Add parallel Print Page Options

दावीदाचे स्तोत्र.

23 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे
    ते मला नेहमी मिळत राहील.
तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो.
    तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो.
    तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
मी जरी थडग्यासारख्या [a] भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो
    तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, का?
    कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस.
    तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर तयार केलेस
    तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील.
    आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन. [b]

Footnotes

  1. स्तोत्रसंहिता 23:4 मी … थडगे किंवा “मरणाची काळी दरी” वा “खूप अंधारी दरी.”
  2. स्तोत्रसंहिता 23:6 आणि … बसेन किंवा “मी देवाच्या मंदिरात् पुन्हा पुन्हा खूप वेळपर्यंत जाईन.”