Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 4:1-6:11

मंदिरातील बांधकाम आणि सामान

शलमोनाने वेदी पितळेची केली. ती 30 फूटलांब, 30 फूट रुंद आणि 18 फूट उंच होती. त्याने ओतीव पितळेचे एक गंगाळदेखील केले. हे गोल असून त्याचा व्यास 10 हात होता. त्याची उंची 5 हात आणि त्याचा कडेचा परीघ 30 हात होता. या गंगाळाच्या खालच्या बाजूस सभोवार कडेला बैलांच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या. त्यांची लांबी 10 हात होती. गंगाळ बनवतानाच या बैलांच्या दोन रांगा ओतल्या होता. बारा घडीव बैलांनी हे प्रशस्त गंगाळ तोललेले होते. तीन बैल पूर्वाभिमुख, तीन पश्चिमाभिमुख, तीन उत्तराभिमुख तर तीन दक्षिणाभिमुख होते. आणि गंगाळ त्यांच्यावर होते. सर्व बैलांचा मागील भाग एकमेकांकडे आणि मध्यभागी आलेला होता. या पितळी गंगाळाची जाडी 3 इंच होती. त्याची कड उमललेल्या कमलपुष्पासारखी होती. त्यात 17,500 गॅलन पाणी मावू शकत असे.

याखेरीज शलमोनाने दहा तस्ते बनवली. ती त्याने या गंगाळाच्या उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला पाच अशी बसवली. होमार्पणात वाहायच्या वस्तू धुवून घेण्यासाठी ही दहा तस्ते होती. पण मुख्य पितळी गंगाळ मात्र याजकांच्या वापरासाठी, होमार्पणाच्या वस्तू वाहण्यापूर्वी धुण्यासाठी होते.

शलमोनाने सोन्याचे दहा दीपवृक्षही केले. हे त्याने त्यांच्या विधीनुसार बनविले, आणि मंदिरात ठेवले. डावीकडे पाच आणि उजवीकडे पाच असे ते ठेवले. दहा मेजेही शलमोनाने मंदिरात ठेवली. ती ही पाच डावीकडे आणि पाच उजवीकडे अशी ठेवली. शिवाय सोन्याचे शंभर वाडगे केले. याखेरीज शलमोनाने याजकांसाठी एक आवार केले, एक प्रशस्त आवार आणि त्यांना दरवाजे केले. आवारांत उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले. 10 एवढे झाल्यावर आग्नेयला मंदिराच्या उजवीकडे त्याने ते मोठे पितळी गंगाळ ठेवले.

11 हिराम या कारागिराने हंडे, फावडी व वाडगे बनवले. शलमोनासाठी जे देवाच्या मंदिराचे काम त्याला करायचे होते ते त्याने पूर्ण केले.

12 दोन स्तंभ,

स्तंभावरचे कळस,

त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.

13 त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबांच्या दोन रांगा होत्या. स्तंभांवरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते.

14 तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली होती.

15 मोठे पितळी गंगाळ आणि त्याला आधार देणारे बारा बैल हिरामनेच केले.

16 शलमोनासाठी त्याने हंडे, फावडी, काटे इत्यादी मंदिरातली उपकरणे केली.

त्यासाठी लखलखीत, उजळ पितळ वापरलेले होते. 17 या सर्व गोष्टीसाठी शलमोनाने आधी चिकणमातीचे नमुने बनविले. त्यासाठी सुक्कोथ आणि सरेदा यांच्यामधली, यार्देन खोऱ्यातली माती वापरली. 18 शलमोनाने इतक्या अगणित गोष्टी करवून घेतल्या की त्यांना पितळ किती लागले याची मोजदाद कोणी केली नाही.

19 याखेरीज आणखी काही गोष्टी शलमोनाने देवाच्या मंदिरासाठी केल्या. सोन्याची वेदी, समर्पित भाकर ठेवण्याची मेजे केली. 20 सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते. 21 याशिवाय फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुध्द सोन्याचे होते. 22 कातऱ्या, वाडगे, कटोरे, अग्निपात्रे, या गोष्टीही शलमोनाने सोन्यात घडवल्या. मंदिराची दारे, अत्यंत पवित्र गाभाऱ्यातली दारे, आणि मुख्य दालनाचे दरवाजे हे ही सोन्याचे होते.

मग शलमोनाने काढलेले परमेश्वराच्या मंदिराचे सर्व काम समाप्त झाले. आपले वडील दावीद यांनी मंदिरासाठी दिलेल्या सर्व वस्तू त्याने मग आत आणल्या. सोन्या-रुप्याच्या सर्व वस्तू आणि इतर सामानसुमान त्याने आणले. मंदिराच्या कोषागारात त्याने या सर्व वस्तू ठेवल्या.

पवित्र करारकोश मंदिरात आणण्यात येतो

पुढे शलमोनाने परमेश्वराचा करारकोश दावीदनगराहून म्हणजेच सीयोनमधून आणण्यासाठी इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी, आपापल्या घराण्यांचे प्रमुख, यांना यरुशलेम येथे बोलावून घेतले. सातव्या महिन्यातील मंडपाच्या सणाच्या दिवशी सर्व इस्राएल लोक शलमोनाकडे आले.

सर्व इस्राएलाचे वडीलधारे जमल्यावर लेवींनी करारकोश उचलून घेतला. याजक आणि लेवी यांनी मिळून तो यरुशलेमला आणला. दर्शन मंडप आणि तेथे असलेली सर्व पवित्र उपकरणेही त्यांनी बरोबर आणली. राजा शलमोन आणि इस्राएलाचे लोक करारकोशाला सामोरे गेले. कोशासमोर त्यांनी मेंढरांचे आणि गुराढोरांचे बळी अर्पण केले. मोजदाद करता येऊ नये इतके प्राणी त्यांनी बळी दिले. एवढे झाल्यावर, मंदिराच्या आतल्या मुद्दाम तयार करवून घेतलेल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्यात याजकांनी तो परमेश्वराचा करारकोश आणला. करुबांच्या पखांच्या बरोबर खाली तो त्यांनी ठेवला. कोशावरती करुबांच्या पखांनी आपले छत्र धरले होते. कोश आणि त्याचे दांडे त्यांनी झाकले. हे दांडे सर्वांत पवित्र गाभाऱ्यासमोरुन दिसतील इतके लांब होते. पण मंदिराच्या बाहेरुन ते दिसत नसत. आजपर्यंत ते तेथे आहेत. 10 दोन दगडी पाट्यांखेरीज या करार कोशात काहीही नव्हते. होरेब पर्वतावर मोशेने त्या दोन पाट्या या करार कोशात ठेवल्या होत्या. इस्राएल लोक मिसरमधून बाहेर पडल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी जो करार केला तो या होरेब पर्वतावरच.

11 एवढे झाल्यावर याजक गाभाऱ्यातून बाहेर आले. ते सर्व शुचिर्भूत झाले होते. ते सर्व नेमके कोणकोणत्या गटातले होते हे यावेळी महत्वाचे नव्हते. आतून बाहेर आल्यावर ते पुन्हा पवित्र झाले. 12 मग सर्व लेवी गायक वेदीच्या पूर्वेला उभे राहिले. आसाफ, हेमान आणि यदुथूनचे सर्व गायक वर्ग हजर होते. त्यांची मुले आणि भाऊबंददेखील आले होते. यासर्वांनी शुभ्र तलम वस्त्रे घातली होती. झांजा, सारंग्या आणि वीणा ही वाद्ये त्यांनी हातात घेतली होती. या लेवी गायकांबरोबर 120 याजक होते आणि ते कर्णे वाजवत होते. 13 गायन आणि वादन एका सुरात चालले होते. एका सुरात त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले आणि त्याला धन्यवाद दिले. कर्णे, झांजा इत्यादी वाद्यांचा एक जल्लोष उडाला. त्यांच्या गाण्याचा आशय असा होता:

“परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे.
    त्याची खरी प्रीति सर्वकाळ राहाते.”

तेव्हा परमेश्वराचे सर्व मंदिर मेघाने भरुन गेले. 14 त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना, इतके परमेश्वराच्या तेजाने देवाचे मंदिर भरुन गेले होते.

मग शलमोन म्हणाला, “मी मेघासारख्या अंधकारात वास करीन असे परमेश्वर म्हणाला आहे. परमेश्वरा, तुझ्या निवासासाठी मी हे घर बांधले आहे. तू येथे चिरकाल राहावेस म्हणून हे उच्च कोटीचे घर आहे.”

शलमोनाचे भाषण

मग शलमोनाने मागे वळून सर्व इस्राएल समुदायांना आशीर्वाद दिला. आणि ते सर्व उभे राहिले. रशलमोन पुढे म्हणाला,

“इस्राएलाच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा. माझे वडील दावीद यांच्याशी तो जे बोलला ते त्याने खरे करुन दाखवले आहे. परमेश्वर देवाने असे वचन दिले होते, ‘माझ्या लोकांना मी मिसरमधून बाहेर आणल्यानंतर इस्राएल वंशातील कोणतेही नगर मी माझ्या नावाचे घर तिथे बांधले जावे म्हणून निवडले नाही. तसेच, माझ्या इस्राएल लोकांचे आधिपत्य करण्यासाठी कोणाएकाची निवडही केली नाही. पण आता यरुशलेम हे स्थान मी माझ्यासाठी निवडले आहे आणि दावीदाला इस्राएल लोकांवर नेमले आहे.’

“इस्राएलचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ माझे वडील दावीद यांना मंदिर बांधायचे होते. पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘दावीद, माझ्या नावाने मंदिर बांधायचा विचार तुझ्या मनात आला हे चांगले झाले. पण ते तू बांधू शकत नाहीस पण तुझा मुलगा हे काम करील.’ 10 आता परमेश्वराने कबूल केले तसे झाले आहे. माझे वडील दावीद यांच्या जागी मी नवीन राजा झालो आहे. मी इस्राएलचा राजा आहे. असे होईल हे वचन परमेश्वराने दिले होते. आणि मी इस्राएलचा देव परमेश्वर याच्या नावाने मंदिर बांधले आहे 11 मी करारकेश मंदिरात ठेवला आहे. इस्राएलच्या लोकांशी परमेश्वराने केलेला करार या कोशांत आहे.”

रोमकरांस 7:1-13

विवाहावरुन उदाहरण

बंधूनो, तुम्हांस माहीत नाही काय? कारण नियमशास्त्र माहीत असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे की, जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे, तोपर्यंत नियमशास्त्र त्याच्यावर सता चालविते. कारण लग्न झालेली स्त्री जोपर्यंत तिचा पती जिवंत आहे तोपर्यंत ती नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते, पण जर तिचा नवरा मेला तर ती पतीविषयीच्या नियमातून मोकळी होते. म्हणून पती जिवंत असताना ती दुसन्याची झाली, तर तिला व्यभिचारिणी असे म्हणतील. पण जर तिचा पती मरण पावला तर ती लग्नाच्या नियमातून मुक्त होते आणि जरी ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.

माझ्या बंधूनो, अशाच प्रकारे नियमशास्त्राप्रमाणे तुम्हांलाही ख्रिस्ताच्या शरीराद्वारे ठार मारण्यात आले यासाठी की तुम्ही दुसऱ्या पुरुषाचे, जो मेलेल्यातून उठविला गेला होता त्याचे व्हावे, यासाठी की देवाच्या सेवेसाठी आमचा वापर व्हावा. कारण जेव्हा आम्ही आमच्या पापी मानवी स्वभावाप्रमाणे जगत होतो तेव्हा पापी वासना नियमशास्त्राच्या द्वारे मरणाला फळ देण्यासाठी आपल्या अवयवामध्ये कार्य करीत होत्या. ज्या नियमशास्त्रामध्ये आम्ही कैदी झालो होतो त्यात आम्ही मेलेलो असल्याने आता आम्ही नियमशास्त्रापासून मुक्त आहोत तेव्हा आता आम्ही देव, आमचा प्रभु याची पवित्र शास्त्राच्या जुनेपणाप्रमाणे नव्हे तर आत्म्याच्या नवेपणाप्रमाणे सेवा करतो.

पापाविरुद्धची लढाई

तर मग आता आपण काय म्हणतो? नियमशास्त्र पाप आहे असे आम्ही म्हणावे काय? खात्रीने नाही! कारण नियमशास्त्रावाचून पाप काय आहे हे मला समजले नसते. खरोखर “लोभ धरु नको” असे नियमशास्त्राने सांगितले नसते तर लोभ म्हणजे काय हे मला माहीत झाले नसते. [a] परंतु पापाने संधी साधली आणि मजमध्ये सर्व प्रकारचा लोभ भरला. कारण नियमशास्त्राशिवाय पाप मृतवत आहे. एके काळी मी नियाशास्त्राशिवाय जगत होतो, परंतु जेव्हा नियमशास्त्र आले तेव्हा पाप संजीवित झाले. 10 आणि मी मरण पावलो, जी आज्ञा जीवन आणण्यासाठी योजण्यात आली होती तिचा परिणाम माझ्यासाठी मरण असा झाला. 11 कारण पापाने संधी साधली आणि त्या आज्ञेयोगे मला फसविले व तिच्याद्वारे ठार केले.

12 म्हणून आम्ही असा निष्कर्ष काढतो की, नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, नीतिमान आणि उत्तम आहेत. 13 याचा अर्थ असा आहे का, की जे उत्तम होते ते माझ्यासाठी मरण होते काय? खात्रीने नाही! परंतु पाप हे पाप म्हणून ओळखले जावे म्हणून त्याने जे उत्तम त्याद्वारे मजमध्ये मरण निर्माण केले. यासाठी की, पाप त्या आज्ञेमुळे कमालीचे पापिष्ठ व्हावे.

स्तोत्रसंहिता 17

दावीदाची प्रार्थना.

17 परमेश्वरा, न्यायासाठी,
    प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक.
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
    माझी खरी प्रार्थना ऐक.
तू माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेशील.
    तू सत्य बघू शकतोस.
तू माझ्या ह्रदयात खोलवर पाहिलेस.
    तू रात्रभर माझ्या बरोबर होतास
तू मला प्रश्न विचारलेस आणि तुला काहीही चूक आढळली नाही.
    मी वाईट गोष्टी करण्याची योजना आखलेली नाही.
एखाद्याला जितके शक्य आहे तितक्या प्रयत्न पूर्वक
    मी तुझ्या आज्ञा पाळायचा प्रयत्न केला.
मी तू आखून दिलेल्या मार्गांवरुन गेलो.
    माझ्या पायांनी जगण्याचा तुझा मार्ग कधीही सोडला नाही.
देवा, मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तेव्हा
    तू मला ओ दिलेस म्हणून आता तू माझे ऐक.
देवा, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू मदत करतोस.
    ते लोक तुझ्या उजवीकडे उभे राहतात तेव्हा आता तुझ्या एका भक्ताची प्रार्थना ऐक.
तुझ्या डोळ्यातल्या बुब्बुळाप्रमाणे माझे रक्षण कर.
    मला तुझ्या पंखाच्या सावली खाली लपव.
परमेश्वरा, जे वाईट लोक माझा निपात करायला निघाले आहेत
त्यांच्यापासून मला वाचव माझ्याभोवतीचे जे लोक मला दुख द्यायला निघाले आहेत, त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
10 ते वाईट लोक देवाचे न ऐकण्याइतके गर्विष्ठ झाले आहेत
    आणि ते स्वतःच्याच बढाया मारत आहेत.
11 त्या लोकांनी माझा पाठलाग केला आता
    ते माझ्या अवती भोवती आहेत
आणि माझ्यावर हल्ला करायच्या तयारीत आहेत.
12 ते दुष्ट लोक दुसरा प्राणी मारुन खाण्यासाठी लपून बसलेल्या सिंहासारखे आहेत.
    ते सिंहासारखे हल्ला करण्यासाठी लपून बसतात.

13 परमेश्वरा, ऊठ आणि शत्रूकडे जा.
    त्यांना शरण यायला लाव.
तुझ्या तलवारीचा उपयोग कर.
    आणि मला दुष्टापासून वाचव.
14 परमेश्वरा, तुझ्या शक्तीचा उपयोग करुन,
    या दुष्टांना इहलोकातून नाहीसे कर.
परमेश्वरा, तुझ्याकडे मदतीसाठीखूप लोक येतात.
    त्या लोकांकडे या आयुष्यात फारसे काही नसते.
त्या लोकांना खूप अन्न दे.
    त्यांच्या मुलांना जे काही हवे ते दे.
    त्यांच्या मुलांना इतके अन्न दे की ते त्यांच्याही मुलांना पुरुन उरेल.

15 मी न्यायासाठी प्रार्थना केली, म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन
    आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन.

नीतिसूत्रे 19:22-23

22 लोक खरे आणि प्रामाणिक असावेत अशी इच्छा केली जाते, म्हणून खोटे असण्यापेक्षा गरीब असणे चांगले.

23 जो माणूस परमेश्वराचा आदर करतो त्याचे आयुष्य चांगले असते. आयुष्यात समाधानी असतो आणि त्याला संकटांची चिंता नसते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center