A A A A A
Bible Book List

ईयोब 40 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

40 परमेश्वर ईयोबाला म्हणाला:

“ईयोबा, तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास.
    तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस.
आता तू चुकलास हे तू कबूल करशील का?
    तू मला उत्तर देशील का?”

मग ईयोबाने देवाला उत्तर दिले तो म्हणाला:

“मी अगदी नगण्य [a] आहे.
    मी काय बोलू?
मी तुला उत्तर देऊ शकत नाही.
    मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो.
मी एकदा बोललो होतो.
    पण आता अधिक बोलणार नाही.
    मी दोनदा बोललो पण मी आता अधिक बोलणार नाही.”

नंतर परमेश्वर वादळातून पुन्हा ईयोबाशी बोलला. तो म्हणाला:

“ईयोबा, तू आता कंबर कसून [b] उभा राहा
    आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला सिध्द हो.

“ईयोबा, मी न्यायी नाही असे तुला वाटते का?
    मी काही चूक केल्याचा आरोप करुन तू स्वतःचे निरपराधित्व सिध्द करु पहात आहेस.
ईयोबा तुझे बाहू देवाच्या बाहूंइतके शक्तिशाली आहेत का?
    देवाच्या आवाजासारखा तुझा आवाज गडगडाटी आहे का?
10 जर तू देवासारखा असलास तर तुला स्वतःबद्दल अभिमान वाटू दे.
    आणि तुला मान मिळू दे.
    तू जर देवासारखा असलास तर तू मानमरातब आणि वैभव कपड्यांसारखे घालू शकतोस.
11 तू जर देवासारखा असलास तर तू तुझा राग दाखवू शकतोस आणि गर्विष्ठ लोकांना शिक्षा करु शकतोस.
    गर्विष्ठांना मान खाली घालायला लावू शकतोस.
12 होय ईयोबा त्या गर्विष्ठांकडे बघ आणि त्यांना नम्र कर.
    वाईट लोकांना जागच्या जागी चिरडून टाक.
13 त्यांना चिखलात पुरुन टाक.
    त्यांचे शरीर गुंडाळून थडग्यात टाकून दे.
14 ईयोबा, तू जर या सगळ्या गोष्टी करु शकशील तर मी सुध्दा तुझी स्तुती करीन.
    आणि तु तुझ्या सामर्थ्याने स्वतःला वाचवू शकतोस हे मी मान्य करीन.

15 “ईयोबा, तू बेहेमोथ कडे बघ.
    मी (देवाने) तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले.
    बेहेमोथ गायीसारखे गवत खातो.
16 बेहेमोथच्या अंगात बरीच शक्ती आहे.
    त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत.
17 बेहेमोथची शेपटी देवदाराच्या झाडासारखी उभी राहते.
    त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.
18 बेहेमोथची हाडे पितळेसारखी बळकट आहेत.
    त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी.
19 बेहेमोथ हा अतिशय आश्र्चर्यकारक प्राणी मी (देवाने) निर्माण केला आहे.
    परंतु मी त्याचा पराभव करु शकतो.
20 डोंगरावर जिथे जंगली श्र्वापदे खेळतात
    तिथले गवत बेहेमोथ खातो.
21 तो कमळाच्या झाडाखाली झोपतो.
    बेहेमोथ दलदलीतल्या लव्हाळ्यात लपतो.
22 कमळाचे झाड बेहेमोथला आपल्या सावलीत लपवते.
    तो नदीजवळ उगवणाऱ्या एका वृक्षाखाली (विलोवृक्ष) राहतो.
23 नदीला पूर आला तर बेहेमोथ पळून जात नाही.
    यार्देन नदीचा प्रवाह त्याच्या तोंडावर आदळला तरी तो घाबरत नाही.
24 बेहेमोथचे डोळे कुणीही बांधू शकणार नाही
    आणि त्याला सापळ्यात अडकवू शकणार नाही.

Footnotes:

  1. ईयोब 40:4 नगण्य किंवा “बिनमहत्वाचा.”
  2. ईयोब 40:7 कंबर कसून शब्दश: “सैनिकासारखा कंबर कसून” याचा अर्थ “युध्दाला तयार हो.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes