A A A A A
Bible Book List

निर्गम 2 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

मोशे बाळ

लेवी वंशातील एक माणूस होता. त्याने लेवी वंशातीलच मुलगी बायको केली. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला; तो मुलगा फार सुंदर व देखणा आहे असे पाहून त्याच्या आईने त्याला तीन महिने लपवून ठेवले. तो बाळ मुलगा असल्यामुळे सापडला जाईल व मारला जाईल अशी त्याच्या आईला भीती वाटली. तीन महिन्यानंतर तिने एक लव्हाव्व्याची पेटी तयार केली; ती पाण्यावर तरंगावी म्हणून तिने तिला आतून व बाहेरून डांबर लावले. तिने त्या तान्ह्या बाळाला पेटीत ठेवले; नंतर तिने ती पेटी नदीत उंच लव्हाव्व्यात ठेवली. त्या बाळाची बहीण, त्याचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी तेथून दूर बाजूला उभी राहिली.

त्याच वेळी फारोची मुलगी (राजकन्या) आंघोळ करण्यासाठी नदीवर गेली. तिच्या दासी नदीच्या किनाऱ्यावर फिरत होत्या. राजकन्येने उंच लव्हाव्व्यात ती पेटी पाहिली; आणि एका दासीला तिकडे जाऊन ती पेटी आणण्यास सांतगितले. राजकन्येने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले, ते बाळ रडत होते, म्हणून तिला त्याच्याबद्दल फार वाईट वाटले! ती म्हणाली, “हा बाळ कोणातरी इब्री म्हणजे इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेला मुलगा आहे.”

मग आतापर्यत लपून बसलेली ती बाळाची बहीण राजकन्येकडे गेली व म्हणाली, “या बाळाची काळजी घेण्यासाठी मी जाऊन एखादी इब्रीदाई शोधून आणू का?”

राजकन्येने उत्तर दिले, “होय कृपाकरून लवकर घेऊन ये.”

तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.

राजकन्या त्या बाईला म्हणाली, “बाई, ह्या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्याला दूध पाज आणि त्याची चांगली काळजी घे; त्याबद्दल मी तुला मोबदला देईन.”

तेव्हा त्या बाईने ते बाळ घेतले आणि त्याची योग्य काळजी घेतली. 10 ते मूल वाढले. मग काही काळानंतर एके दिवशी ती बाई त्या बाळाला घेऊन राजकन्येकडे आली; तेव्हा राजकन्येने ते बाळ घेतले आणि त्याला आपला स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारले; तिने त्याचे नांव मोशे ठेवले कारण तिने त्याला पाण्यातून उचलून घेतले होते.

मोशे आपल्या लोकांस मदत करतो

11 मोशे वाढत जाऊन एक तरूण माणूस झाला. तेव्हा आपल्या इब्री लोकांस फार कष्टाची कामे करावयास भाग पाडले जात आहे हे त्याने पहिले. एके दिवशी एक मिसरचा माणूस इब्री माणसास मारत असताना त्याने पाहिले. 12 तेव्हा आपल्याकडे पाहणारा आजूबाजूला कोणीही नाही हे जाणून मोशेने त्या मिसरच्या माणसाला जिवे मारले व वाळूत पुरुन टाकले.

13 दुसऱ्या दिवशी दोन इब्री माणसे मारामारी करत होती. मोशेने पहिले की त्यांच्यामधील एक दोषी आहे. मोशे त्याला म्हणाला, “तू आपल्या शेजाऱ्याला का मारत आहेस?”

14 त्या माणसाने उत्तर दिले, “तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? मला सांग! तू काल [a] जसे त्या मिसरच्या माणसाला जिवे मारलेस, तसे मला मारावयास पाहातोस काय?”

तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वतःशीच म्हणाला, “मी काय केले ते आता सर्वाना माहीत झाले आहे.”

15 मोशेन काय केले हे फारोला समजले तेव्हा त्याने त्याला जिवे मारावयाचे ठरवले. परंतु मोशे फारोपासून दूर पळून गेला. तो मिद्यान देशात गेला आणि तेथे एका विहिरीजवळ थांबला.

मिद्यान देशात मोशे

16 मिद्यानात एक याजक होता. त्याला सात मुली होत्या; आपल्या बापाच्या शेरडामेंढरास पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या डोणीत पाणी भरण्याचा प्रयत्न करीत होत्या; 17 परंतु काही मेंढपाळांनी त्यांना पाणी भरू न देता हुसकून लावले. तेव्हा मोशेन त्या मुलींना त्यांच्या शेरडामेंढरांस पाणी पाजण्यास मदत केली.

18 मग त्या मुली आपला बाप रगुवेल याच्याकडे गेल्या; तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही आज एवढ्या लवकर घरी कशा आला?”

19 मुलींनी उत्तर दिले, “तेथील मेंढपाळांनी आम्हाला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. परंतु एका मिसरच्या माणसाने आम्हाला मदत केली. त्याने आम्हासाठी पाणी काढून आपल्या शेरडेमेंडरास पाजले.”

20 तेव्हा रगुवेल आपल्या मुलींना म्हणला, “तो माणूस कोठे आहे? तुम्ही त्याला सोडून का आला? त्याला आपल्या घरी जेवावयास बोलावून आणा.”

21 त्या माणसापाशी राहण्यास मोशेला आनंद वाटला. त्या माणसाने आपली मुलगी सिप्पोरा हिच्याबरोबर त्याचे लग्न करून दिले. 22 सिप्पोराला एक मुलगा झाला. मोशेने त्याचे नांव गेर्षोम ठेवले.

देव इस्राएल लोकानां मदत करण्याचे ठरवतो

23 बऱ्याच वर्षानंतर मिसरचा राजा मरण पावला. अजूनही इस्राएल लोकानां अतिशय कष्टाची कामे करावी लागत होती. त्यांनी मदतीकरिता हाका मारल्या व देवाने त्या ऐकल्या; 24 देवाने त्यांच्या प्रार्थना ऐकल्या आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराची त्याला आठवण झाली. 25 देवाने इस्राएल लोकांचे हाल पाहिले आणि त्यांना लगेच मदत करावयाचे ठरवले.

Footnotes:

  1. निर्गम 2:14 काल या अर्थाचा शब्द प्राचीन ग्रीक भाषांतरात अढळतो; तो मूळ इब्री भाषेलीत आवृतीत नाही.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes