Add parallel Print Page Options

93 परमेश्वर राजा आहे.
    त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे.
तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे.
    ते कंपित होणार नाही.
देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे.
    देवा, तू सदैव जीवंत आहेस.
परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे.
    आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि
    त्यांचा आवाज खूप मोठा आहे.
    परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.
परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील. [a]
    तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.

Footnotes

  1. स्तोत्रसंहिता 93:5 तुझे … राहतील किंवा “तुझ्या करारावर विश्वास ठेवणे खरोखरच शक्य आहे.”