A A A A A
Bible Book List

उत्पत्ति 10 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

राष्ट्रांची वाढ आणी प्रसार

10 शेम, हाम व याफेथ ह्या नोहाच्या तीन मुलांना जलप्रलयानंतर पुष्कळ मुलगे झाले; त्यांची वंशावळ येणे प्रमाणे:

याफेथाचे वंशज

याफेथाचे मुलगे; गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.

गोमरचे मुलगे; आष्कनाझ, रीपाथ व तोगार्मा, हे होते.

यावानाचे मुलगे; अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.

भूमध्यासमुद्रच्या किनाऱ्याच्या आसपास जी राष्ट्रे झाली ती सर्व याफेथाच्या संततीपासून होती; प्रत्येक मुलाला स्वतःची जमीन होती ही सर्व कुळे वाढत गेली व त्यांची वेगवेगळी राष्ट्रे झाली. प्रत्येक राष्ट्राची भाषा वेगळी होती.

हामाचे वंशज

हामचे मुलगे याप्रमाणे होते: कूश, मिस्राईम, पूट व कनान

कुशाचे मुलगे: सबा, हवीला, साब्ता, रामा, व साव्तका;

आणि रामाचे मुलगे शबा व ददान हे होते.

कुशाला निम्रोद नावाचा मुलगा होता, तो पृथ्वीवर महाबलवान व पराक्रमी असा वीरपुरुष होता. तो परमेश्वरापुढे बलवान शिकारी झाला म्हणून इतर माणसांची निम्रोदाशी तुलना करुन “तो माणूस, परमेश्वरासमोर बलवान निम्रोद शिकाऱ्यासारखा आहे” असे म्हणण्याची प्रथा आहे.

10 शिनार प्रांतातील बाबेल, एरक, अक्काद व कालहने ही निम्रोदाच्या राज्यातील सुरवातीची शहरे होती. 11 तेथून तो अश्शुरालाही गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईरकालह व रेसन ही शहरे वसवली 12 (रेसन हे शहर, निनवे व मोठे शहर कालह यांच्या दरम्यान आहे.)

13 मिस्राईम याला लूद, अनामीन, लहाकीम, नाप्तुहीम 14 पात्रुस कास्लूह व कप्तोरी हे मुलगे झाले. कास्लूहपासून पलिष्टी लोक आले.

15 कनानाचा पहिला मुलगा सीदोन हा होता; कनान हा हेथचाही बाप होता. कनानापासून उदयास आलेली राष्ट्रे, 16 यबूसी, अमोरी, गिर्गाशी, 17 हिव्वी, आरकी, शीनी 18 अर्वादी, समारी व हमाथी ही होती.

पुढे कनानाची कुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात पसरली. 19 कनान्यांची सीमा उत्तरे कडील सीदोनापासून दक्षिणेकडील गरारापर्यंत व पश्चिमेकडील गाजापासून तर पूर्वेस सदोम व गमोरा पर्यंत तसेच आदमा पासून व सबोईम पासून व लेशापर्यंत पसरली होती.

20 ही सर्व हाम याची वंशजे होती; हया सर्व वंशजांना स्वतःची भाषा व देश होते; ती सर्व वेगवेगळी राष्ट्रे झाली.

शेम याचे वंशज

21 शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो इब्री लोकांचा मुळ पुरुष होता.

22 शेम याचे मुलगे; एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम;

23 अरामाचे मुलगे: ऊस, हूल, गेतेर व मश हे होते;

24 अर्पक्षदास शेलह झाला,

शेलहास एबर झाला:

25 एबर यास दोन मुलगे झाले; एकाचे नाव पेलेग होते. पेलेग म्हणजे वाटणी; कारण याच्याच हयातीत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.

26 यक्तानास अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, 27 हदोराम, ऊजाल, दिक्ला 28 ओबाल, अबीमाएल, शबा, 29 ओफीर, हवीला व योबाब असे मुलगे झाले; हे सगळे यक्तानाचे मुलगे; 30 ते मेशापासून पूर्वेकड़ील डोंगराळ भागात राहात होते. मेशा सफारच्या देशाकडे होते.

31 हे शेमाचे वंशज होते. कुळे, भाषा, देश व राष्ट्रे याप्रमाणे त्यांची विभागणी अशी आहे.

32 ही नोहाच्या मुलांची व त्यांच्या वंशजांची, पिढ्या व कुळाप्राणे यादी आहे; त्यांच्या राष्ट्रांप्रमाणे ती आखलेली आहे; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर वेगवेगळी राष्ट्रे झाली.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes