A A A A A
Bible Book List

निर्गम 39 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

याजकांची खास पवित्र वस्त्रे

39 पवित्र स्थानात सेवा करताना याजकांनी घालावयाची निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताची पवित्र वस्त्रे कारागिरांनी तयार केली; अहरोनासाठीही परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली.

एफोद

त्यांनी सोन्याच्या जरीचा आणि निव्व्या, जांभव्व्या, किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा एफोद तयार केला. त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले व ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुतात व कातलेल्या तलम सणाच्या कापडात भरली. त्यांनी एफोदसाठी खांदपट्ट्या केल्या व त्या एफोदाच्या दोन्ही टोकांना जोडल्या त्यांनी कमरपट्टा विणला व तो एफोदाला अडकवला. हा पट्टाही एफोदाप्रमाणेच म्हणजे सोन्याच्या जरीचा, निव्व्या, जांभव्व्या, किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा त्यांनी तयार केला.

कारागिरांनी इस्राएलच्या मुलांची नांवे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविली. मग देवाला इस्राएल लोकांची आठवण राहावी म्हणून त्यांनी ती रत्ने एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लावली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.

न्यायाचा ऊरपट

नंतर त्यांनी कुशल कारागिराकडून एफोदप्रमाणेच सोन्याच्या जरीचा, निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा न्यायाचा ऊरपट बनवून घेलता. न्यायाचा ऊरपट चौरस व्हावा म्हणून तो दुमडला; तो नऊइंच लांब व नऊ इंच रुंद असा चौरस होता. 10 मग कारागिरांनी त्या न्यायाच्या ऊरपटावर सुंदर रत्नांच्या चार रांगा बसविल्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक; 11 दुसऱ्या रांगेत पाचू नीलमणी व हिरा; 12 तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पक्षराग; 13 आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे, ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविली. 14 इस्राएलाच्या (याकोबाच्या) प्रत्येक मुलासाठी एक या प्रमाणे ती बारा रत्ने न्यायाच्या ऊरपटावर होती; एकेका रत्नावर एकेका मुलाचे नांव मुद्रा कोरतात त्याप्रमाणे त्यांनी कोरले होते.

15 दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखव्व्या त्यांनी न्यायाच्या ऊरपटावर लावल्या. 16 कारागिरांनी सोन्याची दोन कोंदणे व सोन्याच्या दोन गोल कड्या बनवून त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावल्या. 17 मग त्यांनी न्यायाच्या ऊपपटांऱ्या टोकांस लावलेल्या दोन्ही गोल कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखव्व्या घातल्या. 18 पीळ घातलेल्या दोन्ही साखव्व्यांनी दुसरी दोन टोके सोन्याच्या कोंदणात खोचून त्या त्यांनी एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला लावल्या. 19 मग त्यांनी सोन्याच्या आणखी दोन गोल कड्या करून त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर एफोदाच्या आतील बाजूच्या कडेला एफोदाजवळ लावल्या. 20 त्यांनी सोन्याच्या आणखी दोन कड्या खांदपट्ट्यांच्या तळाला एफोदाच्या समोर लावल्या. 21 त्यांनी नंतर न्यायाच्या ऊरपटाच्या गोल कड्या एफोदाच्या गोल कड्यांनी निव्व्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो एफोदावर घट्ट बसावा; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.

याजकांसाठी इतर वस्त्रे

22 नंतर त्यांनी एफोदाबरोबर घालावयाचा निव्व्या रंगाच्या सुताचा झगा कारागिराकडून विणून घेतला. 23 त्यांनी झग्याच्या मध्यभागी एक भोक ठेवले व त्या दरम्यान झगा फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती कापडाचा गोट शिवला.

24 मग त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती कातलेल्या तलम सणाच्या कापडाची व निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या कापडाची डाळींबे काढली. 25 नंतर त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली व ती झग्याच्या खालच्या घेराभोवती डाळींबाच्यामध्ये लावली. 26 झग्याच्या खालच्या घेराभोवती घुंगरुं मग डाळींब, पुन्हा घुंगरु मग डाळींब याप्रमाणे दोन डाळींबामध्ये एक घुंगरुं अशी ती झाली; हा झगा याजकाने परमेश्वराची सेवा करताना घालावयासाठी होता; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.

27 कारागिरांनी अहरोन व त्याच्या मुलांसाठी तलम सणाच्या विणलेल्या कापडाचे कुडते केले. 28 आणि त्यांनी तलम सणाचे मंदिल, फेटे व चोळणे केले. 29 मग त्यांनी तलम सणाच्या कापडाचा व निव्व्या जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा कमरपट्टा बनविला व त्यावर नक्षी काढली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.

30 मग त्यांनी पवित्र मुकुटासाठी शुद्ध सोन्याची पट्टी केली व तिच्यावर परमेश्वर पवित्र अशी अक्षरे कोरली. 31 त्यांनी ती सोन्याची पट्टी निव्व्या फितीवर लावली व ती निळी फीत मंदिला भोवती समोर बांधली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.

मोशे पवित्र निवास मंडपाची पाहिणी करतो

32 अशा प्रकारे पवित्र निवास मंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्व काही केले. 33 मग त्यांनी मोशेला सर्व सामान दाखवले; म्हणजे पवित्र निवास मंडप आणि तंबू व त्याचे सर्व समान म्हणजे गोल कड्या, आकड्या फळया, अडसर, खांब खांबाच्या खुर्च्या (बैठक); 34 आणि लाल रंगविलेली मंडप झाकण्याची मेंढ्यांची कातडी व तहशाची कातडी वे अंतरपट;

35 आज्ञापटाचा कोश, तो वाहून नेण्याचे दांडे आणि दयासन। 36 मेज, त्यावरील सर्व सामान व पवित्र समक्षतेची भाकर; 37 शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष त्यावरील दिवे व त्याची सर्व उपकरणे व दिव्यासाठी तेल; 38 सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या दारासाठी पडदा; 39 पितळेची वेदी व तिची पितळेची जाळी, वेदी वाहून नेण्याचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठकः

40 अंगणाचे पडदे व कनाती, खांब व त्याच्या खुर्च्या (बैठक), अंगणाच्या प्रवेश दाराचा पडदा तणावे, मेखा व पवित्र निवास मंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य:

41 पवित्र निवास मंडप, म्हणजे दर्शन मंडप सेवा करण्यासाठी विणलेली वस्त्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या मुलांची वस्त्रे;

42 परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सगळे काम केले. 43 लोकांनी काम केले ते सर्व मोशेने बारकाईने पाहिले; ते त्यांनी अगदी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes