A A A A A
Bible Book List

गीतरत्न 5 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

तो म्हणतो

माझ्या प्रिये, माझ्या वधू, मी माझ्या बागेत गेलो.
    मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये घेतली.
मी माझा मध व मधाचे पोळे खाल्ले.
    मी माझा द्राक्षारस व दूध प्यालो.

स्त्री प्रेमिकांशी बोलते

प्रिय मित्रांनो, खा, प्या.
    प्रेमाने धुंद व्हा.

ती म्हणते

मी झोपलेली आहे.
    पण माझे हृदय जागे आहे.
माझा प्रियकर दार वाजवतो ते मी ऐकते.
    “प्रिये माझ्यासाठी दार उघड माझ्या प्रेमा,
    माझ्या कबुतरा, माझ्या सर्वोत्कृष्टा!
माझे डोके दवाने ओले झाले आहे.
    माझे केस रात्रीच्या धुक्याने ओले झाले आहेत.”

“मी माझा पोषाख काढून टाकला आहे.
    मला तो पुन्हा घालायचा नाही.
मी माझे पाय धुतले आहेत.
    मला ते पुन्हा घाण करायचे नाहीत.”

पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातला [a]
    आणि माझे हृदय त्याच्यासाठी हेलावले. [b]
माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले.
    माझ्या हातातून गंधरस गळत होता.
इतर सुवासिक द्रव्ये माझ्या बोटांतून
    कुलुपाच्या कडीवर गळत होती.
मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले.
    पण माझा प्रियकर तोंड फिरवून निघून गेला होता.
तो गेला तेव्हा
    मी जवळ जवळ गतप्राण झाले. [c]
मी त्याला शोधले
    पण तो मला सापडू शकला नाही.
मी त्याला हाक मारली
    पण त्याने मला ओ दिली नाही.
शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले.
    त्यांनी मला मारले,
    इजा केली.
भिंतीवरच्या पहारेकऱ्यांनी
    माझा अंगरखा घेतला.

यरुशलेमच्या स्त्रियांनो! मी तुम्हाला सांगते,
    जर तुम्हाला माझा प्रियकर दिसला, तर त्याला सांगा की मी प्रेमविव्हळ झाले आहे. [d]

यरुशलेमच्या स्त्रिया तिला उत्तर देतात

सुंदर स्त्रिये!
    तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून वेगळा कसा?
तो इतर प्रियकरांपेक्षा चांगला आहे का?
    म्हणूनच तू आम्हाला वचन द्यायला सांगत आहेस का?

ती यरुशलेमच्या स्त्रियांना उत्तर देते

10 माझा प्रियकर उन्हाने काळवंडला आहे व तेजस्वी दिसतो.
    तो दहा हजार माणसात उठून दिसेल.
11 त्याचे मस्तक शुध्द् सोन्याप्रमाणे आहे.
    त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंबकावळ्यासारखे काळे आहेत.
12 त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत,
    दुधाच्या थारोळ्यातील कबुतरासारखे आहेत कोदंणातल्या हिऱ्यासारखे आहेत.
13 त्याचे गाल मसाल्याच्या पदार्थांच्या बागेप्रमाणे आहेत,
    अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत.
त्याचे ओठ सुंगध गळणाऱ्या
    कमलपुष्पाप्रमाणे आहेत.
14 त्याचे बाहू रत्नांनी जडवलेल्या
    सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत.
त्याचे शरीर नीलमणी जडवलेल्या
    मऊ हस्तिदंतासारखे आहे.
15 त्याचे पाय सोन्याचा पाया
    असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत.
तो लबानोनमधल्या गंधसरुच्या
    झाडासारखा उंच उभा राहतो.
16 होय, यरुशलेमच्या स्त्रियांनो, माझा प्रियकर खूप हवाहवासा वाटणारा आहे.
    त्याचे तोंड सर्वांत गोड आहे.
तोच माझा प्रियकर,
    तोच माझा सखा आहे.

Footnotes:

  1. गीतरत्न 5:4 पण … हात घातला किंवा “त्याचा हात ओढला एका अर्थाने याचा संबंध कुलुप आणि किल्लीशी असू शकेल.” काही जुन्या किल्ल्या हातासारख्या असत. किल्ली दारातून एका छिद्रात आत सरकवत आणि “बोटे” खास छिद्रात नीट बसत.यामुळे खिटी सरकत असे व कुलुप उघडत असे वा बंद होत असे.
  2. गीतरत्न 5:4 माझे … हेलावले शब्दश: “त्याच्यासाठी माझी आंतडी तुटली.”
  3. गीतरत्न 5:6 तो … झाले किंवा “तो बोलला तेव्हा माझा आत्मा बुडाला.”
  4. गीतरत्न 5:8 मी … आहे शब्दश: “मला प्रेमज्वर झाला आहे.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes