A A A A A
Bible Book List

यहेज्केल 42 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

याजकाची खोली

42 नंतर त्या माणसाने मला उत्तरेकडून बाहेरच्या पटांगणात आणले. मग त्याने मला राखीव जागेच्या पश्र्चिमेकडे असलेल्या खूप खोल्यांच्या इमारतीकडे नेले आणि उत्तरेकडच्या इमारतीकडेही नेले. त्या इमारतीची लांबी 100 हात व रुंदी 50 हात होती. लोक उत्तेरेकडच्या पटांगणातून ह्या इमारतीत प्रवेश करत. ह्या इमारतीला, एकमेकांकडे तोंड असलेले सज्जे तीनही मजल्यावर होते. त्यांच्यामध्ये 20 हात (35 फूटाची) मोकळी जागा होती. ही मोकळी जागा इमारत आणि मंदिर यांमध्ये होती. दुसऱ्या बाजूला असलेल्या खोल्यांची तोंडे बाहेरच्या पटांगणाच्या फरसबंदीकडे होती. इमारतीचे प्रवेशद्वारे उत्तरेकडे असले तरी, 10 हात रुंदीचा आणि 100 हात लांबीचा रस्ता इमारतीच्या दक्षिणेकडून गेला होता. ह्या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या, मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा अरुंद होत्या, कारण सज्जाने बरीच जागा व्यापलेली होती. तीन मजल्यावर खोल्या होत्या. बाहेरच्या पटांगणाप्रमाणे त्यांना खांब नव्हते. म्हणून सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांच्या काहीशा मागे होत्या. बाहेरच्या बाजूला, खोल्यांना समांतर अशी भिंत होती. ती बाहेरच्या पटांगणापर्यंत गेली होती. ती खोल्यांच्या समोर होती. तिची लांबी 50 हात (87 फूट 6 इंच) होती. बाहेरच्या पटांगणात असलेल्या खोल्या 50 हात (87 फूट 6 इंच) लांबीच्या होत्या. मंदिराच्या बाजूची, इमारतीची एकूण लांबी 100 हात होती. ह्या खोल्यांच्या खाली, पश्र्चिमेला, बाहेरच्या भिंतीच्या सुरवातीला, बाहेरच्या पटांगणातून पूर्वेच्या बाजूला येण्यासाठी एक दार होते. 10 दक्षिणेला, मंदिराच्या अंगणासमोर आणि मंदिराच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला खोल्या होत्या.

11 ह्या खोल्यांसमोर एक रस्ता होता. ह्या खोल्या उत्तरेकडील खोल्याप्रमाणेच होत्या. दक्षिणेकडची दारे, लांबी-रुंदीला उत्तरेकडच्या दारांएवढीच होती. दक्षिणेकडची दारे माप, नक्षी आणि प्रवेश याबाबतीत उत्तरेकडच्या दारांप्रमाणेच होती. 12 दक्षिणेकडच्या खोल्यांखाली, पूर्वेला उघडणारे दार होते. त्या दारातून लोकांना भिंती लगतच्या उघड्या रस्त्यावरुन आत येता येत असे. दारांच्या पलीकडे विभागणारी भिंत होती. [a]

13 तो माणूस मला म्हणाला, “पटांगणाच्या समोर असलेल्या उत्तर व दक्षिण दिशेकडील खोल्या ह्या पवित्र आहेत. देवाला बळी अर्पण करणाऱ्या याजकासाठी त्या आहेत. याजक तेथे अती पवित्र पदार्थ खातील. व असा पदार्थ ते तेथेच ठेवतात. का? कारण ती जागा पवित्र आहे. ते पवित्र पदार्थ म्हणजे धान्यार्पण, पापार्पण व दोषार्पण होत. 14 याजक तेथे जातील पण बाहेरच्या पटांगणात येण्याआधी त्यांना प्रथम आपली सेवेची वस्त्रे तेथेच उतरवून ठेवावी लागतील. का? कारण ती वस्त्रे पवित्र आहेत. इतर लोक मंदिराच्या ज्या भागात जातात, तेथे याजकाला जायचे असेल तर त्याने खोलीत जाऊन दुसरी वस्त्रे घातलीच पाहिजेत.”

बाहेरचे पटांगण

15 आतील मंदिराच मोजमाप करुन झाल्यावर त्या माणसाने मला पूर्वेकडच्या दारातून बाहेर आणले. त्यांने सर्व बाजूंनी बाहेरच्या पटांगणाचे मोजमाप केले. 16 मोजपट्टीने त्याने पूर्वेची बाजू मोजली. ती लांबीला 500 हात (875 फूट) भरली. 17 त्याने उत्तरेची बाजू मोजली. ती लांबीला 500 हात (875 फूट) भरली. 18 त्याने दक्षिणेची बाजू मोजली. तिची लांबी 500 हात (875 फूट) भरली. 19 मग पश्र्चिमेकडे जाऊन त्याने माप घेतले तेही 500 हात (875 फूट) भरले. 20 त्याने चारी बाजूंनी मंदिराचे मोजमाप केले. मंदिराभोवती भिंत होती. ती लांबीला 500 हात (875 फूट) व रुंदीला 500 हात (875 फूट) होती. तिच्यामुळे पवित्र (सोवळ्याची) जागा व अपवित्र जागा अशा (पवित्र न मानलेली) वेगवेगळ्या झाल्या होत्या.

Footnotes:

  1. यहेज्केल 42:12 दक्षिणेकडच्या … होती ह्या ओवीचा हिब्रू अर्थ समजणे अतिशय कठीण आहे.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes