Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 6:12-8:10

शलमोनाची प्रार्थना

12 शलमोन परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले. 13 बाहेरच्या आवारात प्रत्येकी 7 1/2 फूट लांबी, रुंदी आणि उंची असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने बसवला होता. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले 14 शलमोन म्हणाला,

“हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस. 15 तुझा सेवक दावीद याला दिलेले वचन तू पाळलेस. दावीद माझे वडील होते. तू आपल्या मुखानेच त्यांना वचन दिलेस आणि आज आपल्या हाताने ते प्रत्यक्षात आणले आहेस. 16 तसेच आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, दावीद या सेवकाला दिलेले हे वचनही खरे कर. तू असे म्हणाला होतास: ‘माझ्यासमक्ष इस्राएलच्या गादीवर न चुकता तुझ्या वंशातीलच कोणीतरी येत जाईल. मात्र तुझ्या मुलांनी काटेकोर वर्तन केले पाहिजे. तुझ्याप्रमाणेच त्यांनीही माझा करार पाळला पाहिजे.’ 17 तेव्हा आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, हे ही शब्द खरे होऊ देत. आपला सेवक दावीद याला तू तसा शब्द दिला आहेस.

18 “परमेश्वर पृथ्वीवर लोकांमध्ये वस्ती करु शकत नाही ही गोष्ट, हे देवा, आम्हाला माहीत आहे. आकाश आणि त्या पुढचे अवकाशही तुला सामावून घ्यायला असमर्थ आहेत. या मी बांधलेल्या मंदिरातही तू मावू शकत नाहीस हे आम्ही जाणतो 19 पण माझी एवढी प्रार्थना ऐक. मी करुणा भाकतो तिच्याकडे लक्ष दे. परमेश्वर देवा, माझी आर्त हाक ऐक. मी तुझा एक दास आहे. 20 या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो असे मी तुला कळकळीने विनवतो. तुझे नाव इथे राहील असे तू म्हणाला होतास. मी या मंदिराकडे तोंड करुन प्रार्थना करीन तेव्हा ती तू ऐक. 21 तुझ्या इस्राएल लोकांनी तसेच मी केलेल्या प्रार्थना तू ऐक. या प्रार्थनास्थळाकडे तोंड करुन आम्ही प्रार्थना करु तेव्हा तिच्याकडे तू लक्ष दे. तुझ्या आकाशातील स्थानावरुन तुझे इथे लक्ष असू दे. आमच्या प्रार्थना ऐक आणि आम्हाला क्षमा कर.

22 “एखाद्याने दुसऱ्याची काही आगळीक केल्याचा आरोप त्याच्यावर आला आणि तो तुझे नाव घेऊन आपण निर्दोष आहोत असे सांगू लागला तर तो वेदीसमोर तसे शपथ घेऊन सांगत असताना, 23 तू स्वर्गातून ऐक. तुझ्या सेवकाचा योग्य न्यायनिवाडा कर. ज्याच्या हातून आगळीक घडली असेल त्याला शासन कर. त्याच्यामुळे इतरांना जसा त्रास झाला तसाच याला होऊ दे. ज्याचे वागणे उचित होते तो निर्दोष असल्याचे सिध्द कर.

24 “इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द पाप केल्यामुळे जर शत्रूंनी तुझ्या इस्राएल लोकांचा पराभव केला आणि अशावेळी इस्राएल लोक तुझ्याकडे येऊन तुझ्या नावाने क्षमायाचना करु लागले, या मंदिरात येऊन विनवणी करु लगले तर 25 तू स्वर्गातून ते ऐकून इस्राएल लोकांना क्षमा कर. तू त्यांना आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर त्यांना पुन्हा परत आण.

26 “इस्राएल लोकांनी पाप केल्यामुळे आकाश बंद होऊन पर्जन्यवृष्टी झालीच नाही आणि त्यावेळी पश्चात्तापाने इस्राएल लोकांनी मंदिराच्या दिशेने पाहात क्षमायाचना केली, तू केलेल्या शिक्षेमुळे पापाचरण थांबवले, 27 तर स्वर्गातून त्यांचे ऐकून घे. त्याचे ऐक आणि त्यांना माफ कर. इस्राएल लोक तुझे दास आहेत. त्यांना जगण्याचा सन्मार्ग दाखव. तुझ्या भूमीवर पाऊस पाड. ती तूच तुझ्या लोकांना दिलेली जमीन आहे.

28 “कदाचित् एखादेवेळी दुष्काळ, भयानक साथीचा रोग, किंवा पिकांवर रोग अथवा टोळ, नाकतोडे यांची धाड अशी काही आपत्ती किंवा लोकांच्या राहत्या नगरांवर शत्रूचा हल्ला झाला, असे काही झाल्यास 29 तुझे इस्राएल लोक तुझी करुणा भाकतील आणि प्रार्थना करतील. जो तो आपले क्लेश किंवा दु:ख ओळखून, या मंदिराच्या दिशेने बाहू उभारुन प्रार्थना करु लागेल. 30 तेव्हा तू ते स्वर्गातून ऐक. तू स्वर्गात राहातोस. तू त्यांची प्रार्थना ऐकून त्यांना क्षमा कर. प्रत्येकाचा मनोदय तुला माहीत असल्यामुळे ज्याला जे योग्य असेल त्याला ते दे. मानवाचे मन फक्त तूच ओळखतोस. 31 असे झाले म्हणजे तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या या भूभागावर त्यांची वसती असेपर्यंत लोक तुझा धाक बाळगतील आणि तुझे ऐकतील.

32 “तुझ्या इस्राएल प्रजेपेक्षा वेगळा असा कोणी उपराही कदाचित् दूर देशाहून इथे आलेला असेल. तुझ्या नावाची महती, आणि तुझे समर्थ बाहू यांच्यामुळे तो आलेला असेल. त्याने येऊन या मंदिराकडे पाहात प्रार्थना केली तर 33 तू ती स्वर्गातून ऐक. त्याची मागणी पुरव. म्हणजे इस्राएल लोकांप्रमाणेच पृथ्वीवरील इतर लोकांनाही तुझ्या नावाचा महिमा कळेल आणि त्यांना तुझ्याविषयी आदर वाटेल. हे मी बांधलेले मंदिर तुझ्या नावाचे आहे हे पृथ्वीवरील सर्व लोकांना कळेल.

34 “शत्रूशी लढण्यासाठी जेव्हा तू आपल्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी पाठवशील आणि तिथून ते तू निवडलेल्या या नगराच्या आणि मी बांधलेल्या मंदिराच्या दिशेने पाहात प्रार्थना करु लागतील. 35 तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांच्या विनंती प्रमाणे त्यांना मदत कर.

36 “पाप कोणाच्या हातून होत नाही? तेव्हा लोक तुझ्या विरुध्द पाप करतील तेव्हा तुझा त्यांच्यावर कोप होईल. तू शत्रूंकरवी त्यांचा पाडाव करशील, बंदी म्हणून त्यांना बळजबरीने इथून दूरच्या किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी नेले जाईल. 37 पण तिथे त्यांचे ह्रदयपरिवर्तन होऊन, परभूमीत कैदी होऊन पडलेले ते म्हणतील, ‘आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले आहे. आम्ही दुराचरण केले आहे.’ 38 असतील तिथून ते अंतरीच्या उमाळ्याने तुला शरण येतील. या देशाच्या तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाच्या दिशेने आणि तू निवडलेल्या नगराच्या दिशेने पाहात ते प्रार्थना करतील. तुझ्या नावाखातर मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने पाहात ते प्रार्थना करतील. 39 असे होईल तेव्हाही तू तुझ्या स्वर्गातील निवासस्थानातून ऐक. त्यांच्या विनवणीला कान दे, त्यांना मदत कर. ज्यांनी तुझ्या विरुध्द पाप केले आहे अशा तुझ्या लोकांना क्षमा कर. 40 आता, हे परमेश्वरा, माझी तुला विनवणी आहे की तू तुझे कान आणि डोळे उघड. आम्ही इथे बसून जी प्रार्थना करणार आहोत ती लक्षपूर्वक ऐक.

41 “आता, हे परमेश्वर देवा, तुझे सामर्थ्य मिरवणाऱ्या
    या करारकोशाजवळ, आपल्या विश्रामस्थानी ये.
तुझे याजक उध्दाराने भूषित होवोत.
    तुझे भक्त या सुजनतेने सुखी होवोत.
42 हे परमेश्वर देवा, तुझ्या अभिषिक्त राजाचा स्वीकार कर.
    तुझा एकनिष्ठ सेवक दावीद याचे स्मरण असू दे.”

मंदिराचे परमेश्वराला समर्पण

शलमोनाची प्रार्थना संपल्याबरोबर स्वर्गातून अग्नी खाली उतरला आणि त्याने होमबली आणि यज्ञार्पणे भस्मसात केली. परमेश्वराच्या लखलखीत तेजाने मंदिर भरुन गेले. त्या तेजाने दिपून याजकांनाही परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना. थेट स्वर्गातून अग्नी खाली येणे आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर पसरणे या गोष्टी इस्राएलच्या समस्त लोकांनी पाहिल्या. तेव्हा त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमन केले, परमेश्वराला धन्यवाद दिले आणि ते म्हणाले,

“परमेश्वर चांगला आहे
    त्याची कृपा सर्वकाळ राहाते.”

मग शलमोनाने आणि सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे यज्ञ केले. राजा शलमोनाने 22,000 बैल आणि 1,20,000 मेंढरे वाहिली. राजा आणि प्रजा यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली. ते फक्त उपासनेसाठी वापरायचे होते. याजक आपल्या कामाला सिध्द झाले. परमेश्वराच्या भजनाची वाद्ये घेऊन लेवी ही उभे राहिले. राजा दावीदाने ही वाद्ये परमेश्वराच्या स्तवनासाठी करुन घेतली होती. “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची कृपा चिरंतन आहे” असे याजक आणि लेवी गात होते. लेवींच्या समोर उभे राहून याजक कर्णे वाजवत होते. सर्व इस्राएल लोक तिथे उभे होते.

मंदिरासमोरचे मधले आवार शलमोनाने पवित्र केले. या जागी त्याने होमार्पणे आणि शांतिअर्पणांची वपा वाहिली. होमार्पणे, अन्नार्पणे आणि वपा यांचे प्रमाण एवढे प्रचंड होते की पितळी वेदीवर ते सर्व मावेना म्हणून मधले आवार त्याने वापरले.

शलमोन आणि इस्राएल लोक यांनी सात दिवस हा सण साजरा केला. हमाथच्या वेशीपासून ते मिसरच्या झऱ्या पर्यंतच्या भागातले सगळे इस्राएल लोक इथे आल्यामुळे शलमोनबरोबरचा जमाव खूपच मोठा होता. आठव्या दिवशी त्यांनी पवित्र सभा घेतली कारण त्या आधी सात दिवस त्यांनी सण साजरा केला होता. वेदी पवित्र करुन ती परमेश्वराला समर्पण केली. ती फक्त परमेश्वराच्या उपासनेसाठी वापरायची होती. सात दिवस त्यांनी सण साजरा केला. 10 सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी शलमोनाने लोकांना घरोघरी परतायला सांगितले. दावीद, शलमोन आणि इस्राएल लोक यांच्यावर परमेश्वराने कृपा केल्यामुळे लोक आनंदी झाले होते. त्यांची अंतःकरणे आनंदाने भरुन गेली होती.

शलमोनाला परमेश्वराचे दर्शन

11 परमेश्वराचे मंदिर आणि राजगृह बांधण्याचे काम शलमोनाने पार पाडले. परमेश्वराचे मंदिर आणि आपले निवासस्थान यांच्याबाबतीत योजलेल्या सर्व गोष्टी त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या. 12 नंतर एकदा रात्री परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले. तो शलमोनाला म्हणाला,

“शलमोना तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. हे स्थळ यज्ञगृह म्हणून मी निवडले आहे. 13 कधी जर मी पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून आकाशमार्ग बंद केला, धान्य फस्त करायला टोळधाड पाठवली किंवा रोगराईचा प्रसार केला 14 आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करुन माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला ओ देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करीन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन. 15 आता माझी दृष्टी या ठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत. 16 हे मंदिर मी माझे म्हणून निवडले आहे.माझे नाव इथे सदासर्वकाळ रहावे म्हणून मी हे स्थान पवित्र केले आहे. माझी दृष्टी आणि माझे चित्त नेहमी या मंदिराकडे लागलेले असेल. 17 शलमोना, तुझे वडील दावीद यांच्याप्रमाणेच तू माझ्याशी वागलास, माझ्या आज्ञांचे पालन केलेस, माझे विधी आणि नियम पाळलेस, 18 तर मी तुला समर्थ राजा बनवील आणि तुझे राज्य महान होईल. तुझे वडील दावीद यांना मी तसे वचन दिले आहे. त्यांना मी म्हणालो होतो, ‘दावीद तुझ्या घराण्यातील पुरुषच इस्राएलच्या राजपदावर आरुढ होईल.’

19 “पण जर माझ्या आज्ञा आणि नियम तू पाळले नाहीस. इतर दैवतांची उपासना व सेवा केलीस, 20 तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएल लोकांना मी हुसकावून लावीन. माझ्या नावाप्रीत्यर्थ असलेले हे पवित्र मंदिर मी सोडून जाईन. इतकेच नव्हे तर ते इतर देशांमध्ये निंदेचा विषय करीन. 21 एकेकाळी पूज्य मानल्या गेलेल्या या मंदिरावरुन जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला आता आश्चर्य वाटेल. ते लोक म्हणतील, ‘हा प्रदेश आणि हे मंदिर यांची अशी अवस्था परमेश्वराने का केली बरे?’ 22 तेव्हा त्यांना इतर लोक सांगतील, ‘कारण आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचे या इस्राएल लोकांनी ऐकले नाही. या लोकांना या परमेश्वरानेच मिसरमधून बाहेर आणले. तरी हे इतर दैवतांच्या भजनी लागले. त्यांनी त्यांची उपासना व सेवा केली. त्यांनी मूर्तिपूजा सुरु केली. म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराने हे अरिष्ट आणले.’”

शलमोनाने बांधलेली नगरे

मंदिर आणि आपले घर बांधायला शलमोनाला वीस वर्षे लागली. मग हिरामने दिलेली नगरे शलमोनाने वसवली. त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांना वसती करण्यास मुभा दिली. पुढे शलमोनाने हमाथ सोबा हे नगर जिंकून घेतले. वाळवंटातील तदमोर हे नगरही त्याने वसवले. कोठारांसाठी म्हणून त्याने हमाथमधली नगरे बांधली. वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ-होरोन यांची उभारणीही शलमोनाने केली. ती त्याने भक्कम तटबंदीची नगरे केली. त्यांना मजबूत कोट, वेशी आणि अडसर करवले. बालाथ आणि अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरुशलेम, लबानोनसकट आपल्या आधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली.

7-8 इस्राएल लोक राहात असलेल्या प्रदेशात अनेक परकी लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी. त्यांना शलमोनाने वेठबिगार केले. हे लोक मूळचे इस्राएल नव्हते. या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्राएल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत. इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने वेठबिगारीसाठी सक्ती केली नाही. ते त्याचे योध्दे होते. ते सैन्याधिकारी, रथाधिपती, स्वारांचे अधिकारी असे होते. 10 काही इस्राएलीजण तर शलमोनाच्या अधिकाऱ्यांवर अंमल गाजवणारे होते. असे प्रमुख अधिकारी 250 होते.

रोमकरांस 7:14-8:8

मनुष्याच्या मनातील लढा

14 कारण आम्हांला माहीत आहे की, नियमशास्त्र आत्मिक आणि मी दैहिक मनुष्य आहे. मी गुलाम म्हणून पापांत शरणागत राहावे म्हणून विकलेला असा आहे. 15 मी काय करतो हे मला माहीत नाही कारण काय करायचे हे मला माहीत नाही. कारण ज्या गोष्टींचा मी द्वेष करतो, त्याच गोष्टी मी करतो. 16 आणि ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाही त्याच करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे हे मान्य करतो. 17 परंतु खरे तर मी त्या करतो असे नव्हे तर माझ्या ठायी वसत असलेले पाप त्या गोष्टी करते. 18 होय, मला माहीत आहे की, जे चांगले आहे ते माझ्यामध्ये वसत नाही. 19 चांगले करण्याची माझ्या ठायी इच्छा आहे, परंतु तसे मी करीत नाही, त्याऐवजी जे फार वाईट व जे मला करावेसे वाटत नाही तेच करतो. 20 आणि ज्याअर्थी, ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाहीत त्या मी करतो, तेव्हा खरे तर त्या गोष्टी मी करतो असे नाही तर माझ्याठायी असणारे पाप त्या गोष्टी करते.

21 तर माझ्यामध्ये मला हा नियम आढळतो की, माझ्यातील मनुष्याला चांगले करावेसे वाटते पण वाईट ही एकच गोष्ट माझ्याबरोबर आहे. 22 माझ्या आत असलेला मनुष्य देवाच्या नियमशास्त्रामुळे आनंद करतो. 23 परंतु माझ्या अवयवात मला निराळाच नियम कार्य करताना दिसतो. तो माझ्या मनावर अमल करणाऱ्या नियमाबरोबर लढतो, आणि पापाने मजवर लादलेल्या नियमाचा, जो माझ्या शरीरात कार्य करतो, त्याचा कैदी करतो. 24 मी अत्यंत दु:खी मनुष्य आहे! मरणाधीन असलेल्या शरीरापासून मला कोण सोडवील? 25 परंतु आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाचे आभार मानतो.

तर मग माझ्या मनाने मी देवाच्या नियमाचा गुलाम आहे. पण माझ्या पापी स्वभावाने मी पापाने माझ्यावर लादलेल्या नियमाचा गुलाम आहे.

पवित्र आत्म्यात जीवन

म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही. कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूमध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हांला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे. नियमशास्त्र समर्थ आहे पण आपण दूर्बळ आहोत त्यामुळे वाचु शकत नाही, देवाने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरुपाने व पापाकरिता पाठवून ख्रिस्ताच्या देहामध्ये पापाला न्यायदंड ठरविला. यासाठी की, नीतिच्या व आवश्यक गोष्टी आपण जे देहाच्या पापमय स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आमच्याद्वारे पूर्ण व्हाव्यात.

कारण जे त्यांच्या मानवी पापी देहाप्रमाणे जगतात ते देहाच्या गोष्टींचा विचार करतात, परंतु जे आत्म्याने चालतात व ज्यांचे मन आत्म्याच्या गोष्टींकडे लागलेले असते ते त्याप्रमाणे जीवन जगतात. देहाचे चिंतन हे मरण आहे. पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांति आहे. मानवी स्वभावाचे अधिकार असलेले पापी मन म्हणजे देवाबरोबर वैर आहे. कारण ते देवाच्या नियमाच्या आधीन होत नाही, व त्याला आधीन होताही येत नाही. कारण जे देहस्वभावाच्या आधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्र करता येत नाही.

स्तोत्रसंहिता 18:1-15

प्रमुख गायकासाठी परमेश्वराचा सेवक दावीदयाचे स्तोत्र. दावीदाने हे स्तोत्र [a] परमेश्वराने त्याला शौलापासून आणि इतर शंत्रूपासून वाचवले तेव्हा लिहीले.

18 तो म्हणाला, “परमेश्वरा, तू माझे सामर्थ्य आहेस,
    मी तुझ्यावर प्रेम करतो.”

परमेश्वर माझा खडक माझा किल्ला माझी संरक्षक जागा आहे.
    माझा देव माझा खडक आहे.
मी माझ्या रक्षणासाठी त्याच्याकडे धाव घेतो.
    देव माझी ढाल आहे.
त्याची शक्ती नेहमी माझे रक्षण करते. [b]
    परमेश्वर माझी उंच डोंगरावरची लपण्याची जागा आहे.

त्यांनी माझी चेष्टा केली.
    परंतु मी ज्याची स्तुती केली जावी अशा परमेश्वराचा धावा केला
    आणि शत्रूंपासून माझे रक्षण झाले.
माझे शत्रू मला मारण्याचा प्रयत्न करीत होते.
    मृत्यूच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या मृत्युलोकात नेणाऱ्या पुरात मी सापडलो होतो.
थडग्याच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या.
    मृत्यूचा सापळा माझ्या भोवती होता.
सापळ्यात अडकल्यावर मी परमेश्वराचा धावा केला.
    होय, मी देवाला माझ्या मदतीसाठी बोलावले.
देव त्याच्या मंदिरात होता.
    त्याने माझा आवाज ऐकला.
    त्याने माझी मदतीची हाक ऐकली.
पृथ्वी हादरली आणि कंपित झाली.
    स्वर्गाचा पाया हादरला.
    का? कारण परमेश्वर क्रोधित झाला होता.
देवाच्या नाकातून धूर आला
    देवाच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाळा निघाल्या.
    त्याच्या अंगातून ठिणग्या उडाल्या.
परमेश्वराने आकाश फाडले
    आणि तो खाली आला तो घट्ट् काळ्या ढगावर उभा राहिला.
10 परमेश्वर उडत होता तो उडणाऱ्या करुबावर आरुढ होऊन
    वाऱ्यावर उंच उडत होता.
11 परमेश्वर त्याच्या सभोवती तंबूसारख्या पसरलेल्या काळ्या ढगात लपला होता.
    तो गडगडणाऱ्या दाट ढगात लपला होता.
12 नंतर देवाचे चमचमते तेज ढगातून बाहेर पडले.
    तेथे गारा पडल्या आणि विजांचा चमचमाट झाला.
13 परमेश्वराने ढगांमधून गडगडाट केला,
    त्या सर्वशक्तिमान देवाने आपला आवाज ऐकवला तेथे गारा पडल्या आणि विजांचा कडकडाट झाला.
14 परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली
    परमेश्वराने विजेचे लोळ फेकून लोकांची त्रेधा उडवली.

15 परमेश्वरा, तू धमकावून बोललास
    आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला
पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ दिसू शकला.
    आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला.

नीतिसूत्रे 19:24-25

24 आळशी माणूस स्वतःच्या भूकेसाठी करायच्या गोष्टी देखील करणार नाही. तो ताटातले अन्न तोंडात टाकायचे कामसुध्दा करीत नाही.

25 जर एखादा माणूस स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला शिक्षा करायला पाहिजे. नंतर मूर्ख धडा शिकतील. शहाण्या माणसावर टीका केली तर तो शिकतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center