A A A A A
Bible Book List

1 तीमथ्याला 4 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

खोठ्या सिक्षकांविरुद्ध इशारा

आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील, आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसविणाऱ्यां कडे लक्ष देतील. ते लोकांना लग्न करण्यास मना करतात व काही अन्नपदार्थ टाळण्यासाठी सांगतात. जे विश्वासणारे आहेत, व ज्यांना सत्य माहीत आहे अशांनी उपकार मानून घेण्यासाठी देवाने ते निर्माण केले आहेत. कारण देवाने केलेली प्रत्येक गोष्ट चांगली आहे व जर उपकार मानून आम्ही घेतो तर कोणतीही गोष्ट नाकारु नये. कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.

ख्रिस्त येशूचा चांगला सेवक हो

तेव्हा बंधू, जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधुभगिनींना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. परंतु देवहीन गोष्टी, ज्या म्हाताऱ्या स्त्रियांचे लक्षण आहे ते टाळ आणि स्वतःला सतत देवाच्या भक्तीमध्ये गुंतवण्याची सवय ठेव. कारण शारीरिक शिकवणुकीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे, कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे. हे सत्य वचन आहे जे सर्वथा स्वीकारावयास योग्य आहे. 10 म्हणून आम्ही जास्त काम करतो आणि धडपड करतो. कारण आम्ही, जो सर्व लोकांचा व विशेषेकरून जे विश्वास ठेवतात, अशा विश्वासणाऱ्यांचा विशेषकरुन तारणारा आहे त्या जिवंत देवावर आशा ठेवली आहे.

11 आज्ञा कर आणि या गोष्टी शिकव. 12 तू तरुण आहेस म्हणून कोणी तुला तुच्छ मानू नये. त्याऐवजी, विश्वासणाऱ्यांसाठी तू तुझ्या बोलण्याने, तुझ्या वागण्याने, तुझ्या प्रेम दर्शविण्याने, तुझ्या असलेल्या विश्वासाने व तुझ्या शुद्ध जीवनाने त्यांचा आदर्श हो.

13 मी येईपर्यंत लोकांमध्ये देवाचे वचन वाचण्यात, बोध करण्यात व शिकविण्यात स्वतःला वाहून घे. 14 जेव्हा वडीलजनांनी तुझ्यावर हात ठेवला त्यावेळी भविष्याच्या संदेशाचा परिणाम म्हणून तुला मिळालेली देणगी जी तुझ्यामध्ये आहे, त्याविषयी निष्काळजी राहू नको. 15 या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यात पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांना दिसून यावी. 16 आपणांकडे व आपल्या शिकवणुकीकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे तारण करशील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes