A A A A A
Bible Book List

ईयोब 37 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

37 “गडगडाट व वीजा ह्यांची मला भिती वाटते.
    तेव्हा माझ्या ह्रदयाची धडधड वाढते.
प्रत्येक जण लक्षपूर्वक ऐका! देवाचा आवाज गडगडाटासारखा वाटतो.
    देवाच्या मुखातून येणारा गडगडाटासारखा आवाज ऐका.
देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो.
    ती सर्व पृथ्वीभर चमकते.
वीज चमकते तेव्हा देव गडगडाटी आवाज काढतो.
    देव त्याच्या अद्भुत आवाजात गर्जतो.
वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.
देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे.
    देव आपल्याला न कळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.
देव ‘हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.’
    देव ‘पावसाला पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’
देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांना तो काय करु शकतो
    हे कळावे म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे.
पशू त्यांच्या घरकुलात जातात आणि तेथेच राहतात.
दक्षिणेकडून चक्रीवादळ येते.
    उत्तरेकडून थंड वारे येतात.
10 देवाच्या नि:श्वासाने बर्फ होते
    आणि समुद्र गोठतो.
11 देव ढगांना पाण्याने भरतो
    आणि तो ते पसरवतो.
12 तो ढगांना सर्व पृथ्वीभर पसरण्याची आज्ञा करतो.
    देव जी आज्ञा देतो ती ढग पाळतात.
13 देव लोकांना शिक्षा करण्यासाठी ढग आणतो,
    पूर आणतो किंवा त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी पाणी आणतो.

14 “ईयोबा, एक क्षणभर थांब आणि लक्ष दे.
    थांब आणि देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांचा विचार कर.
15 ईयोब, देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का?
    तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का?
16 ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का?
    देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याचे ढग हे केवळ एक उदाहरण आहे.
    आणि देवाला त्याबद्दल सारे माहीत आहे.
17 परंतु ईयोब तुला या गोष्टी माहीत नाहीत.
    तुला फक्त एवढेच माहीत आहे की दक्षिणेकडून गरम वारे वाहतात तेव्हा तुला घाम येतो,
    तुझे कपडे अंगाला चिकटतात आणि सगळे काही स्तब्ध असते.
18 ईयोब, तू देवाला आकाश पसरवण्यात
    आणि ते आरशाप्रमाणे करण्यात मदत करु शकशील का?

19 “ईयोब, देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग.
    काय बोलावे ते आम्हाला कळत नाही कारण आम्हाला जास्त माहिती नाही.
20 मला देवाशी बोलायचे आहे असे मी म्हणणार नाही.
    तसे म्हणणे म्हणजे स्वतःचा नाश करुन घेणे आहे.
21 माणूस सूर्याकडे बघू शकत नाही.
    वाऱ्याने ढग पळवून लावले की तो फार तेजस्वी आणि चकचकीत दिसतो.
22 आणि देवसुध्दा तसाच आहे.
    देवाची सुवर्णप्रभा दक्षिणेकडील पर्वतावरुन [a] चमकते.
    देवाच्या भोवती तेजोवलय असते.
23 तो सर्वशक्तिमान देव महान आहे.
    आपण त्याला समजू शकत नाही.
तो सामर्थ्यवान आहे परंतु तो आपल्याशी चांगला आणि न्यायाने वागतो.
    देवाला आपल्याला त्रास द्यायची इच्छा नसते.
24 म्हणूनच लोक देवाला मान देतात.
    परंतु देव आपल्या शहाणपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना मान देत नाही.”

Footnotes:

  1. ईयोब 37:22 पर्वत किंवा “दक्षिण” किंवा “झाफॉज.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes