A A A A A
Bible Book List

यशया 19 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

देवाचा मिसरला संदेश

19 मिसरबद्दल शोक संदेश पाहा, परमेश्वर, जलद गतीने जाणाऱ्या मेघावर आरूढ होऊन येत आहे. देव मिसरमध्ये प्रवेश करील आणि तेथील खोटे देव भीतीने थरथर कापू लागतील. मिसर खरा धैर्यवान होता पण त्याचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल.

देव म्हणतो, “मी मिसरमधील लोकांना त्यांच्याच लोकांविरूध्द लढायला लावीन. भावाभावात लढाई होईल शेजारी शेजाऱ्याच्याविरूध्द जाईल. शहरे एकमेकांच्या विरूध्द जातील. प्रदेश एकमेकांच्या विरोधात जातील. मिसरच्या लोकांचे बेत मी उधळून टाकीन. मिसरवासी गोंधळून जातील. ते काय करावे याबाबत त्यांचे खोटे देव, चाणाक्ष लोक, जादूगार, मांत्रिक यांचा सल्ला घेतील. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही.” प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “मी मिसरला कठोर शासकाच्या हातात देईन. एक सामर्थ्यवान राजा मिसरवर राज्य करील.”

नाईल नदी कोरडी पडेल. समुद्र आटतील. सर्व नद्यांच्या पाण्याला दुर्गंध येईल. सर्व कालवे सुकतील आणि मिसरमधील पाणी नाहीसे होईल. पाणवनस्पती कुजून जातील. नदीकाठची झाडे सुकतील, मरतील व वाऱ्यावर उडून जातील. नदीच्या रूंदट पात्रातील वनस्पतीसुध्दा मरतील.

नाईल नदीत मच्छिमारी करणारे कोळी दु:खाने रडतील. कारण ते अन्नासाठी नाईल नदीवर विसंबून असतात. पण तीच कोरडी होईल. विणकर फार दु:खी होतील. कारण त्यांना कापड तयार करण्यासाठी आंबाडी लागते. पण नदी कोरडी पडल्यामुळे त्यात आंबाडी होणार नाही. 10 पाण्यावर बांध बांधणाऱ्यांना काम न राहिल्याने ते सुध्दा कष्टी होतील.

11 सोअनचे नेते मूर्ख आहेत. फारोचे “शहाणे सल्लागार” चुकीचा सल्ला देतात. हे नेते स्वतःला शहाणे समजतात. ते म्हणतात की आम्ही पूर्वीच्या राजघराण्यातील आहोत. पण ते स्वतःला जेवढे शहाणे समजतात तेवढे ते नाहीत. 12 मिसर देशा, तुझे ते सुज्ञ लोक कोठे आहेत? त्यांना सर्वशक्तिमान परमेश्वराने मिसरबद्दल काय योजले आहे ते समजले पाहिजे. त्यांनी तुला काय घडणार आहे ते सांगितले पाहिजे.

13 सोअनाच्या नेत्यांना मूर्ख बनविले गेले आहे. नोफाचे नेते खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. म्हणून ते सर्व मिसरला चुकीच्या मार्गाने नेतात. 14 परमेश्वराने नेत्यांना गोंधळात टाकले आहे. ते स्वतःभरकटतात आणि मिसरला चुकीच्या वाटेने नेतात. ते जे काय करतात ते चूकच असते. ते मद्यप्यांसारखे मळमळून येऊन गडबडा लोळत आहेत. 15 नेत्यांना करण्यासारखे आता काही नाही. (हे नेते म्हणजे “डोके व शेपूट,” “शेंडे व बुडखे” आहेत.)

16 त्या वेळी मिसरवासी घाबरलेल्या बायकांसारखे दिसतील. ते सर्वशक्तिमान परमेश्वराला भितील. देव शिक्षा करण्यासाठी हात उगारील व त्यांची घाबरगुंडी उडेल. 17 यहुद्यांच्या भूमीला मिसरमधील सर्व लोक घाबरतील. मिसरमधील प्रत्येकजण यहुदाचे नाव ऐकताच भयभीत होईल. असे होण्याचे कारण हेच की सर्वशक्तिमान परमेश्वराने मिसरमध्ये भयानक गोष्टी घडून आणण्याची योजना आखली आहे. 18 ह्या वेळेला मिसरमधील पाच शहंरातील लोक युहद्यांची कनान भाषा बोलतील. त्या पाच शहरांपैकी एका शहराचे नाव “ईर-हरेस” असेल. ह्या शहरांत राहणारे लोक सर्वशक्तिमान परमेश्वराला अनुसरण्याची शपथ वाहतील.

19 तेव्हा मिसरच्या मध्यावर परमेश्वरासाठी एक वेदी असेल. व परमेश्वराविषयी आदर दाखविण्यासाठी मिसरच्या सीमेवर एक स्मारक उभारले जाईल. 20 सर्वशक्तिमान परमेश्वराच्या सामर्थ्यशाली कृत्यांची मिसरमधील ही निशाणी आणि पुरावा असेल. केव्हाही लोकांनी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला की परमेश्वर मदत पाठवील. लोकांचे रक्षण व बचाव करण्यास देव एका माणसाला पाठवील हा माणूस अत्याचार करणाऱ्यापासून लोकांना सोडवील.

21 त्या वेळेला मिसरवासीयांना परमेश्वराची खरी ओळख होईल. ते देवावर प्रेम करतील. ते देवाची उपासना करतील आणि बळी अर्पण करतील. ते परमेश्वराला नवस बोलतील आणि ते फेडतील. 22 परमेश्वर मिसरमधील लोकांना शिक्षा करील. नंतर परमेश्वर त्यांना क्षमा करील. ते परमेश्वराला शरण जातील. परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला पावेल व त्यांना क्षमा करील.

23 त्या वेळी मिसर ते अश्शूर असा महामार्ग असेल. त्यामुळे मिसर व अश्शूर त्यांच्यामधे ये-जा होईल. मिसर अश्शूरच्या बरोबरीने वागेल. 24 त्या वेळी इस्राएल, अश्शूर व मिसर एकत्र येऊन राज्य करतील. हा देशाच्या दृष्टीने ईश्वराचा कृपाप्रसादच ठरेल. 25 सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या देशांवर कृपा करील. तो म्हणेल, “मिसरवासीयांनो, तुम्ही माझे आहात अश्शूरच्या रहिवाशांनो, तुम्हाला तर मीच घडवलय्! इस्राएलच्या लोकांनो, मी तर तुमचा स्वामी आहे. तुम्हासर्वांना माझे आशीर्वाद!”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

Isaiah 19 New International Version (NIV)

A Prophecy Against Egypt

19 A prophecy against Egypt:

See, the Lord rides on a swift cloud
    and is coming to Egypt.
The idols of Egypt tremble before him,
    and the hearts of the Egyptians melt with fear.

“I will stir up Egyptian against Egyptian—
    brother will fight against brother,
    neighbor against neighbor,
    city against city,
    kingdom against kingdom.
The Egyptians will lose heart,
    and I will bring their plans to nothing;
they will consult the idols and the spirits of the dead,
    the mediums and the spiritists.
I will hand the Egyptians over
    to the power of a cruel master,
and a fierce king will rule over them,”
    declares the Lord, the Lord Almighty.

The waters of the river will dry up,
    and the riverbed will be parched and dry.
The canals will stink;
    the streams of Egypt will dwindle and dry up.
The reeds and rushes will wither,
    also the plants along the Nile,
    at the mouth of the river.
Every sown field along the Nile
    will become parched, will blow away and be no more.
The fishermen will groan and lament,
    all who cast hooks into the Nile;
those who throw nets on the water
    will pine away.
Those who work with combed flax will despair,
    the weavers of fine linen will lose hope.
10 The workers in cloth will be dejected,
    and all the wage earners will be sick at heart.

11 The officials of Zoan are nothing but fools;
    the wise counselors of Pharaoh give senseless advice.
How can you say to Pharaoh,
    “I am one of the wise men,
    a disciple of the ancient kings”?

12 Where are your wise men now?
    Let them show you and make known
what the Lord Almighty
    has planned against Egypt.
13 The officials of Zoan have become fools,
    the leaders of Memphis are deceived;
the cornerstones of her peoples
    have led Egypt astray.
14 The Lord has poured into them
    a spirit of dizziness;
they make Egypt stagger in all that she does,
    as a drunkard staggers around in his vomit.
15 There is nothing Egypt can do—
    head or tail, palm branch or reed.

16 In that day the Egyptians will become weaklings. They will shudder with fear at the uplifted hand that the Lord Almighty raises against them. 17 And the land of Judah will bring terror to the Egyptians; everyone to whom Judah is mentioned will be terrified, because of what the Lord Almighty is planning against them.

18 In that day five cities in Egypt will speak the language of Canaan and swear allegiance to the Lord Almighty. One of them will be called the City of the Sun.[a]

19 In that day there will be an altar to the Lord in the heart of Egypt, and a monument to the Lord at its border. 20 It will be a sign and witness to the Lord Almighty in the land of Egypt. When they cry out to the Lord because of their oppressors, he will send them a savior and defender, and he will rescue them. 21 So the Lord will make himself known to the Egyptians, and in that day they will acknowledge the Lord. They will worship with sacrifices and grain offerings; they will make vows to the Lord and keep them. 22 The Lord will strike Egypt with a plague; he will strike them and heal them. They will turn to the Lord, and he will respond to their pleas and heal them.

23 In that day there will be a highway from Egypt to Assyria. The Assyrians will go to Egypt and the Egyptians to Assyria. The Egyptians and Assyrians will worship together. 24 In that day Israel will be the third, along with Egypt and Assyria, a blessing[b] on the earth. 25 The Lord Almighty will bless them, saying, “Blessed be Egypt my people, Assyria my handiwork, and Israel my inheritance.

Footnotes:

  1. Isaiah 19:18 Some manuscripts of the Masoretic Text, Dead Sea Scrolls, Symmachus and Vulgate; most manuscripts of the Masoretic Text City of Destruction
  2. Isaiah 19:24 Or Assyria, whose names will be used in blessings (see Gen. 48:20); or Assyria, who will be seen by others as blessed
New International Version (NIV)

Holy Bible, New International Version®, NIV® Copyright ©1973, 1978, 1984, 2011 by Biblica, Inc.® Used by permission. All rights reserved worldwide.

Viewing of
Cross references
Footnotes