Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 2:18-4:4

कालेबचे वंशज

18 हेस्रोनचा मुलगा कालेब, यरियोथची मुलगी अजूबा ही कालेबची (बायको.) [a] या दोघांना मुले झाली येशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजूबाचे मुलगे. 19 अजूबा वारल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव हूर. 20 हूरचा मुलगा उरी. ऊरीचा मुलगा बसलेल.

21 पुढे, वयाच्या साठाव्या वर्षी हेस्रोनने माखीरच्या मुलीशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादचे वडील. हेस्रोन आणि माखीरची मुलगी यांच्या शरीरसंबंधातून तिने सगूब याला जन्म दिला. 22 सगूबचा मुलगा याईर. याईरची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती. 23 पण गशूर आणि अराम यांनी ती सर्व बळकावली. कनाथ आणि आसपासची खेडीपाडी ही त्यापैकीच. अशी एकंदर साठ खेडी होती. ती सर्व, गिलादचा बाप माखीर याच्या मुलांची होती.

24 एफ्राथमधील कालेब येथे हेस्रोन मरण पावला. त्याची बायको अबीया हिला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यापासून झालेला अशहूर हा मुलगा होता. हा अश्हूर म्हणजे तकोवाचा बाप.

यरहमेलची वंशज

25 यरहमेल हा हेस्रोनचा पहिला मुलगा. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलची मुले. राम हा त्यातला मोठा. 26 यरहमेलला दुसरी बायको होती, तिचे नाव अटारा. ती ओनामची आई.

27 यरहमेलाचा थोरला मुलगा राम याचे मुलगे मास, यामीन आणि एकर हे होत.

28 शम्मय व यादा हे ओनामचे मुलगे. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे मुलगे.

29 अबीशूराच्या बायकोचे नाव अबीहाईल. त्यांना दोन मुलगे झाले ते म्हणजे अहबान आणि मोलीद.

30 सलेद आणि अप्पईम हे नादाबचे मुलगे. यापैकी सलेद निपुत्रिकच वारला.

31 अप्पईमचा मुलगा इशी. इशीचा मुलगा शेशान. शेशानचा मुलगा अहलय.

32 शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन मुलगे होते. पैकी येथेर मुले बाळे न होताच वारला.

33 पेलेथ आणि जाजा हे योनाथानचे मुलगे, ही झाली यरहमेलची वंशावळ.

34 शेशानला मुलगे नव्हते, फक्त मुली होत्या. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा. 35 त्याच्याशी शेशानने आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव अत्ताय.

36 अत्तायास नाथान नावाचा मुलगा झाला. त्याचा मुलगा जाबाद. 37 जाबादचा मुलगा एफ्‌लाल, एफलाल हा ओबेदचा बाप. 38 ओबेदचा मुलगा येहू, येहूचा मुलगा अजऱ्या. 39 अजऱ्याने हेलसला जन्म दिला. आणि हेलसाने एलासा याला जन्म दिला. 40 एलासाचा मुलगा सिस्माया, सिस्मायाचा मुलगा शल्लूम, 41 शल्लूमचा मुलगा यकम्या, यकम्याचा मुलगा अलीशामा.

कालेबचे घराणे

42 कालेब हा यरहमेलचा भाऊ. कालेबलाही मुलगे झाले. त्यापैकी मेशा हा थोरला. मेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा हेब्रोन.

43 कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे मुलगे. 44 शमाने रहम याला जन्म दिला, रहमचा मुलगा यर्काम. रेकेमचा मुलगा शम्मय, 45 शम्मयचा मुलगा मावोन. मावोन हा बेथसूरचा बाप.

46 कालेबला एफा नावाची दासी होती. तिला हारान, मोसा, गाजेज ही मुले झाली. हारान हा गाजेजचा पिता.

47 रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे मुलगे.

48 माका ही कालेबची आणखी एक दासी. शेबेर आणि तिऱ्हना हे तिचे मुलगे. 49 शाफ आणि शवा हे ही तिला झाले. शाफचा मुलगा मद्नान आणि शवाचे मुलगे मखबेना आणि गिबा. अखसा ही कालेबची मुलगी.

50 कालेबची वंशावळ ही अशी आहे. होर हा कालेबचा थोरला मुलगा. हा एफ्राथला झाला. हूरचे मुलगे पुढीलप्रमाणे: किर्याथ-यारीमाचा संस्थापक शोबाल, 51 बेथलहेमचा संस्थापक सल्मा आणि बेथ-गादेरचा संस्थापक हारेफ.

52 किर्याथ-यारीमची मुहूर्त मेढ रोवणारा शोबाल याचे वंशज असे: हारोवे, मनुहोथमथील अर्धे लोक, 53 आणि किर्याथ-यारीममधील घराणी (कुळे). इथ्री, पूथी, शमाथी आणि मिश्राई ही ती घराणी होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले.

54 सल्माचे वंशज याप्रमाणे: बेथलेहेम व नटोपाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहतकर आणि सारी लोक. 55 शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखनिकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाबचा संस्थापक हम्माथ याच्यापासून उत्पन्न झालेले केनी लोक होते.

दावीदाची मुलगे

दावीदाच्या काही मुलांचा जन्म हेब्रोन नगरात झाला. त्यांची यादी अशी:

अम्रोन हा त्यातला थोरला. इज्रेल नगरातील अहीनवाम ही त्याची आई.

दानीएल हा दुसरा. कर्मेल यहूदा येथील अबीगईल ही त्याची आई.

तिसरा मुलगा अबशालोम. गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा हा मुलगा.

हग्गीथचा मुलगा अदोनीया हा चवथा.

अबीटलचा मुलगा शफाट्या हा पाचवा.

दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.

दावीदाच्या या सहा मुलांचा जन्म हेब्रोन येथे झाला.

दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरुशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले. तिथे जन्मलेली दावीदाची मुले खालीलप्रमाणे:

बथशूवाला चार मुलगे झाले. बथशूवा अम्मीएलची मुलगी. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे मुलगे. 6-8 इतर नऊ मुलगे असे: इभार, अलीशामा, एलीफलेट नोगा, नेफेग, याफीय, अलीशामा, एल्यादा, एलीफलेट. ही सर्व दावीदाची मुले. दासीपासून झालेले आणखीही मुलगे त्याला होते. तामार ही दावीदाची मुलगी.

दावीद नंतरचे यहूदाचे राजे

10 शलमोनाचा मुलगा रहाबाम. त्याचा मुलगा अबीया, त्याचा मुलगा आसा. आसाचा मुलगा यहोशाफाट, 11 त्याचा मुलगा योराम, योरामचा मुलगा अहज्या. अहज्याचा योवाश, 12 योवाशचा मुलगा अमस्या, अमस्याचा मुलगा अजऱ्या, त्याचा मुलगा योथाम. 13 योथामचा मुलगा आहाज, त्याचा मुलगा हिज्कीया, त्याचा मुलगा मनश्शे. 14 मनश्शेचा मुलगा आमोन, आमोनचा योशीया.

15 योशीयाचे मुलगे: थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चवथा शल्लूम.

16 यहोयाकीमचे मुलगे: यखन्या आणि त्याचा मुलगा सिद्कीया.

बाबिलोनने यहूदाचा पाडाव केल्यानंतरची दावीदाची वंशावळ

17 यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्याला झालेल्या मुलांची नावे: शलतीएल, 18 मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.

19 पदायाचे मुलगे याप्रमाणे: जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे मुलगे मशुल्लाम आणि हनन्या. या दोघांची बहीण शलोमीथ. 20 जरुब्बाबेलाला आणखीही पाच मुले होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.

21 पलट्या हा हनन्याचा मुलगा आणि पलट्याचा मुलगा यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा मुलगा ओबद्या. ओबद्याचा मुलगा शखन्या.

22 शखन्याचे वंशज याप्रमाणे: शमाया, शमायाला सहा मुलगे: शमाया, हट्टूश, इगाल, बाहीहा, नाऱ्या आणि शाफाट.

23 नाऱ्याला तीन मुलगे: एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.

24 एल्योवेनयला सात मुलगे होते. त्यांची नावे अशी: होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.

यहूदाची आणखी काही घराणी

यहूदाच्या मुलांची नावे अशी:

पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.

शोबालचा मुलगा राया: त्याचा मुलगा यहथ. यहथाची मुले अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत.

इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची मुले. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी.

पनुएलाचा मुलगा गदोर आणि एजेरचा मुलगा हूशा ही हूरची मुले.

हूर हा एफ्राथाचा मुलगा आणि एफ्राथा ही बेथलेहेमची संस्थापक होती.

प्रेषितांचीं कृत्यें 24

यहूदी लोक पौलावर दोष ठेवतात

24 पाच दिवसांनतर हनन्या कैसरिया येथे गेला. हनन्या मुख्य याजक होता. हनन्याने आपल्याबरोबर काही यहूदी वडीलजन आणि तिर्तुल्ल नावाचा वकील यांना कैसरिया येथे नेले; त्यांनी राज्यपालापुढे पौलावरिल दोषारोप सादर केले. जेव्हा पौलाला आत नेण्यात आले तेव्हा तिर्तुल्ल याने पौलावरील आरोप सांगण्यास सुरुवात केली.

तो म्हणाला, “फेलिक्स महाराज, तुमच्यामुळे आम्हांला फार शांतता लाभली असून, तुमच्या दूरदृष्टीमुळे जरुर असलेल्या सुधारणासुद्धा या देशात झाल्या आहेत. फेलिक्स महाराज, आम्ही हे सर्व प्रकारांनी व सर्व ठिकाणी हे कृतज्ञतेने मान्य करतो. परंतु तुमचा अधिक वेळ न घेता, आम्ही जे काही तुम्हांला थोडक्यात सांगतो, ते ऐकून घेण्याची कृपा करावी, ही विनंती करतो. हा मनुष्य त्रास देणारा आहे, जगात सगळीकडे यहूदी लोकांना त्याने त्रास दिलेला आहे. तो नासरेथकराच्या पंथाचा पुढारी आहे. 6-7 त्याने देवाचे मंदिर विटाळण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्याला धरले [a] या गोष्टी खऱ्या आहेत की नाही हे तुम्ही ठरवू शकता. त्याला काही प्रश्न विचारा.” इतर यहूदी लोकांनी याला मान्यता दिली व सांगितले की, “हे सर्व खरे आहे!”

Paul Defends Himself Before Felix

10 जेव्हा राज्यपालाने पौलाला बोलण्यास खुणावले, तेव्हा पौल म्हणाला, “फेलिक्स महाराज, बरीच वर्षे या देशाचे न्यायाधीश म्हणून आपण काम करीत आहात, म्हणून मला आपणा समोर स्वतःचा बचाव करायला आनंद वाटत आहे. 11 यरुशलेम येथे उपासनेसाठी जाऊन मला बारोपेक्षा जास्त दिवस झालेले नाहीत, ही गोष्ट खरी आहे की नाही, हे आपण पडताळून पाहू शकता 12 मी मंदिरात कोणाशी वाद घालताना, सभास्थातात किंवा बाहेर कोठे कोणाला चिथावून देताना या लोकांना आढळलो नाही. 13 हे लोक माझ्यावर जो आरोप ठेवीत आहेत, तो त्यांना तुमच्यासमोर सिद्ध करता येणार नाही.

14 “मात्र मी हे आपल्यसमोर कबूल करतो: या मार्गाने (ख्रिस्ती मार्गाने) जाऊन मी आपल्या वाडवडिलांच्या देवाची उपासना करतो त्या मार्गाला हे लोक पंथ म्हणतात. जे काही नियमशास्त्रात सांगितले आहे आणि जे काही आमच्या संदेष्ट्यानी सांगितलेले आहे, त्या सर्वांवर मी विश्वास ठेवतो. 15 आणि धार्मिकांचे व वाईटांचेही मरणातून पुन्हा उठणे होणार आहे, ही गोष्ट हे लोकही माइयाबरोबर मानतील अशी मी देवामध्ये आशा बाळगतो. 16 यासाठी देवापुढे आणि मनुष्यांपुढे आपला विवेक शुद्ध असावा याचा मी नेहमी आटोकाट प्रयत्न करीत असतो.

17 “अनेक वर्षे दूर राहिल्यानंतर माइया लोकांतील गरीबांना दान देऊन यरुशलेममध्ये स्वतःसाठी अर्पण करावे म्हणून मी मंदिरात जाऊन हा विधी करीत असताना, शुद्धीकरण झालेला असा मी त्यांस आढळलो. 18 तेथे मी कसलाही जमाव केला नव्हता अगर दंगा ही केला नव्हता 19 पण आशियातील काही लोक तेथे हजर होते. 20 जर त्यांना माइयाविरुद्ध काही म्हणायचे असेल, तर त्यांनी आपणांपुढे हजर होऊन मला दोषलावावा. किंवा मी जेव्हा धर्मसभेपुढे उभा राहिलो, त्यावेळी माइयामध्ये काही चूक त्यांना आढळली असेल, तर त्यांनी तसे सांगावे. 21 मी या लोकांमध्ये उभे राहून मोठ्याने म्हणालो की, ‘मेलेल्यांतून पुन्हा उठण्याच्या प्रश्नावरुन माझा न्यायनिवाडा होत आहे.’ या एका गोष्टीशिवाय दुसरा आरोप माइयावर करायचा असेल तर यांनी तसे सांगावे.”

22 फेलिक्सला (ख्रिस्ती) मार्गाविषयी चांगली माहिती असल्याने त्याने सुनावणी थांबवली. फेलिक्स म्हणाला, “जेव्हा लुसिया सरदार येथे येईल, तेव्हा तुझ्या प्रकरणाचा काय निर्णय घ्यायचा ते मी ठरवीन.” 23 मग फेलिक्सने शतधिपतीला आज्ञा केली की, पौलाला पहाऱ्यात ठेवावे, परंतु त्याला थोडी मोकळीक देण्यात यावी. आणि असाही हुकूम केला की, त्याच्या मित्रांना त्याची गरज भागविण्यास मना करु नये.

पौल फेलिक्स व त्याच्या पत्नीशी बोलतो

24 काही दिवसांनंतर फेलिक्स आपली पत्नी द्रुसिल्ला हिच्याबरोबर आला. ती एक यहूदी स्त्री होती. फेलिक्सने पौलाला बोलावणे पाठविले. आणि त्याने येशू ख्रिस्तावरील विश्वासाबाबत पौलाचे बोलणे ऐकून घेतले. 25 परंतु जेव्हा पौलाने धार्मिकपणा, आत्मसंयमन, आणि होणाऱ्या न्यायाविषयी सांगितले. तेव्हा फेलिक्सला भीति वाटली. तो पौलाला म्हणाला, “आता तू जा, परत वेळ मिळाला म्हणजे मी तुला बोलावीन.” 26 यावेळी पौल त्याला पैसे देऊ करील असे त्याला वाटत होते म्हणून फेलिक्स त्याला वरचेवर बोलावणे पाठवत असे आणि त्याच्याशी बोलत असे.

27 दोन वर्षे झाल्यावर फेलिक्सच्या जागी पुर्क्य फेस्त हा राज्यपाल झाला. आणि यहूदी लोकांचे मन मोडण्याची फेलिक्सची इच्छा नव्हती, म्हणून त्याने जाण्यापूर्वी पौलाला तुरुंगातच ठवले.

स्तोत्रसंहिता 4

प्रमुख गायकासाठी तंतुवाद्याच्या साथीने गावयाचे दावीदाचे स्तोत्र. [a]

माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन
    तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक.
आणि माझ्याशी दयाळू अंतकरणाने वाग.
    मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे.

लोकहो! तुम्ही आणखी किती काळ माझ्याविषयी वाईट बोलत राहाणार आहात?
    तुम्ही माझ्याबद्दल सांगण्यासाठी नवीन काहीतरी खोटे नाटे शोधत असता आणि माझ्याविषयी तसले खोटे सांगणे तुम्हाला आवडते.

परमेश्वर आपल्या चांगल्या माणसांचे ऐकतो हे तुम्हाला माहीत आहे म्हणून मी जेव्हा
    जेव्हा त्याची प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा तो माझे एकतो.

जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा, पण पाप करू नका.
    तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा.
देवाला चांगल्या गोष्टीचे होमार्पण करा
    आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा.

बरेच लोक म्हणतात “आम्हाला देवाचा चांगुलपणा कोण दाखवेल?
    परमेश्वरा, आम्हाला तुझे तेजस्वी मुख पाहू दे.”
परमेश्वरा, तू मला खूप सुखी केलेस. सुगीच्या दिवसात जेव्हा धनधान्याची आणि द्राक्षारसाची समृध्दी असते तेव्हा मला जितका आनंद होतो त्यापेक्षा मी आता अधिक आनंदी आहे.
मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का?
    कारण परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस.

नीतिसूत्रे 18:16-18

16 जर तुम्हाला महत्वाच्या माणसाला भेटायची इच्छा असेल तर त्याला नजराणा द्या. नंतर तुम्ही त्याला सहजपणे भेटू शकता.

17 सुरुवातीला बोलणारा माणूस नेहमी बरोबर आहे असे तोपर्यंत वाटत असते, जोपर्यंत कुणीतरी येऊन त्याला प्रश्र विचारीत नाही.

18 दोन बलवान माणसे वाद घालत असली तर तो वाद चिठ्ठ्या टाकून सोडवणे चांगले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center