Add parallel Print Page Options

यज्ञ व अर्पणे

परमेश्वर देव दर्शनमंडपातून मोशेला हाक मारुन म्हणाला, “इस्राएल लोकांना असे सांग: की जेव्हा तुम्ही परमेश्वराला पशूबली अर्पिता तेव्हा तो प्राणी तुमच्या पाळीव गुराढोरांच्या खिल्लारांतील किंवा शेरडांमेढारांच्या कळपातील असावा.

“जेव्हा एखाद्या माणसाला गुरांढोरांतले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोष नसलेला नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वर ते अर्पण मान्य करील. त्या माणसाने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित म्हणून मान्य होईल.

“त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या वेदीवर व वेदीच्या सभोंवती शिंपडावे. याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व मग त्याच्या शरीराचे तुकडे करावे. नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी; त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्या पशूचे तुकडे, डोके व चरबी रचावी; त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी, मग याजकाने सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी आहे; त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.

Read full chapter