Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

शलमोनाचे वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.

127 जर परमेश्वर घर बांधीत नसेल
    तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत.
जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल
    तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.

भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि
    रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.
देव ज्या लोकांवर प्रेम करतो
    त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.

मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत.
    आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.
तरुण माणसाची मुले सैनिकाच्या
    भात्यातील बाणांसारखी आहेत.
जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल.
    त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची मुले सार्वजानिक ठिकाणी [a] त्याच्या शत्रूंविरुध्द त्याचे रक्षण करतील.

Notas al pie

  1. स्तोत्रसंहिता 127:5 सार्वजनिक ठिकाणी शब्दाश: “दरवाजा” याचा अर्थ एखाद्या माणसाची मुले शत्रूनी त्याला कोर्टात खेचले तर त्याचा बचाव करीत.