Add parallel Print Page Options

दावीद आपला मुलगा अबशालोम याच्याकडून पळाला तेव्हाचे दावीदाचे स्तोत्र.

परमेश्वरा मला खूप शत्रू आहेत.
    खूप लोक माझ्या विरुद्ध गेले आहेत.
बरेच लोक माझ्याबद्दल बोलत आहेत ते लोक म्हणतात, “देव त्याला वाचवणार नाही.”

परंतु परमेश्वरा, तूच माझी ढाल आहेस
    तूच माझे वैभव आहेस
    परमेश्वरा मला महत्व [a] देणारा तूच आहेस.

मी परमेश्वराची प्रार्थना करेन
    आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल!

मी पडून विश्रांती घेतो तरी मी जागा होईन हे मला माहीत आहे.
    मला हे कसे कळते?
    कारण परमेश्वर मला सांभाळतो माझे रक्षण करतो.
माझ्याभोवती हजारो सैनिक असतील.
    परंतु मी या शत्रूंना घाबरणार नाही.

परमेश्वरा जागा हो!
    देवा मला वाचव तू फार शक्तिशाली आहेस
तू जर माझ्या शत्रूंच्या थोबाडीत मारलीस
    तर त्यांचे सगळे दात पडतील.

परमेश्वरा, जय तुझाच आहे.
    परमेश्वरा तू कृपा करून तुझ्या लोकांवर दया कर.

Footnotes

  1. स्तोत्रसंहिता 3:3 तूच … महत्व शब्दशः “तू माझे वैभव आहेस तू माझे मस्तक उचलणारा आहेस.”