A A A A A
Bible Book List

1 तीमथ्याला 1 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

आपला तारणारा देव आणि आपली आशा ख्रिस्त येशू यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून

विश्वासातील माझा खरा पुत्र तीमथी याला:

देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू, आमचा प्रभु याच्याकडून तुला कृपा, दया आणि शांति लाभो.

खोट्या शिक्षणाविरुद्ध इशारा

मी मासेदोनियाला जात असता तुला कळकळीने विनंति केल्याप्रमाणे तू इफिस येथे राहावेस असे माझे म्हणणे आहे. यासाठी की, काही ठराविक लोकांना खोटे शिक्षण देऊ नका अशी तुला त्यांना आज्ञा करता यावी. किंवा कथा-कहाण्यांच्या आहारी जाऊ नका आणि न संपणाऱ्या वंशावळ्या याकडे लक्ष देऊ नका असे तू त्यांना सांगावेस. कारण त्यामुळे भांडण वाढते आणि विश्वासाने देवाची योजना जी पूर्ण होते ती या गोष्टीमुळे पूर्ण होत नाही. आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीति आहे, जी शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या सदसदविवेकबुद्धीतून व प्रामाणिक विश्वासातून उगम पावते. काहींनी पतनामुळे या गोष्टीकडून आपले लक्ष दुसरीकडे लावले आहे व ते व्यर्य बडबडीकडे वळले आहेत. त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते, पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत.

आता आम्हाला हे माहीत आहे की, नियमशास्त्र खरोखरच चांगले आहे. जर कोणी त्याचा चांगला वापर करतो. म्हणजे हे जाणून घेऊन की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर नियमशास्त्राचा भंग करणाऱ्या आणि बंडखोर लोकांसाठी, तिरस्करणीय लोकांसाठी, पापयांसाठी, भक्तिहीन आणि अधर्मी लोकांसाठी, वडिलांना ठार मारणाऱ्या, आईला ठार मारणाऱ्यासाठी, 10 खुनी लोकांसाठी, जारकर्मी, समलिंगसंभोगी, इतर मनुष्यांना फसविणारे, खोटारडे, खोटी शपथ घेणारे यांच्यासाठी आहे. इतर जे दुसरे सगळे करतात ते चांगल्या शिक्षणाविरुद्ध आहेत, 11 गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपविली आहे, तिला हे अनुसरून आहे.

देवाच्या दयेबद्दल उपकार

12 जो मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभुचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू समजले आणि त्याने मला त्याची सेवा करण्यासाठी नियुक्त केले. 13 जरी मी पूर्वी निंदा करणारा, मनस्ताप देणारा आणि हिंसक होतो, तरी माझ्यावर दया दाखविण्यात आली. तोर्पांत मी विश्वासणारा नव्हतो म्हणून अज्ञानामुळे मी तसा वागलो. 14 परंतु विश्वास आणि दया जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभुच्या कृपेने ओसंडून वाहिली.

15 एक विश्वसनीय वचन आहे जे स्वीकारावयास पूर्णपणे योग्य आहे. येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास या जगात आला. मी त्या पाप्यातील पहिला आहे. 16 परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली, यासाठी की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्याच्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना अनंतकाळचे जीवन मिळावे. 17 आता अनंतकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला माहिमा आणि गौरव अनंतकाळासाठी असो. आमेन.

18 तिमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवीत आहे. यासाठी की सुयुद्ध करण्यात तिचा उपयोग करता यावा. 19 तुम्हांला विश्वास आणि चांगला विवेक असावा. कित्येकांनी चांगला विवेक नाकारुन विश्वास तारवाप्रमाणे उद्ध्वस्त केला आहे. 20 त्यात हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, देवाविरुद्ध न बोलण्याविषयी त्यांनी शिकावे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes