Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 7-8

इस्साखारचे वंशज

इस्साखारला चार मुलगे होते. त्यांची नावे अशी: तोला, पुवा, याशूब आणि शिम्मोन.

उज्जी, रकाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे मुलगे. ते सर्व आपापल्या घराण्यातले प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या कारकिर्दीपर्यंत 22,600 इतकी झाली.

इज्रह्या हा उज्जीचा मुलगा. मिखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे मुलगे. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते. त्यांच्या घराण्यात 36,000 सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळीच्या नोंदीवरुन दिसते. बायका आणि मुले पुष्कळ असल्यामुळे यांचे घराणे मोठे होते.

इस्साखारच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून 87,000 लढवय्ये होते असे वंशावळींच्या नोंदींवरुन दिसते.

बन्यामीनचे वंशज

बन्यामीनला तीन मुलगे: बेला, बेकर आणि यदीएल.

बेलाला पाच मुलगे होते: एस्बोन, उज्जी, उज्जीयेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात 22,034 सैनिक होते असे घराण्याच्या नोंदींवरुन दिसते.

जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेर चे मुलगे. आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळीच्या नोंदीवरुन कळते. त्यांच्याकडे 20,200 सैनिक होते, हे ही त्यावरुन कळते.

10 यदीएलचा मुलगा बिल्हान. बिल्हानची मुले, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर. 11 यदीएलचे मुलगे हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे 17,200 सैनिक युध्दाला तयार होते.

12 शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा मुलगा हुशीम.

नफतालीचे वंशज

13 यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे मुलगे.

हे सर्व बिल्हेचे वंशज.

मनश्शेचे वंशज

14 मनश्शेचे वंशज खालील प्रमाणे: मनश्शे आणि त्याची अरामी दासी यांना अस्रीएल नावाचा मुलगा होता. माखीर हाही आणखी एक मुलगा होता. माखीर म्हणजे गिलादचा बाप. 15 हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका बाईशी माखीरने लग्न केले. तिचे नाव माका. माखीरच्या बहिणीचे ही नाव माका होते. या माकाचे दुसरे नाव सलाफहाद होते. हिला फक्त मुलीच झाल्या. 16 माखीरची बायको माका हिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या (माखीरच्या) भावाचे नाव शेरेश. शेरेशचे मुलगे ऊलाम आणि रेकेम.

17 ऊलामचा मुलगा बदान.

हे झाले गिलादचे वंशज. गिलाद हा माखीरचा मुलगा. माखीर मनश्शेचा मुलगा. 18 माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे मुलगे झाले.

19 अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे मुलगे.

एफ्राईमचे वंशज

20 एफ्राईमची वंशावळ पुढीलप्रमाणे. एफ्राईमचा मुलगा शुथेलह,शुथेलहाचामुलगा बेरेद,बेरेदाचा मुलगा तहथ,तहथचा मुलगा एलादा. 21 एलादाचा मुलगा तहथ. तहथचा मुलगा जाबाद. जाबादचा मुलगा शुथेलह.

गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरे मेंढरे चोरुन नेत होते. 22 एजेर आणि एलद हे एफ्राईमचे मुलगे होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले. 23 मग एफ्राईमचा बायकोशी संबंध येऊन त्याची बायको गर्भवती राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. एफ्राईमने या मुलाचे नाव बरीया ठेवले. घरात आधी वाईट घडून गेल्यामुळे त्याने हे नाव ठेवले. 24 एफाईमच्या मुलीचे नाव शेरा. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि खालचे आणि वरचे उज्जनशेरा ही बांधली.

25 रेफह हा एफ्राईमचा मुलगा. रेफहचा मुलगा रेशेफ. त्याचा मुलगा तेलह. तेलहचा मुलगा तहन. 26 तहनचा मुलगा लादान. लादानचा मुलगा आम्मीहूद. आम्मीहूदचा अलीशामा. 27 त्याचा मुलगा नून आणि नूनचा मुलगा यहोशवा.

28 एफ्राईमच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी ते रहात होते: बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान; र्पार्मिला गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी थेट अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत. 29 मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा मुलगा योसेफ याचे वंशज राहत होते.

आशेरजे वंशज

30 इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे मुलगे. त्यांची बहीण सेराह.

31 हेबेर, मालकीएल, हे बरीयाचे मुलगे. मालकीएलचा मुलगा बिर्जाविथ.

32 यफलेट, शोमर, होथाम हे मुलगे आणि शूवा ही बहीण यांचा हेबेर हा बाप होता.

33 पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे मुलगे.

34 अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेरचे मुलगे.

35 शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे मुलगे सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.

36 सोफहचे मुलगे सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना, 37 बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा.

38 यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे मुलगे.

39 आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे मुलगे.

40 हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते गुणसंपन्न शूर योध्दे होते. त्यांच्या वंशावळीच्या नोंदीप्रमाणे 26,000 लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.

राजा शौलच्या घराण्याचा इतिहास

बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आश्बेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा. चौथा नोहा व पाचवा राफा.

3-5 अद्दार, गेरा, अबीहूद, अबीशूवा, नामान, अहोह, गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे मुलगे.

6-7 एहूदचे वंशज खालील प्रमाणे: नामान, अहीया आणि गेरा. हे गेबातील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांना आपापली गावे सोडायला लावून सक्तीने मानाहथ येथे नेण्यात आले. गेराने त्यांना कैद केले. गेराने उज्जा आणि अहीहूद यांना जन्म दिला.

शहरयिमाने मवाबात आपल्या बायका हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्याला दुसऱ्या एका बायकोपासून मुले झाली. 9-10 ही त्याची बायको होदेश हिच्यापासून त्याला योबाब, सिब्या, मेशा, मल्काम, यऊस. शख्या, मिर्मा हे मुलगे झाले. ते आपल्या वडिलांच्या घराण्यांचे प्रमुख होते. 11 हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे मुलगे झाले.

12-13 एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पाचे मुलगे. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली. बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.

14 अह्यो, शाशक, यरेमोथ, 15 जबद्या. अराद, एदर, 16 मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे मुलगे. 17 जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर, 18 इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे मुलगे.

19 याकीम, जिख्री, जब्दी, 20 एलीएनय, सिलथय, अलीएल, 21 अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे मुलगे.

22 इश्पान, एबर, अलीएल, 23 अब्दोन, जिख्री, हानान, 24 हनन्या, एलाम, अनथोथीया, 25 इफदया, पनुएल हे शाशकचे मुलगे होत.

26 शम्शरय, शहऱ्या, अथल्या, 27 यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामचे मुलगे.

28 हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. तशी त्यांची वंशावळींमध्ये नोंद आहे. ते यरुशलेम येथे राहत होते.

29 गिबोनचा बाप यइएल. तो गिबोनमध्ये राहत होता. त्याची बायको माका. 30 त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब, 31 गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर मुले. 32 शिमा हा मिकलोथचा मुलगा. आपल्या यरुशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.

33 कीशचा बाप नेर. कीश शौलचा बाप. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा.

34 योनाथानचा मुलगा मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा बाप.

35 पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे मुलगे.

36 यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमाबेथ व जिम्री यांचा बाप होता. जिम्री हा मोसाचा बाप होता. 37 बिनाचा पिता मोसा. बिनाचा मुलगा राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.

38 आसेलला सहा मुलगे होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.

39 आसेलचा भाऊ एशेक. त्याचे मुलगे: ज्येष्ठ मुलगा ऊलाम, दुसरा यऊष आणि तिसरा अलिफलेत. 40 ऊलामचे मुलगे शूर आणि उत्तम धनुर्धर होते. त्यांची वंशवेल चांगली विस्तारली. मुले, नातवंडे मिळून 150 जण होते.

हे सर्व बन्यामीनचे वंशज.

प्रेषितांचीं कृत्यें 27:1-20

पौल समुद्रमार्गे रोमला निघतो

27 जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरविले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले. युल्य हा सम्राटाच्या सेनेतील एक अधिकारी होता. अद्रमुतिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो. हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते. आम्ही या जहाजातून प्रवासाला निघालो. तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.

दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहोंचलो. युल्य पौलाशी फार चांगला वागला. पौलाच्या मित्राना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली. तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो. आणि कुप्रच्या किनाऱ्याकिनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता. किलकिया व पंफुल्याजवळच्या समुद्राला पार करुन लुक्या प्रांतातील मुर्या बंदरात पोहोंचलो. तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे आलेक्झांद्रीयाचे एक जहाज आढळले. त्याने आम्हांला त्या जहजात बसविले.

आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो. कनिदा येथपर्यंत येण्यासाठी आम्हांला फार कष्ट पडले कारण वारा तोंडचा होता. आम्हांला पुढे जाता येईना. म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून सलमोनाच्या समोरच्या बाजूस गेलो. यापुढे आमचे जहाज क्रेतच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणींतून सुरक्षित बंदर येथे पोहोंचले, तेथे जवळच लसया नगर होते.

बराच वेळ वाया गेला होता. आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते. कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळही [a] निघून गेला होता. तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला. पौल म्हणला, 10 “पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल!” 11 परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत, उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता. 12 परंतु हे बंदर (सुरक्षित म्हटलेले) हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते. म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले. आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले. (फेनिके हे क्रेत बेटावरील शहर होते. त्याचे बंदर नैऋ त्य व वायव्य दिशेला होते.)

वादळ

13 जेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारु हाकारीत जाऊ लागले. जहाजावरच्या लोकांना वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हांला पाहिजे होते. व तसेच ते वाहत आहे. 14 परंतु लवकरच क्रेत बेटावरुन “ईशान्येचे” म्हटलेले वादळी वारे वाहू लागले. 15 आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले, व त्याला पुढे जाता येईना. तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले.

16 मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो. मग थोड्या खटपटीनंतर जीवनरक्षक होडी वर उचलून घेतली. 17 जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले. जहाज वाळू असलेल्या सूर्ती [b] नावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले. तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले.

18 जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले. 19 तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली. 20 बरेच दिवस आम्हांला सूर्य किंवा तारे दिसले नाहीत. वादळ फारच भयंकर होते. आम्ही आमच्या सर्व आशा सोडून दिल्या. आम्ही मरणार असे आम्हांला वाटू लागले.

स्तोत्रसंहिता 7

दावीदाने परमेश्वरापाशी गायलेले स्तोत्र हे स्तोत्र बन्यामीनी कुटुंबातील कुशाचा मुलगा शौल याच्या संबंधी आहे.

परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
    माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव.
तू जर मला मदत केली नाहीस तर सिंहाच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या प्राण्यासारखी माझी अवस्था होईल
    मला दूर नेले जाईल आणि कुणीही मला वाचवू शकणार नाही.

परमेश्वर देवा मी काहीही चूक केलेली नाही.
    मी चूक केली नसल्याबद्दल खात्रीपूर्वक सांगतो.
मी माझ्या मित्रांशी दुष्टावा केला नाही
    आणि मी मित्रांच्या शत्रूंना मदतही केली नाही.
जर हे खरे नसेल तर मला शिक्षा कर.
    शत्रू माझा पाठलाग करो, मला पकडो व मला मारो.
    त्याला माझे जीवन जमिनीत तुडवूदे आणिमाझा जीव मातीत ढकलू दे.

परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे
    म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द् लढ.
    परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर.
परमेश्वरा लोकांचा निवाडा कर.
    सगळे देश तुझ्याभोवती गोळा कर आणि लोकांचा निवाडा कर.
परमेश्वरा, माझा निवाडा कर.
    मी बरोबर आहे हे
    सिध्द् कर मी निरपराध आहे हे सिध्द् कर.
वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर.
    देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या ह्रदयात डोकावून बघू शकतोस.

10 ज्याचे ह्रदय सच्चे आहे अशांना देव मदत करतो
    म्हणून तो माझे रक्षण करेल.
11 देव चांगला न्यायाधीश आहे
    आणि तो त्याचा क्रोध केव्हाही व्यक्त करु शकतो.
12-13 देवाने एकदा निर्णय घेतल्यानंतर
    तो त्याचे मन बदलत नाही.
देवाकडे लोकांना शिक्षा करायची शक्ती आहे. [a]

14 काही लोक सतत वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात.
    ते गुप्त योजना आखतात आणि खोटे बोलतात.
15 ते दुसऱ्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांना इजा करतात.
    परंतु ते स्वत:च्याच जाळ्यात अडकतील आणि त्याना कुठली तरी इजा होईल.
16 त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल.
    ते इतरांशी फार निर्दयपणे वागले.
    त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल.

17 मी परमेश्वराची स्तुती करतो, कारण तो चांगला आहे
    मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो.

नीतिसूत्रे 18:22

22 जर तुम्हाला बायको मिळाली, तर तुम्हाला चांगली गोष्ट मिळाली असे होईल. परमेवर तुमच्यावर खुश आहे असे ते दर्शवते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center