Add parallel Print Page Options

एक गाणे कोरहाच्या मुलांचे स्तोत्र

48 परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात,
    त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.
देवाचे पवित्र शहर सुंदर आहे.
    त्याचे सौंदर्य सर्व पृथ्वीवर आनंद आणते
सियोन पर्वत सगळ्यात उंच आणि पवित्र पर्वत आहे.
    हे त्या महान राजाचे शहर आहे.
इथे त्या शहराच्या राजवाड्यांत
    देवाला किल्ला म्हणतात.
एकदा काही राजे भेटले.
    त्यांनी या शहरावर हल्ला करायची योजना आखली
ते सगळे चालून आले.
    त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले.
    ते घाबरले आणि पळत सुटले.
भयाने त्यांना घेरले,
    भीतीने त्यांचा थरकाप झाला.
देवा, तू पूर्वेकडच्या जोरदार वाऱ्याचा उपयोग केलास
    आणि त्यांची मोठी जहाजे मोडलीस.
होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या शहरात,
    आमच्या देवाच्या शहरात घडत असलेले पाहिले.
देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.

देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमळ दयेचा लक्षपूर्वक विचार करतो.
10 देवा तू प्रसिध्द आहेस.
    पृथ्वीवर सगळीकडे लोक तुझी स्तुती करतात
    तू किती चांगला आहेस ते प्रत्येकाला माहीत आहे.
11 देवा, सियोन पर्वत आनंदी आहे
    यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.
12 सियोन भोवती फिरा,
    शहर बघा, बुरुज मोजा.
13 उंच भिंती बघा, सियोनच्या राजवाड्याचे कौतुक करा.
    नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
14 देव खरोखरच नेहमी आपला देव असेल.
    तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.