मत्तय 8:28-32
Marathi Bible: Easy-to-Read Version
येशू दोन माणसांमधून भूते काढतो(A)
28 मग येशू समुद्राच्या पलीकडे असलेल्या गरदेकरांच्या देशात आला, तेव्हा दोन भूतबाधा झालेली माणसे स्मशानातून येशूकडे आली. ही माणसे स्मशानातील कबरांध्ये राहत होती. ती फार भेसूर होती, त्यामुळे कोणीही त्यांच्या वाटेला जात नसे. 29 ती दोघे येशूकडे आली व म्हणाली, “देवाच्या पुत्रा, तुला आमच्याकडून काय पाहिजे? नेमलेल्या वेळेपूर्वीच तू आम्हांला शिक्षा करायला आलास काय?”
30 त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर डुकरांचा एक कळप चरत होता. 31 ती भुते त्याला विनंती करू लागली, ती म्हणाली, “जर तू आम्हाला ह्यांच्यामधून काढून टाकणार असशील तर आम्हांला त्या डुकरांच्या कळपात जाऊ दे.”
32 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जा.” मग ती त्यांच्यामधून निघून डुकरांमध्ये गेली. तेव्हा तो संपूर्ण कळप कड्यावरून खाली धावत जाऊन पाण्यात बुडाला.
Read full chapter
मार्क 5:11-14
Marathi Bible: Easy-to-Read Version
11 तेथे डोंगराच्या कडेला डूकारांचा एक मोठा कळप चरत होता. 12 मग त्या दुष्ट आत्म्याने येशूला विनंति केली आणि म्हणाला, “आम्हांला त्या डुकरांत पाठव म्हणजे आम्ही त्यांच्यात शिरू.” 13 मग त्याने त्यांना तसे करण्यास परवानगी दिली. मग दुष्ट आत्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि त्या डुकरांत शिरले. मग तो दोन हजारांचा कळप टेकडीवरून पळत खाली जाऊन सरोवरात पडला व बुडून मेला.
14 त्या कळापाची राखण करणारे लोक दूर पळून गेले व त्यांनी ही बातमी गावात व शेतात सांगितली, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक तेथे आले.
Read full chapter
लूक 8:32
Marathi Bible: Easy-to-Read Version
32 डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. भुतांनी त्याला विनंति केली, “आम्हांला त्या डुकरांच्या मध्ये जाऊ दे.” आणि येशूने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली.
Read full chapter
लूक 8:33
Marathi Bible: Easy-to-Read Version
33 मग भुते त्या मनुष्यातून बाहेर आली आणि डुकरात शिरली. नंतर डुकरांचा कळप सरोवराकडे जोरात पळाला आणि तो सारा कळप सरोवरात बुडून मेला.
Read full chapter2006 by Bible League International