Add parallel Print Page Options

प्रमुख गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तोत्र

47 लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा.
    तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जल्लोष करा.
सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे.
    तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे.
त्याने आपल्याला दुसऱ्या लोकांचा पराभव करायला मदत केली.
    त्याने ते देश आपल्या अधिपत्याखाली आणले.
देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली.
    त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला.

परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात
    आपल्या सिंहासनाकडे जातो.
देवाचे गुणगान करा.
    आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा.
देव सर्व जगाचा राजा आहे.
    त्याच्या स्तुतिपर गाणे गा.
देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो.
    तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
देशांचे प्रमुख अब्राहामाच्या देवाच्या लोकांना भेटतात.
    सर्व देशांचे प्रमुख देवाचे आहेत.
    देव त्या सगळ्यां पेक्षा थोर आहे. [a]

Footnotes

  1. स्तोत्रसंहिता 47:9 देव … आहे किंवा “देव फारच उच्च वृत्तीचा आहे” पाचव्या कडव्यात वापरलेल्या हिब्रू शब्द हाच आहे. त्यावरुन समजते की देव वर गेला आणि सिंहासनावर बसला.