A A A A A
Bible Book List

अनुवाद 6 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

परमेश्वराची आज्ञा पाळा व परमेश्वरावर प्रेम करा

“तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलेले विधी, नियम व आज्ञा त्या ह्याच. ज्या प्रदेशात तुम्ही राहण्यासाठी जात आहात तेथे हे नियम पाळा. तुम्ही व तुमची मुले नातवंडे-सर्वांनी आमरण आपल्या परमेश्वराचा आदर बाळगा. त्याने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे वागा, म्हणजे दीर्घायुषी व्हाल. इस्राएल लोकहो, काळजीपूर्वक ऐका व हे नियम पाळा. मग तुमचे भले होईल. तुम्हाला भरपूर संतती होईल आणि तुमच्या देशात दुधामधाचे पाट वाहतील. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे सर्वकाही मिळेल.

“हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे. आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी, दारी, झोपता-उठताना, त्याविषयी बोलत राहा. त्या लिहून आठवणीसाठी हाताला बांधा व कपाळावर चिकटवा. दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा.

10 “अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना तुम्हांला हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते. तो तुम्हांला मिळेल. तुम्ही स्वतः वसवलेली नाहीत अशी मोठी, समृध्द नगरे तो तुम्हाला देईल. 11 उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हाला देईल. तुम्हाला खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हांला देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हाला देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल.

12 “पण सावध राहा! परमेश्वराला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हांला बाहेर आणले. 13 त्याचा आदर ठेवा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने घेऊ नका. 14 तुमच्या आसपासच्या राष्ट्रातील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका. 15 तुमचा देव परमेश्वर सतत तुमच्या बरोबर आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वराला आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हाला पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील.

16 “मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत, तसे इथे करु नका. 17 त्याच्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणीचे व नियमांचे पालन करा. 18 उचित आणि चांगले आहे तेच करा. त्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो. त्याने तुमचे कल्याण होईल. परमेश्वराने जो चांगला प्रदेश तुम्हांला द्यायचे तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे, त्यात तुमचा प्रवेश होईल. 19 परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे, तुम्ही आपल्या शत्रूंना हुसकावून लावाल.

देवाने जे केले ते मुलांना शिकवा

20 “आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील. 21 तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हाला तेथून बाहेर आणले. 22 त्याने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरुद्ध मोठे प्रभावी चमत्कार करुन दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत. 23 आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले. 24 ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हाला दिली आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्याचा आदर बाळगला पाहिजे. मग तो आपल्याला कायम जीवंत ठेवील व भले करील. 25 जर आपण काळजीपूर्वक परमेश्वराचे सर्व नियम पाळले तर आपण फार चांगली गोष्ट [a] केली आहे असे तो म्हणेल.

Footnotes:

  1. अनुवाद 6:25 चांगली गोष्ट किंवा “जर आपण त्याने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व नियम काळजीपूर्वक पाळले तर परमेश्वर आपला देव आपल्याला नीतिमान ठरवेल.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes