A A A A A
Bible Book List

स्तोत्रसंहिता 1Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

भाग पहिला

(स्तोत्रसंहिता 1-41)

माणसाने जर वाईट लोकांचा सल्ला मानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही
    आणि देवावर [a] विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही
    तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते
    तो त्या बद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.
त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो
    तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो.
    तो जे काही करतो ते यशस्वी होते.

परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून
    जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.
न्यायालयातील खटल्याचा निवाडा करण्यासाठी जर चांगले लोक एकत्र आले
    तर वाईट लोकांना अपराधी ठरविले जाईल ते पापीलोक निरपराध ठरविले जाणार नाहीत.
का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो
    आणि वाईटाचे निर्दालन करतो.

Footnotes:

  1. स्तोत्रसंहिता 1:1 माणूस … देव किंवा “जो दुष्टांचा सल्ला मानत नाही किंवा पापाच्या मार्गाने जात नाही वा टिंगल करणाऱ्याच्या घरात राहात नाही त्याला आशीर्वाद मिळतात.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes