A A A A A
Bible Book List

निर्गम 33 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

“मी तुमच्या बरोबर येणार नाही”

33 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्या बरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा. तुमच्यापुढे चालण्यास मी माझ्या दूताला पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोकांचा मी पराभव करीन व त्यांना तुमचा देश सोडावयास भाग पाडीन. तेव्हा तुम्ही दुधामधाच्या देशास जा; मी तुमच्याबरोबर येणार नाही कारण तुम्ही फार ताठमानेचे लोक आहात जर मी तुमच्या बरोबर आलो तर तुम्ही मला रागाला आणाल. कदाचित मी जर मी आलो तर रस्त्यातच तुम्हाला नष्ट करीन.”

ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु:खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत; कारण परमेश्वर मोशेला म्हणला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही फार ताठमानेचे लोक आहात; मी तुमच्या बरोबर थोडा वेळ जरी प्रवास केला तरी मी तुम्हाला नष्ट करीन; म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा; मग तुमचे काय करावयाचे ते मी ठरवीन.’” म्हणून होरेब पर्वतापासून (सीनाय पर्वतापासून) पुढे इस्राएल लोकांनी दागदागिने घालणे बंद केले.

दर्शन मंडप

मोशे छावणी बाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्याला “दर्शन मंडप” असे नांव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वराला काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शन मंडपाकडे जाई. ज्या ज्या वेळी मोशे छावणीतून दर्शन मंडपाकडे जाई त्या त्यावेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहात आणि मोशे दर्शन मंडपात जाईपर्यत त्याला बघत. जेव्हा मोशे तंबूत जाई तेव्हा उंच ढग खाली उतरून येई आणि दर्शन मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे. 10 जेव्हा लोक दर्शन मंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत.

11 ज्याप्रमाणे एखादा माणूस आपल्या मित्राशी बोलतो त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोरबोलत असे. परमेश्वराशी बोलल्यानंतर मोशे नेहमीआपल्या छावणीत माघारी जाई तरी मोशेचा मदतनीस. नूनाचा मुलगा यहोशवा हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.

मोशे परमेश्वराचे तेज पाहातो

12 मोशे परमेश्वराला म्हणाला, “ह्या लोकांना घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, ‘मी तुला तुझ्या नांवाने ओळखतो आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.’ 13 जर मी तुला खरोखर संतोष दिला असेल तर तू मला तुझे मार्ग शिकव. तुला जाणून घेण्याची माझी इच्छा आहे मग तुला सतत संतोष देणे मला जमेल. हे सर्व लोक तुझे आहेत याची तू आठवण ठेव.”

14 परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वतः तुझ्या बरोबर येईन व तुला विसावा देईन.”

15 मग मोशे परमेश्वराला म्हणाला, “जर तू आमच्याबरोबर येणार नाहीस तर मग आम्हाला या ठिकाणापासून पुढे पाठवू नकोस. 16 तसेच तू माझ्या विषयी व लोकांविषयी संतुष्ट आहेस ते आम्हाला कसे कळेल? जर तू आमच्याबरोबर येशील तर मग मात्र आम्हाला खातरीने कळेल! जर तू आमच्याबरोबर येणार नाहीस तर मग मी व हे लोक त्यांच्यात आणि पृथ्वीवरल कोणत्याही लोकात काही फरक राहणार नाही.”

17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण मी तुजवर संतुष्ट आहे आणि मी तुला तुझ्या नांवाने ओळखतो.”

18 नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.”

19 मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नांव मी जाहीर करीन म्हणजे तू ते ऐकशील कारण मी निवडलेल्या कोणावरही दया करीन व त्यांच्यावर प्रेम करीन. 20 परंतु तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही माणूस जगणार नाही.

21 “माझ्याजवळ ह्या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा. 22 माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यत माझ्या हाताने तुला झाकीन; 23 नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठपाहाशील; परंतु तू माझा चेहरा पाहाणार नाहीस.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes