Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

दावीदाचे मिक्ताम [a] नावाचे स्तोत्र

16 देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे.
मी परमेश्वराला म्हणालो,
    “परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस
    माझ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली आहे”
परमेश्वर त्याच्या पृथ्वीवरील भक्तांसाठी अनेक अद्भुत गोष्टी करतो.
    परमेश्वर त्या लोकांवर खरोखरच प्रेम करतो हे तो दाखवतो.

परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते.
    ते त्या मूर्तींना रक्ताची भेट देतात.
मी त्यात सहभागी होणार नाही.
    मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो.
    परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस तुच मला माझा वाटा देतोस.
माझा वाटा फारच अद्भूत आहे
    माझे वतन सुंदर आहे.
मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले रात्रीच्या वेळी मला
    अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या.

मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो
    आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही.
त्यामुळे माझे ह्रदय आणि माझा आत्मा आनंदीत राहील
    माझे शरीरही सुरक्षित असेल.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात राहू देणार नाहीस.
    तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस. [b]
11 तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा,
    केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल.
    तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.

Notas al pie

  1. स्तोत्रसंहिता 16:1 दावीदाचे मिक्ताम “मिक्तामचा” अर्थ स्पष्ट होत नाही. परंतु त्याचा अर्थ: “नीट योजलेले गाणे” असा होऊ शकेल. हे गाणे कदाचित् दावीदने लिहिले असेल वा त्याला अर्पण केले असेल.
  2. स्तोत्रसंहिता 16:10 सडला … नाहीस शब्दाश, “ऱ्हास होत असलेला बघणे” किंवा, “प्रेते सडतात ती जागा बघणे.”