Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

दावीदाचे एक स्तुतीगीत.

110 परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाला,
    “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या नियंत्रणाखाली ठेवीन.
    माझ्याजवळ माझ्या उजव्या बाजूला बस.”

परमेश्वर तुझे राज्य वाढवायला मदत करेल.
    तुझे राज्य सियोनपाशी सुरु होईल आणि ते तू तुझ्या शत्रूंवर त्यांच्या देशात जाऊन राज्य करशील.
तू तुझ्या सैन्याची जमवाजमव करशील
    त्यावेळी तुझे लोक स्वयंसेवक बनून दाखल होतील.
त्यांचा खास पोशाख परिधान करतील आणि भल्या पहाटे एकत्र जमतील.
    हे तरुण लोक जमिनीवर जसे दव पडते त्याप्रमाणे तुझ्याभोवती असतील. [a]

परमेश्वराने वचन दिले आहे
    आणि आता तो त्याचे मन बदलणार नाही.
“तू सदैव याजक राहिला आहेस
    मलकिसदेक होता तसा याजक तू आहेस.”

माझा प्रभु तुझ्या उजव्या बाजूला आहे.
    तो रागावेल तेव्हा इतर सर्व राजांचा पराभव करील.
देव सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील.
    सर्व जमीन प्रेतांनी झाकली जाईल
    आणि बलवान राष्ट्रांच्या नेत्यांना देव शिक्षा करील.

राजा वाटेत झऱ्याचे पाणी पितो.
    तो खरोखरच त्याचे मस्तक उचलेल आणि अतिशय सामर्थ्यवान [b] होईल.

Notas al pie

  1. स्तोत्रसंहिता 110:3 हे तरुण … असतील हे कडवे हिब्रूत समजायाला खूप अवघड आहे शब्दश: “जन्मापासून पवित्र तेज तुझेच आहे तुझे तारुण्यांचे दव तुझ्यासाठी अरुणोदयासारंखे आहे.
  2. स्तोत्रसंहिता 110:7 त्याचे … सामर्थ्यवान शब्दश: “तो त्यांचे डोके वर उचलेल याचा अर्थ तो पाणी प्यायल्यानंतर त्याचे डोके वर उचलेल, असा असावा किंवा देव त्याला खूप बलवान आणि महत्व असलेला करेल असा असावा. इथे लेखकाला दोन्ही अर्थ अभिप्रेत असावेत.”