Add parallel Print Page Options

पांढऱ्या घोड्यावरचा स्वार

11 नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला; आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसलेल्याचे “नाव विश्वासू आणि खरा” असे होते; कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो. 12 त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुगुट आहेत. त्याचे नाव त्याच्यावर लिहिले आहे. ते नाव काय आहे हे त्याच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नाही. 13 त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजविलेला झगा घातला होता. त्या स्वाराचे नाव “देवाचा शब्द” असे आहे. 14 स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यांवर बसून त्याच्या मागे येत होते. 15 त्याच्या तोंडातून एक धारदार तरवार येते जिच्याने तो राष्ट्रांना नमवील, आणि लोखंडी दंडाने तो त्यांच्यावर सता गाजवील. सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाची द्राक्षे तो द्राक्षकुंडामध्ये तुडवील. 16 त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे:

राजांचा राजा आणि प्रभुंचा प्रभु

Read full chapter