A A A A A
Bible Book List

प्रकटीकरण 7 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

इस्राएलचे एकशे चळेचाळीस हजार लोक

यानंतर मी चार देवदूतांना पुथ्वीच्या चार कोपऱ्यांना उभे राहिलेले पाहिले. देवदूतांनी पृथ्वीचे चारही दिशांचे वारे अडविले होते. जमिनीवर, समुद्रावर किंवा कोणत्याही झाडावर वारा वाहू नये म्हणून ते वाऱ्याला थोपवीत होते. तेव्हा मी आणखी एक देवदूत पूर्वेकडून वर येताना पाहिला. या देवदूताकडे जिवंत देवाचा शिक्का होता. या देवदूताने त्या चार देवदूतांना मोठ्या आवाजात बोलाविले. हे चार देवदूत असे होते की ज्यांना देवाने पृथ्वी व समुद्राला इजा करण्याचे सामर्थ्य दिले. देवदूत त्या देवदूतांना म्हणाला, “मिनीला, किंवा समुद्राला किंवा झाडांना, जे देवाची सेवा करतात त्या लोकांना आम्ही शिक्का मारेपर्यंत इजा करु नका.”

मग मी ज्यांना शिक्का मारला होता त्यांची संख्या ऐकली. इस्राएल लोकांच्या प्रत्येक वंशावर शिक्का मारला, ते एकशे चव्वेचाळीस हजार होते.

यहूदा वंशातील 12,000 लोकांना

रऊबेन वंशातील 12,000 लोकांना

गाद वंशातील 12,000 लोकांना

अशेर वंशातील 12,000 लोकांना

नफताली वंशातील 12,000 लोकांना

मनश्शे वंशातील 12,000 लोकांना

शिमोन वंशातील 12,000 लोकांना

लेवी वंशातील 12,000 लोकांना

इस्साखार वंशातील 12,000 लोकांना

जबुलून वंशातील 12,000 लोकांना

योसेफ वंशातील 12,000 लोकांना

बन्यामिन वंशातील 12,000 लोकांना

मोठा समुदाय

यानंतर मी पाहिले, तेव्हा अफाट लोकसमुदाय मला दिसला. तेथे इतके लोक होते की, कोणालाही ते मोजता आले नसते. ते प्रत्येक राष्ट्राचे, वंशाचे, जमातीचे, आणि भाषेचे लोक होते, हे लोक सिंहासनासमोर आणि कोकऱ्यासमोर उभे होते. त्या सर्वांनी पांढरे शुभ्र झगे घातले होते आणि त्यांच्या हातात झावळ्याच्या फांद्या होत्या. 10 ते मोठ्याने ओरडत होते, “तारण आमच्या देवाचे आहे. व आमच्या कोकऱ्याचे आहे, जो सिंहासनावर बसतो.”

11 सर्व देवदूत सिंहासनाभोवती उभे होते आणि वडिलजनांच्या आणि चार प्राण्यांच्या भोवती उभे होते. ते सिंहासनासमोर पालथे पडले आणि त्यांनी देवाची आराधना केली. 12 ते म्हणाले, “आमेन! स्तुति गौरव, शहाणपण, आभार, सन्मान, सामर्थ्य आणि पराक्रम अनंतकाळासाठी आमच्या देवाची आहेत. आमेन!”

13 मग वडीलांपैकी एकाने मला विचारले, “हे पांढरे झगे घातलेले कोण आहेत? व कोठून आले आहेत?”

14 मी म्हणालो, “महाराज, आपणाला माहीत आहे.”

आणि तो वडील म्हणाला, “हे लोक मोठ्या त्रासातून बाहेर आलेले आहोत, त्यांनी त्यांची वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुतली आहेत. आता स्वच्छ व शुभ्र झाले आहेत. 15 म्हणून आता हे लोक देवाच्या सिंहासनासमोर आहेत. हे लोक देवाची त्याच्या मंदिरात रात्रंदिवस सेवा करतात आणि जो सिंहासनावर बसलेला आहे, तो त्यांचे रक्षण करील. 16 त्या लोकांना पुन्हा केव्हाच भूक लागणार नाही. त्यांना पुन्हा केव्हाच तहान लागणार नाही, सूर्यामुळे त्यांना बाधा होणार नाही. कोणतीही उष्णता त्यांना जाळून टाकणार नाही. 17 सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ असेल. ज्या झऱ्यांचे पाणी जीवन देते तेथे तो त्यांना नेईल. आणि देव त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रु पसून टाकील.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes