A A A A A
Bible Book List

योएल 3 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

यहूदाच्या शत्रूंना शिक्षा करण्याचे परमेश्वर वचन देतो

“त्या वेळी, यहूदा व यरुशलेम यांची कैदेतून सुटका करून, मी त्यांना परत आणीन. मी, सर्व राष्ट्रांनासुध्दा गोळा करून, खाली यहोशाफाटाच्या दरीत [a] आणीन. तेथे मी त्यांचा न्यायनिवाडा करीन. त्या राष्ट्रांनी माझ्या माणसांना म्हणजेच इस्राएल लोकांना पांगविले. त्यानी त्याना बळजबरीने इतर राष्ट्रात राहण्यास भाग पाडले म्हणून त्या राष्ट्रांना मी शिक्षा करीन. त्या राष्ट्रांनी माझा देश वाटून घेतला. त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्या टाकल्या. वेश्या खरीदण्यासाठी त्यांनी मुलगा विकला आणि मद्य खरीदण्यासाठी मुलगी विकली.

“सारे, सीदोन व पेलेशेथच्या सर्व प्रांतानो, माझ्या दृष्टीने तुम्हाला अजिबात महत्व [b] नाही. माझ्या कृत्याबद्दल तुम्ही मला शिक्षा करीत आहत का? तुम्हाला कदाचित् तसे वाटत असेल. पण लवकरच मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही माझे सोने-चांदी घेतली. तुम्ही माझा अमूल्य खजिना घेऊन आपल्या मंदिरात ठेवलात.

“तुम्ही यहूदाच्या व यरुशलेमच्या माणसांना यावनी लोकांना विकले. अशा रीतीने, तुम्ही त्यांना देशोधडीला लावू शकला. तुम्ही त्या खूप दूर असलेल्या प्रदेशात माझ्या लोकांना पाठविले. पण मी त्यांना परत आणीन, आणि तुम्ही जे काही केले, त्याबद्दल तुम्हाला शिक्षा करीन. तुमच्या मुला-मुलींना मी यहूद्यांना विकीन. मग ते त्या मुंला-मुलींना दूरच्या शबाच्या लोकांना विकतील.” परमेश्वरानेच हे सांगितले.

युध्दाला सज्ज व्हा

राष्ट्रा-राष्ट्रामध्ये घोषणा करा:
युध्दाला सज्ज व्हा.
    बलवान माणसांना उठवा.
सर्व योध्दे जवळ येऊ देत
    त्यांना उठू द्या.
10 फाळ मोडून त्यांच्या तलवारी करा.
    कोयत्यापासून भाले करा.
“दुबळ्याला मी बलवान योध्दा आहे”
    असे म्हणू द्या.
11 सर्व राष्ट्रांनो, त्वरा करा!
    त्या जागी एकत्र या.
    हे परमेश्वरा, तुझे बलवान योध्दे आण
12 राष्ट्रांनो, उठा!
    यहोशाफाटच्या दरीत गोळा व्हा.
तेथे मी सभोवतालच्या राष्ट्रांचा
    न्याय करायला बसेन.
13 विळा आणा,
    कारण पीक तयार झाले आहे.
या आणि द्राक्षे तुडवा.
    कारण द्राक्षकुंड भरून गेले आहे.
पिंप भरून वाहत आहेत.
    कारण त्यांचे पाप मोठे आहे.

14 निर्णयाच्या [c] दरीत पुष्कळशी माणसे आहेत.
    परमेश्वराचा विशेष दिवस जवळ आला आहे.
15 चंद्र-सूर्य काळवंडतील.
    तारे निस्तेज होतील.
16 परमेश्वर देव सियोनेहून गर्जना करील
तो यरुशलेमहून ओरडेल.
    आणि आकाश व पृथ्वी कापेल
पण परमेश्वराच्या लोकांना
    तो सुरक्षित स्थान असेल.
इस्राएलच्या लोकांना
    तो सुरक्षित जागा असेल.
17 “मगय तुम्हाला कळेल की मीच
    तुमचा परमेश्वर देव आहे.
माझ्या पवित्र पर्वतावर म्हणजे
    सियोनावर मी राहतो.
यरुशलेम पवित्र होईल.
    त्या नगरीतून पुन्हा कधीही परके जाणार नाहीत.

नवजीवनाचे यहूदाला वचन

18 त्या दिवशी, पर्वत गोड
    द्राक्षरसाने पाझरतील,
टेकड्यांवरून दूध वाहील,
    आणि यहूदाच्या कोरड्या पडलेल्या नद्यांमधून पाणी वाहील,
परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील
    आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील.
19 मिसर उजाड होईल.
अदोमाचे रान होईल.
    का? कारण ते यहूद्यांशी क्रूरपणे वागले.
त्यांनी त्यांच्या देशातील
    निष्पाप लोकांना मारले
20 परंतु, यहूदामध्ये नेहमीच
    लोक राहतील.
ते यरुशलेममध्ये
    पिढ्यान्पिढ्या वास करतील.
21 त्या लोकांनी माझ्या लोकांना ठार केले.
    म्हणून मी त्यांना खरोखरच शिक्षा करीन.”

कारण परमेश्वर देव सियोनमध्ये वस्ती करील.

Footnotes:

  1. योएल 3:2 यहोशाफाटाच्या दरी ह्या नावाचा अर्थ “परमेश्वराने न्याय दिला.”
  2. योएल 3:4 माझ्या … महत्व शब्दश: अर्थ माझा तुमचा काय संबंध?
  3. योएल 3:14 निर्णयाच्या दरी हे नाव यहोशाफाटच्या दरीप्रमाणेच आहे.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes