Add parallel Print Page Options

राजा शौलच्या घराण्याचा इतिहास

बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आश्बेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा. चौथा नोहा व पाचवा राफा.

3-5 अद्दार, गेरा, अबीहूद, अबीशूवा, नामान, अहोह, गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे मुलगे.

6-7 एहूदचे वंशज खालील प्रमाणे: नामान, अहीया आणि गेरा. हे गेबातील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांना आपापली गावे सोडायला लावून सक्तीने मानाहथ येथे नेण्यात आले. गेराने त्यांना कैद केले. गेराने उज्जा आणि अहीहूद यांना जन्म दिला.

शहरयिमाने मवाबात आपल्या बायका हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्याला दुसऱ्या एका बायकोपासून मुले झाली. 9-10 ही त्याची बायको होदेश हिच्यापासून त्याला योबाब, सिब्या, मेशा, मल्काम, यऊस. शख्या, मिर्मा हे मुलगे झाले. ते आपल्या वडिलांच्या घराण्यांचे प्रमुख होते. 11 हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे मुलगे झाले.

12-13 एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पाचे मुलगे. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली. बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.

14 अह्यो, शाशक, यरेमोथ, 15 जबद्या. अराद, एदर, 16 मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे मुलगे. 17 जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर, 18 इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे मुलगे.

19 याकीम, जिख्री, जब्दी, 20 एलीएनय, सिलथय, अलीएल, 21 अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे मुलगे.

22 इश्पान, एबर, अलीएल, 23 अब्दोन, जिख्री, हानान, 24 हनन्या, एलाम, अनथोथीया, 25 इफदया, पनुएल हे शाशकचे मुलगे होत.

26 शम्शरय, शहऱ्या, अथल्या, 27 यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामचे मुलगे.

28 हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. तशी त्यांची वंशावळींमध्ये नोंद आहे. ते यरुशलेम येथे राहत होते.

29 गिबोनचा बाप यइएल. तो गिबोनमध्ये राहत होता. त्याची बायको माका. 30 त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब, 31 गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर मुले. 32 शिमा हा मिकलोथचा मुलगा. आपल्या यरुशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.

33 कीशचा बाप नेर. कीश शौलचा बाप. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा.

34 योनाथानचा मुलगा मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा बाप.

35 पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे मुलगे.

36 यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमाबेथ व जिम्री यांचा बाप होता. जिम्री हा मोसाचा बाप होता. 37 बिनाचा पिता मोसा. बिनाचा मुलगा राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.

38 आसेलला सहा मुलगे होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.

39 आसेलचा भाऊ एशेक. त्याचे मुलगे: ज्येष्ठ मुलगा ऊलाम, दुसरा यऊष आणि तिसरा अलिफलेत. 40 ऊलामचे मुलगे शूर आणि उत्तम धनुर्धर होते. त्यांची वंशवेल चांगली विस्तारली. मुले, नातवंडे मिळून 150 जण होते.

हे सर्व बन्यामीनचे वंशज.