Add parallel Print Page Options

आसाफाचे स्तोत्र

82 देव देवांच्या सभेत उभा राहातो.
    तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस?
    दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”

“गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे.
    त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.
त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर.
    त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”

“काय घडते आहे ते त्यांना [a] कळत नाही.
    त्यांना काही समजत नाही.
ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही.
    त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात
    तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”
परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल,
    इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल.

देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो.
    देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.

Footnotes

  1. स्तोत्रसंहिता 82:5 ते त्याना अर्थ कदाचित् काय घडते आहे ते ज्यांना कळत नाही असे गरीब लोक असा असावा किंवा “देवांना” हे कळत नाही की त्यांच्यामुळे जगाचा नाश होतो आहे कारण ते न्यायी नाहीत आणि ते योग्य गोष्टी करीत नाहीत.