Add parallel Print Page Options

प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे मास्कील यावेळी जिफी लोक शौलाकडे येऊन म्हणाले, “दावीद आमच्या लोकांत लपला आहे असे आम्हाला वाटते.”

54 देवा, तुझ्या अधिकाराचा उपयोग करुन मला वाचव.
    तुझे महान सामर्थ्य वापर आणि मला मुक्त कर.
देवा, माझी प्रार्थना ऐक मी
    काय म्हणतो ते ऐक.
जे देवाची उपासना करत नाहीत असे परके माझ्या विरुध्द गेले आहेत
    आणि शक्तिशाली लोक मला मारायला निघाले आहेत.

पाहा, माझा देव मला मदत करेल.
    माझा मालक मला साहाय्य करेल.
जे लोक माझ्याविरुध्द गेले आहेत त्यांना देव शिक्षा करेल.
    देव माझ्याशी प्रमाणिक असेल आणि तो त्या लोकांचा नाश करेल.

देवा, मी तुला खुशीने अर्पणे देईन.
    परमेश्वरा, मी तुझ्या चांगल्या नावाची स्तुती करेन.
परंतु मी तुला सर्व संकटांतून सोडवण्याची विनंती करीत आहे.
    माझ्या शत्रूंचा पराभव झाल्याचे मला पाहू दे.