Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटुंबाचे शोशन्नीमया सुरांवर बसवलेले मास्कील प्रीतीचे स्तोत्र

45 मी राजासाठी या गोष्टी लिहितो
    तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरुन जाते.
एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत
    त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात.

तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस.
    तू चांगला वक्ता आहेस,
    म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद देईल.
तुझी तलवार म्यानात ठेव हे सर्वशक्तीमान,
    तुझा गौरवशाली गणवेश परिधान कर.
तू खूप अद्भूत दिसतोस जा आणि चांगल्यासाठी व न्यायासाठी होत असलेली लढाई जिंकून ये.
    तुझा बलवान उजवा हात विस्मयजनक गोष्टी करण्यासाठी वापर.
तुझे बाण तीक्ष्ण आहेत.
    तू खूप लोकांचा पराभव करशील ते तुझ्यापुढे जमिनीवर पडतील.
देवा [a] तुझे सिंहासन नेहमी साठी आहे.
    चांगुलपणा हा तुझा राजदंड आहे.
तुला चांगुलपणा आवडतो
    आणि तू वाईटाचा तिरस्कार करतो म्हणून देवा,
    तुझ्या देवाने तुलाच तुझ्या मित्रांचा [b] राजा निवडले.
तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरु, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो.
    हस्तिदंताने अच्छादलेल्या महालातून तुला आनंदीत करण्यासाठी संगित ऐकू येते.
राजांच्या मुली करवल्या आहेत.
    तुझी वधू तुझ्या उजव्या हाताला शुध्द सोन्याचा मुगुट धारण करुन उभी आहे.

10 मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल.
    तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
11 राजाला तुझे सौंदर्य आवडते.
    तो तुझा नवा नवरा (स्वामी) असेल.
    तू त्याला मान देशील.
12 सोराचे लोक तुझ्यासाठी भेटी आणतील.
    श्रीमंत लोक तुला भेटायची इच्छा धरतील.

13 राजकन्या म्हणजे एक किमती
    आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे.
14 सुंदर वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या वधूला राजाकडे नेले जाते.
    तिच्या करवल्या तिच्या मागून जातात.
15 त्या अतिशय आनंदात आहेत.
    आनंदविभोर होऊन त्या राजाच्या राजवाड्यात प्रवेश करतात.

16 राजा, तुझी मुले तुझ्यानंतर राज्य करतील.
    तू त्यांना तुझ्या संपूर्ण राज्याचे अधिपती करशील.
17 मी तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील असे करीन.
    लोक सदैव तुझी स्तुती करतील.

Notas al pie

  1. स्तोत्रसंहिता 45:6 देव हे देवासाठी लिहिले असेल किंवा कवी येथे “देव” हे नाव राजासाठी वापरत असेल.
  2. स्तोत्रसंहिता 45:7 तुला … मित्र शब्दश: “तुझ्यावर आणि तुझ्या मित्रांवर खारु तेल ओतले. देवळात गोळा करुन ठेवलेले खास तेल.” त्या तेलाने राजा, पुजारी आणि देवदूत यांना मालिश केली जाई.