A A A A A
Bible Book List

प्रेषितांचीं कृत्यें 12 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

हेरोद अग्रिप्पा ख्रिस्ती मंडळीला दुखावतो

12 त्याच काळात हेरोद राजा मंडळीतील काही विशिष्ट विश्वासणऱ्यांचा छळ करु लागला. हेरोदाने याकोबाला तलवारीने मारण्याची आज्ञा केली, याकोब हा योहानाचा भाऊ होता. हेरोदाने पाहिले की, यहूदी लोकांना हे आवडले आहे. म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरविले. (हे वल्हांडण सणाच्या काळात घडले.) हेरोदाने पेत्राला अटक करुन तुरुंगात टाकले. सोळा शिपाई पेत्राभोवती पहारा देत होते. हेरोदाला वल्हांडण होईपर्यंत थांबायचे होते. मग त्याने पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना केली. म्हणून पेत्राला तुंगात ठेवण्यात आले. पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती.

पेत्र तुरुंग सोडतो

पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता. त्याला साखळ्यांनी बांधले होते. तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते. ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. अचानक देवाचा दूत तेथे उभा राहिला. तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला. देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करुन त्याला उठविले. देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल.” मग पेत्राने कपडे घातले. मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये!”

मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्या मागे चालला. पेत्राला कळत नव्हते की, देवदूत हे खरोखर काय करीत आहे. त्याला वाटले आपण दृष्टान्त पाहत आहोत. 10 पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी फाटकाजवळ येऊन पोहोंचले. शहर आणि त्यांच्यामध्ये आता फक्त फाटकच होते. ते फाटक त्यांच्यासाठी आपोआप उघडले. पेत्र व देवदूत फाटकामधून बाहेर पडले. त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला.

11 पेत्राला मग कळले की नेमके काय घडले. आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने त्याचा दूत माइयाकडे पाठविला. व त्याने मला हेरोदापासून सोडविले. यहूदी लोकांना वाटले की, माझा छळ होईल. पण प्रभूने मला या सर्वांतून सोडविले आहे.”

12 या गोष्टीची जाणीव झाल्यावर पेत्र मरीयेच्या घरी गेला. ती योहानाची आई होती. (योहानाला मार्क असेही म्हणत) पुष्कळ लोक त्या ठिकाणी जमले होते. ते सर्व प्रार्थना करीत होते. 13 पेत्राने बाहेरील बाजूने दार ठोठावले. तेव्हा रुदा नावाची दासी दार उघडण्यासाठी आली. 14 तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली. ती दार उघडण्याचेसुद्धा विसरुन गेली. ती आतमध्ये पळाली आणि लोकांना तिने सांगितले, “पेत्र दाराजवळ उभा आहे!” 15 विश्वासणारे रुदाला म्हणाले, “तू बावचळलीस!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली. म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिज!”

16 पण पेत्र बाहेरुन दार सारखे ठोठावत होता. जेव्हा विश्वासणाऱ्यांनी दार उघडले, तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले. ते चकित झाले होते. 17 पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले, मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले. तो म्हणाला. “याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा.” मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला.

18 दुसऱ्या दिवाशी शिपाई फार हताश झाले होते. पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते. 19 हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्याला शोधू शकला नाही. मग हेरोदाने पहारेकऱ्यांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली.

हेरोद अग्रिप्पाचे मरण

नंतर हेरोद यहूदातून निघून गेला. तो कैसरीया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला. 20 हेरोद सोर व सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता. ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले. ब्लस्तसला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले. ब्लस्तस हा राजाचा खाजगी सेवक होता. लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता.

21 हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरविला. त्या दिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता. तो सिंहासनावर बसून लोकांसमोर भाषण करु लागला. 22 लोक मोठ्याने ओरडून म्हणाले, “ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!” हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला. 23 आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून देवाच्या दूताने लगेच त्याला आजारी पाडले. किड्यांनी त्याला आतून खाल्ले आणि तो मेला.

24 देवाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्येत पसरत होता. व लोकांना प्रेरित करीत होता. विश्वासणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता.

25 बर्णबा व शौलाने त्यांचे यरुशलेम येथील काम संपविल्यानंतर ते अंत्युखियाला परत आले. त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes