A A A A A
Bible Book List

दानीएल 3 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

सोन्याची मूर्तो व तापलेली भट्टी

नबुखद्नेस्सर राजाने एक सोन्याची मुर्तो केली होती. ती 90 फूट [a] उंचीची व 9 फूट [b] रूंदीची होती. नंतर त्याने ती दुरा नावाच्या सपाट प्रदेशात स्थापिली. हा सपाट प्रदेश बाबेल परगण्यात होता. मग राजाने प्रांताधिकारी, मुलकी अधिकारी, राज्यपाल, सल्लागार, कोषाधिकारी, न्यायाधीश, राज्याचे कारभारी व राज्याच्या इतर सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांना एकत्र बोलाविले त्या सर्वांनी मुर्तोच्या प्रतिष्ठापनेसाठी एकत्र जमावे अशी राजाची इच्छा होती.

म्हणून ते सर्वजण येऊन नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या मुर्तोसमोर उभे राहिले. तेव्हा राजाच्या वतीने घोषणा करणारा मोठ्याने म्हणाला, “निरनिराव्व्या राष्ट्रांतून आलेल्या व वेगवेगव्व्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, लक्षपूर्वक ऐका! तुम्हाला पुढील आज्ञा करण्यात येत आहे: सर्व प्रकारच्या वाद्यांचा आवाज ऐकताच तुम्ही नतमस्तक झाले पाहिजे. शिंगे, बासरी, सतार अलगुजे वीणा, तंबोरा ह्या व इतर वाद्यांचा आवाज ऐकताच, तुम्ही सोन्याच्या मूर्तोची पूजा केली पाहिजे. नबुखद्नेस्सर राजाने तिची स्थापना केली आहे. जर कोणी नतमस्तक होऊन मूर्तोची पूजा करण्याचे टाळले तर त्याला अतितप्त भट्टीत ताबडतोब फेकून देण्यात येईल.”

त्यामुळे शिंग, बासरी, सतार, अलगुजे, तंबोरा ह्यांचा व इतर वाद्यांचा आवाज ऐकताच सर्वांनी नतमस्तक होऊन मूर्तीची पूजा केली. सर्व लोक, राष्ट्रे सर्व, भाषक ह्यांनी नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या मूर्तोची पूजा केली.

ह्यांनंतर काही खास्दी राजाकडे येऊन यहूद्यांविरुध्द तक्रार करू लागले. ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले, “राजा चिरंजीव होवो! 10 राजा शींग, बासरी, सतार, अलगुजे,वीणा, तंबोरा ह्या व इतर सर्व वाद्यांचा आवाज ऐकताच प्रत्येकाने नतमस्तक होऊन सोन्याच्या मूर्तोची पूजा करण्याची आज्ञा तू दिली होतीस. 11 आणि तू असेही म्हणाला होतास की जो कोणी असे करणार नाही त्याला तापलेल्या भट्टीत टाकून देण्यात येईल. 12 पण राजा काही यहूद्यांनी तुझ्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले. त्यांना तू बाबेल परगण्याचे मुख्य अधिकारी म्हणून नेमलेस, शद्रख, मेशख, अबेद्नगो हेच ते यहूदी होत. ते तुझ्या दैवताला पूजत नाहीत. तू स्थापलेल्या मर्तोपुढे नतमस्तक होऊन, त्यांनी मूर्तोची पूजा केली नाही.”

13 नबुखद्नेस्सरला राग आला. त्याने शद्रख, मेशख व अबेद्नगो यांना बोलविणे पाठविले. मग त्यांना राजापुढे आणण्यात आले. 14 नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, शद्रख, मेशख, अबेद्नगो, तुम्ही माझ्या दैवताला पूजत नाही हे खरे आहे का? मी स्थापलेल्या सोन्याच्या मूर्तोची नतमस्तक होऊन तुम्ही पूजा केली नाही, हेही खरे का? 15 तुम्ही शिंगे, बासरी, सतार, अलगुजे,वीणा,तंबोरा ह्यांचा व इतर वाद्यांचा आवाज ऐकताच नतमस्तक होऊन सोन्याच्या मूर्तोची पूजा केली पाहिजे. मी घडविलेल्या मूर्तोची पूजा करण्यास तुम्ही तयार असाल तर चांगलेच आहे. पण तुम्ही पूजा केली नाही तर तुम्हाला ताबडतोब तापलेल्या भट्टीत टाकण्यात येईल. मग माझ्या हातून कोणताच देव तुमची सुटका करू शकणार नाही.

16 शद्रख, मेशख व अबेद्नगो राजाला म्हणाले, “नबुखद्नेस्सर, ह्या गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. 17 जर तू आम्हाला भट्टीत टाकलेस, तर आम्ही उपासना करीत असलेला देव आमचे रक्षण करू शकतो आणि त्याची इच्छा असल्यास तो तुझ्यापासून आमचा बचावही करू शकतो. 18 पण जरी देवाने आम्हाला वाचविले नाही, तरी हे राजा,आम्ही तुझ्या दैवतांना आम्ही भजणार नाही, हे लक्षात ठेव तू स्थापलेल्या सोन्याच्या मूर्तोची आम्ही पूजा करणार नाही.”

19 मग नबुखद्नेस्सराला खूप राग आला. त्याने शद्रख मेशख व अबेद्नगो यांच्याकडे तुच्छतेने पाहिले. त्याने भट्टी नेहमीपेक्षा सातपट तापविण्याची आज्ञा दिली. 20 मग नबुखद्नेस्सरने त्याच्या सैन्यातील काही बलवान सैनिकांना शद्रख, मेशख व अबेद्नगो यांना बांधण्याचा हुकूम केला आणि त्यांना त्या तिघांना तापलेल्या भट्टीत टाकायला सांगितले.

21 मग त्या तिघाना बांधून भट्टीत टाकण्यात आले. त्यानी अंगरखे, विजारी, टोप्या आणि इतर कपडे घातलेले होते. 22 राजा हुकूम देतेवेळी अतिशय रागावला असल्याने त्यांनी घाईघाईन भट्टी तापविली भट्टीची आच एवढी होती की तिच्या ज्वाळांनी बलवान सैनिक मेले. शद्रख मेशख, व अबेद्नगो यांना टाकण्यासाठी ते भट्टीजवळ गेले तेव्हाच ते ज्वाळांनी भाजून मेले. 23 शद्रख, मेशख, अबेद्नगो भट्टीत पडले. त्यांना अगदी घट्ट बांधले होते.

24 मग नबुखद्नेस्सरने एड्ढदम उडी मारली. तो आश्चर्यचकीत झाला. त्याने आपल्या सल्लागारांना विचारले, “आपण तिघांनाच बांधले आणि तिघांनाच भट्टीत टाकले खरे ना?”

सल्लागार उत्तरले, “हो महाराज!”

25 मग राजा म्हणाला, “पाहा! मला अग्नीमध्ये चार माणसे चालताना दिसतात. ते बांधलेले नाहीत व जळलेलेही नाहीत. चौथा देवदूताप्रमाणे [c] दिसत आहे.”

26 मग नबुखद्नेस्सर तापलेल्या भट्टीच्या तोंडाजवळ गेला. तो ओरडला, “शद्रख, मेशख, अबेद्नगो, बाहेर या. परात्पर देवाच्या सेवकांनो, इकडे या.”

मग ती तिघे आगीतून बाहेर आले. 27 ते बाहेर येताच, प्रांताधिकारी, मुलकी अधिकारी, राजाचे सल्लागार राज्यपाल ह्यांनी त्यांच्याभोवती गर्दो केली. आगीने शद्रख, मेशख व अबेद्नगो जळाले नाही हे त्यांनी पाहिले होते. त्याचे अंग, केस किंवा वस्त्रे काहीच जळाले नव्हते. एवढेच नव्हे तर ते आगीत असूनसुध्दा त्यांच्या अंगाला जळकट वास येत नव्हता.

28 मग नबुखद्नेस्सर म्हणाला शद्रख मेशख व अबेद्नगो यांच्या देवाचे स्तवन करा.त्याने देवदूताला पाठवून आपल्या सेवकांचे आगीपासून रक्षण केले. ह्या तिघांनी आपल्या देवावर निष्ठा ठेवली त्यांनी माझा हुकूम मानला नाही आणि दुसऱ्या दैवताला भजण्या-पूजण्याऐवजी ते मरण्यास तयार झाले. 29 म्हणून मी आता असा नियम करतो की शद्रख, मेशख व अबेद्नगो यांच्या देवाच्याविरुध्द बोलणाऱ्याचे मग तो कोठल्याही राष्ट्राचा वा कोठलीही भाषा बोलणारा असो, तुक़डे तुकडे करण्यात येतील. व त्याच्या घराची राखरांगोळी करण्यात येईल. दुसरा कोठलेही दैवत आपल्या माणसांना असे वाचवू शकणार नाही. 30 मग राजाने त्या तिघांना बाबेल परगण्यात आणखी महत्वाची पदे दिली.

Footnotes:

  1. दानीएल 3:1 90 फूट शब्दश: 60 हात.
  2. दानीएल 3:1 9 फूट शब्दश: 6 हात.
  3. दानीएल 3:25 देवदूत शब्दश: देवाचा पुत्र.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes