यशया 17
Marathi Bible: Easy-to-Read Version
देवाचा सिरीयाला संदेश
17 दमास्कसला हा शोक संदेश आहे. परमेश्वर म्हणतो की पुढील गोष्टी दमास्कसला घडतील.
“आता दमास्कस एक शहर आहे, पण त्याचा नाश होईल.
फक्त पडझड झालेल्या इमारती तेथे शिल्लक राहतील.
2 लोक अरोएराची शहरे सोडून जातील.
त्या ओसाड शहरांतून शेळ्यामेंढ्यांचे कळप मुक्तपणे हिंडतील.
त्यांना हाकलायला तेथे कोणी माणूस नसेल.
3 एफ्राइमची (इस्राएलची) किल्ले असलेली शहरे नष्ट होतील.
दमास्कसचे सरकार पडेल.
इस्राएलला जे घडले तेच सिरीयात घडेल.
सगळी प्रतिष्ठित माणसे दूर केली जातील.”
सर्वशक्तिमान परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे ह्या गोष्टी घडतील.
4 “त्या वेळी याकोबाची (इस्राएलची) सर्व संपत्ती नष्ट होईल.
आजारी माणसाप्रमाणे याकोब दुबळा व बारीक होईल.
5 “एफ्राइम खोऱ्यातील धान्याच्या मोसमाप्रमाणे तो काळ असेल. मजूर शेतात पिकलेली पिके कापून गोळा करतात. नंतर कणसे तोडून ते धान्य गोळा करतात.
6 “तो काळ जैतूनच्या मोसमाप्रमाणेही असेल. लोक झाड हलवून जैतूनची फळे पाडतात. पण काही झाडावर राहतातच. उंचावरच्या फांद्यावर चार-पाच फळे राहून जातातच. ह्या शहरांचेही असेच होईल.” सर्वशक्तिमान परमेश्वराने हे सांगितले आहे.
7 त्या वेळी लोक देवाकडे म्हणजे आपल्या जन्मदात्याकडे पाहतील. त्यांना इस्राएलच्या पवित्र देवाचे दर्शन होईल. 8 लोक, स्वतःच्या हाताने केलेल्या वेद्यांकडे जाणार नाहीत. त्यांनी खोट्या देवांसाठी तयार केलेल्या अशेरा स्तंभाचा आणि धूपाच्या वेद्यांचा ते मान ठेवणार नाहीत. 9 त्या वेळेला किल्ले असलेली सर्व शहरे ओस पडतील. इस्राएलचे लोक येण्याआधी त्या भूमीवर जसे डोंगर आणि जंगले होती [a] त्याप्रमाणे ती शहरे होतील. पूर्वी इस्राएली लोकांना येताना पाहून तेथे राहणारे लोक पळून गेले. भविष्यात परत एकदा देश ओस पडेल. 10 असे घडण्याचे कारण तू तुला वाचवणाऱ्या देवाला विसरलास. देव हे तुझ्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे, हे तुझ्या लक्षात राहिले नाही.
दूरच्या देशांतून तू चांगल्या जातीच्या द्राक्षवेली आणल्यास तू त्यांची लावणी करशील पण त्या वाढणार नाहीत. 11 एके दिवशी तू द्राक्षवेलींची लागवड करशील, त्या वाढाव्या म्हणून प्रयत्न करशील. दुसऱ्या दिवसापासून त्या वाढूही लागतील पण सुगीच्या काळात तू फळे गोळा करायला जाशील तेव्हा तुला सगळे सुकून गेलेले दिसेल. रोगाने सर्व वेली मरून जातील.
12 समुद्राच्या गर्जनेप्रमाणे येणारा पुष्कळ लोकांचा आक्रोश ऐक.
ते मोठ्याने रडत आहेत.
लाटा एकमेकीवर आदळून उठणाऱ्या आवाजाप्रमाणे हा आक्रोश आहे.
13 लोकांची स्थितीही त्या लाटांप्रमाणेच होईल.
देव त्यांची कानउघाडणी करील आणि ते लांबवर धावत सुटतील.
लोकांची स्थिती वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटाप्रमाणे होईल.
वावटळीत उडून जाणाऱ्या गवताप्रमाणे त्यांची अवस्था होईल.
14 त्या रात्री सर्व माणसे अतिशय भयभीत होतील.
उजाडण्यापूर्वी सर्व नष्ट झालेले असेल.
त्यामुळे आमच्या शत्रूंना काहीही मिळणार नाही
ते ह्या भूमीवर पाय ठेवतील तेव्हा येथे काहीही उरलेले नसेल.
Footnotes
- यशया 17:9 इस्राएलचे लोक … जंगले होती ह्याचा दुसरा एक अर्थ ‘तेथे होराइट व आमोराइट लोक होते.’
Isaiah 17
New International Version
A Prophecy Against Damascus
17 A prophecy(A) against Damascus:(B)
“See, Damascus will no longer be a city
but will become a heap of ruins.(C)
2 The cities of Aroer(D) will be deserted
and left to flocks,(E) which will lie down,(F)
with no one to make them afraid.(G)
3 The fortified(H) city will disappear from Ephraim,
and royal power from Damascus;
the remnant of Aram will be
like the glory(I) of the Israelites,”(J)
declares the Lord Almighty.
4 “In that day(K) the glory(L) of Jacob will fade;
the fat of his body will waste(M) away.
5 It will be as when reapers harvest the standing grain,
gathering(N) the grain in their arms—
as when someone gleans heads of grain(O)
in the Valley of Rephaim.(P)
6 Yet some gleanings will remain,(Q)
as when an olive tree is beaten,(R)
leaving two or three olives on the topmost branches,
four or five on the fruitful boughs,”
declares the Lord, the God of Israel.
7 In that day(S) people will look(T) to their Maker(U)
and turn their eyes to the Holy One(V) of Israel.
8 They will not look to the altars,(W)
the work of their hands,(X)
and they will have no regard for the Asherah poles[a](Y)
and the incense altars their fingers(Z) have made.
9 In that day their strong cities, which they left because of the Israelites, will be like places abandoned to thickets and undergrowth.(AA) And all will be desolation.
10 You have forgotten(AB) God your Savior;(AC)
you have not remembered the Rock,(AD) your fortress.(AE)
Therefore, though you set out the finest plants
and plant imported vines,(AF)
11 though on the day you set them out, you make them grow,
and on the morning(AG) when you plant them, you bring them to bud,
yet the harvest(AH) will be as nothing(AI)
in the day of disease and incurable(AJ) pain.(AK)
12 Woe to the many nations that rage(AL)—
they rage like the raging sea!(AM)
Woe to the peoples who roar(AN)—
they roar like the roaring of great waters!(AO)
13 Although the peoples roar(AP) like the roar of surging waters,
when he rebukes(AQ) them they flee(AR) far away,
driven before the wind like chaff(AS) on the hills,
like tumbleweed before a gale.(AT)
14 In the evening, sudden(AU) terror!(AV)
Before the morning, they are gone!(AW)
This is the portion of those who loot us,
the lot of those who plunder us.
Footnotes
- Isaiah 17:8 That is, wooden symbols of the goddess Asherah
2006 by Bible League International
Holy Bible, New International Version®, NIV® Copyright ©1973, 1978, 1984, 2011 by Biblica, Inc.® Used by permission. All rights reserved worldwide.
NIV Reverse Interlinear Bible: English to Hebrew and English to Greek. Copyright © 2019 by Zondervan.