Add parallel Print Page Options

परमेश्वराकडे परतणे

14 इस्राएला, तू पडलास. तू परमेश्वराविरुध्द पाप केलेस. पण आता परमेश्वराकडे, तुझ्या परमेश्वराकडे, परत ये. तू ज्या गोष्टी बोलणार आहेस, त्याबद्दल विचार कर व परमेश्वराकडे परत ये.

“त्याला सांग की आमचे पाप धुवून टाक आम्ही करीत
    असलेल्या चांगल्या गोष्टीं चा स्वीकार कर.
    आम्ही आमच्या ओठांद्वारे तुझी स्तुती करू.
अश्शूर आम्हाला वाचविणार नाही.
    आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही.
आम्ही हातांनी बनविलेल्या गोष्टींना
    ‘आमचा देव’ असे पुन्हा म्हणणार नाही का?
कारण अनाथांवर करुणा करणारा
    तूच एकमेव आहेस.”

परमेश्वर इस्राएलला क्षमा करील

परमेश्वर म्हणतो,
“त्यानी माझा त्याग केली तरी मी त्यांना ह्या गोष्टीबद्दल क्षमा करीन.
    मी मोकळेपणाने त्यांच्यावर प्रेम करीन.
    आता मी त्यांच्यावर रागावलो नाही.
मी इस्राएलासाठी दहिवराप्रमाणे होईन.
    इस्राएल लिलीप्रमाणे फुलेल,
    लबानोनमधील गंधसरूंप्रमाणे तो फोफावेल.
त्याच्या फांद्यांचा विस्तार होईल
    व तो जैतुनाच्या सुंदर वृक्षाप्रमाणे होईल.
लंबानोनमधील गंधसरूंच्या गंधाप्रमाणे
    त्याचा सुवास असेल.
इस्राएलचे लोक, पुन्हा,
    माझ्या सुराक्षितेत राहातील ते धान्याप्रमाणे
वाढतील ते वेलीप्रमाणे विस्तारतील.
    ते लबानोनमधील द्राक्षारसाप्रमाणे होतील.”

परमेश्वर इस्राएलला मूर्ती बद्दल ताकीद देतो

“एफ्राईम, माझा (परमेश्वराचा) मूर्तीशी काहीही संबंध असणार नाही,
    तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणारा मीच एकमीच आहे.
फक्त मीच तुमच्यावर लक्ष ठेवतो, मी सदाहरित देवदारूसारखा आहे.
    माझ्यामुळे तुम्हाला फळ मिळते.”

अखेरचा सल्ला

शहाण्या माणसाला या गोष्टी समजतात.
    चलाख माणसाने या गोष्टी शिकाव्या
परमेश्वराचे मार्ग योग्य आहेत.
    त्यामुळे सज्जन जगतील
    व दुर्जन मरतील.