A A A A A
Bible Book List

आमोस 2 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

मवाबसाठी सजा

परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “मवाबच्या लोकांनी पुष्कळ अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच. का? कारण त्यांनी अदोमच्या राजाची हाडे जाळून त्याचा चुना केला. म्हणून मी मवाबमध्ये आग लावीन. ती आग करीयोथचे उंच मनोरे नष्ट करून टाकील. तेथे भयंकर आरडाओरड होईल, रणशिंगाचा आवाज होईल आणि मवाब नष्ट होईल. अशारीतीने, मवाबच्या राजांचा शेवट करीन. मी मवाबच्या नेत्यांना ठार करीन.” परमेश्वर असे म्हणतो.

यहूदाला शिक्षा

परमेश्वर असे म्हणतो, “यहूदाने पुष्कळ अपराध केले असल्यामुळे मी यहूदाला शिक्षा करीन. का? कारण त्यांनी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्यास नकार दिला. त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांच्या पूर्वजांनी असत्यावर विश्वास ठेवला. यहूदाच्या लोकांनी परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यास हे असत्यच कारणीभूत झाले. म्हणून यहूदात आग लावीन. त्या आगीत यरुशलेमचे उंच मनोरे भस्मसात होतील.”

इस्राएलला शिक्षा

परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “इस्राएलने पुष्कळ अपराध केले आहेत म्हणून मी त्याला शिक्षा करणारच. का? कारण इस्राएल लोकांना विकले. त्यांनी गरिबांना जोड्याच्या किंमतीला विकले. गरिबांना धुळीत लोटून त्यांनी त्या गरिबांना तुडविले. दु:खितांची गाव्हाणी ऐकणे त्यांनी सोडून दिले. मुले वडील यांनी एकाच स्त्रीशी शारिरिक संबंध ठेवले. त्यांनी माझे नाव धुळीला मिळवले. ते गरीब लोकांजवळून कपडे घेतात आणि वेदीजवळ बसून पूजा करताना त्या कपड्यावरच बसतात. ते गरिबांना पैसे कर्जाऊ देतात आणि त्याबदल्यात त्यांचे कपडे गहाण म्हणून ठेवून घेतात. ते लोकांना दंड देण्यास भाग पाडतात आणि त्या पैशातून स्वतःसाठी मद्य विकत घेतात व त्यांच्या दैवतांच्या देवळात बसून ते पितात.

“पण प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोरींना मारणारा मीच होतो. अमोरी गंधसंरूप्रमाणे उंच होते. ते अल्लोन वृक्षांप्रमाणे बळकट होते. परंतु मी त्यांच्या वरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला.

10 “तुम्हाला मिसरमधून आणणारा मीच तो एकमेव! 40 वर्षे मी तुम्हाला वाळवंटातून पार नेले व अमोरींचा प्रदेश घेण्यास मीच तुम्हाला मदत केली. 11 मी तुमच्यापैकी काही मुलांना संदेष्टे बनविले व तुमच्यातील काही तरुणांना नाजीर बनविले, इस्राएल लोकांनो हे खरे आहे!” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. 12 “पण तुम्ही नाजीरांना मद्य प्यायला लावले व संदेष्ट्यांना संदेश देण्यास मनाई केली. 13 तुम्ही मला बोजाप्रमाणे आहात खूप वाळलेले गवत भरलेल्या गाडीप्रमाणे मी खाली वाकलो आहे. पण मी ह्याच तव्हेने तुम्हाला खाली दाबून टाकीन [a]. 14 कोणीही पळून जाऊ शकणार नाही. अगदी जोरात धावणारा सुध्दा! बलवान पुरेसे बलवान राहणार नाहीत. सैनिक पळून जाऊन स्वतःला वाचवू शकणार नाहीत. 15 धनुर्धारी वाचणार नाहीत. जोरात धावणारे पळून जाणार नाहीत. घोडेस्वार जिवंत राहणार नाहीत. 16 त्या वेळी खूप शूर सैनिकसुध्दा पळून जातील. त्यांना कपडे घालण्याससुध्दा वेळ मिळणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो.

Footnotes:

  1. आमोस 2:13 दाबून टाकीन ह्याचा अर्थ बहुधा “मी तुम्हाला त्रास देईन.” असा असावा.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes