहा केली आहे.’” [a]

47 तो दररोज मंदिरात शिकवीत असे. मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, लोकांचे पुढारी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते. 48 पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता. कारण सर्व लोक त्याच्या शब्दांनी खिळून गेले होते.

स्तोत्रसंहिता 88

कोरहाच्या मुलाचे स्तुतीगीत प्रमुख गायकासाठी हेमान एज्राही याचे दुःखद आजाराविषयीचे मास्कील

88 परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस.
    मी रात्रंदिवस तुझी प्रार्थना करीत आहे.
कृपा करुन माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
    दयेखातर माझी प्रार्थना ऐक.
माझ्या आत्म्याला हे दु:ख पुरेसे आहे.
    मी आता लवकरच मरणार आहे.
लोक मला आताच मृत आहे असे समजून वागवतात.
    मी जगायला अगदी शक्तिहीन आहे असे समजून वागवतात.
मला तू मृत माणसात शोध.
    मी थडग्यात असलेल्या प्रेतासारखा आहे.
ज्याला तू विसरलास असा एक मृतात्मा, तुझ्यापासून
    आणि तुझ्या निगराणीपासून दूर गेलेला असा एक.
तू मला जमिनीतल्या त्या खड्‌यांत टाकलेस.
    होय, तूच मला त्या अंधाऱ्या जागेत ठेवलेस.
देवा, तू माझ्यावर रागावला होतास
    आणि तू मला शिक्षा केलीस.

माझे मित्र मला सोडून गेले.
    ज्याला कोणीही स्पर्श करु इच्छीत नाही.
अशा माणसाप्रमाणे ते मला टाळतात.
    मी घरात बंद झालो आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही.
अति दुःखाने रडल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत.
    परमेश्वरा, मी सतत तुझी प्रार्थना करीत आहे.
माझे बाहू उभारुन मी तुझी प्रार्थना करत आहे.
10 परमेश्वरा, तू मृतांसाठी चमत्कार करतोस का?
    भुते उठून तुझी स्तुती करतात का? नाही.

11 थडग्यातले मृत लोक तुझ्या प्रेमाबद्दल बोलू शकत नाहीत.
    मृत्युलोकांतील मृतलोक तुझ्या इमानीपणाविषयी बोलू शकत नाहीत.
12 अंधारात पडलेले मृतलोक तुझी अद्भुत कृत्ये पाहू शकत नाहीत.
    विस्मृतीच्या जगातले मृतलोक तुझ्या चांगुलपणाविषयी बोलू शकत नाहीत.
13 परमेश्वरा, मी तुला मदत करण्याविषयी विचारत आहे.
    प्रत्येक दिवशी पहाटे मी तुझी प्रार्थना करतो.
14 परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास?
    तू माझे ऐकायला नकार का देतोस?
15 मी तरुणपणापासूनच अशक्त आणि आजारी आहे.
    मी तुझा राग सोसला आहे आणि मी असहाय्य आहे.
16 परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला होतास
    आणि शिक्षा मला मारुन टाकीत आहे.
17 दु:ख आणि वेदना सदैव माझ्याबरोबर असतात.
    मी माझ्या दु:खात आणि वेदनात बुडून मरत आहे असे मला वाटते.
18 आणि परमेश्वरा, तूच माझ्या आप्तेष्टांना आणि इष्ट मित्रांना मला सोडून जाण्यास भाग पाडलेस.
    केवळ भयाण अंधकार माझी सोबत करत माझ्याजवळ राहिला.

नीतिसूत्रे 13:12-14

12 आशा नसली की ह्रदय दु:खी असते. तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळाली की तुम्हाला खूप आनंद होतो.

13 जर एखाद्या माणसाने इतर लोक त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असतील तेव्हा त्यांचे ऐकले नाही तर त्याच्यावर संकटे येतील पण जो माणूस दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा मान राखतो त्याला त्याचे फळ मिळते.

14 शहाण्या माणसाची शिकवण आयुष्य देते. ते शब्द तुम्हाला मृत्यूचा फास चुकवायला मदत करतील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center